Dreamum wakeuppam अश्लील गाणे?

Submitted by रमेश भिडे on 17 December, 2012 - 23:54

Dreamum wakeuppam हे नवीन गाणे काही दिवसपूर्वी कानावर आले. आणि कालच पुतण्याला मुंबईत फोन केला तर हे गाणे मागे वाजत होते. कुतूहल चाळवले,म्हणून विचारले तर म्हणाला की हे गाणे तर सुपरहिट आहे...म्हणून डाउनलोड करून काळजीपूर्वक ऐकले तेव्हा मला धक्काच बसला .........................!

संगीत,ठेका ,शब्दोच्चार पद्धत इत्यादि बाबतीत गाणे catchy असले तरी गाण्याचे शब्द आणि त्यातून व्यक्त होणारा अर्थ अश्लील आहे,असे मला वाटले. अशा गाण्यांना सेन्सॉर बोर्ड परवानगी काशी काय देते बुवा?

..
Aiyyaayo..

Dreamum wakeuppam
Critical conditionum
Hey earthum quakepum
Hil dool sab shakeupum
Face to faceum dharti putram
Thighsum thunderum
Downum underum
Sizeum matterum
Thinkum wonderum
Jumpingum..
Pumpingum..
Throbbingum..
Thumpingum.. (Wune, runde, mune, naale)
Ummhha.. Ummhha..
Heart beatnum
dhol peetnum
Love lust double kasht
bada dheetnum
Yeh.. body heatnum
hot seatnum
Calling fire brigade bhi defeatnum
Same to sameum
Dil me utarum
Thighsum thunderum
Downum underum
Sizeum matterum
Thinkum wonderum
Jumpingum…
Pumpingum
Streelingum..
Pullingum.. (Wune, runde, mune, naale)
Ummhha.. Ummhha.. Ummhha.. Ummhha..

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंदार कात्रे >+१.
बघायला ही हे गाणं बंडल वाटलं एकदम. राणी मुखर्जी चा चेहेरा पुर्वी किती गोड दिसायचा. आता मात्र बघवत नाही.

शब्द लक्षात्च येत नव्हते, ठेका तालच ऐकु यायचा --- पण आता मात्र कळतेय की हे गाण अश्लिल आहे निदान ऐकायला तरी, पड्द्यावर कसे आहे माहीत नाही

बघवत नाही पडद्यावर. मुलांसमोर तर शक्यतो नकोच. हीचका तुमची टेस्ट असे तु.क. पड्तील.
गाणे रामोजी फिल्म सिटीत शूट केले आहे. त्यापेक्षा दबंग २ ची गाणी मजेशीर आहेत. वरील गाणे जरा डेस्परेट वाटले मला तरी.

एरॉटिक आणि बोल्ड आहे पण स्पूफ आहे. ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा हिंदी चित्रपटसृष्टीचा टॅकी खेळ नाहीये एवढे नक्की.

अश्लील हे ज्याच्या त्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे.
आवडणे न आवडणे हा ज्याचा त्याचा प्रश्न.

सगळी गाणी आज काल 'उ लाला' टाइप किंवा साउथ च्या इतर गाण्यांची कॉपी दिसतात.. अश्लील असो किंवा नसो, गाणं साकारणारी कन्व्हिन्सिंग नाही वाटली तर गाणं अगदीच फ्लॉप वाटतं.. राणी अगदीच मिसमॅच या गाण्याला !
'अय्या' मधे तर २० मिनिटाच्या कथेचा फार ओढून ताणून ३ तासाचा सिनेमा बनवायचा म्हणून गाणी आणि इतर वियर्ड कॅरेक्टर्स टाकलीयेत.
गंध मधे खूप छान वाटली ती गोष्ट, अय्या मधे वेडीच वाटत होती सगळी कॅरॅक्टर्स, एंटरटेन्मेन्ट व्हॅल्यु पण नाही.. मला तरी अगदीच सुमार वाटला अय्या.

बाप्रे असे एक एका गाण्याव्र एक एक धागे निघायला लागले तर काही खरे नाही. सर्व काही मार्केटिंग साठी आणि सिनेमाचा खप वाढविण्याचे उद्योग आहेत. भलेही अय्याच्या मेकिंग मध्ये मराठी माणूस गुंतलेला असला तरी हिंदी इंडस्ट्र्री चे रूल्स फॉलो करूनच हिंदी सिनेमा बनणार! निदान कमर्शियल सिनेमा तरी! आपण अश्लील, अश्लील असा पुकारा केला तरी सिनेमा, गाणे बनवणारे लोक 'पब्लिक ला तेच पाहिजे' असे म्हणत स्वतःचे समर्थन करणार ! त्यामुळे आपण डोक्याला शॉट लावून घेऊ नये.

संदर्भ लक्षात न घेता बघितले तर काहीही अश्लील वाटू शकते.
ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा हिंदी चित्रपटसृष्टीचा टॅकी खेळ नाहीये एवढे नक्की.
>>>
ह्या प्रतिक्रिया काही पटल्या नाहीत. सिनेमामध्ये आगे-पीछे काही संदर्भ घेऊन हे गाणे असेलही व त्यामुळे असे म्हणूया की सिनेमा पाहताना त्या संदर्भामुळे हे गाणे अश्लील वाटत नसेलही. पण सुट्टे ऐकताना, टिव्हीवर प्रोमोज मध्ये बघताना ते तसेच असल्याचा फील देण्यात आला आहे. आता तसे का आहे ह्याचे कारण ह्याच पोस्टीत सुरुवातीलाच मी सांगितले.

संदर्भ लक्षात घेउनही टॅकी आणि पॅथेटिक वाट्ते. कलात्मक रीत्या घेता आले असते. नायिकेला दाक्षिणात्य चित्रपटासमान भड्क पणा वैयक्तिक आयुष्यात आवडतो हे लक्षात घेतले तरीही कितीतरी दक्षिणी सिनेमे फार हळूवार व एरॉटिक पण असतात. मणिरत्नमचे सिनेमे व रहमानची गाणी बघितली तर? एक रिदम म्हणून सिनेमा आहे, कादलन, जंटल मन इत्यादी कांदुकोनेन कांदुकोनेन, आलई पायुथे वगैरे तर ग्रेट आहेत.

स्वासमे नावचे गाणे जरूर बघा. इतके मधुर आणि प्रेमळ आहे. कमल हसन चे आहे. लिरिक्स पाहिली तर तू अणुस्फोट केलास तू हिंसा केलीस असेच काय काय आहे पण टेकिन्ग व कन्स्ट्रक्षन फार स्वीट आहे.

वरील गाण्यात सिनेमाची हिरवीण प्रौढ कुमारी म्हणुन तिच्या रंगीत स्वप्नांचे हे डेपिक्षन आहे असे समजले तरीही ते जरा इन बॅड टेस्ट असे दिसते. अर्थात हे खूप सब्जेक्टिव आहे. टु ईच हर ओन.

अप्पडी पोडे वगैरे लेटेस्ट गाणी बगितली तरी ती क्लासी वाट्तील ह्या पुढे. अशोका ह्या शारुकच्या
सिनेमातील त्यांचे एक द्वंद्व गीत अतिशय एरॉटिक पण क्लासी रीत्या चित्रित केलेले आहे.

<नायिकेला दाक्षिणात्य चित्रपटासमान भड्क पणा वैयक्तिक आयुष्यात आवडतो हे लक्षात घेतले तरीही कितीतरी दक्षिणी सिनेमे फार हळूवार व एरॉटिक पण असतात. मणिरत्नमचे सिनेमे व रहमानची गाणी बघितली तर? एक रिदम म्हणून सिनेमा आहे, कादलन, जंटल मन इत्यादी कांदुकोनेन कांदुकोनेन, आलई पायुथे वगैरे तर ग्रेट आहेत. >

नायिका रात्री उशिरा टीव्हीवर लागणारी पाहत असते. त्यात अशी हळुवार गाणी दाखवतात का?

गाणे आवडणे न आवडणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तरी
>>> १. दाक्षिणात्य चित्रपटासमान भड्क पणा वैयक्तिक आयुष्यात आवडतो
२. दक्षिणी सिनेमे फार हळूवार व एरॉटिक पण असतात.
३. मणिरत्नमचे सिनेमे व रहमानची गाणी <<

या तिन्हीचा एकमेकांशी संबंध आहे का?

इव्हन रुख्मणी रुख्मणी मधेही असे शब्द आहेत ज्यावर बोल्ड म्हणून ऑब्जेक्शन घेतल असणार त्या वेळी पण पिक्चरायझेशन कोरिओग्राफी सगळच सॉल्लिड जमलय !!
थोडक्यात साकारणारी टिम चांगली पाहिजे .

त्या वेळी पण पिक्चरायझेशन कोरिओग्राफी सगळच सॉल्लिड जमलय !! <<<
+१००
त्यामुळेच गाणे किंवा सिनेमा फसलाय असे म्हणता येईल फारतर
लहान मुलांसमोर बघता येत नाही म्हणून हे चुकीचेच आहे, हे अश्लीलच आहे, असे करायलाच नको इत्यादी काही पटत नाही.

जाउ दे , मी भलत्याच ट्रॅ़क वर आहे आणि इतर चर्चा वेगळ्याच ट्रॅ़क वर चालु आहे म्हणून थोडा वेळ गप्प बसते
Proud

मणिरत्नमचे सिनेमे व रहमानची गाणी बघितली तर?>>> म्हणजे नक्की काय?
मणीरत्नमचे सिनेमे आणि रहमानची गाणी हळूवार असतात की नसतात? अश्लील वाटू शकतात की वाटू शकत नाहीत?
आठवा 'रुक्मणी रुक्मणी' हे हिंदी गाणे. ह्या गाण्याचे शब्द, चित्रीकरण अश्लील होते की नव्हते?

कॅरेकटर आणि कथेचा संदर्भ, बोल्ड, पब्लिक डिमांड काहीही असो पण हे गाणं अगदीच वाह्यात आहे. अश्लील आहे. अगदी बघवत नाही नाच आणी हावभाव. राणी भयाण.

चला....आता रात्री उशिरा लागणार्‍या असल्या सगळ्याच गाण्यांवर रसग्रहणात्मक धागे काढायला प्रत्येक वेळी परवानगीची गरज नाही Proud या चर्चेचा संदर्भ लक्षात आणून दिला की झालं.....अगदी केस लॉ सारखं Wink Biggrin

अय्या पिक्चर, त्यातली राणी, तिचा भाऊ, तिची कॉलेजातली भंकस कलीग, एकंदर पिक्चरची थीम, चेहर्‍यावरची माशीही न हालणारा सो कॉल्ड हॅन्डसम 'सुगंधी' नायक, उगाचच कुजवण्यासाठी घेतलेला सु.भा., डर्टी पिक्चर मधल्या विद्यासारखी 'फिगर' करून उत्तान नाच करणारी नायिका, सगळीच गाणी (विशेष करून एका कुठल्यातरी गाण्यातला पेट्रोल पंपावरचा सीन) आणि हे सगळं पडद्यावर आणणारा तो डायरेक्टर स.कु....... सगळंच प्रचंड गंडलेलं आहे.

अहो ह्याच काय घेवुन बसलात .... मनात आनलं तर " नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच " हेही अश्लील गाणं वाटतं .
.

दिग्दर्शकाला जे सांगायचं आहे त्यात तो सपाटून कमी पडला आहे. नगाला नग म्हणून दक्षिणी गाणे आणले आहे. तुफान मस्त गाणी असतातच पण ते व्यक्त न होता हे काहीतरी पॅथेटिक झाले आहे.
करायला नको वगैरे आजिबातच नाही पण ते फसले आहे हे दिसते आहे प्रत्यक्ष.

भडक गाणी नायिकेला आवड्तात असे लिहीले आहे. कृपया सगळे पोस्ट वाचावे.

सस्मित यांचा प्रतिसाद असा असावा असं मला वाटतं.......

"कॅरेकटर आणि कथेचा संदर्भ, बोल्ड, पब्लिक डिमांड काहीही असो पण हे गाणं अगदीच वाह्यात आहे, असं मला वाटतं. अश्लील आहे असं मला वाटतं. मला अगदी बघवत नाही नाच आणी हावभाव. राणी भयाण, असं मला वाटतं"

मंजिरी सोमणच्या पोस्टला अनुमोदन. या सिनेमातलं सगळंच बंडल होतं. तरी मंसो त्या गरगर खुर्चीवर फिरणार्‍या आजीला विसरली. ती पण काय इरिटेटिंग होती. निर्मीती सावंतच बर्‍या होत्या त्यातल्या त्यात. ( मुलीला बघायला आल्यावर म्हणायचा त्यांचा स्टॅ. डायलॉग तर एकदम भारी. Happy )

नशीब मुवी ऑन डिमांडवर ५०रुपये घालवुन पाहिला होता. मल्टीप्लेक्समधे तिकिटचे पैसे, पेट्रोल आणि खाणंपिणं हा सगळा खर्च केला असता तर फारच चिडचिड झाली असती. Happy

भडक गाणी नायिकेला आवड्तात असे लिहीले आहे. कृपया सगळे पोस्ट वाचावे. <<
संपूर्ण पोस्ट वाचले आहे.
भडक गाणी जर नायिकेला आवडतायत तर तिच्या स्वप्नातल्या गाण्यांना रोमॆंटिक, हळुवार, मणिरत्नम + रेहमान अशी ट्रीटमेंट असायला हवी ही अपेक्षाच विसंगत आहे.
ते गाणे बाजारूच असायला हवे.

Pages