मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले यांच्याबरोबर ब्रेकफास्ट गटग

Submitted by मयूरेश on 25 July, 2012 - 02:35
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल गंधर्व, बालगंधर्व रंगमंदिरासमोर. ( २९ जुलै २०१२, वेळः-सकाळी ९.०० ते ११.००)

मंडळी, आपले मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले सध्या पुण्यात आहेत. वविच्या वेळेस बर्‍याच मायबोलीकरांना त्याना भेटता आले.पण ज्यांना वविला यायला जमले नाही त्यांना या गटगला उपस्थित राहुन वेबमास्तरांना भेटायची संधी आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 28, 2012 - 23:30 to रविवार, July 29, 2012 - 01:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे, २९ उद्या (रविवारी) आहे.... मी आजच समजत होते! Uhoh असो. येण्याचा प्रयत्न जरूर करणार!

Over?

5th aug sathi dhaga kadha.. >> काय, मुंबै मध्ये आहे का ५ला गटग?

गटग झालं शैलजाला काय मिळालं ठावं न्हाय, (बहुतेक कटलेट :अओ:) शुकुनी काही खाल्लच नाही ती उशीरा आली. गटग मस्त झालं, बरेच नवे, रोमातले आयडी आले होते, ते आता सक्रिय होतील नक्कीच. Happy
अजून उरलेले लोक आहेत तिथे, आम्ही गृहकृत्यदक्ष म्हणून लवकर निघालो Proud

रेकॉर्ड हजेरी... आणि बहुतेक सगळे माबोकर असलेले...

आधीच्या काही रेकॉर्ड हजेरी गटग मध्ये माबोकरांबरोबर त्यांचे कुटुंबीय पण उपस्थित होते...

एकदम नवीन बरेच आयडी होते आज...

मज्जा आली गटगला. Happy वेमांना भेटून छान वाटले.

लाजो, टोमॅटो उत्तप्याची किती काळजी ती तुला Proud पण मी कटलेट मागवलं, आणि फिल्टर कॉफी.
सकाळी सकाळी बदामाच्या आकाराची कटलेटं, त्यावर शिंपडलेला पालापाचोळा आणि बाजूला कांद्यांच्या २ चकत्या वगैरे पाहून धन्य झाले! चव मस्त होती Happy

नवे, जुने आयडी भेटले. गप्पा, आरडा ओरडा, कल्ला, नेहमीसारखंच. Happy नव्या आयडींना प्रकट व्हायचं आवाहन केलं आहे. ते पार पाडतील अशी आशा Happy वर येणार म्हणून लिहिलेल्यांपैकी योगुली, दक्षिणा, धीरज आणि anusaya इतके टांगारु झाले, शुकूटांगारुठरताठरतावाचली! शुके,इनॉचॉलबेपुढच्यावेळी. बाकी सगळ्यांनी हजेरी लावली. गंधर्ववाल्यांना सांगून कायमस्वरुपी डिस्काउंटची सोय करायला हवी! Wink

श्यामले, तू घातलेल्या धपाट्याचा करारा जवाब दिया जायेगा! Proud हॉटेलमधून उठल्यावरही नेहमीप्रमाणे बाहेर रस्त्यावर उभं राहून गप्पांचा कार्यक्रम बराच वेळ सुरु होता, त्यातच फोटोसेशनही झाले. फोटो इथे येणार आहेत का? त्याबद्दलची मते टाकायची का? Proud

अशा तर्‍हेने येत्या आठवड्याला सामोरं जायची तयारी झाली Happy

शैलजा Proud

टॉम उतप्प्याची नाही गं.... तुमची काळजी.. Happy

मस्त झालं गटग ना? आता फोटो धाडा... आम्ही तेव्हढ्यावर समाधान मानु Happy

फोटोज कधी आणि कसे मिळणार?.....>>>याचं उत्तर फक्त अतुलनीयच देऊ शकतात Happy

Proud
ए ठरवा नेमकं राखीच्या भितीने दिली नाही की राखी बांधली नाही म्हणुन दिली नाही
मला किती प्रॉब्लेम होतो इथे
चॉकलेट तर जातच हातचं पण दादाही जातो Proud

आम्ही गृहकृत्यदक्ष म्हणून लवकर निघालो>>>>>>>. लोल्स.

बाकी कालही मी बर्‍याचमाबोकराना प्रथमच भेटलो.
चिनुक्स म्हणजे सरप्राइज आहे. मला वाटलेलं त्यापेक्षा बराच वेग़ळा. Happy

बाकी मया जे खातो तेच मागवायचं हा माझा फंडा काल अर्धा यशस्वी ठरला. (खाण्यातल्या दर्दी माणसाची बिनधास्त कॉपी करावी :))
उप्पीट / उपमा मस्त होतं. नंतर त्याने कटलेट घेतल तर मी ओनियन उत्तप्पा. तो नसता घेतला तरी चालल असत.

पेपर डोसा फोटोजेनिक होता. Happy
पण वविच्या बीबी वर फोटोवरुन बरीच नियमावली वाचल्याने मी माझा कॅमेरा म्यान करुन ठेवलेला. (शिवाय तिकडे त्यावेळी कोणी कॅमेराही बाहेर काढला नव्हता)
नंतर ग्रुप फोटो अतुलनीय यानी काढलेत. त्यावेळी मी डबल नास्ता लोडेड झाल्याने आळशीपणा केला, ग्रुप फोटो माझ्या कॅमेर्‍यात काढायला.
कालचा माझा पहिलाच दिवस जो की मी कॅमेरा दिवसभर सोबत असुनही एकही फोटो नाही काढला.
(आळ्शीपणाची हद्द झाली)

नंतर माबोकर सम्याला भेटलो.
आणि मिपाकराना धावती भेट देउन घरी.

अजय हे खुपच छान व्यक्तिमत्व आहे. Happy
सर्वांशी प्रेमाने बोलणे, त्यांची चौकशी करणे.. वै वै.. (त्यांना हळुच मायबोलीच्या उपक्रमाची जबाबदारी घेण्यासाठी सांगणे, जेणेकरुन प्रत्येकाचा सहभाग अधिकाधिक होत जाइल :))
त्यानी मायबोलीची सुरवात कशी झाली ते सांगितलं.
ती स्टोरी मस्त आहे. Happy

रिया बिचारीने काल मेदु वडा सांबार खाल्ल..
शुकु जरा गडबडीतच होती.
पण लेट होउनही आली हे महत्वाचं. Happy

पेपर डोसा फोटोजेनिक होता...>>> कसला सही डोसा होता तो. तो समोर ठेवल्यावर रेशम डोरचा चेहरा पहाण्यालायक झाला होता. कितीतरी वेळ ती खायला सुरूवात कशी आणि कुठुन करावी याच संभ्रमात होती. तरी तिने शेवटपर्यंत लढा दिला. पण श्यामली किंवा पूनम या दोघींपैकी कोणीच तिला साथ न दिल्याने तिला तो पेपर डोसा पूर्ण संपविता आला नाही.:). त्या डोश्याचा एक फोटो घ्यायला हवा होता :).

मला वाटल अक्ख्या गटगसाठीची ऑर्डर आहे ती >> Lol
>>करारा जवाब दिया जाएगा>>> इंतजार है >> भेट म्हणजे चार धपाटे घालते चांगले!

मंसो, पॉईंट्शीर वृ येऊदेत!

भेट म्हणजे चार धपाटे घालते चांगले!....>>>> `भेट' हा शब्द फार महत्त्वाचा आहे बघ शैलजा :). तेव्हा तू व्हर्च्युअल धपाट्यांवरच सामाधान मानुन घे बरं. पाहिजे तर चार धपाटे घालणारी बाहुली असं लिही फार तर कंसात....:फिदी:

तू चार घाल आणि रुमाला चार घालायला सांग. चार पे चार फ्री! श्यामलीभी क्या याद रख्खेगी!...>>मी आणि रुमाने मिळुन चार चार धपाटे घातल्यावर श्यामली काही याद ठेवायच्या कंडिशनमध्ये तरी राहील का गं?:हाहा:

Pages