Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49
आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंदार , हे फक्त लग्नाच्याच
मंदार , हे फक्त लग्नाच्याच बाबत का? सगळ्याच बाबतीत असायला हवे.
एका विशिष्ट वयापर्यंत पालक मुलांचे सपोर्ट सिस्टम असतात. मग दोघे एकमेकांच्या सोबतीने चालतात. नंतर मुले पालकांची सपोर्ट सिस्टम बनतात. मुलांवरच्या प्रेमाला 'आमचे ऐकाल तरच' अश्या अटी लागू असू नयेत. दुसर्याने घेतलेल्या निर्णयाला पराकोटीचा विरोध केला तर तो निर्णय चुकीचा ठरण्यास आपल्या विरोधाचाही हातभार लागू शकतो, हेही पालकांनी लक्षात घ्यायला हवे.
काल एका मालिकेत ऐकलेले एक वाक्य चक्क पटले.
"तुम अपने बच्चों का भला चाहती हो इसमें कोई शक नही, पर जरूरी तो नही कि जो तुम चाहो उससे उनका भलाही हो|"
ह्म्म्म्म
ह्म्म्म्म
म्हणजे पालकांचं मत न जुमानता
म्हणजे पालकांचं मत न जुमानता मनमानी करुन लग्न करायचं आणि तोंडावर आपटल्यावर परत पालकांनी मदत करावी ही अपेक्षा? मज्जाय!!!
>>>>>>>>>>> बाप रे .. फारच टोकाची भुमिका असते रे तुझी बर्याच दा ..
तुझ्या बाबतीत असे झाल्यास तु काय करशील ?? न जुमानता लग्न वगैरे लग्न केले आणि काहि कारणास्तव नाहि जमले मग ??
(No subject)
मंदार, थोडीफार बंडखोरी
मंदार, थोडीफार बंडखोरी प्रत्येक पिढीत झालेली असते. निरपेक्ष प्रेम असे काहीतरी असतेच ना ?
आपले न ऐकता, बाळ पावसात जाते / भिजते, त्याला सर्दी होते... त्यावेळी आपण कोरडा टॉवेल घेऊन धावतोच ना !
ह्म्म्म्म दिनेशदा. बरोबर.
ह्म्म्म्म दिनेशदा. बरोबर.
निधर्मी काय , आंतरजातीय काय.
निधर्मी काय , आंतरजातीय काय. मजा चाललीय.
स्वतःची मुलगी पळून गेली कि मग तोंड लपवत फिराल ना तेव्हा हे वेळ काढून वाचा.
ओळखा पाहू हे वाक्य कुणाचे
ओळखा पाहू हे वाक्य कुणाचे आहे......??
जातीभेद ही एक अशी भिंत आहे जी तोफेच्या गोळ्याच्या मार्याने फुटणार नाही. पण लाडूच्या मार्याने नक्कीच फुटेल...
आधी आहे जातीत एकोप्याने रहा
आधी आहे जातीत एकोप्याने रहा कि.
उत्तर : जन्मजात जातिभेद
उत्तर : जन्मजात जातिभेद मोडायचे म्हणजे काय करायचे ( उत्तरार्ध) हे प्रकरण वाचा..
घरटी एक नेता अशी ज्या पक्षाची
घरटी एक नेता अशी ज्या पक्षाची अवस्था आहे त्या पक्षाचा एक नेता जातीभेद गाडू असं म्हणत होता.
जी मते मांडायची असतील ती
जी मते मांडायची असतील ती कृपया आपल्या स्वत:च्या आयडीने मांडावीत. असंख्य ड्युआय घेऊन जरी कोणी तेच तेच मुद्दे मांडले तरी त्यामुळे अजिबात विशेष प्रभाव इ. पडत नाही. हसं होतं. स्वतःच्या मतांबद्दल ठाम नाहीत म्हणून ड्युआयड्यांचा सहारा घेतल्यासारखं दिसतो. हा पळपुटेपणा बंद करा.
काय लिहीलंय ते पहावं.
काय लिहीलंय ते पहावं.
काय लिहीलंय ते पहावं. >>>>
काय लिहीलंय ते पहावं.
मी वर लिहिलंय ते तुम्हाला लागू होतं असं का बरं वाटावं तुम्हाला? 
>>>>
नाही वाटलं तसं. पण मी जातो
नाही वाटलं तसं. पण मी जातो आता.
अर्रर, ताठरपणा गेला की काय?
अर्रर, ताठरपणा गेला की काय?
बघा मी परवाच जातीबाहेरचं लग्न
बघा मी परवाच जातीबाहेरचं लग्न म्हणजे पोरगी पळालि म्हणतात असं लिहिलं होतं'
हो गं साती. १० वर्षांनी कळलं
हो गं साती. १० वर्षांनी कळलं मला की आईवडिलांनी कौतुकाने, प्रेमाने, आनंदाने करून दिलेलं असलं तरी मी पळालेच.
आंतरजातीय करूनही काही चित्तथरारक आन्भव नैत, कोणी पैसावसूल डायलॉग्ज मारले नाहीत.. हाऊ बोरिंग! असं समजत होते मी आणि एकदम थ्रिलची यंट्रीच झाली कहानीमे तू हे सांगितल्यापास्नं
हाहाहा नीधप ... बाहुल्या
हाहाहा नीधप ...
बाहुल्या पळाला वाटत...
फारच किव कराविशी वाटते रे बाहुल्या तुझ्या विचारांची . मानसिक विक्रुतिच वाटते मला कधी कधी अश्या लोकांमधेय ..
प्रकाटाआ
प्रकाटाआ
>>> बरेचदा मास्तुरेंचं आणि
>>> बरेचदा मास्तुरेंचं आणि लिंबुटिंबु यांचंही लिखाणही आवडतं.
धन्यवाद किरण! मलाही तुमचे प्रगल्भ प्रतिसाद आवडतात. कधीकधी विचार न जुळणारे असतात, पण तुमचे प्रतिसाद संयत व प्रगल्भ असतात.
>>> >>>> साती, मुलांपेक्षा आपले इगो, संस्कृतीरक्षण, समाज हे महत्त्वाचं आहे का? उलट "देव न करो, पण जर तुमचा निर्णय चुकीचा ठरला तरी आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत" असा दिलासा देणे मला तरी योग्य वाटते. केवळ लग्नाच्याच नाही तर आयुष्यातल्या इतर कोणत्याही निर्णयाबाबत. असा भावनिक दिलासा कोणालाही खूप बळ मिळवून देतो.
मलाही नेमकं हेच म्हणायचं होतं! मुलांना सावध करूनसुद्धा त्यांनी चूक केली तरी वेळ येताच त्यांच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे.
पण तुमचे प्रतिसाद संयत व
पण तुमचे प्रतिसाद संयत व प्रगल्भ असतात.
अहो मास्तुए गै.स. नको. सध्या फॉर अ चेंज म्हणून गंभीर प्रतिसाद देतोय. गाडी कही मूळ पदावर येईल सांगता येत नाही
मास्तुरे , तुमचे म्हणणे १०० %
मास्तुरे , तुमचे म्हणणे १०० % खरे आहे आणि दिनेशदा आपले उदाहरण गोड आहे.
धन्यवाद. मला फक्त स्वतःबद्दल खात्री आत्ताच देता येत नाही.
.....धन्यवाद. मला फक्त
.....धन्यवाद. मला फक्त स्वतःबद्दल खात्री आत्ताच देता येत नाही >>>> साती तुम्ही आता फक्त असे म्हणताय. देव ने करो पण असा प्रसंग आलाच तर आपल्या मुलांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे रहाणाऱ्या तुम्हीच पहिल्या असाल.
मित्रांनो पाच भाग झाले या
मित्रांनो
पाच भाग झाले या मालिकेचे. एका रात्रीत क्रांती वगैरे असं उद्दिष्ट तर नक्कीच नसावं या शो चं. प्लीजच इथे धंदा वगैरे बद्दल चर्चा नको. तो मुद्दा निकालात निघालेला आहे. या पाच भागात काही समानता आहे का ? स्वतंत्रपणे एपिसोडस पाहीले तर नव्याने हा मुद्दा मांडला जातोय असं नाही. मग एखादी थीम घेऊन हा शो चालला आहे का ?
पहिला भाग स्त्री भ्रूण हत्येचा. बळी आहे ते असहाय्य भ्रूण. ज्याला आपल्या हक्कांबद्दल तर सोडाच मारेक-यांबद्दलही काही माहिती नाही. मारेकरी आहेत आईवडील. आणि सुपारी घेताहेत डॉक्टर्स. स्त्री भ्रूण हत्याच का ? याच आढावा घेताना मुद्दा येतो तो अस्तित्वात असलेल्या परंपरा आणि सामाजिक रूढींचा. मुलीला जन्म देण्यापेक्षा गर्भातच मारली असती तर बरं झालं असतं हे बोलून दाखवलं जायचं त्याला विज्ञानाची साथ मिळाली आणि ते बोल प्रत्यक्षात खरे झाले.
स्त्री च्या जन्माची ही दैना जाणवली पहिल्या भागात आणि कारणं दिसली दुस-या भागात. लग्नावरचा खर्च, त्यानंतरची परवड. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी हे दाखवणारा हा एपिसोड पहिल्या भागाचं उत्तर देऊन गेला.
परंपरा हे एक उत्तर तर आहेच. पण समाजाची अधोगती शिक्षणाने रोखली जायला हवी तसं न होता उच्चशिक्षित डॉक्टर्सच कसायाचं काम करताना दिसले. आणि मग त्या मानसिकतेचा वेध घेतला गेला डॉक्टरांच्या एपिसोडमधे.
एकीकडे लग्न हा असा धंदा बनत असतान प्रेमविवाह करणे हे उत्तर असू शकतं. पण भारतात ते ही सोपं नाही हे दाखवून देणारा पाचवा भाग होता. एकातून दुसरा , दुस-यातून तिसरा, हे सगळे भाग एकात एक गुंफले गेले आहेत आणि फक्त सदसदविवेकबुद्धीला आवाहन करताहेत. विवेक कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे. घटनेपेक्षाही श्रेष्ठ आहे आणि रूढी परंपरांपेक्षाही. आजची उच्चसिक्षित पिढी सुशिक्षित आहे का असा विचार करायला लावणारी ही मालिका आहे.
न्युलीअर फॅमिलीच्या जमान्यात आजचा माणूस समाजापासून तुटत असताना सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल फॉर अ चेंज म्हणून विचार व्हावा हे माफक उद्देश असायला हरकत नाही. असा फोरम नाहीच ना कुठे !
प्रत्येक एपिसोडनंतर चर्चा चालूच आहेत . फक्त मायबोलीवर नाही तर, कार्यालयात. कॉलेजकट्ट्यावर, सकाळी फिरायला जाणा-या ज्येष्ठ नागरिकांमधे, दुपारच्या महिलाष्टकांत.. सगळीकडेच.
काही असो, समाजाचं रूप समोर येतंय. महाराष्ट्रात भ्रूण हत्यांविरोधात धडक कारवाई चालू आहे, राजस्थानात जीवनदायिनी योजना चालू आहे, काही आदर्श उदाहरण समोर येत आहेत. त्याच वेळी निषेध, बहिष्काराच्या धमक्या हे समोर येतंय. डॉक्टरांवरच्या एपिसोडमुळे अत्यानंद होणंही समोर येतंय तर डॉक्टरांचा अनाकलनीय बहिष्कारही. त्या वेळी खूष असणारे काही लोक ज्या वेळी आपल्या समाजाच्या पंचायतींविरुद्ध एपिसोड आला त्या वेळी नाराज झाले. दुस-याची फजिती ती आपली करमणूक. या निमित्ताने समाजाने यावरही विचार केला पाहीजे. एकीकडे विजन २०२० डोक्यावर घेऊन तरुण पिढी नाचतेय त्याच वेळी समाजाचे काही ठेकेदार चर्चाही घडू देत नाहीत. विरोधी विचार मांडू देत नाहीत हे समोर येतंय. पण ,आपणही या सर्वांचा भाग असू कदाचित. प्रत्येक गोष्ट दुस-यावर नेउन ठेवलं कि संपलं असं नको आता. सध्या राजकारणी हे असेच नारळ फोडायचे दगड झालेत. ही संधी आहे बदल घडवायची.
मात्र, तेरा भागानंतर सगळं थंड होईल कदाचित . मग या विचारमंथनाचं काय ? पुढे स्टार प्लस, आमीर खान काय करणार आहेत ? त्यांनी काही केलं तरच आपण चर्चा करायच्या का ? कि मग पुन्हा सत्यमेव जयतेची वाट बघत बसायचं ?
परदेशी राहणा-यांच्या बोलण्यात, लिखाणात विचार स्वातंत्र्याचा आदर, व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर या बद्दल खूप काही येतं. अशी कुठली गोष्ट आहे जी खाल्ल्याने ही प्रगल्भता आली असावी ? एक समाज म्हणून कुठे कमी पडतोय आपण ?
परफेक्ट पोष्ट......
परफेक्ट पोष्ट......
किरण, कुठे कमी पडलो सांगू ?
किरण,
कुठे कमी पडलो सांगू ? स्वातंत्रानंतर काही ध्येयंच राहिलं नाही. देश कसा चालवायचा, समाज कसा बांधायचा याचा विचार झाला नाही, स्वप्ने मात्र भरपूर दाखवली गेली, पण राष्ट्रभावना मात्र रुजवता आली नाही, रुजली नाही.
किरण, पोस्ट आवडली.
किरण, पोस्ट आवडली.
व्वा किरण.... अत्यंत संयतपणे
व्वा किरण.... अत्यंत संयतपणे पाचही भागांचे सार तुम्ही इथे मांडले आहेत आणि अशा कार्यक्रमातून प्रकट होणार्या अपेक्षांना मूर्त स्वरूप येईल का नंतर सारे काही शांत शांत...व परत 'मागील पानावरून पुढे चालू' ही समाजभावना....यावरही तुम्ही छान प्रकाश टाकला आहे.
पण तरीही या निमित्ताने टीव्हीची जबरदस्त ताकद तरी कळली आणि हेही कळते की या माध्यमाचा यथार्थपणे खुद्द शासनकर्त्यानीच "सत्यमेव जयते" चा सत्य अर्थ कारभारात करून घ्यायचे ठरविले तर कुणी सांगावे आपल्या देशाबद्दलच्या आपल्या कल्पना कदाचित मूर्त स्वरूपात येऊ तरी शकतील.
(काहीसे अवांतर ~ येत्या रविवारी "हीरो" हा विषय आहे.)
किरण काका... माझा निषेढ
किरण काका...
माझा निषेढ नोण्डव्लेला त्या धाग्यावर आहे... असो.
..मात्र, तेरा भागानंतर सगळं थंड होईल<<< सहमत!
Pages