आमचा गणपती (घरचा)

Submitted by संयोजक on 5 September, 2012 - 02:47

amacha%20ganapatiCollage.jpg
प्रकाशचित्र तोषवीकडून साभार.

नमस्कार मंडळी,

मोरया रे... बाप्पा मोरया रे!
गणेशोत्सव जवळ आला की वेध लागतात साजिर्‍या गोजिर्‍या गणेशमूर्तींचे, आरास आणि सजावटीचे. मग सुरु होते धांदल वेगवेगळ्या कल्पनांची, शक्कली लढवण्याची, 'जरा हटके' काही करण्याची. मग आरास अशी काही जमून येते की "अहाहा, क्या बात है!"

इथे आपल्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाचा लाभ तमाम मायबोलीकरांना घडवाल ना?
बाप्पाचा थाटमाट, सगळी सजावट, कलाकुसर, देखावे, नैवेद्य आणि काय काय...
गणपती डेकोरेशन निश्चित करतांनाची प्रक्रिया, पर्यावरणाचा, नाविन्याचा विचार, धडपड हे सुद्धा मायबोलीकरांना जाणून घ्यायला आवडेल.

त्यासंबधीचे थोडेसे.

आपण आपल्या घरच्या गणपती विषयी थोडक्यात माहिती आणि फोटो इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.

धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१२.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा आमच्या घरचा बाप्पा!
bappaa.jpg

आरासकाम करण्यात मित्र, मैत्रीण, नवरा, थोरली लेक आणि बारकी लेक यांचा मोलाचा वाटा आहे!
विकएंडला मित्र-मैत्रीण खास आरासकाम करण्यासाठी आले होते. त्यांच्या येण्याने आमचाही उत्साह दुणावला!
मुलींना तर खुप काही काही करायचे होते. एकंदरीत हसत-खेळत काम झाल्याने मजा आली.
विड्याची/आंब्याची पाने न मिळाल्याने बाप्पानेच दिलेल्या आयडीयेच्या कल्पनेनुसार हिरव्या रंगाचा कागद वापरुन विड्याची पाने तयार करण्यात आली आणि बाप्पा स्थानापन्न झाले.

आता पुढचे दहा दिवस आनंदात जाणार आहेत. दर्शनाला येणारा मित्रपरिवार, मोठ्या आणि बर्‍याच आरत्या, प्रसाद यांची रेलचेल असणार आहे. 'येइ गं विठ्ठले माझे माऊली गे' ही आरती म्हणायचीच अशी खास फर्माईश लेकींनी केली आहे! तसेच 'हरे राम हरे राम.......हरे कृष्ण....हरे' हे भजन हव्वेच असे धाकटीने सांगितले आहे. तिला 'र' ऐवजी 'ल' म्हणावा लागतो ते सोडा! Biggrin

अजुन अपडेटस देतच राहीन!

हा माझ्या घरचा गणपती. ही मुर्ती जयपुरी आहे. आई असल्यामुळे दहा दिवस गणपती ठेवलेत. खूप दिवसांची मनोकामना पुर्ण झाली. आता रोज हार, दुर्वा, आरती करताना शाळेचे दिवस आठवत आहेत. तिथे तगर, कण्हेर, पारिजात ही फुले हमखास मिळायचीत. इथे चाफ्याची विविधरंगी फुले आहेत. घंटीचे फुले आहेत. पहिला हार गुलाबीजांभळा चाफा आणि पिवळा चाफा ह्यांचा.

2_0.jpg3_0.jpg1_2.jpg

छान आहेत दोन्ही आरास.
बी व वत्सला मस्त केलीय मांडणी.
इकडे विड्याची पानं मिळायला मारामारी आहे.

वत्सला, बी - सुरेख आहे आरास.
वत्सला, तुझ्या लेकींना गणेशोत्सव आवडतोय, हे वाचून मस्त वाटलं Happy

किती देखण्ञा मूर्त्या, सुंदर आरास आणि सजावटी आहेत सगळ्यांच्या!

हिम्सकूलच्या आजोबांनी काढलेल्या रांगोळ्या सुंदर असतात!

व्वा! सुंदर आहेत सगळ्यांचे बाप्पा Happy

वत्सला, मुलींना उत्सव आवडतोय हे छानच Happy

बी, १० दिवस आई बरोबर गणेशोत्सव साजरा करणार म्हणजे ग्रेट्च Happy

सिंडरेला, तुमच्या बाप्पांसमोर मोत्याचा लाडु आहे का तो?

खूप सूंदर मूर्त्या, सुंदर आरास आणि सजावटी आहेत सगळ्यांच्या! मला सुद्धा इथे सर्वांच्या घरच्या गणेशांचे दर्शन होणार!! खूप मिस करते आहे हे सगळे. Sad

लाजो, लाडू म्हणा नारळ म्हणा मोदक म्हणा Happy खरा प्रसाद लंपास होतो म्हणून हा मोत्याचा प्रसाद ठेवलाय.

सगळ्यांच्या घरचे गणपती सुंदर आहेत..

वत्सला, आमच्याकडे पण 'येइ ओ विठ्ठले माझे माऊली गे' ह्या आरतीची फर्माईश होते मित्र मंडळींकडुन Happy
मस्त जाणार हे १० दिवस

सुरेख बाप्पा, सुंदर सजावटी!

यंदा मी आणि राहुलने घरी एयर ड्राय क्ले पासून बनवलेला बाप्पा आणि त्याची पूजा-

साधारण आकार-
ganesha3.jpgganesha2_0.jpg

उंदीरही आहे-

ganeshpj2.jpg

हा आमचा गेल्यावर्षीचा बाप्पा.. या वर्षीचे प्रचि पुढच्या आठवड्यात गावाला गेल्यावर....
IMG_1424_0.jpg

Pages