सही दही!

Submitted by मंजूडी on 8 October, 2012 - 06:09

दही विरजणे, साय विरजणे, ताक करणे, लोणी काढणे इत्यादींसाठी टिपा बाफ.
लोण्याच्या पुढच्या पायरीचे प्रश्न वारंवार आले तर आपण निराळ्या धाग्यावर चर्चा करू. Wink

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता, ते जर ३-४ दिवसाची साय असेल तरच ना. आमची जुनी शिळी साय असते त्यामुळे ताक बंडलच होता है. क्या करने का? Happy

हा बाफ वाचून इतका उत्साह आलाय की असं वाटतंय ताबडतोब घरी गेल्या गेल्या स्वयंपाक करण्या अगोदर पहिलं दहिच लावावं Proud Lol

तर हे काढलेलं लोणी पिवळसर असतं. का बरं? >>
दुध - चितळेंच्या म्हशीचं>>

मने, अग चितळ्याच्य म्हशीच्या दुधाचे साय पण पुर्ण पिवळी येते.
मी काही दिवसांपुर्वी चितळ्यांकडचच दुध वापरत होते, पण त्या पिवळ्या रंगामुळे बंद केलय.. मी ऐकलय त्यांच्याकडे म्हशीच्या दुधाचे पण २ प्रकार आहेत.. बाकी फार डिटेल्स माहित नाहित, पण हा माझा स्वतःचा अनुभव आहे...

जुनी असेल तरिही ताक चांगले होते..फक्त विरजण लावुन भांडे आधी ७-८ तास बाहेर ठेवायचे आणि मग ४-५ तास फ्रीज मध्ये ठेवुन नंतर लोणी काढायचे

मी ऐकलय त्यांच्याकडे म्हशीच्या दुधाचे पण २ प्रकार आहेत >> चितळ्यांचे? Uhoh माझ्या मते नाही. अमूलचे २ प्रकार आहेत. एक फॅटस युक्त आणि दुसरं फॅट्स काढलेलं. त्याचं दही चांगलं लागत. आय मिन लागताना लागतं चांगलं आणि चविलाही चांगलंच. Happy

मी बरिचशी मोकिमी ची पद्धत वापरते. फक्त कूकर मधे न ठेवता oven 10 C वर ठेवते आणि दिवा पण चालु असतो अवन चा. रात्रभरात मस्त घट्ट दही लागतं नंतर दुसर्‍या दिवशी ४-५ तास बाहेर ठेवते म्हणजे आंबट होतं. मी आठवड्यात एकदाच लावते आणि संपत आलं की उरलेलं दही वापरुन पुढचा लॉट.
गेले २ महिने तरी नीट लागतंय दही.

मी ऐकलय त्यांच्याकडे म्हशीच्या दुधाचे पण २ प्रकार आहेत >> चितळ्यांचे? माझ्या मते नाही. अमूलचे २ प्रकार आहेत. >> असेलही कदाचित, पण हा साय पिअवळी येण्याच अनुभव मात्र माझा अगदी चांगलाच आहे..

DAC-03 नावाचे एक कल्चर असते..
http://www.nutraingredients.com/Industry/Chr.-Hansen-develops-culture-fo...

इथे माहिती आहे.

पुण्यातही एक जागा आहे
40, Vivek Building, Nr. hadapsar Industrial Estate Pune Maharashtra India 411013
91-20-65270181
info@veterinaryfeed.com
www.veterinaryfeed.com

इथे माहिती आहे.

http://www.veterinaryfeed.com/fermento-301-Sweet.htm

भावना, केंब्रिजात?? वा! उत्तमच.
१० तपमान कसं काय ठेवतेस ओवनला?? माझ्याचे किमान ८० आहे बहुतेक!

दही जमल्यावर सांगा.........मला पावकिलो पाहिजे...........;)

बापरे, किती विज्ञान आहे दही लावण्यामागे.

अवचटांच्या 'छंदांविषयी' या पुस्तकात त्यांनी दह्याबद्दलही लिहिले आहे. कोणाकडे तरी अगदी सुंदर कवड्यासारखे लागलेले दही खाल्ल्यावर त्यांनी तसेच दही घरी करायचे मनावर घेतले. बरेच दिवस प्रयोग करत राहिल्यावर कुठे त्यांना मनासारखी रेसिपी सापडली. त्यांनी मस्त लिहिलीय ती रेसिपी.

मी त्यातला "दह्याला विरजण लावल्यावर मोजुन ४० वेळा चमच्याने एकाच दिशेने (म्हणजे क्लॉकवाईज किंवा उलटे, जसे असेल तसे पण एकाच दिशेने) ढवळावे आणि निवांत ठेवावे" हा सल्ला लक्षात ठेवला.

अर्थात ४० वेळा ढवळण्याइतका पेशन्स नसल्याने मी सरळ रवी घेते आणि दुधाला फेस येईतो घुसळते. फॅट जास्त असलेले म्हशीचे दुध असेल तर अगदी सुरीने कापता येईल असे घट्ट दही लागते, तेच गाईचे असेल तर थोडे सैल लागते.

>> चितळ्यांचे? माझ्या मते नाही. >>>>>+१
मी पण १०-१२ दिवसांची साय जमा करुन मग ताक करते. ४-५ दिवसांची साय जमा झाली की विरजण लावते, साय ढवळून फ्रिज मधे ठेवते, रोज सकाळी त्यात साय टाकते, ढवळून फ्रिज मधे ठेवते. असे करत करत १०-१२ दिवसांनी ताक करयच असेल त्या दिवशी सकाळीच विरजण बाहेर काढून ठेवते. नंतर सगळी कामे आटोपल्यावर सावकाश दुपारी ब्लेंडरने विरजण घुसळते. थंडीचे दिवस सोडुन इतर वेळी फ्रिजच थंड पाणी वापरते, त्यामुळे लोण्याचा छान गोळा होतो आणि ताकही वापरण्या योग्य रहाते.

मृदुला, हो केंब्रिज मधे. ओवन चं बटन अगदी १-२ मिमि. पुढे सरकवायचं (माझ्याकडे ते साधारण १० से. होतं)
अणि हो दिवा पण चालु ठेवायचा. ईलेक्ट्रिसिटि रात्री तिप्पट कमी असते त्यामुळे चालतं.
थोडेफार प्रयोग करावे लागतील. विरझण घातल्यावर खुप वेळ संथ फिरवायचं.

मी कोणत्याही स्टोअर ब्रँडचं लाइव कल्च्रर वालं दही वापरते सुरुवातीला.

अमेरिकेत गाईचे होल दूध पूर्ण उकळी आल्यावर कोमट झाले की विरजण लावते अन झाकून ओव्हन मधे ठेवते. ओव्हनमधे लाईट वगैरे काही नाही. पण बंदिस्त असल्याने थोडी वॉर्म्थ असतेच. अगदी थंडीचे दिवस असले तर एका भांड्यात पाणी उकळून ते भांडं पण ओव्हनमधे ठेवते.
रात्री विरजण लावून ओव्हनमधे अन सकाळी फ्रीज मधे ठेवते. संध्याकाळपर्यंत अगदी मस्त घट्ट दही लागतं.

मी विरजण लावताना थोडं विरजण वाटीत घालून त्यात कोमट दूध घालून घोटून घेते. मग हे सर्व दुधात मिसळून ५०-६० वे़ळा एका दिशेने फिरवते. नवर्‍याला हे सर्व थोतांड वाटतं - तो चमचाभर विरजण दुधात घालतो अन ३-४ वेळा ढवळतो. बस्स. पण तरी दोघांनी लावलेलं दही मस्त विरजतंय Happy

शक्यतो दूधाला विरजण रात्री लावावं. सकाळी दही लागलं की ते फ्रीजमध्ये ठेवावं. ते बाहेरच राहिलं, तर आंबट होत जातं.
>>>>>> रात्रभर दही बनवत ठेवतेस???? बापरे. माझ्या पध्दतीनं कर, दोन्-तीन तासात लागतं. अगदी गोड दही.

दूध ताजं असो, शिळं असो, दोन दुधं एकत्र केलेली असोत, फुल क्रीम असो वा नसो, गायीचं असो वा म्हशीचं असो. पद्धत हीच. माझ्या साबांनी शिकवलेली.

कोमटपेक्षा जSSरा जास्त गरम दूध. (खूप गरम नसावं. अतिगरम दुधाचं दही लागायला एक आख्खा दिवस जातो.) ते एका भांड्यात आणि दह्याचं विरजण दुसर्‍या भांड्यात घ्यावं. दूध वरून धार धरून विरजणाच्या भांड्यात ओतावं. मग या भांड्यातून त्या भांड्यात असं वरून ओतत रहावं. चांगलं १२-१५ वेळा करावं. मस्तपैकी फेस येत राहतो. इतके वेळा इथेतिथे करूनही दूध कोमट असतंच आणि तसंच असलं पाहिजे.

मग हे दूध, ज्या भांड्यात दही लावायचं आहे त्या भांड्यात घालावं. मी काचेचं भांडं घेते. भांडं सुकं असावं. ला ओपालां भांडंही चालेल. मडक्यात वगैरे घट्टं दही लागतं पण त्यातलं व्हे वाया जातं असं मला वाटतं. शिवाय नंतर ते मडकं साफ कोण करणार? सिरॅमिकच्या ग्लेझ असलेल्या भांड्यात दही लावू नये.

तर हे असं फेसाळलेलं मिश्रण घातलेलं भांडं मायक्रोवेव मध्ये ठेऊन द्यावे. जसजसं दूध थंड व्हायला लागतं तसतसं दही लागत जातं. दोनेक तासांनी भांडं किंचित हलवून बघावं. मिश्रण हलणं बंद होताच उचलून फ्रीजमध्ये ठेवावं. बरेचदा भांडं काहीसं कोमटच असतं.

या पध्दतीने लावायचं असेल तर रात्री कधीही दही लावू नये. लक्षात रहात नाही आणि रात्रभर ते बाहेरच राहतं आणि हमखास आंबट लागतं.

मामी, मायक्रोवेव चालू ठेवायचा की बंद. म्हणजे काय सेटिंग ठेवायचं?

तुमच्या साबा दही लाबायला मावे वापरतात म्हणजे भलत्याच मॉडर्न आहेत.
Happy

मामी, मायक्रोवेव चालू ठेवायचा की बंद. म्हणजे काय सेटिंग ठेवायचं?

तुमच्या साबा दही लाबायला मावे वापरतात म्हणजे भलत्याच मॉडर्न आहेत.

>>>>>>>>>>>> अगं मावे चालू थोडाच करायचाय? दही लावताना मावेचा उपयोग इन्क्युबेटरसारखा करायचा. बॅक्टेरियांना योग्य ते तपमान मिळायला गं. त्यामुळे आधी जर दुसर्‍या कशाकरता मावे वापरला असेल तर तोही आतून जरा गरम राहिलेला असतो. तेही उपयोगी पडतं. हवं तर ग्लासभर पाणी मावेमध्ये गरम करून घेऊन मग त्या मावेत हे विरजणाचं भांडं ठेवावं.

मावेच्या काळाच्याआधी साबा दह्याच्या भांड्यावर दुसरं मोठं पातेलं झाकून ठेवायच्या.

मायक्रोवेव्हच्या अगदी लो सेटींगलाही दही लागू शकते. ( असे एका मावेच्या कूकबूक मधेच वाचले होते. )
१९९१ -२०१० या काळात मी मावे वापरला, मग सोडून दिला !

सध्या तरी तुरटीचाच प्रयोग. मिल्क पावडरवर

१) पाणी खळबळ उकळायचे आणि त्यात हवी ती चांगल्या क्वालिटीची मिल्क पावडर घालायची आणि ढवळायचे. गुठळ्या राहिल्या तरी चालतात. गॅस २ मिनिटांनी बंद करायचा.

२) मग २ तासभर ते दूध तसेच ठेवायचे.

३) दूसर्‍या कपात विरजण चमच्याने जरा ढवळून घ्यायचे आणि दूधवरची साय बाजूला करुन ते टाकायचे.

४) त्या कपात थोडे म्हणजे अगदी पाव कपभर पाणी घ्यायचे आणि त्यात तुरटी फिरवायची, मग ते पाणी
विरजणात टाकायचे. ( हे मी साधारण रात्री साडे अकराला लावतो. दूध साडे नऊ / दहा वाजता केलेले असते )
अवनमधे वगैरे ठेवावे लागत नाही. सकाळी पावणेपाचला उठतो त्यावेळी मस्त घट्ट, सायीचे दही लागलेले असते.

मिल्क पावडर, निडो वापरतो.

अरे बापरे, दही लावणं फारच आणीबाणीचा विषय दिसतो. Wink

कुठचही दूध वापरून दही लागलय आतापर्यंत... (पुण्य समजायचं का?) Proud

(ह. घ्या.)

<<अरे बापरे, दही लावणं फारच आणीबाणीचा विषय दिसतो.>> खरोखरी आहेच तो.

जर दही नीट लागले नाही तर काय चुकते आहे हा प्रश्न भेडसावत रहातो. आंबट विरजणाचे गोड दही तीन-चार वेळच्या विरजण-दही प्रयोगानंतर खूप वेळा केले आहे. मला आंबट दह्याची कधी आवडते त्यामुळे आंबट दह्याचे काराचे काय (लस्सी) हा प्रश्न येत नाही.

दिनेशदा - तुरटी दह्यासाठी ही भन्नाट कल्पना आहे माझ्यासाठी, प्रसंग पडल्यास वापरेन आणि मग तुम्हाला सांगेन.

बाकी "bulgarian" दही कसे लावायचे माहीत आहे का? मी (california) बाजारातिल "bulgarian" दही विरजण म्हणून वापरले. प्रयोग फसला.

दही लावणं मी सोडूनच दिले होते... आता परत चालू करीन म्हणते.
तोपर्यंत एक प्रश्न. माउंटन हाय चे प्लेन दही आणले. नवीन डब्बा असूनही तार दिसतीय त्यात. फेकून द्यायचे का मग? दही चवीला नेहेमीसारखेच वाटतेय, पण तार प्रचंड यक्क वाटते. Sad

बस्के, युरोपियन स्टाईल दही असेल तर त्याला तार सदृश्य काहीतरी असतं, असा माझा अनुभव आहे..
मी शक्यतो युरोपियन स्टाईल आणत नाही त्यामुळे...
तसं आहे का?

ज्यांच्याकडे (भारतात) दही आंबटच होत आहे त्यांनी विरजण एकतर अगदी कमी घालावे किंवा दह्याऐवजी लोण्याने विरजण लावावे. अर्धा चमचा रूम टें. चे लोणी घेऊन नेहमीसारखे दही विरजावे(साबा देशात असेच करतात). मी नेहमी घरीच दूध विरजते (अमेरिकेत). एक दोन वेळा दक्षिणी फ्यामिली शोधून त्यांच्याकडून आणले नंतर देसी ब्रँड दह्याचे विरजण लावले तर लागले आणि माझा तो एक प्रश्न सुटला. एक (मेजरींग) कप (कोणतेही) दूध व एक टे. स्पून दही असे प्रमाण ठेवले आहे. चांगले दही लागते. उबदार ठीकाणी भांडे ठेवायचे नाहीतर त्यावर शाल, कोट असे काहीतरी घालायचे. २% दुधाचे दही चांगले लागते पण नंतर पाणी सुटते. होल मिल्कचेही चांगले लागते, जरा कमी पाणी सुटते. मात्र दूध फक्त कोमट करून भागत नाही तर त्यापेक्षा जास्त (पण उकळते नाही) टेंप. चे असावे लागते.

Pages