मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले यांच्याबरोबर ब्रेकफास्ट गटग

Submitted by मयूरेश on 25 July, 2012 - 02:35
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल गंधर्व, बालगंधर्व रंगमंदिरासमोर. ( २९ जुलै २०१२, वेळः-सकाळी ९.०० ते ११.००)

मंडळी, आपले मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले सध्या पुण्यात आहेत. वविच्या वेळेस बर्‍याच मायबोलीकरांना त्याना भेटता आले.पण ज्यांना वविला यायला जमले नाही त्यांना या गटगला उपस्थित राहुन वेबमास्तरांना भेटायची संधी आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 28, 2012 - 23:30 to रविवार, July 29, 2012 - 01:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झालं गटग!
एखाद दोन माबोकरांनाच ओळखत होते , आणि बाकिच्यांना भेटण्याची उत्सुकता होती. मुळात वेबमास्तरांना भेटायचं होतं.
माबोची जन्मकहाणी त्यांच्याकडून ऐकायची होती. ती ऐकली. Happy
माझ्या लेकानी ऐकवलं होतं 'असं इंटरनेटवर भेटलेल्या लोकांना भेटायचं नाही हा रूल तू मोडतेयस बरका ' मग त्याला सांगितल "अरे हे इंटरनेटवर भेटलेले नाहीत रे , हे तर आपल्या मायबोलीवरचे आहेत :)."
हा विश्वास वाटतो ह्यातच सारं आलं ना?

छान झाले कालचे गटग. तब्बल २० मिनिटे आधी येवुन (वेळ संपायच्या) लोकांचा माझ्यावर टांगारुचा शिक्का मारायचा प्रयत्न मी हाणून पाडला Wink
सगळ्या माबोकरांनी सगळ्याच ( Lol )पदार्थांचा फडशा पाडल्याने मला माही खायला मिळाले नाही आणि ती भूक मी बालगंधर्वला पेरु खाऊन भागवली.
वेमांनी फक्त लेकीलाच आणि समस्त बच्चे माबोकरांना (रिया प्लीजच नोट मी लहान माबोकर म्हणाले नाहिये) किंडरजॉय देऊन मला काही विचारण्याला फाट्यावर मारले. पण त्यांनी आवर्जुन चौकशी केली Happy
श्यामली, रुमा, अकु, रेशमडोर, शैलु, मिनू, इन्ना, चिनुक्स, फारेंडा, मयुरेश, अतुल आणि सगळेच यांना भेटुन आनंद झाला.
वेमा पुढच्यावेळी लंच गटग करुयात म्हणजे मग उरलेल्या गप्पा मारता येतील.

मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले यांच्याबरोबर ब्रेकफास्ट गटगला आलेल्या माबोकरांची व त्यांच्या छोट्यांची प्रकाशचित्रे -
(बर्‍याचशा लोकांना मी प्रथम भेटत असल्याने सर्वांची नावे लक्षात राहिली नाहीत तरी लोकांनी माबोकर ओळखून सहकार्य करावे....धन्यवाद)

Picture_1.JPGPicture_2.JPGPicture_3.JPGPicture_4.JPGPicture_5.JPGPicture_6.JPGPicture_7.JPGPicture_8.JPGPicture_9.JPGPicture_10_0.JPGPicture_11.JPG

मस्त फोटोज.... Happy

मी आले होते काल पण लेट... Sad
असो... फारच थोडे माबोकर भेटले... पण जे कोणी भेटले.. छान वाटलं त्यांना भेटुन Happy

पहिले दोन फोटो गंधर्वच्या बाहेरचेच आहेत?
एवढा छान परिसर दिसू शकतो गंधर्वचा यावर माझा तरी विश्वास बसला नसता Happy

एवढा छान परिसर दिसू शकतो गंधर्वचा यावर माझा तरी विश्वास बसला नसता...>>. नी, ती फोटोग्राफरची कमाल आहे Happy

मला डोसा संपवीण्याच्या कामगिरीवर एकेटे टाकणार्या माबोकरंचा णिशेध!!! .. बाकी णिशेध वृतांत मधे नोंदवण्यात येईल याची दखल घ्यावी..

अतुलनीय, धन्यवाद! आता नावांची उजळणी केली पाहिजे.
रिया बच्चेकंपनीबरोबर मस्त आलाय फोटो. खरतर त्यांच्याबरोबर मिळायला हव होतं चॉकलेट तुला पण Happy

धन्यवाद अतुल.. चौथ्या फोटोत अजय फारेंडाला दम देतायत असं वाटतंय Wink

काल मला साथ द्यायला साजिरा नसल्यानं अख्खं गटग संपूपर्यंत एकही पाण्याचा ग्लास सांडला नाही Wink

मग भाई किसका है!!>> हो, पण तो कित्ती शांत आहे.. Wink
(येस्स!! त्यानी तुमच नातं सांगितल्यापासुन मला हे कुठेतरी बोलुन मन मोकळ करायच होत :फिदी:. )

फोटो छान आलेत अतुल. Happy
धन्यवाद फोटोंसाठी.

काल मी सगळ्या गडकर्‍यांची चौकशी केली / आठवण काढली होती मयुरेश सोबत. Happy

फ ने तर गेल्या कित्येक वर्षात एकहि चित्र मायबोलीवर टाकलेल नाहिये. Sad

रिया बच्चेकंपनीबरोबर मस्त आलाय फोटो. खरतर त्यांच्याबरोबर मिळायला हव होतं चॉकलेट तुला पण
>>
इन्ना तुमाखमै ग
सगळ्यांनी मला तुला चॉकलेट मिळालं का हे विचारलं पण दिलं कोणीच नाही
Crying smiley face

इन्ना, तू रियाच्या दु:खावर चॉकलेट चोळते आहेस का? फिदीफिदी
>
Lol

बाकी फोटो मस्तच Happy

वविच्या वेळी जशी वाट बघत होते की माबो उघडल्या उघडल्या फोटो बघायला मिळतील ती इच्छा या गटगच्या निमित्ताने पूर्ण झाली.

१. मज्जा आली काल
२. नोंदणी केलेल्यांपैकी फक्त ३ मेंबर्सची अनुपस्थिती (या शुकु ला धरलंय :फिदी:)
३. कौवा या रोमातल्या आयडीशी अनपेक्षित तरीही आनंददायी भेट
४. रेशमडोर चा पेपरडोसा मला खायचा होता Lol
५. गगो, पिंची, हैदराबाद या बाफ वरचे गटग नसल्यामुळे रीया अतिशय शांत बसून काय समोर येईल ते मुकाट्याने खात होती. Proud
६. शैलजा फायनली भेटली एकदाची, नीट गप्पा झाल्या नाहीत पण ठीके
७. बाकी नेहमीचे यशस्वी कलाकार आपापल्या भूमिकेत चपखल.
८. गंधर्वबाहेरच्या फोटोसेशनामुळे एकूणच शहरात हे सगळे लोक प्रथमच आले आहेत असा तिथल्या आसपासच्या लोकांनी करून घेतलेला समज.
९. पुढे बालगंधर्व कट्ट्यावर कोणीही गेलं नाही. (पौर्णिमा साठी)
१०. पुण्यात कुठेही फोटो काढला तरी छानच परिसर दिसतो (नीरजा साठी :फिदी:)
११. वेमा अजय कडून माबोची कहाणी ऐकली.
१२. चला चला करत एकही जण तिथून हालता हालत नव्हता.
१३. आठ दिवसांपूर्वीच वविला भेटलो होतो असं वाटतंच नव्हतं.
१४. बालगंधर्वच्या समोर पेरू घेतला, आणि सम्याची धावती भेट घेतली.
१५. वृत्तांत संपला.

घे ग शैलजा Proud

मंसो Proud पुढच्या भेटीत मला पेरु देणेचे करावे.
>>पुण्यात कुठेही फोटो काढला तरी छानच परिसर दिसतो >> सत्यवचन.
आता एकदा गप्पा करायला भेटू निवांत, त्या स्मितालाही घेऊन ये Happy

झकोबा, शांत माणसांना भरपूर उंगल्या असतात... (शां आणि ह व्यक्तिमत्वाचाही अपवाद नाही!)

आते आणि तिचा बिंदूदार वृत्तांत.. Happy

पुढे बालगंधर्व कट्ट्यावर कोणीही गेलं नाही. (पौर्णिमा साठी)>> अरे देवा! तोच फुटपाथ अडवून बसला होतात की काय दोन तास पुढे? गंधर्वच्या मॅनेजरने 'सरकून घ्या' असे म्हटले नाही का? Proud

५. गगो, पिंची, हैदराबाद या बाफ वरचे गटग नसल्यामुळे रीया अतिशय शांत बसून काय समोर येईल ते मुकाट्याने खात होती.
>>>
अरे देवा!
अस नाहीये
मी पहिल्यांदा कोणाला भेटले की शांतच असते
काहीच अपवाद असावेत बहुदा

गंधर्वबाहेरच्या फोटोसेशनामुळे एकूणच शहरात हे सगळे लोक प्रथमच आले आहेत असा तिथल्या आसपासच्या लोकांनी करून घेतलेला समज. >>>> Lol
आत्ती! तुझ्या प्वाइंट्-वाइज वृ ची मी एकदम पंखा बर्का!!! ह्यासाठीच थांबले होते प्रतिसाद द्यायचे! Happy
मस्त फोटो आहेत सगळेच!
आठ दिवसांपूर्वीच वविला भेटलो होतो असं वाटतंच नव्हतं >>> वा! वा! (आता मुंबई चे गटग अ‍ॅटेण्ड करावेच का? ह्या विचारातली बाहुली! Happy )

गंधर्वच्या मॅनेजरने 'सरकून घ्या' असे म्हटले नाही का? >> त्याला शांत करण्यासाठी आम्ही ४-५ जणांनी गटगनंतरचं एक छोटं गटग तिथंच उरकून घेतलं. त्यानिमित्तानं 'पद्मजा_जो'नं पण गटगला यायचं पुण्य मिळवलं Wink

Pages