अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२

Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता: 
*****************************

चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.

*****************************

माहितीचा स्रोत: 
हॅ!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रूप बदलला आहे.
('आपली मायबोली' ग्रूपवर भलतीच जबाबदारी असल्याचं वाचलं. :P)

बाफचे नाव बदलले व तो योग्य ग्रूपवर टाकल्याबद्दल धन्यवाद.
यंदा फक्त किती जाणार हेच लिहायचे आहे का? नावे गुलदस्त्यात?

धागा काढणारे अट्ट्ल पुणेकर असावेत असा दाट संशय आहे.
पुणेकर कसले धागे काढणे वगैरे कामे करतात? त्यांना नुसते, कुणि काही केले की कुजकट कॉमेंट करणे येते.

आता यात काही वाईट आहे किंवा चांगले असे मला म्हणायचे नाही, फक्त काय आहे ते सांगितले.

माझे तर मत असे आहे की आपण जसे असू त्याचा अभिमान बाळगून असावे. कोण काय बोलतो तिकडे लक्ष देऊ नये. असे वागल्यानेच मंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्राध्यक्ष इ. महत्वाच्या पदी पोचून 'जण्तेची सेवा' कराता येते. मग श्री लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन आपल्या सात पिढ्या बसून खातील अशी संपत्ति देते.

तर आणखी एक माबोकर जाणार आहे, पण नाव अर्थातच गुप्त ठेवण्यात येत आहे.

११ ऑगस्ट पर्यंत होणार का हजार?

चला कामाला लागा पाहू .. (ह्यावेळी थोडा फटीग जणवतोय चर्चेत आणि उत्साहात .. ;))

सशल, गेल्या वेळी शेवटच्या दोन दिवसांत चारशे पोस्ट्स पडल्या होत्या.
विश्वास बसत नसेल त्यांनी स्वतः मोजून बघा (आणि आम्हालाही सांगा :P)

बरं, तुमच्या किनार्‍याच्या जीटीजीचं काय झालं? Proud

जागा बुवा बुक करणार आहेत.
म्हणजे तसं भाईंनी त्यांना सांगितलंय. भाई या ए.वे.ए.ठि.चे सासू (सारख्या सूचना) आहेत. Proud

मी एकटाच उपस्थित रहाणार असल्याने बाकीच्यांनी तारखेची काळजी करु नये. ती मी स्वतः ठरविन.. Happy

Pages