आमचा गणपती (घरचा)

Submitted by संयोजक on 5 September, 2012 - 02:47

amacha%20ganapatiCollage.jpg
प्रकाशचित्र तोषवीकडून साभार.

नमस्कार मंडळी,

मोरया रे... बाप्पा मोरया रे!
गणेशोत्सव जवळ आला की वेध लागतात साजिर्‍या गोजिर्‍या गणेशमूर्तींचे, आरास आणि सजावटीचे. मग सुरु होते धांदल वेगवेगळ्या कल्पनांची, शक्कली लढवण्याची, 'जरा हटके' काही करण्याची. मग आरास अशी काही जमून येते की "अहाहा, क्या बात है!"

इथे आपल्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाचा लाभ तमाम मायबोलीकरांना घडवाल ना?
बाप्पाचा थाटमाट, सगळी सजावट, कलाकुसर, देखावे, नैवेद्य आणि काय काय...
गणपती डेकोरेशन निश्चित करतांनाची प्रक्रिया, पर्यावरणाचा, नाविन्याचा विचार, धडपड हे सुद्धा मायबोलीकरांना जाणून घ्यायला आवडेल.

त्यासंबधीचे थोडेसे.

आपण आपल्या घरच्या गणपती विषयी थोडक्यात माहिती आणि फोटो इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.

धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१२.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच सर्वांचे बाप्पा. Happy

केळीच्या पानावरचा नैवेद्य Happy

केळीच्या पानावर जेवुन किती वर्षे झाली हे आठवतही नाहिये आता...

छान छान बाप्पा आणि आरास.....मोदकबाप्पा तर फार आवडले.

हे माझ्या माहेरचे गौरी-गणपती....

Ganesh 2012..jpggauri 2012.jpg

गौरींची बाळे...(हा कन्सेप्ट मला नीटसा कळलेला नाही)

gauri1 2012..jpg

रुणुझुणू, या भाद्रपदातल्या ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी म्हणजे माहेरवाशिणी. गणपती हा त्यांचा बंधुराज. गणपती आला की या दोघी त्याला भेटायला माहेरी येतात आणि येताना सोबत आपली बाळे घेऊन येतात, अशी यामागची गोष्ट लहानपणी आजीनं सांगितली होती. म्हणूनच गौरींच्या सोबत ही बाळे असतात. इकडे त्यांना झोला-झोली असंही म्हणतात. Happy

लहानपणी, गणेशचतुर्थीला किमान ५ घरच्या गणेशमूर्तींचे दर्शन घ्यायचो मी.. बर्‍याच वर्षांनी मायबोलीवर ते करता आले. सर्वांची आरास मन प्रसन्न करणारी आहे.

क्रांति, मीसुद्धा अशीच गोष्ट ऐकत आलेय. पण मग गणपती हा गौरीचा मुलगा नाही का ? (बापरे, फारच बेसिक गोंधळ दिसतोय माझा)

रुणु, काही ठिकाणी गौराई ही गणपतीची आई म्हणुन येते असे मानतात, तर काही ठिकाणी ती बहिण म्हणुन येते. कोकणात बर्‍याचशा ठिकाणी ती बहिण म्हणुन येते असेच मानतात.

गौरी आई च गणपतीची!
आणि पार्वती आणि उमा अशा दोघी म्हणुन दोन गौर्‍या
हे अस मी लहानपणापासून ऐकत आलेय Happy
तिची दोन बाळं का ते मात्र कळालं नाही कधी Happy

वा सुंदर, अप्रतिम! सर्वांचेच गणपती ,आरास खुप सुंदर झाली आहे. गणपती बाप्पाचे डोळे आणि गाईचे डोळे पाहिल्यावर किती प्रसन्न वाटते! त्यातुन आपल्याला प्रेम, करुणा, विश्वास ,...सर्व काही मिळते......
गौरी ही गणपतीची आई असेच मी मानत होते. आम्ही पुर्वी बंगलोरला असताना एका मैत्रिणी (साउथ इंडिअन) कडे गेलेली तर तिच्याकडे गणपती यायच्या आधी गौर आलेली...मी तिला म्हणाले कि आमच्याकडे गौर नंतर येते तर ती म्हणाली आधी आईच येणार मग मुलगा (गणपती) .

सगळ्यांचे बाप्पा आवडले!! किती सुंदर सजावट, कलाकुसर केलीय सगळ्यांनी!! झोपाळ्यावरचे बाप्पा, डिस्नेलँड बाप्पा, टोपल्यांची सजावट व केदार२० तुमचा घरचा बाप्पा फारच आवडले!!

सगळ्यांच्याच घरचे बाप्पा प्रसन्न, तृप्त दिसताहेत. सजावटींच्या कल्पकतेला सलाम.

युगंधर, तुमच्या घरातलं फर्निचर आवडलं. फॅबइंडियातलं आहे का?

आमच्या घरातील बाप्पा.
01_0.jpg04.jpg02_0.jpg03.jpg
संपूर्ण मखर घरी बनवले आहे. सगळे श्रेय माझ्या काकांना (मावशीचे मिस्टर). गेली ३७ वर्ष मखर तेच बनवतात. ज्या शिताफीने ते थर्माकोलवर डीझाईन बनवतात ते बघून थक्क व्हायला होते. आम्हा भावंडांची मदत म्हणजे फेविकोल लावून देणे . टेबलाला कागद चिकटवणे वैगरे. शाळेत असताना गणपतीत जवळ जवळ पूर्ण वर्गच घरी यायचा. दोन्ही बाजूला लावलेले पिलर्स त्यांनी थर्माकोल च्या पट्ट्या लाटण्याने लाटून बनवल्या आहेत. दरवर्षी थोडाफार बदल केला जातो. ४/५ वर्षानी पूर्ण डिझाईन चेंज करतो.

एकापेक्षा एक आहेत सारे.. मुर्ती तर गणपतीची झकास असतेच.. पण सजावटही उत्कृष्ट आहेत... आमच्याकडे का नाही येत बाप्पा ही खंत पुन्हा एकदा मनात दाटून आली.. Sad

@ सामी, तुझ्या गणपतीची मुर्ती, ते मकर, आणि पुर्ण फोटोभर पसरलेला एक लाल रंग.. जबरदस्तच.. मी मिस केले..

Pages