अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२

Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता: 
*****************************

चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.

*****************************

माहितीचा स्रोत: 
हॅ!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

८.

मी सायो आणि भाई मोजते आहे भुतांच्या जागी. Proud
(कोणाच्या जागी कोण इ. तपशील प्रत्यक्ष एवेएठित. :P)

१६ Happy

हेडकाउंट :

स्वाती आंबोळे (२)
सिंडरेला (२)
भाई (१)
सायो (१)
बुवा (१)
वृंदाताई (१)
नीती (१?)
नाइक (अडीच)
लँगो (१?)
एम्टी - होस्ट (४)
--------------------------
एकूण साडेसोळा. Happy

वर काढतेय बाफ. एवढेच लोक आहोत का आपण ? मग मेन्यू चे काहीतरी करावे लागेल. मुख्य आयटम्स भातचा प्रकार, पोळ्या याचे काय ?! मेन्यूच बदलायचा का मग ? बोला आता जास्त वेळ नाहिये.

बरं मसालेभात आणते.
एवढीच लोकं़ का यावेळी? झक्कींना आमची वाह्यात, उ आणि पां कंपनी आवडेनाशी झाली का?

५.

नीती आणि लँगो - पोळ्या आणि कोशिंबीर/रायता आयटम आपसांत वाटून घेऊ शकता का?

कोण आहे रे तिकडे? झक्की, फचिन, चमन, माणूस, अभिप्रा, इ. मेंब्रांना हलवा. Proud
एम्टी, देसायांना निरोप दे. चट्टेरी पट्टेरी लेंग्यात आले तरी चालेल म्हणावं. Proud

चमनला 'टेनिस' विषयावर प्रवचन द्यायचे आमंत्रण द्या तर(च) तो येइल > >त्याला म्हणावे फेडी जिंकला काल म्हणून तरी ये Happy

पोळ्यांना नो टेकर्स अजून?

माझा एक प्रस्ताव आहे. जर इतके कमी लोक असतील तर स्वयंपाकाचा घाट न घालता कुठेतरी (सर्वांना मध्यवर्ती पडेल अशा ठिकाणच्या) रेस्टॉरन्टमधे भेटायचं का जेवायला?
उगाच एम्टीलासुद्धा कशाला प्री/पोस्ट एवेएठि स्वच्छतेत पाडायचं?
जर तिथे फार वेळ बसता येणार नसेल तर जवळ कोणाच्या तरी घरी जाऊन उरलेल्या गप्पा मारता येतील.

(वैसे मेरा घर खुला है - खुलाही रहेगा तुम्हारे लिये.. Proud
मी चहाकॉफी आणि बुवांना जायफळ/वेलची घातलेलं गरम पाणी यांचीही व्यवस्था आनंदाने करेन. :P)

Pages