"सत्यमेव जयते" भाग ५ (Is Love A Crime?)

Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49

आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud

>>नायगारा धबधब्यावर तुम्ही आहात. तुम्हाला अर्नोल्ड सारख्या एका धटिंगणाने एका पायाला धरून अधांतरी ठेवलंय.
(अच्छा म्हणजे ईथून सुरुवात झाली का "धर्म" विषयक चर्चेला..) Happy

रच्याकने: नायगर्‍याच्या अनुशंगाने देखिल असली सॅडीस्टीक स्वप्ने/परिस्थिती ची कुणी कल्पना करणे म्हणजे (स्वप्नात) स्वतः कॅटरीनाने तुम्हाला प्रपोज केल्यावर "हुंडा देणार का" असला निरस प्रश्ण विचारण्यासारखे आहे... असो.. एकेकाचे नशीब...
~द.

>>> सबब : धर्म बदलला तरी धर्मांतर होत नाही

पण भारतातले निधर्मांध बघितले तर, धर्म न बदलता सुद्धा धर्मांतर झालेले असते याची खात्री पटते.

>>रच्याकने: नायगर्‍याच्या अनुशंगाने देखिल असली सॅडीस्टीक स्वप्ने/परिस्थिती ची कुणी कल्पना करणे म्हणजे (स्वप्नात) स्वतः कॅटरीनाने तुम्हाला प्रपोज केल्यावर "हुंडा देणार का" असला निरस प्रश्ण विचारण्यासारखे आहे... <<

Rofl lol-049.gif Rofl

>>योग, फुलटॉस शोधून शोधून सिक्सर मारतोय्स
आयपिल चा परिणाम... (पूर्वी सारखे बाऊंसर्स वर सिक्सर मारणे आता झेपत नाही..!)

इंडियन पीनल कोडची भीती चोरी करणा-याला. ज्याला चोरीच करायची नाही त्याला कुठलंही पीनल कोड असलं तरी काय फरक पडतो ? मी तर म्हणतो धर्म नसला तर हात पाय चालायचे बंद होणारेत का ? सेव्हन सिस्टर स्टेटच्या परंपरांना टाळ्या पडतात ते कुठल्या धर्मासाठी. एकदा डोळे मिटले कि कसल्या परंपरा आणि कसला धर्म ?

प्रत्येक धर्मातली चांगली तत्त्वं घ्यावीत आणि निधर्मी म्हणून जगावं हे मला पटतं.

माबोवरच कुठेतरी वाचलं होतं:
"या राष्ट्रास निधर्मी म्हणून घोषित करणे व पुरुषासारख्या पुरुषाने स्वतःस हिजडा म्हणवुन घेऊन तसे वागणे या दोन्हीत अर्थाअर्थी, मला तरी फरक वाटत नाही! "

>>> प्रत्येक धर्मातली चांगली तत्त्वं घ्यावीत आणि निधर्मी म्हणून जगावं हे मला पटतं.

प्रत्येक धर्मातली चांगली तत्त्वं घ्यावीत आणि हिंदू म्हणून जगावं हे मला पटतं.

>>>
धर्म, जातपात ई. च्या नावे फोडलेले खडे देखिल तर्कविसंगत वाटतात. मुळातच भारतीय विवाह व कुटूंब पध्दती, त्यातील रूढी, परंपरा, वगैरे, वगैरे गेले अनेक हजार वर्षे चालत आलेले असल्याने त्याकाळची त्यामागची कारणमिमांसा वा चौकट समजावून न घेता थेट मुळासकट ऊपटूनच काढायचे ईथे वर अनेक प्रतिसादातून सूचित केले जात आहे त्याचे आश्चर्य वाटते.
<<<

त्याकाळची कारणमीमांसा आणि चौकट आज लागू पडते की नाही हा विचार करायचा की नाही? केवळ काही हजार (किती नक्की?) वर्षे चालली म्हणून ती व्यवस्था (रूढींसकट?!) मान्य करायची हे योग्य सोडाच, शक्य तरी आहे का? जे आजही अत्यंत क्रूर पद्धतीने ती लादू पाहतात त्या (स्वार्थत्याग करणार्‍या मागच्या पिढीतल्या) लोकांना विरोध करावा की नाही?

>>इंडियन पीनल कोडची भीती चोरी करणा-याला. ज्याला चोरीच करायची नाही त्याला कुठलंही पीनल कोड असलं तरी काय फरक पडतो ? मी तर म्हणतो धर्म नसला तर हात पाय चालायचे बंद होणारेत का ? सेव्हन सिस्टर स्टेटच्या परंपरांना टाळ्या पडतात ते कुठल्या धर्मासाठी. एकदा डोळे मिटले कि कसल्या परंपरा आणि कसला धर्म ? <<

अगदि बरोबर...:फिदी:

एक हिंदू दुस-या हिंदूशी लग्न करू शकतो का ? हिंदू म्हणून आपली ओळख पूर्ण होत नाही साहेब. जात कुठली, भाषा कुठली, पोटजात कुठली .. हंगाशी !!

येव्हडं सगळं जुळल्यावर लगीन लागायचं म्हनल्यावर !!!!! कसलं हिंदू म्हणून घेऊन बसलाय. जे खरं आहे ते लिवा कि.

मला अमक्या जातीचा, पोटजातीचा म्हणून जगायला आवडेल.
( आपल्या उज्ज्वल परंपरा आहेत या. तोडू नये. सती प्रथा, स्त्रियांना घरी बसवणे, जरठ विवाह हे सुद्धा त्याच दैवी परंपरांचं अंग आहे. त्याचंही पुनरुज्जीवन करावं )

प्रत्येक धर्मातली चांगली तत्त्वं घ्यावीत आणि निधर्मी म्हणून जगावं हे मला पटतं.

+१

या आपल्या परंपरा नाहीत. घुसलेल्या अनिष्ट प्रथा आहेत. उगाच आपल्याच संस्कृतीला नावं ठेऊ नये.

>>> एक हिंदू दुस-या हिंदूशी लग्न करू शकतो का ? हिंदू म्हणून आपली ओळख पूर्ण होत नाही साहेब. जात कुठली, भाषा कुठली, पोटजात कुठली .. हंगाशी !!

>>> येव्हडं सगळं जुळल्यावर लगीन लागायचं म्हनल्यावर !!!!! कसलं हिंदू म्हणून घेऊन बसलाय. जे खरं आहे ते लिवा कि.

बरं मग काय उपाय आहे याच्यावर? तुम्ही आपल्या धर्माची नोंद "निधर्मी" व जातीची नोंद "माणूस" किंवा "भारतीय" अशी आपल्या जन्मदाखल्यापासून इतर अधिकृत कागदपत्रांवर करू शकणार आहात का? तसं नसेल तर काय उपाय आहे यावर? तुम्ही कोणताही धर्म किंवा जात नाकारत असला तरी कायदा व सरकार तसे करायला परवानगी देईल का? देत असल्यास करून बघा.

तसं नसेल तर काय उपाय आहे यावर? <<
म्हणजे?
ही परवानगी नाही म्हणून आंतरजातीय/ धर्मीय/ प्रांतीय विवाह होता कामा नयेत?
ही परवानगी नाही म्हणून असे विवाह झाल्यास जोडप्यावर/ घरच्यांवर बहिष्कार टाकणे, मारून टाकणे हे न्याय्य आहे?

या आपल्या परंपरा नाहीत. घुसलेल्या अनिष्ट प्रथा आहेत. उगाच आपल्याच संस्कृतीला नावं ठेऊ नये.

कुठून घुसल्या या परंपरा? त्यावेळी तर इतर धर्म जन्मलेही नव्हते..

>>> तसं नसेल तर काय उपाय आहे यावर? <<
म्हणजे?
ही परवानगी नाही म्हणून आंतरजातीय/ धर्मीय/ प्रांतीय विवाह होता कामा नयेत?
ही परवानगी नाही म्हणून असे विवाह झाल्यास जोडप्यावर/ घरच्यांवर बहिष्कार टाकणे, मारून टाकणे हे न्याय्य आहे?

मुळीच नाही. आंतरजातीय्/धर्मीय्/प्रांतीय विवाह हे कायदेशीर आहेत व ते तसे व्हायलाच हवेत. आणि तसे पालकांच्या परवानगीशिवाय जरी झाले तरी जोडप्यावर/ घरच्यांवर बहिष्कार टाकणे, मारून टाकणे हे पूर्ण अन्याय्य आहे.

मास्तुरे
सहमत

आम्ही तेच म्हणतोय. ठरवून आंतरजातीय विवाहही नकोत आणि जर मुलांनी निर्णय घेतले तर विनाकारण विरोध नको. विश्वास टाका त्याच्यावर.

तुम्ही कोणताही धर्म किंवा जात नाकारत असला तरी कायदा व सरकार तसे करायला परवानगी देईल का? देत असल्यास करून बघा.

निधर्मी म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. सकाळला त्याबद्दल सविस्तर वृत्त होतं. निधर्मी म्हणवून घेणं हा माझा कायदेशीर हक्क आहे. कुणी नाकारू शकत नाही तो.

मुलांना कायदा १८ ला सज्ञान मानतो आणि मुले खरोखरीची जबाबदार त्या वयाला नाहीयेत असे वाटत असेल तर १८ पूर्ण होईतो मुलांच्यात स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता निर्माण करणे, आयुष्याचे गांभीर्य कळेल, माणुसकी समजेल हे सगळे करणे पालकांच्याच हातात असते. चुका झाल्याच (४०-६०-८० वयालाही होतात अनेकांच्या) तर त्याचे परिणाम सोसण्याची मुलांची तयारी असेल एवढे घट्ट बनवायला हवे त्यांना.

ते जर पालकांनी उत्तमरित्या केलेले असेल तर मग मुलांच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे.

माझी विमा सल्लागार, नयना स्वतःची जात माणूस म्हणून (कागदोपत्री) लावते. याबाबतीत नेमके काय करावे लागले, हे तिच्याशी संपर्क झाला तर लिहिन इथे.

मंद्या
तुझी हिजड्याची पोस्ट वाचली. या विचारांची घृणा वाटली.

जेव्हां सवर्ण वि दलित, भूमिहार वि नक्षली, रणवीर सेना विरुद्ध वि गरीब मजूर असे दोन्ही बाजूंनी हिंदू मरत असतात तेव्हां चोळी बांगडी घालून घरात कोण बसलेलं असतं ?

समस्या अशी आहे की तुम्ही धर्म व जात ही संकल्पना कितीही नाकारलीत तरीसुद्धा भारतात तुमच्या जन्मदाखल्यापासून सर्व अधिकृत कागदपत्रात त्याची नोंद करावी लागते. भारतातल्या सर्व प्रमुख धर्मात "जाती" असतात. जातीमुक्त धर्म भारतात नाही (पारशी व ज्यू धर्माबद्दल कल्पना नाही). जात नसेल तर पंथ असतातच. हिंदूंमध्ये हजारो जाती आहेत. पण मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख यांच्यात सुद्धा अनेक जाती व पंथ आहेत. (उदा. माजी मंत्री बुटासिंग हा "दलित" शीख आहे व तो दलितांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवत असे).

मी स्वतः धर्म व जात नाकारायचे कितीही ठरविले तरी समोरचा तसे करेलच असे नाही आणि सरकारही तसे करून देत नाही. मग यावर उपाय म्हणजे मी कागदोपत्री एका विशिष्ट धर्माचा व जातीचा असेन, पण वागणूकीतून आणि विचाराने कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा नाही असे करता येईल. पण जेव्हा माझ्या मुलीचे/मुलाचे लग्न करायची वेळ येईल तेव्हा, समोरचे कुटुंब माझ्या विचारांचे नसेल तर तो विवाह अपयशी ठरण्याची शक्यता जास्त आहे. मी निधर्मी पण समोरचा कट्टर धार्मिक किंवा मी स्वतःला कोणत्याही जातीचा मानत नाही पण समोरचा जातीकरता माती खायला तयार असेल तर असे विवाह अयशस्वी ठरण्याची शक्यता जास्त आहे.

मग यासाठी मी माझ्या विचारांचा म्हणजे पूर्ण निधर्मी आणि जातपात अजिबात न मानणारा असा जावई किंवा सून शोधली पाहिजे, म्हणजे मग असा विवाह यशस्वी ठरण्याची शक्यता जास्त असू शकते. म्हणजेच पूर्वीच्या एका प्रतिसादात प्रमोद देवांनी लिहिल्याप्रमाणे, (प्रमोद देव : "शक्यतो मुलीला आपल्यासारख्या पद्धती,संस्कार इत्यादि असणार्‍या घरात द्यावं असं मला वाटतं...तिथेही ती रूजेलच असं खात्रीने नाही सांगता येत..पण रुजण्याची शक्यता जास्त असू शकते इतकंच.") वागणं होईल.

>>जेव्हां सवर्ण वि दलित, भूमिहार वि नक्षली, रणवीर सेना विरुद्ध वि गरीब मजूर असे दोन्ही बाजूंनी हिंदू मरत असतात तेव्हां चोळी बांगडी घालून घरात कोण बसलेलं असतं ?<<

याला म्हणतात वडाची साल पिंपळाला, पिंपळाची आंब्याला, आंब्याची काजुला..............................लावणे Lol
उगाच कैच्याकै पोष्ट, मंदार जोशींच्या त्या पोष्टशी, वर लिहलेल्या शब्दांचा काडीचा तरी सबंध आहे का?:फिदी: उगाच काहीतरी Rofl

Pages