"सत्यमेव जयते" भाग ५ (Is Love A Crime?)

Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49

आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण +१

किरणः

अतिशय तळमळीने लिहलेली पोस्ट! १००% पटली. तावातावाने नपुंसक (unproductive) चर्चा चघळणे हा आपला भारतीयांचा National Time pass आहे. भारताबाहेर राहणारे आम्ही भारतीय सुद्धा ह्याला अपवाद नाही. असो.

किरण,
बरोबर.

स्पोटनंतर मुंबई कशी सुरुळीत चालते तसेच आहे हे. १३ भाग झाले की बस.. Sad

एकातून दुसरा , दुस-यातून तिसरा, हे सगळे भाग एकात एक गुंफले गेले आहेत आणि फक्त सदसदविवेकबुद्धीला आवाहन करताहेत. विवेक कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे. घटनेपेक्षाही श्रेष्ठ आहे आणि रूढी परंपरांपेक्षाही. >>> अप्रतिम! हे सगळे भाग एकमेकात गुंतलेले आहेत असं जाणवत होतं पण ते नेमके काय हे तू अचूक मांडले आहेस, जिओ!

हाय सई

हे पहा सगळे जन मी नवीन आहे इथे मला जास्त काही माहीत नाही ..... मला सांगा ही विनंती तुमचा नवीन मित्र अक्षयकुमार

एकातून दुसरा , दुस-यातून तिसरा, हे सगळे भाग एकात एक गुंफले गेले आहेत आणि फक्त सदसदविवेकबुद्धीला आवाहन करताहेत. विवेक कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे. घटनेपेक्षाही श्रेष्ठ आहे आणि रूढी परंपरांपेक्षाही. >>> अप्रतिम! हे सगळे भाग एकमेकात गुंतलेले आहेत असं जाणवत होतं पण ते नेमके काय हे तू अचूक मांडले आहेस, जिओ! >>>>>>>>>> +१

मयेकर साहेब, त्या बातमीचा मतितार्थ असा की आन्तरजातीय विवाहात पूर्वी फक्त बापाची जातच लावली जायची (म्हणजे सवर्ण बाप्/मागास आई असेल तर अपत्यास रिझर्वेशनच्या फायद्यापासुन वन्चित रहावे लागायचे) त्या ऐवजी, केवळ आन्तरजातिय विवाहात, सन्तती, गरजेप्रमाणे/निवडीप्रमाणे आई किन्वा बापाची मागास जात रिझर्वेशनचे फायदे मिळविण्याकरता लावू शकेल. Happy
या निर्णयान्मुळे म्हणे जातियवाद नष्ट होण्यास मदत होईल अशी काहीशी टीपण्णी तज्ञ ज्येष्ठ विचारवन्तान्नी केलीये असे मी लोकसत्तामधे वाचली.

>>या निर्णयान्मुळे म्हणे जातियवाद नष्ट होण्यास मदत होईल
महान विनोद...
>>रिझर्वेशनचे फायदे मिळविण्याकरता लावू शकेल
यातच सर्व काय ते आलं. पुन्हा एकदा सत्ता सत्चिदानंदमय आहे! Happy

(सर्वोच्च न्यायलयाचा निकाल असल्याने त्याचा आदर करायलाच हवा. थोडक्यात तुम्ही आम्ही कितीही जातीयवाद नष्ट करा असे म्हटले तरी तो "कायदेशीर" कायम आहे. एक पाऊल पुढे तर दोन पावले मागे असे काहीसे.. )

>>> थोडक्यात तुम्ही आम्ही कितीही जातीयवाद नष्ट करा असे म्हटले तरी तो "कायदेशीर" कायम आहे <<< हे सगळ्यात मोठ्ठे सत्य! Happy
बर्‍याच वर्षान्पूर्वी, म्हणजे टीनेजर अस्ताना, समाजवादी/कम्युनिस्ट विचारान्च्या भूलथापान्ना भूलून मी बापाला सान्गितले की सगळे "जीवजन्तू" समान अस्ते, जातीपाती वगैरे हीन्दू धर्माची कीड वगैरे, तर उगा हे जानवेबिनवे कशाला? बापाने मुस्काटात नै चढवली माझ्या पण दरडावुन सान्गितले की जानवे घाल वा नको, तुझा प्रश्न, पण जरा मोठा झाल्यावर बाहेरच्या जगाचा नीट उघड्या डोळ्यान्नि अन अक्कलेने अनुभव घेशिल तेव्हा झक्कत जानवे घालशील, अन तेव्हा ते तसे ठरवशील, ते कायम पाळ. त्यान्चे अक्षर न अक्षर खरे ठरत गेले. Happy

आंतरजातीय दांपत्याच्या मुलांना मिळणार आईची जात>>
ग्रेट! असंच सरसकट सर्व मुलांना आपले आडनावही निवडता यावे (आईचे/वडीलांचे/दोन्ही/यापैकी नाही/कुठलेही नाही इ) म्हणजे "घराण्याचे नाव चालवायला" केल्या जाणार्‍या मूर्ख अन विकृत परंपरा/रुढींचे समूळ उच्चाटन होईल. (सध्याही निवडता येते पण कटकटी बर्‍याच आहेत, असं ऐकून आहे. त्यामुळे बाय डिफॉल्ट वडलांचेच आडनाव लावले जाते.)

>>> म्हणजे "घराण्याचे नाव चालवायला" केल्या जाणार्‍या मूर्ख अन विकृत परंपरा/रुढींचे समूळ उच्चाटन होईल. <<< रुढी परम्परा वा घराणी इत्यादीन्ना सरसकट मूर्ख/विकृत ठरविणे हे तुमचे विचारस्वातन्त्र्य जरुर आहे, मी मानतो ते,
पण वास्तवात जिथे पाळीव कुत्री/घोडे/गाढवे यान्च्या देखिल मागिल साताठ पिढ्यान्चा इतिहास जपला जातो/ त्यानुसार त्यान्च्या लाखो रुपयात "किम्मती" ठरतात, तिथे मर्त्य मानव असा कोण वेगळा लागुन गेला की कुत्रे/घोड्यान्ची जातीनिहाय घराणी तेवढी तो पाळेल, पण "मानव" म्हणून तो "एकसमान" असेल? जरा जास्तच अपेक्षा नै वाटत?

वेगवेगळ्या जातींच्या कुत्र्यांमधले फरक निसर्गदत्त आणि दृश्यमान असतात. तसेच माणसामाणसातील जातीनिहाय फरकाबद्दलही असते असे म्हणायचेय का लिंबूमहाराज?

एकाच बातमीबद्दल खंत व्यक्त करणार्‍यांपैकी एकाने 'जातीभेद नष्ट होऊ नयेत' अशा अर्थाचे तर दुसर्‍याने 'अशाने जातीयवाद नष्ट होणार नाहीत' अशी मते व्यक्त केलीत Happy

(सर्वोच्च न्यायलयाचा निकाल असल्याने त्याचा आदर करायलाच हवा. थोडक्यात तुम्ही आम्ही कितीही जातीयवाद नष्ट करा असे म्हटले तरी तो "कायदेशीर" कायम आहे. एक पाऊल पुढे तर दोन पावले मागे असे काहीसे.. )

अनुमोदन.
पूर्वी ही सवलत नव्हती तेव्हा मेडिकलला फ्री सीट घ्यायचीच म्हणून आईवडिलांचा खोटा घटस्फोट दाखवून आईची जात लावणारी एक हायफाय मागासवर्गीय आमच्या वर्गात होती. केवढं ते प्लॅनिंग !

Proud

लिंबु,
खरं म्हणजे तुमच्यासमोर डोके फोडण्यात अर्थ नाही हे माहीत आहे मला.असो.
सरसकट सगळ्या परंपरा मूर्ख अन विकृत असं म्हटलं नाहीये. पुर्ण वाक्य नीट वाचा प्लीज.

बाकी ते पाळीव कुत्री अन गाढवांचं लॉजिक वरवर बघता बरोबर वाटतं पण जरा विचार केलात तर त्यातला फोलपणा कळेल.
पाळीव कुत्री त्यांच्या "जाती"नुसार वेगवेगळी कामे करतात किंबहुना त्यांनी ती ती स्पेशलाइज्ड कामे करावीत म्हणूनच त्यांचे ब्रीडींग केले जाते. हेच मानवाच्या बाबतीत लागू आहे/असावं, असं म्हणायचंय का तुम्हाला? म्हणजे श्वेतवर्णी मानवाने केवळ आपले दिखाऊ मिजास करावी (पोमेरियन सारखी), कृष्ण्वर्णीय( तुमच्या भारतीय मनाला तुम्ही कोब्रा असल्यामुळे श्वेतवर्णीय मानत असला तरी जगभर तुम्ही-आम्ही काळेच बरं!) लोकांनी गुलामगिरी करावी इ.इ?

मयेकर, तुम्ही सुध्दा? Happy
असो.

अराजक बाफ हा माणसाबद्दलच्या जातीयवादी (म्हणजे नेमके काय?) लिखाणामूळे बंद केला गेला. आता हा बाफ बहुदा प्राण्यांबद्दलच्या जातीयवादी (म्हणजे नेमके काय?) लिखाणामूळे बंद होईल असे वाटते.. अर्थातच दोन्ही बाफ चा विषय व शीर्षक याच्याशी त्याचा काही संबंध नाहीच- हाच काय तो समान धागा!

आमिर चा कार्यक्रम खाप मूळे खपू नये अशी सदिच्छा तसेच हाही बाफ बंद पडू नये एव्हडीच माफक अपेक्षा.

जातीय्वदाचा आणखी एक धागा सकाळी सकाळी चालु होउन बंदही पडला म्हणे.. काय होते त्यात?

@अ‍ॅडमिन

मंदार कागलकर | 13 June, 2012 - 16:21 नवीन
जातीय्वदाचा आणखी एक धागा सकाळी सकाळी चालु होउन बंदही पडला म्हणे.. काय होते त्यात?

यांच्या या पोष्टीमुळे त्या बाफवर न पडलेल्या वादावादीच्या पोष्टी इथे पडतील याची नोंद घ्यावी व योग्य वाटल्यास कारवाई करावी,

>>> यांच्या या पोष्टीमुळे त्या बाफवर न पडलेल्या वादावादीच्या पोष्टी इथे पडतील याची नोंद घ्यावी व योग्य वाटल्यास कारवाई करावी, <<<<
तू पण न्ना मन्दार, कै पण सान्गतोस, अरे तुला माहित नाही का?
की कावळा बसायला अन फान्दी मोडायला, वा कोम्ब्ड आरवायला अन सुर्य उगवायला जसे एकमेकान्चे कारण नस्ते, तसेच यान्च्या पोस्टीमुळे कुठे काय आभाळ कोसळत अस नाहीये! Proud Happy उलट त्यान्चीच कित्तीकित्ती मदत होते, ठाऊके?

>>पण वास्तवात जिथे पाळीव कुत्री/घोडे/गाढवे यान्च्या देखिल मागिल साताठ पिढ्यान्चा इतिहास जपला जातो/ त्यानुसार त्यान्च्या लाखो रुपयात "किम्मती" ठरतात, <<<

लिंबूजी,
एक शंका.
त्या कुत्र्यांमधे महाग असतात नं, त्या बहुतेक ठरवून 'ब्रीड' केलेल्या विकृती असतात. उदा. बुटक्या पायांचं कुत्रं, नकट्या नाकाचं इ.इ.
घोड्यांचं म्हणाल तर घोडेबाजी आजकाल फक्त विजय मल्ल्या सारख्याला परवडते, अन रेस कोर्सवर जाऊन पैसे वगैरे लावणे हे फक्त बाबा कदमच्या कादंबरीत दिसते.

बाकी तुम्हाला तुमच्यात अन कुत्र्या/घोड्यांत साधर्म्य जाणवत असेल, तर त्याला आमचा नाईलाज आहे. अन तुमच्या पोस्टींवरून तुमची किम्मत किती करायची हो? Wink रुपयांत की डॉलरात?

>>नताशा | 13 June, 2012 - 16:01
लिंबु,
खरं म्हणजे तुमच्यासमोर डोके फोडण्यात अर्थ नाही हे माहीत आहे मला.असो.
सरसकट सगळ्या परंपरा मूर्ख अन विकृत असं म्हटलं नाहीये. पुर्ण वाक्य नीट वाचा प्लीज. <<

पहिल्या वाक्याशी सहमत.
ज्यांच्याबद्दल दुराभिमान बाळगला जातो त्या सगळ्या परंपरा मूर्ख अन विकृतच असतात.
वाक्य कोणतेहि असो, अन पूर्ण अपूर्ण कसेही वाचलेले असो.

Pages