प्रकाशचित्र तोषवीकडून साभार.
नमस्कार मंडळी,
मोरया रे... बाप्पा मोरया रे!
गणेशोत्सव जवळ आला की वेध लागतात साजिर्या गोजिर्या गणेशमूर्तींचे, आरास आणि सजावटीचे. मग सुरु होते धांदल वेगवेगळ्या कल्पनांची, शक्कली लढवण्याची, 'जरा हटके' काही करण्याची. मग आरास अशी काही जमून येते की "अहाहा, क्या बात है!"
इथे आपल्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाचा लाभ तमाम मायबोलीकरांना घडवाल ना?
बाप्पाचा थाटमाट, सगळी सजावट, कलाकुसर, देखावे, नैवेद्य आणि काय काय...
गणपती डेकोरेशन निश्चित करतांनाची प्रक्रिया, पर्यावरणाचा, नाविन्याचा विचार, धडपड हे सुद्धा मायबोलीकरांना जाणून घ्यायला आवडेल.
त्यासंबधीचे थोडेसे.
आपण आपल्या घरच्या गणपती विषयी थोडक्यात माहिती आणि फोटो इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१२.
सर्वांच्या घरचे गणपती व
सर्वांच्या घरचे गणपती व सजवलेली आरास बघुन खुप आनंद वाटला, जणु सर्वांच्या घरी भेट देउन आल्यासारखे वाटले
....... मोदकजामची कल्पना मस्तच व हटके वाटली 
वॉव, मोदक जाम कसे बनवले?? गु.
वॉव, मोदक जाम कसे बनवले??
गु. बा. पीठ वापरून का?
हो चितळेंच्या गुलाबजाम मिक्स
हो चितळेंच्या गुलाबजाम मिक्स पासून बनवले. मोदकाचा साचा वापरला. कडेने मिश्रण लावून घेतले मग आत सुकामेवा भरला. मग परत गुलाबजाम चे मिश्रण लावले.
सगळ्यांचेच बाप्पा मस्त.
सगळ्यांचेच बाप्पा मस्त. मोदकबाप्पा क्यूट दिसतोय एकदम!
मोदकबाप्पा कसले क्युट आहेत
मोदकबाप्पा कसले क्युट आहेत
मोदकजाम ची आयड्या भारीच!
मोदकबाप्पा आणि मोदकजाम भारी!
मोदकबाप्पा आणि मोदकजाम भारी!

गणपतीसाठी बनवलेला झोपाळाही मस्त! किती उत्साहाने हे सर्व करता तुम्ही सगळे!बाप्पा नक्कीच खुष होणार सगळ्यांवर
हे माझ्या आईकडचे गौरी-गणपती
हे माझ्या आईकडचे गौरी-गणपती !
नेहमी प्रमाणे माझ्या बाबांनी फुलांचा गालीचा काढला आहे.
गणपती बाप्पा म्हणजे कलेची
गणपती बाप्पा म्हणजे कलेची देवता. अमेरिकेची Disney land बघुनच मला स्फुर्ति मिळाली. आणि त्यातुन ही कलाक्रुती साकार केली. चला तर मग आरतीला सज्ज व्हा. मिकि माउस आपल्या गोल्डन बोटमधुन आपल्या लाडक्या बाप्पाला तुमच्या घरी घेउन येत आहे.
(No subject)
बाप्पा मोरया पल्लवी, मस्त
बाप्पा मोरया
पल्लवी, मस्त आहे फुलांची रांगोळी
योगिनी, मस्त झालय डेकोरेशन
सेना, बालगणेश सुंदर!!
बापरे, कसल्या भारी आहेत एकेक
बापरे, कसल्या भारी आहेत एकेक सजावटी. ते मोदकजाम, फुलांची रांगोळी, झोपाळ्यावर गणपती, घरच्या अंगणातल्या मातीचा गणपती, डिस्नेची सजावट...
कला, अन कलाकार म्हणजे अजून काय असतं म्हणे?
हा आमच्या घरचा, देव्हारयातीलच
हा आमच्या घरचा,

देव्हारयातीलच मूर्ती आहे. वेगळी थोडीशी आरास करून बसवली आहे. उत्तरपूजा/ विसर्जन नंनत परत देव्हारयात जाऊन बसतील बाप्पा.
आणि हा क्लोजप

सगळ्यांचे गणपती सुंदर
सगळ्यांचे गणपती सुंदर आहेत्..बोटीतला बाप्पा खुप आवडला
फुलांची रांगोळी सुरे़ख झालीयं..दाद+१००
मोदकबाप्पा, मोदकजाम दोन्ही
मोदकबाप्पा, मोदकजाम दोन्ही एकदम भारी. मला आधी मोदकजाम म्हणजे pear आख्खे तळल्यासारखे वाटले होते. नंतर कळले गुलाबजाम या आकारात केलेत ते
फुलांचा गालीचापण छान आहे.
आमच्या घरचे बाप्पा :- पर्थ.
आमच्या घरचे बाप्पा :- पर्थ. ऑस्ट्रेलिया...
आणि गौरी...
योगिनी, मस्त सजावट! कल्पना
योगिनी, मस्त सजावट!
कल्पना खूप आवडली.
सगळे गणपतीबाप्पा खूप सुंदर
सगळे गणपतीबाप्पा खूप सुंदर दिसताहेत.
घरी घडवलेले सगळेच बाप्पा विशेष आवडले
बाप्पा येण्या आधी सर्व तयारी
बाप्पा येण्या आधी सर्व तयारी झाली. फ्रेम लाकडाची स्टॅड लाकडाचाच आणि खरी फुले.
हे आमचे बाप्पा,
स्थानापन्न झाले.
आमच्या घरचा गणपती
आमच्या घरचा गणपती
*
*
वा..कित्ती बाप्पांचं दर्शन
वा..कित्ती बाप्पांचं दर्शन मिळालं..

हे आमच्या घरी आलेले बाप्पा.
आणि आरास

मंगलमूर्ती मोरया !!
हा माझ्या माहेरचा गणपती
हा माझ्या माहेरचा गणपती
दीपा, सुंदर पदार्थ !
दीपा, सुंदर पदार्थ !
सगळ्यांचे बाप्पा आणि आरास
सगळ्यांचे बाप्पा आणि आरास सुंदर. स्वतः घडवलेल्या बाप्पांचं खास कौतूक!!
दिपा, मोदकजाम अफलातून कल्पना!!!
हे आमचे बाप्पा..त्यांची आरास आणि नैवेद्य...
आणि बाप्पांचे नवे वाहन...

(No subject)
(No subject)
कोटी कोटी रूपे
कोटी कोटी रूपे तुझी...............बाप्पा, मित्रमंडळींना अप्रत्यक्षरित्या का होईना, भेटायची संधी मिळतेय तुझ्यामुळे. किती प्रकारच्या सजावटी, किती सुंदर आरास, तुझा मनापासून केलेला आणि चुकला तरी तू गोड मानून घेतलेला नैवेद्य, आणि सगळ्यांत महत्वाचा तुझ्या प्रत्येक रूपातला गोडवा............सगळंच विलक्षण! बाप्पा, हे सगळं असंच उत्साहात अखंडितपणे चालत राहो, हीच तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना!
सर्वांचे बाप्पा सुंदर, आणि
सर्वांचे बाप्पा सुंदर, आणि तुम्हा सर्वांचा हेवा वाटतो,
तुम्हाला सजावटीला भरपूर वेळ मिळतो, मनात भरपूर आयडीया असून सुद्धा आम्हाला वेळ मिळत नाही
आमचे गणेशराज २०१२
गणेशमूर्ती शाळा असल्याने सजावटीला फारसा वेळ कधीचं मिळाला नाहीये, तरीपण बाप्पा विराजमान होण्या आधी मिळालेल्या काही अवधीत काय ती सजावट.
आमचा बापा नेहमीच उशीरा तयार होतो भटजी येवून बसले तरी आमचा बाप्पा तयार होत (रंगकाम) असतो
नैवेद्यम

गंगा गौर

विसर्जन बापा निघाले गावाला


चैन पडेना आम्हाला
हे आमच्याकडचे
हे आमच्याकडचे बाप्पा.

आमच्याकडे बाप्पा गौरींच्या मधे असतात

गौरी

आणि हा प्रसाद

व्वा...सुंदर गं! बाप्पांचं
व्वा...सुंदर गं! बाप्पांचं दर्शन अगदी प्रसन्न. त्यांचे डोळे किती शांत, तेवत रहाणारे दिसतायत. गौरीची सजावट तर झक्कास!:)
केदार तुझा बाप्पा पण फार आवडला. कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे. आणि केळीच्या पानावर जेवण. बघुनच तृप्त जहालो.
Pages