आमचा गणपती (घरचा)

Submitted by संयोजक on 5 September, 2012 - 02:47

amacha%20ganapatiCollage.jpg
प्रकाशचित्र तोषवीकडून साभार.

नमस्कार मंडळी,

मोरया रे... बाप्पा मोरया रे!
गणेशोत्सव जवळ आला की वेध लागतात साजिर्‍या गोजिर्‍या गणेशमूर्तींचे, आरास आणि सजावटीचे. मग सुरु होते धांदल वेगवेगळ्या कल्पनांची, शक्कली लढवण्याची, 'जरा हटके' काही करण्याची. मग आरास अशी काही जमून येते की "अहाहा, क्या बात है!"

इथे आपल्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाचा लाभ तमाम मायबोलीकरांना घडवाल ना?
बाप्पाचा थाटमाट, सगळी सजावट, कलाकुसर, देखावे, नैवेद्य आणि काय काय...
गणपती डेकोरेशन निश्चित करतांनाची प्रक्रिया, पर्यावरणाचा, नाविन्याचा विचार, धडपड हे सुद्धा मायबोलीकरांना जाणून घ्यायला आवडेल.

त्यासंबधीचे थोडेसे.

आपण आपल्या घरच्या गणपती विषयी थोडक्यात माहिती आणि फोटो इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.

धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१२.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

सर्वांच्या आराशी, सजावटी, मूर्ती सुरेख दिसत आहेत. प्रसन्न वाटले Happy

आमच्या घरी गणपती बसत नाहीत. पण यंदा मुलाने कार्यशाळेत जाऊन मूर्ती घडवली-

19092012516.jpg20092012525.jpg

सुंदर !

गणपती बाप्पा मोरया !

तसे घरात पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या ’श्री मंदार गणेशाचा’ वास कायम असतोच. इतके वर्ष आई-आण्णांकडे असलेल्या या ’श्री मंदार गणेशाचे” या वर्षी आमच्या पुण्यातील घरात आगमन झाले. आता यापुढे ’श्रींचा निवास’ कायम आमच्या या घरी असेल. Happy

त्या बरोबरच या वर्षी आमच्या घरी अवतरलेले दिड दिवसाचे गणपती बाप्पा Happy

वाह सर्वांचे बापा आणि आरास, मखर खूप सुरेख आहेत आमचे पण येतील माबोवर लवकरच

@ विशाल ’श्री मंदार गणेशाचे” मला याबद्दल माहीती कमी आहे सांगू शकाल काय ?

@केदार२० 'मंदार गणेश' म्हणजे रुईच्या (मंदार) झाडाच्या खोडापासून बनवलेली श्रींची प्रतिमा. मंदार गणेश बहुतांशी नवसपुर्तीसाठी पुजला जातो. एकदा घरात त्याची प्रतिष्ठापना झाली की तो पुढे एका पिढीपासून दुसर्‍या पिढीकडे जात राहतो. इथे वैशिष्ठ्य म्हणजे कुठल्याही 'रुई'च्या झाडाचे खोड चालत नाही, तर स्वतःहून आपोआप वाळुन गेलेल्या झाडाचे खोडच यासाठी वापरले जाते.

रुईच्या (मंदार) झाडाच्या खोडापासून >>>> ज्या रुईला पांढर्‍याशुभ्र रंगाची फुले येतात तिला मंदार असे म्हणतात.. बर्‍याचश्या रुईच्या झाडांना जांभळट निळी फुले येत असतात..

आमच्या घरचे बाप्पा Happy
सगळी सजावट मी एकटीने केलीये. त्यामुळे मी जास्त भाव खाऊन घेतेय घरात Wink

New photo2358.jpgNew photo2356.jpgNew photo2357.jpgNew photo2359.jpgNew photo2361.jpg

पहिल्यांदाच मोदक करायचा प्रयत्न केला. कणकेचे छान झालेले पण तांदळाच्या उकडीचे मोदक पार फसले. टेस्टी होऊनही मोदक वाटू नये इतका आकार गणला. मग ११ च केले.
कारण १ : आई सांगत होती मी शिकवते पण मी ऐकलं नाही
कारण २ : आधी मोदक केले मग हह ची कृती वाचायला घेतली आणि कळालं की सगळी प्रोसेस उलटी पालटी केलीये.
कारण ३ : भाजतय म्हणुन उकडं गार होईपर्यंत वाट पाहात बसले.
असो! आता चुका कळल्या आहेत मग पुढल्या वेळेला जमतील बहुदा.

New photo2362.jpg

सगळ्यांची आरास छान. मस्त वाटतंय बघायला.
माझ्या माहेरी मधल्या काकाकडे असतो गणपती आता य वर्ष झाली गणपतीसाठी गेले नाहीये तिकडे.
पण पूर्वी मी आणि माझा चुलतभाऊ मिळून प्रचंड उत्साहाने आरास करत असू. जुना वाडा होता तेव्हा तर जास्तच उत्साह. ते सगळे आठवले. Happy

रॉकी हिल मधील आमच्या गेल्या ५ वर्षाच्या वास्तव्यातील यंदाचा गणेशोत्सव सर्वात जास्त आनंददायक ठरला , मूर्ती देखील श्रींनी माझ्या हातून चांगली घडवली, आदित्य नि (माझ्या मुलांनी) सुरेख रंगवली, सर्व मित्रांनी रात्री २ पर्यंत जागून आरास तयार करण्यात मदत केली आणि आरती थेट भारतात होते तशी- एकदम दणक्यात !!
बोर्हाडे , जोग ,,नाम्ले ,खाडिलकर , मालपाणि, बहेति, सक्सेना ,कुतुम्बीय ,दुबे ,गोपाल दुरै, कवित गोपल, , हेमलतता,अश्वन्त सुदर्शन, ललिता व सतिश इशानि नेश्नि , अमिर्ता आनन्द्राज श्र्री , प्रगति शर्म-गोतम मोहन्ति , अनापार्थि कुतुम्बीय सर्वान्चे मनापासून आभार .

http://dl.dropbox.com/u/56648009/Ganeshotsav2012/Ganeshotsav2012_0001.mp4

http://dl.dropbox.com/u/56648009/Ganeshotsav2012/MVI_0020.MOV

मस्तच आहेत सगळ्यांचे बाप्पा.

यंदा मी शाडूची मूर्ती घरी बनवली:

हा रंगकाम झाल्यावरचा फोटो:

आणि हा पूजा केल्यावरचा:

सजावटीसाठी काहीही विकत आणलेलं नाही. घरात, त्या अर्ध्या तासात जे काही हाती लागलं, ती सजावट. फुलं सुद्धा बागेतलीच. Happy

सुरेख...

लोला व गौरी चे हाताने केलेले फार आवडले. वर बाप्पांची रांगोळी पण काढलीये ती पण मस्त.

वंदन गजवदना _/\_

सुंदर बाप्पा Happy मन प्रसन्न झाले.

आमच्या बाप्पाचा फोटो घरी जाऊन उपलोड करते Happy

सर्वांच्या घरच्या बापांच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले..
सजावटींतून तुम्हा सर्वांचे उत्साह,मेहनत दिसून येतीये..
खूप छान वाटलं!! Happy

सगळ्यांचे मनापासून आभार.. अगदी घरी बोलवल्यासारखं वाटतय. किती मनापासून तयारी, आरास... कशी लगबग... बाप्पावरचं सगळं सगळं प्रेम ह्या प्रचिंमधून सांडतय.
बाप्पाची उठबस हे कुणी घरी आलेल्या गडगंज पावण्या-रावण्याच्या उस्तवारी सारखं नाही नै?
वाट बघू बघू केलेल्या, कडकडून भेटण्याची आस लावून गेलेल्या, गेल्याच वर्षी पुन्हा येतो हं असं आश्वासून गावी गेलेल्या आपल्या बाप्पासाठी केलेली ही लगबग आहे.
काय जास्तं झालं तर बाप्पा समजून घेतील... कमी पडलं तर बाप्पाच काय ते बघतिल... असं घरचं, मायेचं, आपुलकीचं.
बाप्पा असाच तुमच्या घरी वर्षनुवर्षे प्रेमानं येत राहो...
मोरया...

Pages