महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by प्रिया७ on 18 December, 2012 - 11:06

गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्‍यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.

कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...

mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?
असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा

उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .

मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली गोष्ट आहे बाबु. आता जितक्या पातळीवर सामाजिक सुरक्षिततेचे भान राखले जाईल, तेवढे चांगलेच.

हे घ्या दिल्लीतील मेट्रो मध्ये रात्री च्या वेळी महीलां साठी आरक्षीत असलेल्या डब्या मधुन पुरुष प्रवास करतात त्यांना कोणीही हटकत नाही असे अनेक आरोप महीला प्रदर्शनकार्यानी आताच टीव्हीवर केलेत ,

हे घ्या दिल्लीतील मेट्रो मध्ये रात्री च्या वेळी महीलां साठी आरक्षीत असलेल्या डब्या मधुन पुरुष प्रवास करतात त्यांना कोणीही हटकत नाही असे अनेक आरोप महीला प्रदर्शनकार्यानी आताच टीव्हीवर केलेत ,

मुंबईतल्याही रेल्वे डब्ब्यात असतात की.. एक बायकांचा डब्बा संध्याकाळी ठराविक वेळे नंतर जनरल होतो, तर त्या वेळेच्या आधीच पुरूष घुसतात. बायका तर त्या डब्यात आधीपासुनच चढत नाहीत, कारण एकतर पुरूष मंडळी आधीपासुन घुसतात आणि जनरल झाल्यावर घुसणारे पुरुष काहीतरी वेगळेच भाव चेह-यावर ठेऊन घुसतात. असल्यांशी सामना नको म्हणुन बायका आधीच असले डब्बे टाळतात.

आता इतके जनरल डब्बे पडलेले असताना पुरूषमंडळींना हाच डब्बा का एवढा आवडतो ते काय वेगळे सांगायला पाहिजे????

आता इतके जनरल डब्बे पडलेले असताना पुरूषमंडळींना हाच डब्बा का एवढा आवडतो ते काय वेगळे सांगायला पाहिजे???? <<< +१०००

रात्री नऊ वाजता मधल्या लेडीजमधे चढताना आपली उतरण्याची वेळ ९:३० नंतरची नाही ना याचा विचार करूनच चढावे लागते. अन्यथा १० नंतर सर्वांसाठी होणार्‍या डब्यात आजूबाजूचे सगळे डबे सोडून ९:३० ला झुंडी चढतात.

२४ तास लेडीज डबे असतात त्यात उशीरा पोलिस असतात शक्यतो. मधे एकदा त्या डब्यात मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडल्यावर जरा जागरूक असल्यासारखे असतात. पण लेडिज डब्यात चढणार्‍या फुटकळ पुरूष विक्रेत्यांना मज्जाव होतोच असं नाही.

दिल्लीच्या मेट्रोमध्ये सगळे कोच एकमेकांना जोडलेले असतात. पहिला कोच महिलांसाठी राखिव असला तरी अगदी आरामात दुसर्‍या कोचम्धून पहिल्यामध्ये जाता येतं. बर्‍याचवेळा लोक पूर्णवेळ महिला कोचमध्ये बसून असतात / उभे असतात आणि स्टेशन जवळ आलं की पकडू नये म्हणून दुसर्‍या कोचमध्ये जातात.

रात्री उशिरा मेट्रोमधून प्रवासाचा अनुभव नाहीये पण मागच्या वर्षीपर्यंत भर दुपारी कमी गर्दीच्या वेळी कित्येक पुरुष महिलांच्या कोचमध्ये बसलेले /उभे असायचे. अशांना सांगूनही ते ऐकत नाहीत असा अनुभव आहे. मी बर्‍याचदा स्टेशनवर उतरून तक्रार केली आहे.

मुंबईत लोकल कनेक्टेड नाहीयेत ते बरंय नाहीतर तेही ऐकलं नसतं.
पण लेडीज डबा लागतो तिथे लोकलची वाट पहात उभे राह्यले तरी हटकले जाते पुरूषांना उशीराच्या वेळांना.

प्रचंड आणि मिडीयम गर्दीच्या वेळेला कुणी चढला पुरूष लेडीज डब्यात किंवा प्रयत्न जरी केला तरी बायका त्याला चढू देणार नाहीत, चढल्यास सांगतील आणि नाहीच उतरला, निर्ढावल्यासारखा तिथेच्च उभा राह्यला तर बायका गाडीतून फेकून द्यायला कमी करणार नाहीत. जो गर्दी किंवा मिडीयम गर्दीच्या वेळेस लोकल घेऊ धजावतो त्याला लेडीज डब्यात चढायचं नाही हे माहितच नसणं अंमळ विश्वास ठेवायला कठीण आहे.

हो इथे महिला डब्बा जिथे लागतो तिथेप्लॅटफॉर्मवर गुलाबी रंगामध्ये मार्किंग करून ठेवलेली आहे महिलांसाठी राखिव म्हणून. आणि बहूतांशी मेट्रो स्टेशनवर महिला कर्मचारी उभ्या असतात /असायच्या मदतीसाठी.

बेंगलोरमधे बस प्रवास करताना लक्षात आलेली एक चांगली गोष्ट.
जास्तीत जास्त बसेस मधे (व्होल्वो मधे जरा जास्तच), पुढच्या दरवाज्याने स्त्रिया आणि मागच्या दरवाज्याने पुरूष ये जा करतात. असा अगदी नियम नाहीये, पण ९९% वेळा लोक उत्स्फुर्तपणे तो पाळतात.
त्यामुळे गर्दीच्या वेळेस पुढच्या दारातुन पुरूष प्रवासी आत आला आहे हे फार क्वचितच घडते.
येथे लोकही मला सुज्ञ वाटले. उत्तरेकडे जी धटिंगणशाही असते, तशी इकडे दिसत नाही.

या बाफावरच या विषयाबद्दल बोलते, खरं तर वेगळा बाफ उघडायला हवा अशा चर्चेसाठी. पण इथे अगोदर त्या अनुषंगाने काही मुद्दे येऊन गेलेले आहेत म्हणून...

१. इथे लिहिणार्‍या किती पुरुष आयडींना आजवरच्या आयुष्यात गर्दीत इतर पुरुषांकडून धक्काबुक्की, नकोसे स्पर्श, छेडछाड, अंगचटीला जाणे, लगट करणे, शारीरिक जबरदस्ती, लैंगिक इजा करण्याची धमकी व त्यापोटी करून घेतलेली अवमानजनक कृती अशा वागण्याचा सामना करावा लागला आहे? किंवा असे कोणी वागताना बघावे लागले आहे? असा अनुभव तुमच्यापाशी आहे का?

२. अशा कृतीबद्दल आजवर तुम्ही कोणत्या प्रकारची अ‍ॅक्शन घेतलीत?
अ. गप्प राहिलात. काहीच केले नाही.
आ. जवळच्या व्यक्तींकडे बोलून दाखवले परंतु ठोस कृती नाही.
इ. पोलिस/ पत्रकार/ वर्तमानपत्र/ सामाजिक संस्था/ कार्यकर्ता यांची मदत घेतलीत / घेण्याचा प्रयत्न केलात.
ई. झाल्या घटनेबद्दल आवाज उठवलात.
उ. ज्या व्यक्तींनी असे केले त्यांचा सूड उगवलात / उगवण्याचा प्रयत्न केलात.
ऊ. अन्य व्यक्तीवर सूड उगवायचा प्रयत्न केलात.

३. अशा घटनेचा किंवा घटनांचा आपल्या वैयक्तिक - कौटुंबिक व सामाजिक आयुष्यावर, आपल्या निवडींवर आणि आपल्या स्वभावावर काही परिणाम झाल्याचे आपल्याला जाणवते का? त्याचा आपल्या आयुष्यातील इतर लोकांवर परिणाम झाल्याचे जाणवते का?

४. वरच्या प्रतिसादांमध्ये पुण्याच्या बालाजीनगर भागातील वसतीगृहांमध्ये पुरुषांच्या छळाचे, छेडखानी, जबरदस्तीचे प्रकार सर्रास चालतात/ ती त्याबद्दल बदनाम असल्याचे उल्लेख आहेत. अशा प्रकारच्या घटना जर राजरोस घडत असतील तर त्यांबद्दल प्रसारमाध्यमांना, पोलिसांना व न्याययंत्रणेला कळविणे, लोकांना सतर्क करणे हे आपल्याला आपले कर्तव्य वाटत नाही का?

>>>> १. इथे लिहिणार्‍या किती पुरुष आयडींना आजवरच्या आयुष्यात गर्दीत इतर पुरुषांकडून धक्काबुक्की, नकोसे स्पर्श, छेडछाड, अंगचटीला जाणे, लगट करणे, शारीरिक जबरदस्ती, लैंगिक इजा करण्याची धमकी व त्यापोटी करून घेतलेली अवमानजनक कृती अशा वागण्याचा सामना करावा लागला आहे? किंवा असे कोणी वागताना बघावे लागले आहे? असा अनुभव तुमच्यापाशी आहे का? <<<<<

अकू, पुरुषान्बद्दलचा एक उपहास म्हणून प्रश्न विचारताय की खरोखर सत्याचा शोध घेताय?
अन तुम्ही विचारल्या सर्वच प्रश्नान्सारखे काही एक वा अनेक झाले असेल, तर त्याबद्दलचा तपशील जाऊदेच, हो किन्वा नाही इतकेही उत्तर, मायबोलीवर नावपत्यासहित सर्व माहिती जाहीर झालेल्या पुरुष व्यक्ति देतील, वा त्यान्नी दिलीच पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे का?
असो, तरीही एक सहज माहिती म्हणून सान्गतो, की पुढे जाऊन भिन्नलिन्गी (अर्थात स्त्री) व्यक्तिवर अत्याचार करणार्‍या बहुतेकान्नी त्या कृतीचे अन परिणामान्चे "परिक्षण" आधी समलिन्गी अल्पवयिनान्वर केलेले असते, फक्त कृपा करुन माझ्याकडे पुरावे मागू नका, ज्यान्ना हवेत त्यान्नी पोलिसान्कडे जाऊन केस टू केस जरुर सन्शोधन करावे किन्वा इथुन पुढच्या केसेस मधे पोलिसान्ना त्या दृष्टिनेदेखिल तपास करावयास भाग पाडावे!

>>> एकच प्रश्न ...
>>> त्या मुलीच्या सोबत असणा-या मुलाचे काय झालेय ? <<<<
असले प्रश्न इथे कुणाला पडणार नाहीत किरण.., का पडणार नाहीत वा पडत नाहीत याचा अन्दाज मात्र तू सहज बान्धू शकतोस.
तो मुलगा पुरुष आहे, त्याला काय धाड भरणारे? सबल आहे ना तो? इथपासून ते पोरीबरोबर फिरायला जाताना मजा वाटते तर बाकी काही सहन केले असले तर काय बिघडले इथवर वा याहीपेक्षा पुढे जाउन काहीही वाचायची तयारी ठेव. [स्त्रीपुरुष साहचर्या पेक्षा, त्या ऐवजी केवळ स्त्रीमुक्तिचा विचार झाला की असेच होणार.]
असोच

किरण... खरे आहे. तरी इथे अगोदर पुरुषांवरही असे प्रसंग येतात, वारंवार येत असल्याचे उल्लेख आले आहेत. कशा प्रकारे सामना करतात पुरुष या प्रसंगांचा? अशा प्रकारचे वागणे आपल्याला व इतरांना भविष्यात सहन करायला लागू नये यासाठी काय जबाबदारी घेतात? त्या वर्तनाला अटकाव करण्याचा कशा प्रकारे प्रयत्न करतात? अशा घटनांकडून कोणत्या मानसिकतेतून बघतात / अनुभवतात? त्यावर काय उपाय शोधतात?

सामाजिक प्रश्नांना सामाजिक पातळीवरच वाचा फोडणे योग्य - अयोग्य हा ज्याच्या त्याच्या मताचा प्रश्न आहे.
लिंबूटिंबू उपहास नव्हे, खरोखरी जाणून घ्यायच्या इच्छेतून विचारत आहे. जिथे स्त्रियांवरच्या पुरुषांनी केलेल्या अत्याचारांची विस्ताराने, सर्वांगीण चर्चा केली जाते, तिथे पुरुषांवर पुरुषांकडून होणार्‍या शारीरिक अत्याचारांची चर्चा का नको?

अकु, हा वेगळ्या बाफचा विषय आहे.
पुरुषाकडून ( खास करुन वांद्रे / घाटकोपर ) येथे तरुणपणी अंगचटीला येण्याचे काही अनुभव मी स्वतः घेतलेत. पहिल्या खेपेस काय होतेय हे कळत नव्हते. दुसर्‍या वेळेपासून त्याच्या पायावर जोरात पाय देऊन योग्य तो धडा दिला होता. स्त्री सहकारी (मुलुंड) आणि बायकोबरोबर (जुहू) असताना छक्के त्रास देण्याचाही अनुभवलाय. दोन्हीवेळेला, सणसणीत थोबाडीत ठेवून दिलीय. आणि त्या ठिकाणी जाणे अजिबात टाळले नाही.

एकटे असताना अंगचटीला येणार्‍या स्त्रिया हा माझ्यासाठी नवीन अनुभव नाही. ( भारतात नव्हे तर देशाबाहेरही ) त्या वेळी केवळ ठाम नकार आणि दुर्लक्ष एवढे उपाय पुरेसे ठरले होते.

मूळात त्या घटनेचा विचार किंवा हे होण्यास त्याकाळात आपले चारचौघांपेक्षा देखणे असणे, कारणीभूत आहे असले विचार माझ्या मनात कधीच आले नाहीत. आज या प्रश्नाच्या निमित्ताने उल्लेख केलाय इतकेच, खरे तर मुद्दाम लिहिण्यासारखे यात काहीच नव्हते.

या बीबीचा हा विषय नाही. म्हणून माझ्या या पोस्टची चर्चा इथे आणि इतर कुठल्याही बाफ वर होऊ नये हि अपेक्षा. ( केलीत तर बघायला येणार नाही. ) -

मी पहिल्या पोस्ट पासूनच लिहितोय. हा प्रश्न स्त्री आणि पुरुष असा नाहीच आहे. एक समाज विरुद्ध विकृत मनोवृत्ती असाच आहे. किमान तो तसा असावा, अशी माझी अपेक्षा आहे. त्यामूळे चर्चा मूळ मुद्द्यावरच यावी, अशी नम्र विनंति.

अकु +१०००

पुरूषांवरही असे प्रसंग येतात तेव्हा ते काय करतात? कश्या प्रकारे प्रतिकार करतात? किंवा त्याबद्दल कायदा काय करतो? हे विचारण्यात उपहास कसला आलाय?
ज्यात त्यात उपहास कसा काय दिसतो?

नावपत्त्याचा मुद्दा कुठे आला? आम्ही सांगतो आम्ही गर्दीतून जाताना काय झेलतो ते. दर वेळेला काय नावपत्ते लिहून देतो का?

>>>> तिथे पुरुषांवर पुरुषांकडून होणार्‍या शारीरिक अत्याचारांची चर्चा का नको? <<<
नको असे मी म्हणत नाही. फक्त अशा चर्चेत कोणता स्त्री वा पुरुष आयडी "स्वानुभव" सान्गेल, जेव्हा तिची वा त्याची ओळख आगोदरच अन्य सदस्यापर्यन्त या ना त्या उपक्रमात जाहीर झाली आहे? अन तरीही सान्गायचेच असेल तर अशान्नी घ्यावी का "ड्युप्लिकेट आयडी" आपली लाज जपायला? (आपली लाज जपायला म्हणजे स्वतःस वाटणारी लाज जपायला! जर तीच जपली नाही तर मग निर्लज्जाला कुठेही निर्वस्त्र होणेही अवघड नाही, असो)
जर इथे तपशीलात काही लिहीले, भले दुसर्‍याचे म्हणून लिहीले तरी त्याबद्दल लगेच पुरावे वगैरे मागणारे आहेतच, शिवाय हल्ली म्हणे "डिपार्टमेण्टची" नजरही इथे अस्ते, तर वीस तीस वर्षान्पूर्वी अनुभवलेल्या घटन्नान्बद्दल बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल या थाटाने डिपार्टमेण्टही उतरले तर काय घ्या? यामुळे आळीमिळीगुपचिळी या न्यायाने बहुतेकजण (स्त्री अथव पुरुष) गप्पच बसणार, अन मग बाकी चर्चा करुन काय साध्य होणार?
होय, पुरुषान्वरही असे अत्याचार होतात, अगदी शाळकरी समवयस्क मुलाकडून, ते सिनियर्स वा प्रौढान्कडूनही होतात. त्याची वर्णने इथे जाहीर चर्चेच्या निमित्ताने "आम्बटशौकिनान्च्याकरता" मान्डावित का?

अशा प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूला होत असतात ब-याचदा त्या समोर येत नाहीत,मुळातच स्त्रीकडे पाहण्याची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.आपल्या कायद्यात अतिरेक्यांना फाशी वेळेवर होत नाही इतरांचे काय घेवून बसलात,
अशा प्रसंगानंतर पीडीत व्य़तींना मानसिक आधाराची गरज असते आणि त्याच वेळी पोलीस आणि कायदे अब्रूचे घिंडव्डे काढत असतात,

अकु

ड्रेसकोड या धाग्यावर माझ्या एकूण चार पोष्टी आहेत. त्यातली प्रसंगावधान, मनगटशाही आणी शहाणपण याबद्दलची पोस्ट वाचावी ही विनंती करतो. ( सध्या नेट मिळत नसल्याने पुन्हा किती दिवसांनी या बाफवर येता येईल सांगता येत नाही).

>>>> नावपत्त्याचा मुद्दा कुठे आला? आम्ही सांगतो आम्ही गर्दीतून जाताना काय झेलतो ते. दर वेळेला काय नावपत्ते लिहून देतो का? <<<<
नीरजा, गर्दीतून जातानाचे स्पर्ष वगैरे, अन अकूने विचारलेल्या प्रश्नान्ची संभावित होकारार्थी उत्तरे यात काही फरक असू शकतो असे वाटत नाही का तुला?
नसेल, तर नावपत्त्याचा मुद्दा कुठे आला हे तुला कळलेले दिसत नाही कारण माझ्यामते, कोर्टातील केसचे वृत्तांकन करताना देखिल अत्याचारीत व्यक्तिचे नावपत्ते जाहीर न करण्याचे बन्धन कटाक्षाने पाळले जात असताना इथे कोणता हरिश्चन्दाचा अवतार ज्याची "खरी ओळख" पसरली आहे तो , "हो हो माझ्यावर/बाबत असे असे झाले" असे सान्गणार आहे? व हे मुद्दे अकूनाही माहित असतील असे गृहित धरुन मी उपहासाचा मुदाही त्यान्चेकडूनच निराकरण करुन घेतला, तर त्यात चुकले काय?

प्रश्न विचारलेत, उत्तरे द्यायची असतील, देण्याची इच्छा असेल तर द्यावीत, बंधन नाही.

जर स्वतःबद्दलचा अनुभव सांगायला संकोच वाटत असेल तर इथे डुप्लिकेट आयडी व ''मित्रा''च्या नावाने ही सांगू शकता. उद्देश हाच आहे की झाकूनपाकून, आच्छादन घालून काही गोष्टी ठेवल्या तर त्या कालांतराने सडत जातात व त्यांची दुर्गंधी, त्यांपासून संसर्गाने पसरलेले रोग हे तेवढे दिसतात.... पण जोवर सडलेल्या गोष्टींचा निचरा होत नाही तोवर तो दुर्गंध व संसर्ग नष्ट होणार नाही. म्हणूनच या गोष्टी उघडपणे चर्चिल्या जायला हव्या आहेत.

त्याची वर्णने इथे जाहीर चर्चेच्या निमित्ताने "आम्बटशौकिनान्च्याकरता" मान्डावित का? <<<
याला म्हणतात दांभिकपणा..
आम्ही जेव्हा म्हणतो की आम्हाला असे अनुभव येतात तेव्हा प्रतिकार करायला हवा, गप्प बसून उपयोग नाही, लाज बाळगून वाईट प्रवृत्तीला खतपाणी घातले जाते हे सगळे सांगितले जातेय (जे योग्यच आहे!)
पुरूषांना काय अनुभव येतात? कसा प्रतिकार करतात? काय केले जाते? हे विचारल्यावर विचारणारे आंबटशौकीन लगेच....

>>>> म्हणूनच या गोष्टी उघडपणे चर्चिल्या जायला हव्या आहेत. <<<<
तुमचा मुद्दा व कळकळ पोहोचली.
मात्र अशा चर्चा वान्झोट्याच ठरतात, कारण, तुम्ही ज्या बाबी चर्चेला घेत आहात त्या घटना केवळ आजच्या २०१२ च्याच आहेत असे नाही, ज्या ज्या वेळेस, ज्या त्या मानवातील पशू जागा झालाय त्या प्रत्येक क्षणी या गोष्टी घडल्या आहेत, व त्या तशा घडतात हे सर्व "सिस्टिम्सना" ठाऊक आहे/असते. नसते ते फक्त अशाविरुद्ध काही एक करण्याचे धाडस वा कृतिशीलता. याचे सर्वसामान्य कारण म्हणजे सुपातल्यान्ना जात्यातील भरडले जात असलेल्यान्बद्दल काहीही देणेघेणे नसते हा समस्त भरतखन्डाचा इतिहास आहे. त्यातच तुम्ही आम्हिही मोडतो.
आता कृपया नीरजा, "आम्हि नाही कारण आम्ही निदान मायबोलीवर चर्चा तरी करतो तेव्हा तुम्हीच...." असला युक्तिवाद करू नका.
माझी घरी जायची वेळ झाली.

दिनेशभाऊ, सुंदर वा कोवळ्या मुलान्नाही हा प्रश्न भेडसावतोच. त्याचे अनेक दूरगामी परिणामही होतात. ज्यान्च्यावर होऊ शकत नाहीत अशा केसेस विरळ्या.

मात्र अशा चर्चा वान्झोट्याच ठरतात, कारण, तुम्ही ज्या बाबी चर्चेला घेत आहात त्या घटना केवळ आजच्या २०१२ च्याच आहेत असे नाही, ज्या ज्या वेळेस, ज्या त्या मानवातील पशू जागा झालाय त्या प्रत्येक क्षणी या गोष्टी घडल्या आहेत, व त्या तशा घडतात हे सर्व "सिस्टिम्सना" ठाऊक आहे/असते. नसते ते फक्त अशाविरुद्ध काही एक करण्याचे धाडस वा कृतिशीलता. याचे सर्वसामान्य कारण म्हणजे सुपातल्यान्ना जात्यातील भरडले जात असलेल्यान्बद्दल काहीही देणेघेणे नसते हा समस्त भरतखन्डाचा इतिहास आहे. >>>>

मला स्वतःला हे पटत नाही. म्हणजे जे काही चुकीचे घडते आहे ते पाहत कृतिशून्यतेने स्वस्थ बसणे (व मनात अस्वस्थता बाळगणे) हे उत्तर होऊ शकत नाही. आपण खांदे उडवले म्हणजे जबाबदारी झटकली जात नाही. या पुढे अशा आजूबाजूला घडणार्‍या प्रत्येक घटनेला जेवढे ती दुष्ट कृती करणारे जबाबदार असतात व असतील त्याचबरोबर तशा कृतीचा जाहीर विरोध न करणारे, त्याबद्दल गप्प बसणारे, आवाज न उठविणारे आणि ''सिस्टिम्स'' वर दोष ढकलणारेही तेवढेच असतील हेही लक्षात असूद्यात. ''वान्झोट्या'' समजल्या जाणार्‍याच अनेक चर्चांमधून व वृत्तांमधून कोणीतरी समाजात बदल घडवून आणायच्या, स्वतःत बदल घडवून आणायच्या प्रेरणेने झपाटून उठू शकते हेही लक्षात असूद्यात.

अकु, मी जेव्हा हेच लिहिलेले होते ( कि सहन करु नका / प्रतिकार करा ) तेव्हा त्यावर आलेल्या प्रतिक्रिया बघितल्या आहेत का ?

>>मात्र अशा चर्चा वान्झोट्याच ठरतात,
हे चुकीचे आहे.
>> ''वान्झोट्या'' समजल्या जाणार्‍याच अनेक चर्चांमधून व वृत्तांमधून कोणीतरी समाजात बदल घडवून आणायच्या, स्वतःत बदल घडवून आणायच्या प्रेरणेने झपाटून उठू शकते हेही लक्षात असूद्यात.
हे खूप पटले.
लिम्बूटिम्बू, अरे कृती ही विचारांनंतरच होत अस्ते. हजार वेळा बोलून एकदा घडेल. व्यक्त केलेली कुठलीही गोष्ट वाया जात नाही. एनर्जी अस्ते ती. कुठेतरी convert होत अस्ते. चांगली असो की वाईट. वाईट गोष्टी जर इतक्या धीट्पणे आणि ठळकपणे व्यक्त होत अस्तील तर चांगले विचार पण पसरलेले बरेच ना.
वाईट गोष्टी घडताना पण गुन्हेगार हजार वेळा स्वतःशी, मित्रांशी बोलत असणार. तेही कितीतरी वेळा वांझोटे ठरत असेल.

स्त्रियांनी स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे.

@ दिनेशदा , अकु

मान्यच आहे. हा प्रश्न स्त्री विरुद्ध पुरुष असा होऊच शकत नाही. तसा तो व्हावा यात रस असणा-यांकडे इग्नोर करणेच चांगले. खरंच या बाफचा विषय आहे कि स्त्रियांनी स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे. आपण सुरक्षित नाही याच्याबद्दल खूप चर्चा झालेली आहे. आता बाफच्या विषयाकडे वळायला हवं.

रस्त्यावरून जाताना मी सगळे नियम पाळतो म्हणून अपघात होणारच नाही असं आपण ठामपणे म्हणू शकत नाहीत. समोरच्याने नो एण्ट्रीतून गाडी घातली तर प्रसंगावधान बाळगणं गरजेचं. या भूमिकेतून कुणी सूचना करत असेल तर त्यांना विरोधासाठी विरोध होऊ नये असं मला वाटतं. अगदी ड्रेसकोड या धाग्यावरही हीच भूमिका माडली होती. व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल आग्रही असणं मान्य आहे. पण म्हणून कुणी भर गर्दीतून अंगावर पाच सहा लाखाचे दागिने घालून फिरत नाही तसंच गुंडांशी हुज्जत घालणे, कायदे शिकवणे हे टाळायला हवं. आधी सुरक्षितता. अर्थात हा एक छोटासा भाग झाला. असे उपाय सुचतील तसे सगळे लिहीत जाऊयात.

दिल्लीच्या सदर घटनेमध्ये बसण्याच्या जागेवरून त्या चारापैकी एकाशी वादावादी झाली होती अशी माहीती समोर येतेय. मेडीया आधी एक बाजू लावून धरतो आणि नंतर तिचा चावून चोथा झाल्यावर दुसरी बाजू घेऊन पुन्हा चर्वितचर्वण करतो. अर्थात काहीही झालं तरी कुणावर बलात्कार आणि कुणाच्या डोक्यात रॉड घालून बसबाहेर फेकणं हे समर्थनीय नाही. पण विषयच असा आहे कि प्रसंग टाळण्यासाठी थोडा कमीपणा घेऊन सुरक्षिततेला महत्व देणं हे महत्वाचं आहे किंवा नाही याबदद्ल विचार केला जावा.

अकु, मी जेव्हा हेच लिहिलेले होते ( कि सहन करु नका / प्रतिकार करा ) तेव्हा त्यावर आलेल्या प्रतिक्रिया बघितल्या आहेत का ? >> इथल्या एकूण पोस्टींमध्ये सापडविणे - शोधाशोध अवघड जात आहे.

किरण
एकुन चाललेल्या प्रतिसादावरुन असे वाटते की तुझी पोस्ट अत्यंत चांगली असुन देखील काही वेळेतच त्याचे पोस्टमार्टेम होईल बघ
अश्यावेळेला जे ऐकत असतील आणि ज्यांना खरोखरच ऐकायचे असेल अश्यांनाच सल्ला देत जा
मी स्वतः दिनेशदांच्या पोस्टीवरचे प्रतिसाद वाचले किंबहुना तु सुध्दा वाचलेच असतील
सल्ला देताना आपण कुठे आणि कुणाला देत आहे
हे कृपया लक्षात घ्या मान्यवर
उगाच आपण इतके तळामळीने पुरुष असुन ही फक्त बायकांसाठीच लिहित आहेत तरी सुध्दा त्या सल्ल्यांची हेटाळणीच जर होत असेल तर असे सल्ले देउन अपमान करुन घेउ नये

सहमत किरण / शौर्य

मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.

संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?

पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.

ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

स्त्रियावर होनारा अत्याचार ही नवीन बाब नाही आणी अनत कालापासुन हे होत आहे.आज आधुनिक तन्त्रद्यानाने आपण हे लवकर जाणू शकलो की कूणावरती तरि अन्य्या झाला .त्याची कारणे आणी त्या वरील फुट्कल चर्चा कर् न्या शिवाय आपण आपल्या स्वरक्शणा करीत काय करु शकतो का ते पाहूया.

ज्यांना आपली सुरक्षितता महत्त्वाची वाटते त्यांनी समाजात वावरतांना किमान काही गोष्टींचे कसोशीने पालन करायलाच हवे....आपले पालक जे काही सांगतात....ते काळजीपोटी सांगत असतात हे पक्के ध्यानात घ्यावे....त्या काळजीला बंधन वगैरे संबोधून ते झुगारण्याचा उगाच प्रयत्न करू नये....
एखादी व्यक्ती स्वत: कितीही पुढारलेल्या आचार-विचारांची असली तरी त्या व्यक्तीला ...त्यांच्या दृष्टीने बुरसटलेल्या समाजात नाईलाजाने का होईना जेव्हा वावरायचं असतं...तेव्हा आपल्या स्वातंत्र्याच्या कल्पनांना वेळीच आवर घालणे योग्य..नाहीतर अपघात हा होणारच....
खड्याखड्यांच्या रस्त्यावर कुणी गाड्या बेफामपणे चालवू लागला तर अपघात हा होणारच...माझी गाडी भारी आहे,ती सूसाट पळते म्हणून अशा रस्त्यांवर ती तशी चालवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आत्मनाश ओढवण्यासारखे आहे....खड्यांचे रस्ते कधी सुधारणार,कसे सुधारणार वगैरे बाबत आपण नक्कीच बोलू शकतो,तशा सूचना संबंधितांना करू शकतो...पण रस्ता सुधारल्याशिवाय गाडी सूसाट हाकणे योग्य होणार नाही हे खरे तर कुणालाच सांगायला नको...गाडीचे आणि आपलेही नुकसान होऊ नये म्हणून नाईलाजाने का होईना गाडी हळूच चालवली जाईल....तद्वतच रोजच्या जीवनात काही किमान नियम पाळले तर आपण आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो...इतके करूनही क्वचितप्रसंगी अपघात होऊ शकतो....जमलंच तर नुकसान भरपाई मागणं/मिळवणं, नाही तर तो नशीबाचा दोष समजून सोडून देणं ह्याव्यतिरिक्त आपल्या हातात काही नसतं.

शौर्य.,

>> उगाच आपण इतके तळामळीने पुरुष असुन ही फक्त बायकांसाठीच लिहित आहेत तरी सुध्दा त्या
>> सल्ल्यांची हेटाळणीच जर होत असेल तर असे सल्ले देउन अपमान करुन घेउ नये

९९% सहमत! संतापामुळे आपल्या आयाबहिणी काही अधिकउणे बोलल्या असतील तर त्यांना सहनुभूतीदर्शक म्हणून १% असहमती आहे.

आ.न.,
-गा.पै.

मा़झ्या पोस्टीतून कुणाचा अवमान झालेला असल्यास त्याने / तिने प्रत्त्युत्तर दिले तर ते समजण्यासारखे आहे. असो. मूळ मुद्द्यावर येऊयात..

दिनेशदांनी फोन करण्याचा उपाय सांगितला आहे. हा प्रत्यक्षात वापरला जातो. अजूनही ज्यांच्याकडून हे साधे उपाय फॉलो केले जात नसतील त्यांच्यासाठी ते उपयुक्त आहे.

यातले जे उपाय व्यवहार्य नाहीत ते तसे का नाहीत हे सदस्य सुचवतील तेव्हां अ‍ॅक्सेप्ट करायला हरकत नसणार आहे. अशा सहमतीच्या चर्चेतूनच पुढे जाऊयात ना ! इथे कसली आलीये वै. हार आणि जीत.

इथे कसली आलीये वै. हार आणि जीत.>>> +१०००००
काय राव उगाचच खुसपटे काढायची. जितके उपाय सुचतील ते सगळेच वापरता येतीलच आणि व्यवहार्य असतीलच असे काही नाही. त्यामुळे सल्ले देऊच नयेत हे चूक आहे.

यातले जे उपाय व्यवहार्य नाहीत ते तसे का नाहीत हे सदस्य सुचवतील तेव्हां अ‍ॅक्सेप्ट करायला हरकत नसणार आहे. <<<
प्रतिकार करा हा उपाय सर्व वेळांना, सतत का व्यवहार्य नाही हे साधारण वेगवेगळ्या पद्धतीनी अनेकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याला हेटाळणी, सल्ला घेण्याची लायकी नाही आणि तत्सम लेबले लावली गेली.

प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही याच्याशी सहमत. शेवटी आपण एक यादी बनवू शकलो तर त्यातून असे उपाय गाळता येतील.

Where is Pratibha Patil? The reason that criminals are 'fearless' because of India is having curse of President like Pratibha Patil, who cancelled death punishment of rapist and murderer. Where is she now?

आहना,
I guess she is retired now. To find out where she is, I think you can google and get her address. Please do that.

प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.

सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.

* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.

* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

वरिल बहुतेकांनी सांगितलेले आहेत त्यात माझे काही मुद्दे.

(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.

थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...

युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.

(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.

दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.

(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो... <<
+१०००००००००००

बलात्कार करणार्यांवर कठोर शिक्षा व्हायलाच हवी. माझे स्पष्ट मत असे आहे की जरी भारत डेवलप झाला आहे असे अगदी अमेरिकेने मान्य केलेले असले तरी कित्येक भारतीयांची मानसिकता डेवलप झालेली नाही. ( म्हणजे अमेरिकेची झालेय असा अर्थ काढणार्यानी पुढे वाचूही नये!) दारुड्याला जसे दररोज फटके बसले तरी फिरून तो आणि त्याला फटके मारणारेही दुसरया दिवशी एकाच गुत्त्यात आढळतात त्याचप्रमाणे बाकीच्या गुन्ह्याबाबत भारतात घडते. आज या गुन्ह्याचा निषेध करणार्यांत असे कित्येक असतील की चान्स मिळाला तर पहिले बाईला-मुलीला-मुलाला (!) आपल्या वासनेने ग्रासतील. तुम्ही कोण ते तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे. प्रश्न फक्त तुम्हाला हे जाणवायचा आणि स्वतःला बदलायचा आहे.

बलात्कारात संभोग हा दुय्यम असून 'मी तुझ्यावर अधिकार गाजवतोय्/गाजवतेय' हा मुद्दा असतो आणि ती अत्यंत वाईट मानसिकता आहे. दुर्दैवाने पुरुष हा अत्याचार बायकांवर जास्त करतात हे सत्य आहे आणि एक पुरुष म्हणून मला याची खरच लाज वाटते.

या मानसिकतेवर उपाय म्हणजे अत्यंत कठोर शासन्-व्यवस्था, त्याचे पालन करणारे व्यवस्थापक, मुले-मुली या समान आहेत हे बिंबवणारे पालक ( दोघे - फक्त आई नव्हे), समाज-शिक्षण आणि मुले-मुली या दोघाना सुदृढ करणारे उत्तम शरिरिक शिक्षण!

मुलीना शस्त्र देणे, आरोपी ना भर चौकात फाशी, हात्-पाय्-जननेंद्रीय कापणे वगरे ठीक आहे पण कायद्याच्या कक्षेत समाज रहायचा असेल तर असे उपाय कठीण आहेत. बलात्कार्याला फाशी आणि लहान मुलाचा खून करणार्याला जन्मठेप हे कायद्याला जमणार नाही. दोन्ही गुन्हे अक्षम्यच!!

कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार संदर्भात कोणत्या संस्थेकडे दाद मागावी?

क्राइम पॅट्रोल च्या एका एपिसोड मधे त्या संस्थेबद्दल सांगितले होते.
त्या एपिसोड मधे एका आर्मी शाळेत मुख्याध्यापकाकडुन शिक्षिकेबरोबर चुकीचे वर्तन घडल्यावर वरिष्ठ लष्करी आधिकार्यांनी त्याला पाठीशी घातले होते आणि ती शिक्षिका व तिला पाठिंबा देणार्या इतर स्री शिक्षिका यांना कामावरुन काढुन टाकले होते - पण या संस्थेने हस्थक्षेप केल्यानंअतर न्याय मिळाला होता - असे दाखवले होते?
त्यांची वेबसाइट पण सांगितली होती, ज्यात p हे अक्षर दोनदा आहे. (कदाचित). ही केस जयपुरची होती.

कुणाला आठवले पर क्रुपया सांगा.

तसेच,
(भारतामधे) कामाच्या ठिकाणी महिलांवर अश्लिल शाब्दिक कमेंट करणार्यांविरुद्ध काय करता येउ शकते?

http://www.maayboli.com/node/18380
इथे कामाच्या जागी होणार्‍या लैंगिक शोषण व त्यावर करता येणार्‍या कार्यवाहीची माहिती आहे.

बलात्कारात संभोग हा दुय्यम असून 'मी तुझ्यावर अधिकार गाजवतोय्/गाजवतेय' हा मुद्दा असतो आणि ती अत्यंत वाईट मानसिकता आहे. दुर्दैवाने पुरुष हा अत्याचार बायकांवर जास्त करतात हे सत्य आहे आणि एक पुरुष म्हणून मला याची खरच लाज वाटते.
------ असहमत. अधिकार गाजवतोय हा मुद्दा पटवण्यासाठी बलात्कारच कशाला करायला हवा ? ते इतर अनेक मार्गांनी दाखवता येते.
दिल्लीच्या घटनेत तर अनोळखी व्यक्ती आहेत. जिला ओळखत नाही, नावही माहित नाही त्याच्यावर कसला आला आहे अधिकार. ह्या प्रकारांना केवळ वासनेने झपाटलेले पिसाट असे म्हणेल मी.

Pages