महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by प्रिया७ on 18 December, 2012 - 11:06

गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्‍यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.

कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...

mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?
असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा

उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .

मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल्ली, हरयाना मधल्या अगदी सुशिक्षित तरुणांचा, सर्वसाधारणपणे मुलींकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आहे,
त्याची अनेकांना कल्पना असेलच. त्याची करावी तितकी निंदा थोडीच आहे.<<

+१ @ दिनेशदा

एक जेन्युइन प्रश्न : फाशी , क्यॅस्ट्रेशन , अ‍ॅम्पुटेशन असल्या गंभीर शिक्षांची जरब बसल्याने बलात्कारासारखे गुन्हे कमी होतील असे किती जंणांना वाटत आहे ?

माझे वैयक्तिक मत : शिक्षेला घाबरुन गुन्हेगार पुरावा नष्ट करणे अर्थात बलात्कारीत स्त्रीला मारण्याचाच प्रयत्न करेल Sad

उदयन - तुम्ही सुचवत असलेला प्रतिकाराचा मार्ग (ब्लेड किंवा धारदार शस्त्राने जखम करणे) धोकादायक वाटतो. समजा मुलींनी शस्त्राने प्रतिकार केला. तर अशा प्रकारे मुलींनी प्रतिकार केल्याबद्दल त्या मुलीला कायमची अद्दल घडवण्याच्या घटनां मधे भर पडेल असे वाटते. आज शस्त्राने थोडे जखमी केले तर उद्या ४ टवाळ सोबत आणेल... सर्वात आधी हातावर ताबा मिळवेल.
किती किती नराधामांशी एक मुलगी सामना करत बसणार? १, २, ३ ? दर-दिवशी?

मला भविष्याची चिंता वाटते आहे. मुलींची संख्या % वारी कमी होते आहे... अशा प्रकारच्या घटनांमुळे आज किती लोकांनी मुलगी नको म्हणुन खुणगाढ बांधली असेल? किती लोकांचे निर्णय डळमळीत झाले असतील?

मला निर्धोक, सुरक्षीत असा उपाय दिसत नाही. तरी पुरुष मंडळीं लैंगिक तसेच मानसिक शिक्षणांत कमी पडत आहेत हे प्रकर्षाने जाणवते.

ह्याचा सगळ्याचा उगम म्हणजे शिक्षा न होण्याची खात्री ह्यात आहे. जोपर्यंत पटकन आणि उगाचच फाटे न फोडता शिक्षा होत नाही तोपर्यंत हे असेच चालणार. गेल्या १०० वर्षात स्त्रियांच्या शिक्षणावर भर दिला खरे पण पुरुषांच्या शिक्षणाकडे फार काही लक्ष दिलेले नाहीये. मुळातच मुलांना अजूनही जरा जास्तच भाव दिला जातो. जोपर्यंत हे बदलत नाही आणि कायदा कठोरपणे राबवला जात नाही तोपर्यंत ह्यात काहीही फरक पडणार नाही.

हे काही फक्त भारतातच होते असे नाही. इकडे लंडन मध्ये फार दिवशी मेट्रो वर्तमानपत्रात असलेच काही ना काही झालेले वाचायला मिळते पण मुख्य फरक हा आहे कि निदान ७०% गुन्ह्यांना शिक्षा झाल्याचे पण वाचायला मिळते. आपल्याकडे कोणीच काही करत नाही आणि उगाचच आपले भारत महान आणि भारत आता महासत्ता होणार ह्याची स्वप्ने पाहत राहतात. बेसिक गोष्टी पण धड करता येत नाहीत आपल्याला. कठीण आहे.

@दिनेशदा | 19 December, 2012 - 11:12
आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे हे खरेच आहे, पण त्यापेक्षा असा गुन्हा करण्यासाठी कुणी धजावणारच नाही, अशी योजना हवी आहे. <<

उपाय सुचवा ना? तीच तर गरज आहे.

>>दिल्ली, हरयाना मधल्या अगदी सुशिक्षित तरुणांचा, सर्वसाधारणपणे मुलींकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आहे, त्याची अनेकांना कल्पना असेलच. त्याची करावी तितकी निंदा थोडीच आहे.
<<
कमी अधिक प्रमाणात हे सर्वत्र आहे.

इथे कांही स्त्रियांनी या विषयाला स्त्री- विरुद्ध- पुरुष अशा वादाचे स्वरूप आणायचा केलेला प्रयत्न अयोग्य आहे.

देव्यानी,

एक प्रयोग म्हणून हे करायला हवे. आपल्याकडे अनेक देशांतले मायबोलीकर आहेत. त्यांनी इथे लिहिले पाहिजे.

माझ्या बघण्यात दोन देश आहेत, तिथले लिहितो. ओमान मधे असा कायदा खरेच आहे का, याची कल्पना नाही.
पण तशी दशहत मात्र आहे. या दशहतीनुसार स्त्रीने पोलिसात तक्रार केली, तर त्याची चौकशी होत नाही. तिचे म्हणणे ग्राह्य मानून, कार्यवाही होते. ( हे एक टोक आहे. पण ज्या देशात स्त्रियांनी नोकरी करायची परंपराच नव्हती. तिथे आज त्या स्त्रिया अनेक क्षेत्रात मोकळेपणी वावरतात, हे काय कमी आहे ? त्यांना अजिबात धोका वाटत नाही. रात्रीच्यावेळी देखील, नर्सेस म्हणून काम करणार्‍या स्त्रिया, एकट्याच रस्त्यावरुन जाऊ शकतात.)

न्यू झीलंडमधे, शाळांचा वेळा समान असतात. त्या वेळात शाळेच्या युनिफॉर्ममधे कुठलीही विद्यार्थिनी जर एखाद्या दुकानात / मॉलमधे दिसली. तर तिला कुणीही हटकू शकते.

दिनेश....

तुम्ही तसेच अन्य काही सदस्य इथे म्हणत आहात...'आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे...". खरंय. पण सत्य परिस्थिती अशी आहे की तुम्ही आणि मी शिक्षेच्या 'कडक' पणाची व्याख्या ठरवू शकत नाही.

आयपीसी सेक्शन ३७५ व ३७६ नुसारच 'रेप' ची व्याख्या कोर्ट ठरविते [मुलगी १२ वर्षाच्या आतील असेल तर १९४८ च्या बॉम्बे चिल्ड्रेन अ‍ॅक्टमधील कलम ५७]. त्यात बरीच कलमे आणि विस्तार आहे. पैकी एक वा त्यापेक्षा अधिक कलमे त्या दुर्दैवी मुलीच्या/स्त्रीच्या बाजूने 'लीगली प्रुव्ह' झाली तरी आरोपीला आयपीसी ३५४ अंतर्गत जास्तीतजास्त ७ वर्षाची सक्तमजुरी आणि रुपये दहा हजार दंड होतो. या दंडातील विशिष्ट रक्कम [सहसा ५०%] पिडित व्यक्तीला द्यावी असे न्यायमूर्ती सुचवितात. आरोपीने दंड भरला नाहीच तर शिक्षेत तीन महिन्याची वाढ होते.

हे झाले बलात्कार प्रकरणात एकच आरोपी असेल तर......ज्या दिल्ली घटनेमुळे हा धागा चालू झाला आहे त्या प्रकरणात किमान ६ आरोपी आहेत...असतील... असे चित्र समोर येत आहे. इथे प्रश्न उपटतो तो हा की ज्यावेळी केस चालू होईल.... आरोप सिद्ध होतील....तेव्हा मग ह्या सार्‍या ६ आरोपीना स्वतंत्रपणे ७ वर्षाची शिक्षा होईल की बलात्काराच्या गुन्ह्यातील यापैकी प्रत्येकाचा सहभाग किती पातळीवरील ?

खटला सुरू झाल्यावर इथे खरी ससेहोलपट होते ती त्या मुलीची.... जिला कायद्याच्या भाषेत आता "Prosecutrix" असे म्हणण्यात येईल.... कारण आरोपींचे वकील [एकापेक्षा जास्तही असतात] त्या मुलीवर/स्त्रीवर कोर्टात हजर असणार्‍यांच्या मस्तकाची संतापाने शिर तुटेल की काय असे वाटू शकणारे प्रश्न फेकत असतात, कोर्ट त्याना थांबवत नाही.....त्या मुलीने उत्तर दिले तर ठीक, न दिले तर गुन्ह्याची पातळी [कोर्ट भाषेत Magnitude of Offense] सिद्धच होऊ शकत नाही.

मी स्वतः हजर राहिलो आहे सेशन कोर्टात ज्यावेळी अशा केसेस पटलावर येतात त्यावेळी....अन् पाहिलेही आहे की संबंधित मुलीला/स्त्रीला वकीलांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापेक्षा तत्क्षणी मरण आले तर परवडेल असे वाटल्याचे.

मी पाहिलेले एक उदाहरण : [विस्ताराने सांगू शकत नाही, तरीही....]

सेशन आणि बॉम्बे हाय कोर्टाने अशाच एका आरोपीला बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्यावर ७ वर्षाची शिक्षा सुनावली.....आरोपीचे घराणे गडगंज उद्योगपतीचे असल्याने त्यानी केस सुप्रीम कोर्टापर्यंत लढविली....तिथे त्यांच्या वकिलांनी कोणत्या आणि कायद्यातील तरतुदीच्या क्लृप्त्या किती लढविल्या ते सांगण्याचे हे ठिकाण नव्हे, पण झाले असे की सुप्रीम कोर्टाने त्या आरोपीची शिक्षा ७ वरून ५ वर आणली....पैकी चार वर्षे त्याने त्या दरम्यान अगोदरच भोगली असल्याने, आता केवळ १ वर्षाचीच राहिली....तीही त्याने मग मजेत भोगली....आणि सुटून आला, उद्योगधंद्यात पडला...स्थिरावला....यथास्थित संसारीही झाला.

...अन् ती मुलगी ?

सारे विचित्र आहे हे कायद्यातील तरतुदीचे प्रकरण मंडळी....एखाद्या काल्पनिक सिनेमापेक्षाही भयावह.

अशोक पाटील

>>दिल्ली, हरयाना मधल्या अगदी सुशिक्षित तरुणांचा, सर्वसाधारणपणे मुलींकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आहे,
>>त्याची अनेकांना कल्पना असेलच. त्याची करावी तितकी निंदा थोडीच आहे.<<

म्हणुनच मी उत्तरेकडच्या मानसिकते बद्दल लिहिले होते. तिकडे परिस्थिती गंभीर आहे, त्यामानाने दक्षिणेकडची राज्ये बरीच सुसंस्कृत, सुरक्षित (सेफ आणि सेक्युअर पब्लिक लाईफ) वाटतात. अगदी १००% नसतील पण खुपच चांगली स्थिती आहे.

मी जर काही उपाय सांगितला तर लोक तो उडवून लावतील. कारण तो अतिशय दीर्घ काळ चालणारा आहे पण परिणामकारक आहे. आपल्याला (किंवा आपल्या आणि पुढच्या १ ते २ पिढ्यांना) त्याचे परिणाम पहायला देखील मिळणार नाहीत कदाचित.

स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जसे जनजागृती केली तसे व्यापक स्तरावर अभियान चालू केले गेले पाहिजे सामाजिक समुपदेशनाचे. आणि याची सुरूवात शाळांपासुन केली पाहिजे. हे एकट्या दुकट्याचे काम नाही, अनेक सामाजिक संस्थांनी युद्ध पातळीवर या कार्याची सुरूवात केली तरच काही आशा आहे. या संस्थांचे जाळे फार भक्कम असले पाहिजे तसेच कोणतीही केस धसास लावण्याची तयारी असली पाहिजे.

आत्तापर्यंत इथे आणि वेळोवेळी इतर बाफंच्यावर सुचवले गेलेल उपाय बघितले तर....
बायकांनी असे कपडे घालावेत,
तसे बोलू नये,
या वेळेला कुठे जाऊ नये,
कोणीतरी बरोबर असल्याशिवाय कुठे जाऊ नये (कोणीतरी याचा अर्थ काय? १० गुंडांची गँग आली तर त्या गँगशी लढू शकेल अशी हत्यारे, शरीरयष्टी आणि डोकं असं असलेला बॉडीगार्ड का? तो कुठून आणायचा आता?)
गर्दीत रोज, दर तासाला असेल भले पण सतत मारामार्‍या करत रहाव्यात शिक्षण, नोकर्‍या काही करू नयेत.
आता हे सगळं करण्यातून मुलांवर संस्कार करायला वेळच मिळत नाहीये त्यामुळे पुढची पिढीही असलीच होणार हे उघड आहे.

वा...... महान आणि ढोंगी भारतीय संस्कृती ती हिच....

अशोकजी सत्य परिस्थिती कथन केली आहे. अशा घटनेत आरोपीला काहीही शिक्षा झाली तरी स्त्रीला न्याय मिळतच नाही.... घटना एक वेळा घडते, पण कोर्टात पुन्हा-पुन्हा तो प्रसंग सांगावा लागत असेल. मानसिक आघात किती खोलवर होत असेल? Sad

>>स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जसे जनजागृती केली तसे व्यापक स्तरावर अभियान चालू केले गेले पाहिजे सामाजिक >>समुपदेशनाचे. आणि याची सुरूवात शाळांपासुन केली पाहिजे. हे एकट्या दुकट्याचे काम नाही, अनेक सामाजिक >>संस्थांनी युद्ध पातळीवर या कार्याची सुरूवात केली तरच काही आशा आहे. या संस्थांचे जाळे फार भक्कम असले >>पाहिजे तसेच कोणतीही केस धसास लावण्याची तयारी असली पाहिजे.

संतांनी जसे लोकशिक्षण दिले तसे कथा, किर्तने, प्रवचने, पेपर, रेडिओ, टिव्ही, इ. माध्यमातुन सतत सतत हॅमर करत राहिले पाहिजेत सुविचार.

तर अशा प्रकारे मुलींनी प्रतिकार केल्याबद्दल त्या मुलीला कायमची अद्दल घडवण्याच्या घटनां मधे भर पडेल असे वाटते. आज शस्त्राने थोडे जखमी केले तर उद्या ४ टवाळ सोबत आणेल... सर्वात आधी हातावर ताबा मिळवेल.
किती किती नराधामांशी एक मुलगी सामना करत बसणार? १, २, ३ ? दर-दिवशी? >>>>>>>>
.
.
मग काय करायचे त्यावेळेला ? सांगा.... शांतपणे तुमच्या बरोबर जे घडेल ते घडु द्यायचे...कारण आज तुम्ही काही केले तर उद्या तो ४ जणांना आणेल.. परत करेल... ?????
..
जरा तरी मनातुन ही भीती काढा.. जो पर्यंत ही मानसिकता तुमची बदलत नाही तो पर्यंत पुरुषांची मानसिकता बदलणार नाही...कोणती गोष्ट आयती मिळत नाही....ती मिळवावी लागते..

@देव्यानी | 19 December, 2012 - 11:24
सोडुन द्या ....लोक चार दिवस चर्चा करतील ...इथे मायबोलीवर धुरळा उडेल....कदाचित त्या ४ नराधमाना फाशीही होईल पण त्याला कोण भितो ....लगेच पुढच्या काही काही दिवसात परत अशीच काही घटना घ्डेल......<<

कुणालाही फाशी होणार नाही. शिक्षा सुनावली गेली तरी 'दयाळू' राष्ट्रपती आहेतच की!

मुकु... Sad
आम्ही एकदा मैत्रिणी बसने घरी जात होतो. बस डेपो ला जाणार होती त्यामुळे बसमध्ये विशेष गर्दी नव्हती. एक माणुस पलीकडच्या सीटवर बसलेल्या एका तरु ण मुलगीला बराच वेळ ऑबझर्व्ह करत होता. आम्ही त्या मुली च्या सीटच्या मागे २ सीट वर असल्याने आम्हाला हे कळत होतें पण ती मुलगी बिचारी नवीन होती बहुतेक तिचं ल क्षच नव्हतं ह्या सगळयाकडे.. Sad नंतर त्या माणसाने फोन काढला व बोलत असल्याचे भासवत होता.. पण प्रत्य्क्षात तिचे फोटो का ढत होता. मग आम्ही सरळ उठलो आणी बसच्या मधल्या पॅसेजमध्ये त्या दोघांच्या उभे राहिलो जेणेकरुन त्याला फोटो काढताना अडथळा यावा आणी रागाचे कटाक्ष टाकले तसा तो उतरुन निघुन गेला...

बलात्कारात कामवासना पूर्ण करणे यापेक्षाही कोणावर तरी बळजबरी करता येणे, त्या व्यक्तीला रिडिक्युल करणे, आपली मर्यादारेषा ओलांडून जबरदस्तीने दुसर्‍याच्या मर्यादारेषेत जाऊन तिचा प्रतिकार मोडत आपला हक्क प्रस्थापित करणे अशी जंगली मानसिकता दिसते. शिवाय बलात्कारात जो अ‍ॅक्शन घेतो त्याला स्वत्:च्या अ‍ॅक्शनचे परिणाम सहन करावे लागत नाहीत. गर्भधारणा झाली तरी ती स्त्रीला होणार, समाज बोटही स्त्रीकडे दाखवणार.

मुळात आपल्यापेक्षा दुर्बल घटकावर वर्चस्व गाजवण्याची ही वृत्ती आहे. बलात्कारात ती पुरुषांकडून व्यक्त होते पण इतरवेळीही सगळ्यांकडून व्यक्त होत असते. सूनेचा मानभंग करणारी सासू, बायकोचा चारचौघात अपमान करणारा नवरा, हाताखालच्या लोकांवर डाफरणारा बॉस, नवर्‍याचा राग मुलांवर त्यांना फटके मारून काढणारी आई हे सगळे कमीअधिक प्रमाणात मानसिक बलात्कार करतच असतात. ज्या ठिकाणाहून प्रतिकार होणार नाही याची खात्री असते अशाच व्यक्तींवर हे घाव घातले जातात.

हा देश सोडुन दुसर्‍या कायद्याचे राज्य असलेल्या देशात निघुन जाणे हाच एकमेव पर्याय आहे. पण ते देश तरी इथल्या कीती लोकांना सामावुन घेउ शकतील.
ईथली परिस्थिती कधी ही सुधारणार नाही. मधली १०० वर्ष british लोक हा देश चालवत असल्यामुळे कायद्याचे राज्य होते.

स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जसे जनजागृती केली तसे व्यापक स्तरावर अभियान चालू केले गेले पाहिजे सामाजिक समुपदेशनाचे. आणि याची सुरूवात शाळांपासुन केली पाहिजे. हे एकट्या दुकट्याचे काम नाही, अनेक सामाजिक संस्थांनी युद्ध पातळीवर या कार्याची सुरूवात केली तरच काही आशा आहे. या संस्थांचे जाळे फार भक्कम असले पाहिजे तसेच कोणतीही केस धसास लावण्याची तयारी असली पाहिजे.

याकरता काय करता येईल ते सुचवा !

अशोक, कायद्याचे राज्य स्वीकारल्यावर, आरोपींना बचावाची संधी द्यावीच लागणार. पण अनेकदा न्यायालये, "इन कॅमेरा" खटला चालवून, थोडेफार अभय देऊ शकतात. आणि स्त्रीनेदेखील असे आडवेतिडवे प्रश्न विचारले जाणारच, अशा तयारीनेच या उलटतपासणीला सामोरे गेले पाहिजे. ( मिनाक्षि शेषाद्रीचा "दामिनी" चित्रपट आठवत असेलच.) यासाठी तिच्या वकिलानेदेखील तिची तयारी करुन घेतली पाहिजे.

मला तरी वाटतं, न्यायालये याबाबतीत काही ठोस कार्य करु शकतील.

शिवाय दुर्दैवाने अशा अपघातात ( हो. मला हाच शब्द योग्य वाटतोय.) सापडलेल्या स्त्रीलाच, झाले त्यात माझा काही दोष नव्हता, त्या अपघाताने माझे माणूसपण हरवलेले नाही असा विश्वास वाटला पाहिजे. आणि हे तर
एक समाज म्हणून आपल्याच हातात आहे.

आपल्या महान न्यायव्यवस्थेत
बलात्कार हा एकच गुन्हा आहे की ज्यात गुन्हा घडल्याचे पिडीत व्यक्तीला सिद्ध करावे लागते. गुन्हा न केल्याचे आरोपीला सिद्ध करावे लागण्याचा मुद्दा फार पुढचा.

नीधप, तसे नाही. कुठल्याही गुन्ह्यात तक्रार करणार्‍यालाच ते सिद्ध करावे लागते. त्यानंतर उलटतपासणीला तोंड द्यावे लागते. आरोपीला केवळ बचावाची संधी दिली जाते.

नीधप | 19 December, 2012 - 11:47 >>> +१

या देशात अगदी स्वतःच्या घरातसुद्धा बायकांनी हिजाब वापरणं अनिवार्य आहे आणि तरीही इथे घरातल्या घरात होणार्‍या बलात्कारांचं प्रमाण प्रचंड आहे. काहीही रिपोर्ट केलं जात नाही कारण मग त्या मुलीचं लग्न होणं कठीण. पुन्हा स्वतःच्या नातेवाईकाविरूद्ध तक्रात केली म्हणुन घरातलीच इतर मंडळी फटकुन वागणार. आता मला सांगा हिजाबमधे काय provocative असणारे?
बरं ३-४ वर्षांच्या मुलींवर अत्याचार होतात. त्यापण provocative ड्रेस करतात असं म्हणणार का?
मुद्दा इतकाच की बलात्कार स्त्रिच्या कपड्यांपेक्षा पुरूषाच्या विकृत मानसिकतेमुळे होतो.

नीधप....

"...ज्यात गुन्हा घडल्याचे पिडीत व्यक्तीला सिद्ध करावे लागते. ...."

~ प्रश्न इथेच थांबत नाही. पिडीत व्यक्ती काहीही सांगू दे, आरोपीचा वकील 'झालेला' प्रकार 'बलात्कार' च्या व्याख्येत कसा बसू शकत नाही हे त्या साक्षीवरून लागलीच सिद्ध करायला पुढे सरसावतो. [असे प्रत्यक्षात घडलेही आहे]

अशावेळी 'सिव्हिल सर्जन' च्या पेपर तपासणीची कसोटी लागते आणि मग फिर्यादी पक्षाच्या लक्षात येते की तिथेही किती हलगर्जीपणा झाला आहे रीपोर्टिंगच्या भाषेत. मी पाहिलेल्या...हजर राहाण्याची अनुमती होती मला...केसमध्ये तर कोर्टाने सिव्हिल सर्जनच्या तीन डॉक्टर्सची रीपोर्टबाबत खरडपट्टीच काढली होती.

[मला तर सविस्तर लिहिता येणे मुश्किल झाले आहे...इतकी त्या पिडीत स्त्रीची अवहेलना चालू असते केस सुरू झाल्यावर....उघड असो वा इन कॅमेरा]

फार विचित्र प्रकार असतो 'बलात्कार झाला' सिद्ध करणे. वर्तमानपत्रे, जनरेटा, चॅनेल्स यांच्यात झालेल्या वार्तांकनाला केस सुरू झाल्यावर तिथे अ‍ॅडमिट केले जात नाही. आरोपीतर्फे उभा असलेला वकील जितका कुशल तितका स्टेटचा असेलच याची खात्री नसते.

मामी, प्लीज.. यापुढे आपण अपघात हाच शब्द वापरु या.
>>> हो, दिनेशदा. बरोबर. अपघातच म्हटलं पाहिजे.

आजकाल हे प्रकार वाढले आहेत...... कसे थांबवणार हे गुन्हे???? मला एक कळत नाही, हे दळभद्री लोक कुठे फेडणार आहेत हि पापे?

अशोक, एकच गुन्हा नाही. या बाबतीत तर शारिरीक हल्ला झालेला आहे.
सरकारपक्षातर्फे, तपासकामात हलगर्जीपणा होणे आणि आरोपींनी पैश्याच्या बळावर निष्णात वकील देणे, हे नेहमीचेच. पण तपास नीट केला नाही, म्हणून पोलिसांवर कार्यवाही होईल का ? आणि अपघातग्रस्त स्त्रीसाठी देखील एखादा निष्णात वकील न मिळणे, हे आपल्यालाच नामुष्कीचे नाही का ?

ज्यावेळी या साखळीतले सर्वच घटक, पैशासाठी आपला प्रामाणिकपणा विकतात, तेव्हा तर त्या स्त्रीवर अपघातांची मालिकाच कोसळते.

या केसमधे, श्रीमती जया बच्चन किती सक्रिय सहभाग घेणार आहेत, ते मला बघायचे आहे.

राम जेठमलानी सारखा वकिल काल दिल्ली पोलिसांना लोकसभेत बरेच काही बोलत होता...
.
.असल्या वकिलाचे हे विचार कुठे जातात जेव्हा जेसिकाच्या मारेकर्यांचे आरोप पत्र घेउन त्यांना सोडवले..?
.
राष्ट्रपतीनी ने सोडले फाशी न देता... किमान त्या आरोपींना शिक्षा तरी झाली पण अश्या वकिलांविरुध्द कधी बोलणार जे शिक्षा होउच देत नाहीत ........:राग:

घडलेली घटना खरच लाजिरवाणी आहे

पण वर चालेली चर्चा (? ) ( तळमळीने मुद्दे मांडणारे काही स्त्री आयडी सोडून ) त्याहून भयानक मार्गाने सुरु आहे

फार विचित्र प्रकार असतो 'बलात्कार झाला' सिद्ध करणे. वर्तमानपत्रे, जनरेटा, चॅनेल्स यांच्यात झालेल्या वार्तांकनाला केस सुरू झाल्यावर तिथे अ‍ॅडमिट केले जात नाही. आरोपीतर्फे उभा असलेला वकील जितका कुशल तितका स्टेटचा असेलच याची खात्री नसते.
------ जर अशी वास्तुस्थिती असेल.... तर मग ज्या घटना सिद्ध झालेल्या आहेत, सर्वोच्च न्यायालया पर्यंत गेलेल्या आहेत, तेथे फाशीची शिक्शा जाहिर होते... आणि माननीय राष्ट्रपती तब्बल ३५ गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षा रद्द करतात. या यादी मधे नाव असणारा एक तर ५ वर्षे आधिच नैसर्गिक रितीने मृत झाला होता. किती घिसाड घाई ? आणि जाहिर झालेली शिक्षाच होत नसेल तर धाक रहाणार कसा ?

मानवी हक्क समजू शकतो... पण अशा अपघातांत सापडलेल्यांचा दोष काय, त्यांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कुणाची आहे ? हे राष्ट्रपतींना सल्ला सुचवणारे विचारांत घेत नाहीत का?

अत्यंत तुरळक घटना पुढे येतांत त्या तुरळक पैकी फारच कमी खटल्यांमधे आरोपींना शिक्षा होते.

शानबाग यांचे उदाहरण तर चिड आणणारे आहे... आरोपी ७ वर्षांत बाहेर, आणि ह्यांना अपघाताला सामोरे आणि वर ३५ वर्षे शिक्षा... Sad

, दिनेशदा. बरोबर. अपघातच म्हटलं पाहिजे.>> हेच लिहिणार होते आता. सर्वात आधी "बलात्कार झाला" म्हणजे त्या मुलीची इज्जत गेली, ती आयुष्यातून उठली, अथवा "आता तिच्याशी लग्न कोण करेल?" यांसारख्या समाजधारणा बदलून टाकायला हव्यात. जे काही घडलं यामधे तिची चूक नव्हती, हे जेव्हा पूर्ण समाज मान्य करेल, तिला आत्मसन्मानाने जगू देइल, तिच्या आयुष्यामधे कसलाही बदल होऊ दिला जाणार नाही, तेव्हाच बलात्कार या घटनेमधील गांभीर्य कमी होत जाईल. त्याचबरोबर "पुरूषार्थ"च्या तथाकथित कल्पनांना पण आळा बसवायला हवा. पुरूषांचे लैंगिक शिक्षण करणे गरजेचे आहेच शिवाय प्रत्येक बापाने मुलाला "समाजामधे मुलींसोबत कसे वागावे?" याचे धडे द्यायला हवेतच.

हल्ली ज्याच्या बातम्या येत आहेत त्या बहुतांश घटनांमधे बलात्कार हे "स्त्रीने भांडण काढले म्हणून" अथवा "गंमत" म्हणून केलेले आहेत. ही विचारसरणीच फार भयानक आहे. दुर्दैवाने, जिथे ही विचारसरणी जास्त प्रमाणात दिसते, त्याच भागामधे खापसारख्या मध्ययुगीन मानसिकतेचा पगडादेखील दिसतो. या मानसिकतेचा आर्थिक स्थिती, सामाजिक दर्जा आणि शिक्षणाशी काहीही संबंध नाही.

दिनेश....

नक्कीच. एकच गुन्हा झालेला नाही. शारीरिक हल्ल्याबाबतची कलमे अलग असतात. ती केस दरम्यान पटलावर येतात. यामध्येही तिरकेपणा असा असतो की बलात्काराचा आरोप सिद्ध झाला तरी मुलीवर झालेले शारीरिक हल्लेही 'त्याच' आरोपीनी केले आहेत हे देखील रितसर सिद्ध व्हावे लागते, करावे लागतात. ते काम पोलिस यंत्रणेचे तसेच मेडिकल रीपोर्टसचे.

चला...तोही आरोप व्यवस्थितरित्या सिद्ध झाला तर आता किमान दोन गुन्ह्याबाबत संबंधित आरोपींना शिक्षा सुनावली जाणार हे तर तय झाले..... शिक्षा १. बलात्कार ७ वर्षे आणि २. मुलीवर हल्ला करून शरीरास इजा पोचण्यासारख्या जखमा केल्या म्हणून ३ वर्षे सक्तमजुरी.

पण वैताग असतो तो हा की या दोन्ही कलमाखालील शिक्षा "एकत्र" भोगायच्या असतात. म्हणजे कागदोपत्री जरी १० वर्षाची शिक्षा झाल्याचे दिसते, तरी प्रत्यक्ष भोगली जाते ७.

हे सारे हास्यास्पद आहे हे खरे....पण अशीच जर तरतुद आहे कायद्यात तर त्याला तो विशिष्ट न्यायाधिश तरी काय करणार ?

>>>कधी कधी वाटतं मेंदुवर इतकं संशोधन होतंय त्यात पुरुषांच्या डोक्यातलं हे असंल किडकं केंद्र काढून टाकण्याबद्दल संशोधन व्हायला हवं. पुढे मागे ही सोय होईलही. लवकरात लवकर व्हावी.

मामींच्या ह्या मताशी पूर्णपणे सहमत आहे...प्रश्न पुरातनच आहे आणि त्यावर उपाय असा काहीच दिसत नाही...त्यामुळे अगदी फॅंटसी वाटावी असाच काहीतरी उपाय हवा म्हणजे तात्काल हे सगळं बंद होऊ शकेल...माणसाच्या मनातली सदसद्विवेकबुद्धी सतत जागृत राहील, एकमेकांच्या भावनांचा आदर करेल असे काही तरी औषध,जडीबुटी,जादूची कांडी वगैरे अशा प्रकारचे पर्याय आता हवे आहेत तरच सद्द्या जे अराजक माजलंय ते पूर्णत: थांबवता येईल....

नंदिनी, याऊलट या केसमधे त्या आरोपींची ( अगदी कोर्टात निर्दोष सुटले तरी ) जाहीर छी थू झाली पाहिजे.

अशोक, जिथे कायदा अपुरा पडतोय, तिथे समाजाने पुढे यायला पाहिजे. आणि कायदादुरुस्ती करणारे तरी वेगळे कोण असतात ? समजा असे विधेयक आणलेच, तर त्याला विरोध कोण करतेय, हे पण पुढे येईलच.

किती कट्ट्यावरच्या मुलांना टीजींग साठी शिक्षा होते? जवळजवळ नाहीच. जर प्राथमिक लेवलवर शिक्षा होताना दिसली तर काहीतरी जरब बसेल. कायदे नुसते करून/बदलून काही फायदा नाही अंमलबजावणी नसेल तर काही अर्थ नाही.

अशोकजी, भयानक आहे सगळ. तुम्ही इथे लिहिल्यामुळे हे समजलं. म्हणजे त्या अपघातग्रस्त मुलीला खरच जीव द्यावासा वाटत असेल. आधीच झालेला शारीरीक व मानसिक आघात, आणि वकिलांच्या उलट तपासणीला उत्तरे देणे, किती अवघड आहे ना? Sad

हा बाफ असंच पेटवणार, पेटणार कालांतराने ही चर्चा बंद होणार पण मुळ. मुद्दा बाजूलाच राहणार
महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

कायदा आहे पण त्या कायद्यातपण पळवाटा आहेत Sad

खरंतर अशा गुन्हेगारांना कायद्याने जनतेच्या हवली करावे असाच फतवा निघाला पाहिजे. ज्या शक्य असेल त्या मार्गाने त्याला शिक्षा द्यावी.

मानसिकता बदलायला हवी हे म्हणणे पेटणे पेटवणे वाटत असेल तर मग स्त्रियांची सुरक्षितता पेक्षा स्त्रियांनी गन लायसन्स कसे मिळवावे याची चर्चा करू.

खरंतर अशा गुन्हेगारांना कायद्याने जनतेच्या हवली करावे असाच फतवा निघाला पाहिजे. ज्या शक्य असेल त्या मार्गाने त्याला शिक्षा द्यावी.>>>>>>> +१००

आमच्या इकडे कालच घडलेली घटना आहे नाव स्थळ नाही सांगत
पण छेडछाड करणाऱ्या माणसाला जनतेने खूप चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केला. दोन दिवस जेल ची हवा खाऊन जामिनावर आज सुटलाय.

नागपुरला अश्या दोन गुंडाना महिलांनीच मारले...एक तो अक्कु यादव ज्याला १२ वर्षापुर्वी महिलांनी कोर्टात दगडांनी ठेचुन मारले.... आणि दुसरी घटना आता ह्याच वर्षीची आहे..... अजुनही केस चालु आहे पण ...पण ज्या महिलांवर अत्याचार झाला त्या समाधानी आहेत ....एका गुंडाला आपण मारले म्हणुन .......

चला कल्पना करु मिळालं गन लायसन्स. स्त्रीयांमध्ये माथेफिरू नसतात का? मग अशा एखाद्या स्त्रीने गुन्हेगाराला मारुन झाल्यावर रागाच्या भरात त्याच गनने इतर पाच पन्नास लोकांचे मुडदे पाडले तर मग ते कोलॅटरल डॅमेज म्हणून सोडून द्यायचं का? विषय काय बोलताय काय?

नाही शोभा. त्यासाठी तिला मानसिक बळ देण्याचे काम आपण केले पाहिजे. शारिरीक अपघात झालाय, पण मनावर ओरखडा उमटता कामा नये.

वरती मामी आणि प्रमोद म्हणताहेत तसा उपाय सध्यातरी कल्पनेतच आहे. पण त्यासाठी एक समाज म्हणून आपण तयारी केली पाहिजे.

माझ्या ओळखीत एक बाई आहेत. त्यांना दादरच्या गर्दीत एक माणूस धक्का मारुन पळून रस्ता क्रॉस करुन गेला. त्यांनी तिथेच ऊभे राहून, ओ दादा, ओ दादा अशा हाका मारायला सुरवात केली. आजूबाजूच्या लोकांनी त्याला थांबवला. मग या बाई, रस्ता क्रॉस करुन गेल्या. त्याची कॉलर पकडली. म्हणाल्या, " चुकून झालं असेल ना रे दादा ? " बसं एवढेच. त्या माणसाने भर रस्त्यात या बाईंचे पाय धरले. परत तो कधी असे करेल का ?
यावेळी गर्दीने पण साथ दिली हे महत्वाचे.

कट्ट्यावर बसणारी मुले कोण, कुठल्या कॉलेजमधली, याचा शोध घेणे अवघड आहे का ? मग त्यांच्या पालकांना, शिक्षकांना याची माहिती द्यायचे काम अवघड आहे ?

पण छेडछाड करणाऱ्या माणसाला जनतेने खूप चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केला. दोन दिवस जेल ची हवा खाऊन जामिनावर आज सुटलाय. >>> पण हल्ली गुन्हा घडताना बघणारेही केवळ बघ्याचीच भुमिका घेताना दिसतात. Sad

ढोंगी संस्कृतीच्या नावाने ढोल वाजवणार्‍या मानसिकतेबद्दल बोलायचं नाही. स्त्रियांनी हत्यार बाळगावे म्हणले तर स्त्रिया माथेफिरू असतात. माथेफिरू स्त्रियांना संस्कार करायला वेळ नसतो म्हणूनच सगळं वाईट घडतं...

किती ती डबल ढोलकी.

Pages