अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२

Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता: 
*****************************

चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.

*****************************

माहितीचा स्रोत: 
हॅ!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय्याऽ !! कोल्हापुराची (पक्षी श्रीरामपुराची) ट्यूब आत्ता पेटली! Proud

झक्की, तुम्ही नागपुराच्या मोहल्ल्या-मोहल्ल्यात मिळणारं काही घेऊन जाणार आहा का?

भाई, मग ह्यावेळी हे गाणं म्हणा ..

माहिम चा हलवा आणीन तुला गोमु आणीन तुला
नाही खाल्लास तर मारेन तुला

:p

>>सोन्या आता मोठा झाला. साखळ्या घालत नाही
म्हणूनच देउन टाका...

... अ‍ॅण्ड द फाकोफेस्ट कंटिन्यूज...

माहिम हलवा प्रकरण काय असतं?

माहिमी हलवा ही गव्हाच्या सत्त्वाची मिठाई असते. तिचे चौरसाकृती पापड(?) असतात. मला भारी आवडते.

mahimi_halwa.jpg

मी आधी चुकून लिबलिबीत लिहिलं तो बदामी हलवा.

अस्साँ अस्ताँ क्कॉय?? गाजर्-डाळीचं पीठ मिक्स, गोडमिट्टं पाकातलं, वडीसदृश काहीतरी वाटलं.

सिरियसली, विदर्भात वाढणार्‍या जनतेला माहिम हलवा माहिती असणं कठीण आहे. .. बाँम्बे रिटर्न्ड असलं तरी. Proud तसंच मुंबई-पुण्ञाकडे मिळणारे बुंदीचे कडक लाडू बघून वैदर्भियांची टाळकी फिरल्याच्या (तुटक) दंतकथा माहिती आहेत.

>> मुंबई-पुण्ञाकडे मिळणारे बुंदीचे कडक लाडू
अहाहा! Happy

पण रोज दात घासायला काय होतं म्हणते मी! Proud

तसंच मुंबई-पुण्ञाकडे मिळणारे बुंदीचे कडक लाडू बघून वैदर्भियांची टाळकी फिरल्याच्या (तुटक) दंतकथा माहिती आहेत.>>>> Lol मलाही ही ते कडक लाडू आजिबात आवडत नाहीत.
बाई, अहो दात खासायचा काहीच संबंध नाही. ते लाडू तोंडात आर्धा तास ठेवूनच चावले जातात माझ्यामते. आधी चावायची गुस्ताखी केलीत तर घासलेले दात मोडीत निघतील.

बरं, (मनातले) मांडे, रसमलई आणि खव्याच्या पोळ्यांचं पार्सल धाडलंय फेडेक्सातून गेल्या वेळच्या पत्त्यावरच. मिळालं की कळवा हां बाई! Proud

भातुकलीच्या खेळामधले प्रज्ञा आणिकं बाsssssssई.... (असं मागून बॅकग्राऊंड म्युजिक लावलं पाहिजे तुमच्या पोस्टींना)

१२.

बिल्लू येत नसल्याने मटार उसळ मी आणेन. (पुण्याच्या चौकाचौकात मिळणारी नव्हे. मुंबईच्या आळीआळीत शिजणारी आणेन. :P)

Pages