आमचा गणपती (घरचा)

Submitted by संयोजक on 5 September, 2012 - 02:47

amacha%20ganapatiCollage.jpg
प्रकाशचित्र तोषवीकडून साभार.

नमस्कार मंडळी,

मोरया रे... बाप्पा मोरया रे!
गणेशोत्सव जवळ आला की वेध लागतात साजिर्‍या गोजिर्‍या गणेशमूर्तींचे, आरास आणि सजावटीचे. मग सुरु होते धांदल वेगवेगळ्या कल्पनांची, शक्कली लढवण्याची, 'जरा हटके' काही करण्याची. मग आरास अशी काही जमून येते की "अहाहा, क्या बात है!"

इथे आपल्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाचा लाभ तमाम मायबोलीकरांना घडवाल ना?
बाप्पाचा थाटमाट, सगळी सजावट, कलाकुसर, देखावे, नैवेद्य आणि काय काय...
गणपती डेकोरेशन निश्चित करतांनाची प्रक्रिया, पर्यावरणाचा, नाविन्याचा विचार, धडपड हे सुद्धा मायबोलीकरांना जाणून घ्यायला आवडेल.

त्यासंबधीचे थोडेसे.

आपण आपल्या घरच्या गणपती विषयी थोडक्यात माहिती आणि फोटो इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.

धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१२.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांच्या घरचे गणपती व सजवलेली आरास बघुन खुप आनंद वाटला, जणु सर्वांच्या घरी भेट देउन आल्यासारखे वाटले Happy ....... मोदकजामची कल्पना मस्तच व हटके वाटली Happy

हो चितळेंच्या गुलाबजाम मिक्स पासून बनवले. मोदकाचा साचा वापरला. कडेने मिश्रण लावून घेतले मग आत सुकामेवा भरला. मग परत गुलाबजाम चे मिश्रण लावले.

मोदकबाप्पा आणि मोदकजाम भारी! Happy
गणपतीसाठी बनवलेला झोपाळाही मस्त! किती उत्साहाने हे सर्व करता तुम्ही सगळे!बाप्पा नक्कीच खुष होणार सगळ्यांवर Happy

IMG_0397.jpgIMG_0386.JPGIMG_0390.JPG

गणपती बाप्पा म्हणजे कलेची देवता. अमेरिकेची Disney land बघुनच मला स्फुर्ति मिळाली. आणि त्यातुन ही कलाक्रुती साकार केली. चला तर मग आरतीला सज्ज व्हा. मिकि माउस आपल्या गोल्डन बोटमधुन आपल्या लाडक्या बाप्पाला तुमच्या घरी घेउन येत आहे.

बाप्पा मोरया Happy

पल्लवी, मस्त आहे फुलांची रांगोळी Happy

योगिनी, मस्त झालय डेकोरेशन Happy

सेना, बालगणेश सुंदर!! Happy

बापरे, कसल्या भारी आहेत एकेक सजावटी. ते मोदकजाम, फुलांची रांगोळी, झोपाळ्यावर गणपती, घरच्या अंगणातल्या मातीचा गणपती, डिस्नेची सजावट...
कला, अन कलाकार म्हणजे अजून काय असतं म्हणे?

हा आमच्या घरचा,
देव्हारयातीलच मूर्ती आहे. वेगळी थोडीशी आरास करून बसवली आहे. उत्तरपूजा/ विसर्जन नंनत परत देव्हारयात जाऊन बसतील बाप्पा.

आणि हा क्लोजप

सगळ्यांचे गणपती सुंदर आहेत्..बोटीतला बाप्पा खुप आवडला
फुलांची रांगोळी सुरे़ख झालीयं..दाद+१००

मोदकबाप्पा, मोदकजाम दोन्ही एकदम भारी. मला आधी मोदकजाम म्हणजे pear आख्खे तळल्यासारखे वाटले होते. नंतर कळले गुलाबजाम या आकारात केलेत ते
फुलांचा गालीचापण छान आहे.

Photo0233.jpg

बाप्पा येण्या आधी सर्व तयारी झाली. फ्रेम लाकडाची स्टॅड लाकडाचाच आणि खरी फुले.

Photo0234.jpg

हे आमचे बाप्पा,

Photo0235.jpg

स्थानापन्न झाले.

*

सगळ्यांचे बाप्पा आणि आरास सुंदर. स्वतः घडवलेल्या बाप्पांचं खास कौतूक!!
दिपा, मोदकजाम अफलातून कल्पना!!!

हे आमचे बाप्पा..त्यांची आरास आणि नैवेद्य...

DSC02001.jpgDSC02068.jpgDSC01938.jpgDSC01924.jpg

आणि बाप्पांचे नवे वाहन...
DSC02091.jpg

कोटी कोटी रूपे तुझी...............बाप्पा, मित्रमंडळींना अप्रत्यक्षरित्या का होईना, भेटायची संधी मिळतेय तुझ्यामुळे. किती प्रकारच्या सजावटी, किती सुंदर आरास, तुझा मनापासून केलेला आणि चुकला तरी तू गोड मानून घेतलेला नैवेद्य, आणि सगळ्यांत महत्वाचा तुझ्या प्रत्येक रूपातला गोडवा............सगळंच विलक्षण! बाप्पा, हे सगळं असंच उत्साहात अखंडितपणे चालत राहो, हीच तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना! Happy

सर्वांचे बाप्पा सुंदर, आणि तुम्हा सर्वांचा हेवा वाटतो,
तुम्हाला सजावटीला भरपूर वेळ मिळतो, मनात भरपूर आयडीया असून सुद्धा आम्हाला वेळ मिळत नाही Sad

आमचे गणेशराज २०१२

गणेशमूर्ती शाळा असल्याने सजावटीला फारसा वेळ कधीचं मिळाला नाहीये, तरीपण बाप्पा विराजमान होण्या आधी मिळालेल्या काही अवधीत काय ती सजावट.

आमचा बापा नेहमीच उशीरा तयार होतो भटजी येवून बसले तरी आमचा बाप्पा तयार होत (रंगकाम) असतो Biggrin

नैवेद्यम

गंगा गौर

विसर्जन बापा निघाले गावाला

चैन पडेना आम्हाला Happy

हे आमच्याकडचे बाप्पा.

आमच्याकडे बाप्पा गौरींच्या मधे असतात

गौरी

आणि हा प्रसाद

व्वा...सुंदर गं! बाप्पांचं दर्शन अगदी प्रसन्न. त्यांचे डोळे किती शांत, तेवत रहाणारे दिसतायत. गौरीची सजावट तर झक्कास!:)

केदार तुझा बाप्पा पण फार आवडला. कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे. आणि केळीच्या पानावर जेवण. बघुनच तृप्त जहालो. Happy

Pages