रहमॅनिया

Submitted by नताशा on 16 August, 2012 - 15:12

ए आर रेहमान च्या सगळ्या भाषांतल्या संगीतावर चर्चा करण्यासाठी हा धागा. इथे दुवे शेअर करुया, एखाद्या गाण्यातली आपल्याला जाणवलेली गंमत इतरांना दाखवूया.
रहमॅनिया शब्द रैनाकडून साभार. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम तक, बनारसिया बेस्ट. 'तुम तक' ऐकताना लगानची खूप आठवण येतेय आणि बनारसिया ऐकताना 'नैना लडायके'ची. रांझणाही मस्त आहे. बाकीची हळूहळू चढतीलच Happy

पण त्याच्या डोक्यावर रेहमान नी हात ठेवल्यासारखा वाटतो मला >> रेहमान आपल्यासाठी आदर्श आहे असे अमित त्रिवेदीने स्वतः कुठल्यातरी मुलाखतीमध्ये म्हटल्याचे आठवतेय..

रांझणा.. हळुहळू ऐकत जातोय... Happy

रेहमान वरचं एक पुस्तक वाचताना (नाव विसरलो Sad ) त्यात असं लिहिलेलं की रेहमान कायम नव्या नव्या गायकांना / आवाजांना संधी देतो. त्याचे फिक्स्ड असे काही गायक नाहीत काय? त्याने भरपूर नवीन गायक्-गायिकांकडून गाणी गाऊन घेतलीत आणि त्यामुळेपण मला त्याची गाणी वेगळी वाटत आलीत. फ्रेश आवाज/ वेगळ्या जॉनरचा आवाज असलेली त्याची गाणी मस्तच वाटत आलीत.

रब्बी शेरगील / मोहीत चौहान / जावेद अली/ श्रीधर (की राघव?? रू ब रू वाला) / शान / उदित / हरीहरन / सुखविंदर / कैलाश खेर ... एकदम व्हरायटीच Happy मला कायम वाटत आलय की एकदा 'स्वप्निल बांदोडकर' ला पण संधी मिळाली तर भारी होईल.

पण 'तुम तक ' डेंजर कॉकटेल आहे.. 'एकदा आवडल् कि त्याचा हॅंगओव्हर उतरता उतरणार नाही!>>
हे खरंय अगदि.
पण रांझणात सगळ्यात शेवटी जे गाणं वाजतं पाट्या पडताना... ते 'वाटेवर काटे वेचीत चाललो' चं थोडं स्लोअर व्हर्जन (किमान मुखडा तरी) वाटलं.

हे बहुतेक ऐकलं असेल, ६ महिने झाले. त्या एपिसोडमधली जरीया आणि जगाओ मेरे देस को जास्त प्रसिद्ध झाले आहेत. पण मला जास्त आवडलं ते हे जॅमींग.

हिंदुस्तानी/कर्नाटकी क्लासिकल आणि वेस्टर्न रिदम्स. कोणाकोणाचं कौतुक करणार. :)

आओ बालमा .. छानच
जरीया तर अगदीच जबरदस्त! त्यातली सुरुवात ज्याने केलिये त्याचे ओठच हलत नाहीयेत .. मला कळालचं नाही कोण गातयं ते Happy

त्यात असं लिहिलेलं की रेहमान कायम नव्या नव्या गायकांना / आवाजांना संधी देतो. त्याचे फिक्स्ड असे काही गायक नाहीत काय?
>>>आशा भोसलेंशी फाटल्यानन्तर ओ पी नय्यर यांनी वाणी जयराम, पुष्पा पागधरे, कृष्णा कल्ले याना हाताशी धरून आपली कारकीर्द सुरू केली. त्यातील गाणी ऐकून कणेकर त्याना म्हणाले 'या तर चक्क आशाच्या स्ताईल्मध्ये गाताहेत' यावर ओपी म्हणाला 'चुकतोहेस तू, या ओपीनय्यरच्या स्टाईलमध्ये गात आहेत आणि आशा भोसले देखील ओपी नय्यरच्याच स्टाईलमध्ये गात होती'
तसे रहमानचे बाबतीत रहमान आणि त्याचा ओर्केस्ट्रा मुख्य ! बाकी गायक हे केवळ शब्दांचे भारवाहू ! मग कोणीही असले तरी चालते.हरिहरन सारखेह्गायक वगळता केवळ गायकाने तोलून धरलेली गाणी रहमानकडे कमीच दिसतील. मग हेमा सरदेसाई चे गाणे हे अशा भोसलेचे नाही हे आवर्जून सांगावे लागते (आवारा भंवरे ...)

अर्थात प्रथितयश गायकानी रेहमानच्या गाण्याना अधिकच न्याय दिलाय हेही खरे....

लॉंग लिव रेहमान … किती गाणी लिहायची आणि किती नाही।

रोजा , बॉम्बे, ताल, दिल से , १९४७ द अर्थ,पुकार, झुबैदा , लगान , युवा, रंग दे बसंती, गुरू , जोधा अकबर - ह्या सिनेमांमधली सगळी गाणी कितीदाही ऐकली तरी कंटाळा येत नाही।
हल्ली रेहमान magic कमी झालाय पण…

<<सध्या पट्टाखा गुडी (ज्योती आणि सुलताना नूरानचे व्हर्झन )रिपीट मोडमध्ये चालू असते<<>> येस्स्स....आणि रहमानने स्वतः गायलेले माही वे पण सॉलिड आहे.
हायवे ची बाकी गाणी ऐकलेली नाहीत अजून...ही दोनच ऐकतेय सध्या.

हल्ली रेहमान magic कमी झालाय पण…
>>>
रहमानने चित्रपट संगीत देणे जवळ जवळ थांबवलेच आहे. कधी कधी तो एक दोन गाणीच देतो. रहमान त्याचा गुरु इळय राजा प्रमाणे ऑर्क्र्स्ट्रेशन आणि हॉर्मोनीतला बादशहा आहे. तसेही चित्रपट संगीत इतर अनेक गोष्टीवर अवलंबून असते. स्टोरी, पार्श्वभूमी,स्प्रसंग, मार्केट, इ. तो सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कामात गढलेला असतो असे दिसते. चित्रपट संगीतातली कृत्रिमता त्याच्या सारख्या प्रयोगशील आणि सर्जनशील कलावंताला मानवेल असे दिसत नाही. आता त्याचे एक स्थान निर्माण झाले आहे. तसेही भाराभर काम करण्याबाबत तो कधिच ओळखला जात नाही. चित्रपट्संगीत हा त्याच्या करीअरचा एक भाग आहे , करीअर नव्हे !

>>यातली सुरुवात ज्याने केलिये त्याचे ओठच हलत नाहीयेत .. मला कळालचं नाही कोण गातयं ते >> चनस, ज्याने नव्हे, जिने म्हण. अ‍ॅनी चॉईंग आहे ती.

मग हेमा सरदेसाई चे गाणे हे अशा भोसलेचे नाही हे आवर्जून सांगावे लागते (आवारा भंवरे ...)
>>> अरे हो की ती सध्या गायबच झाली आहे.

जरिया फारच भन्नाट ... रहमान खरेच आंतरराष्ट्रीय संगीतकार आहे. या जरियात कोरसमध्ये प्राजक्ता शुक्रे दिसते आहे.

Rehman's latest- OK Kanmani. Its a Tamil movie.
Listening to Mental Manadhil these days.. Super energy!

Link: https://www.youtube.com/watch?v=Wp05ZCG3yMk

त्या विडिओ च्या खालची ही कमेंट एकदम परफेक्ट आहे:
1st day: Why is it so loud and so noisy, I hate it.
2nd day: Maybe I like it, its not so bad
3rd day: I wake up unconsciously humming it
4th day: I am looping it, the rhythm got me.

Thats AR. Rahman effect. Don't need to understand the language to enjoy the music.

वाव! मस्त धागा!

सुहासिनी मणिरत्नम चा इंदिरा नावाचा चित्रपट आहे.

https://www.youtube.com/watch?v=vAguCXx

नीला काय्गिरदु... हे गाणे फार सुंदर आहे. हरिहरन ची वर्जन ही छान आहे.

नदिये नदिये ... भारी गाणे आहे. आय ट्रीट आहे चित्रीकरण

https://www.youtube.com/watch?v=wT1tpc-VqhA

लिरिक्स आणि अर्थ.
http://janinthesky.com/2012/02/11/nadiye-nadiye-kadhal-nadiye-lyrics-and...
गायक उन्नी मेनन.

वैदेही अप्रतिम गाणे. पण तू दिलेली लिंक उघडत नाही. चित्रीकरण टिपिकल मणिरत्नम टाईप अप्रतिम.
https://www.youtube.com/watch?v=0C6aH9fBwNA

हरिहरन व्हर्शन
https://www.youtube.com/watch?v=Wtg8ZSU9Ws4

Pages