"सत्यमेव जयते" भाग ५ (Is Love A Crime?)

Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49

आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कायदा जात धर्म सक्तीची मानतो ते फक्त सु व्यस्थेच्या दृष्टीने.. उद्या एखाद्याने स्वतःला निधर्मी घोषीत करुन आता मला हिंदु धर्माचा पोटगीचा कायदा लागु नाही, असे म्हणेल... वारसांचे प्रश्न, लग्न, पोटगी यातून पळवाटा काढू नयेत म्हनुन कायदा तसे करु देत नाही.

मास्तुरे,
हा प्रायोरिटीजचा प्रश्न आहे. त्या प्रत्येकाच्या (आईवडिल व मुले) वेगळ्या असू शकतात. आणि ज्या मुलीला/ मुलाला तडजोडी करायच्या असतात तिने/त्याने आपण कुठे तडजोडी करणार आणि कुठे नाही हे ठरवावे आईवडिलांनी ठरवण्यापेक्षा नाही का?
उदाहरणार्थ घरात मांसाहार शिजवला जाणे हे अज्जिबात न चालणार्‍या आईच्या मुलीला स्वतः खात नसली तरी घरात मांसाहार शिजवला जाणे ह्याचे फारसे काही दुखत नसेल. मग मुलीने निवडलेल्या मुलाच्या घरात मांसाहार शिजवला जातो ते आवडत नाही या कारणास्तव आईने मुलीला लग्नाला विरोध करावा का?

स्थळ म्हणून आईवडिलांनी आखलेल्या क्रायटेरियापेक्षा इतर कुठल्या गोष्टीचेच महत्व मुलीला/ मुलाला वाटत असेल तर?

या आपल्या परंपरा नाहीत. घुसलेल्या अनिष्ट प्रथा आहेत. उगाच आपल्याच संस्कृतीला नावं ठेऊ नये. >>>>>>> अनिष्ट प्रथा घुसलेल्या असतील तरी आपल्या संस्कृतीला नावं ठेऊ नये ! Proud

याला म्हणतात वडाची साल पिंपळाला, पिंपळाची आंब्याला, आंब्याची काजुला..............................लावणे हाहा >>>> Proud

स्वाती,
धन्यवाद! मला नेमके हेच म्हणायचे होते.. फक्त सरसकटच सर्व केरात अशा टोकाच्या भूमिकेने सुरुवात करू नये अशा अर्थी मी लिहीले होते.
>>>>त्याकाळची कारणमीमांसा आणि चौकट आज लागू पडते की नाही हा विचार करायचा की नाही?
नक्कीच करायचा... जे आजही लागू आहे, कारण ज्याला समूळ आधार आहे जो आजही लागू होतो ते ठेवावे, नाही लागू होत ते सोडून द्यावे, जमल्यास त्याजागी दुसरे सुधारीत आणावे. बरेच वेळा फेकून देणे टाकून देणे सोपे असते, त्याजागी दुसरा योग्य पर्याय देणे तितकेसे सोपे नसते.
>>केवळ काही हजार (किती नक्की?) वर्षे चालली म्हणून ती व्यवस्था (रूढींसकट?!) मान्य करायची हे योग्य सोडाच, शक्य तरी आहे का?
असे कुणीच म्हणत नाहीये... ती तशी अनेक वर्षे का होती हे समजून घेतल्यास आणि काळाच्या ओघात त्यात झालेले बदल जाणून घेतल्यास सर्वार्थाने त्यातले टाकाऊ काय व टीकाऊ काय हे स्पष्ट होईलच.
>> जे आजही अत्यंत क्रूर पद्धतीने ती लादू पाहतात त्या (स्वार्थत्याग करणार्‍या मागच्या पिढीतल्या) लोकांना विरोध करावा की नाही?
यावर नेमकी ऊत्तर देता येणार नाही कारण आज अमेरीकेत मुलाला चापट मारणे क्रूर असले तरी ईतर देशात ते क्रूर असतेच असे नाही.. अरब राष्ट्रात रमदान मध्ये बाहेर सार्वजनिक ठिकाणी संध्याकाळी ऊपवास सोडेपर्यंत दिवसभर खायला प्यायला (गरोदर स्त्रीया, लहान मुले यांना ही अट लागू नाही) मनाई आहे, मग तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, रमदान पाळत असा वा नसा.. हे एखाद्याला क्रूर वाटू शकेल..(त्यांनी ते कायदेशीर केले आहे त्यात धार्मिक चर्चेला वावच ठेवलेला नाही हा भाग निराळा). तेव्हा विरोध हा निव्वळ व्यक्तींना, वा पध्दतीला नसून मुळात तत्वाला असावा का असा मुद्दा आहे.

शेवटी कुठलेही नाते संबंध हे निव्वळ जात, धर्म, ई. च्या बळावर टीकून रहातात असे विधान कुणिही करत नाही. मात्र धर्म, जात ई. मूळे नाते संबंध तुटू शकतात का? किंवा तसे असूनही ते अधिक फुलू शकतात का याचे ऊत्तर निव्वळ व्यक्तीसापेक्ष नसून त्याला समाज, कायदा, परंपरा अशा अनेक बाजूंची चौकट आहे एव्हडेच म्हणणे आहे.

अरब राष्ट्रात रमदान मध्ये बाहेर सार्वजनिक ठिकाणी संध्याकाळी ऊपवास सोडेपर्यंत दिवसभर खायला प्यायला (गरोदर स्त्रीया, लहान मुले यांना ही अट लागू नाही) मनाई आहे, मग तुम्ही कुठल्याही धर्माचे असा,

उघड्यावर खायला बंदी आहे.. तुम्ही हॉटेलात आत जाऊन खिडकी बंद करुन जेवलात तर चालते. आता अर्थात हॉटेलवालेच जर सगळे मुसलमानच असतील तर कोणत्याच हॉटेलात तुम्हाला काही मिळनार नाही. दुधाची पिशवी विकत घेतली तर तशीच न्यायची नाही. पिशवीत झकुन न्यायची.

अन्नाचे दर्शन हेदेखील टाळावे या उद्देशाने ते आहे.. तुम्ही तुमच्या घरात जाऊन दार बंद करुन दिवसभर खात बसा , ते चालते.

>> तेव्हा विरोध हा निव्वळ व्यक्तींना, वा पध्दतीला नसून मुळात तत्वाला असावा का असा मुद्दा आहे.
विरोध पद्धतीला आहे ना! (तू कार्यक्रम पाहिलास असं गृहित धरून) सहेतुक मानववध, सामाजिक बहिष्कार यांना विरोध आहेच, नाही कसा? नीधप म्हणाली तसं आईबापांचाच धर्म, जात, तत्त्वं, आवडीनिवडी मुलांनी जशाच्या तशा पाळाव्यात काहींची भाबडी इच्छा असते. पण ती अशा पद्धतीने मांडली जाण्याला / अंमलात आणण्याला विरोध असणारच!

>>>>>>>>>>>>>> आम्ही तेच म्हणतोय. ठरवून आंतरजातीय विवाहही नकोत आणि जर मुलांनी निर्णय घेतले तर विनाकारण विरोध नको. विश्वास टाका त्याच्यावर. >>>>>> अगदी अगदी.

पण माझं म्हणणं : ठरवून आंतरजातीय लग्न केलं तरी हरकत काय आहे?

>>>>>>>>>>> मुलांना कायदा १८ ला सज्ञान मानतो आणि मुले खरोखरीची जबाबदार त्या वयाला नाहीयेत असे वाटत असेल तर १८ पूर्ण होईतो मुलांच्यात स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता निर्माण करणे, आयुष्याचे गांभीर्य कळेल, माणुसकी समजेल हे सगळे करणे पालकांच्याच हातात असते. चुका झाल्याच (४०-६०-८० वयालाही होतात अनेकांच्या) तर त्याचे परिणाम सोसण्याची मुलांची तयारी असेल एवढे घट्ट बनवायला हवे त्यांना. ते जर पालकांनी उत्तमरित्या केलेले असेल तर मग मुलांच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे.
>>>> पूर्ण अनुमोदन.

तरीही तुम्हाला पसंत नसेल तर त्यांच्याशी संबंध तोडा. यामुळे तुम्हाला सुख, समाधान आणि शांती लाभणार असेल तर उत्तम आहे हा तोडगा.

वर कोणीतरी आईबापांचा निर्णय मानायचा नसेल तर घराण्याचं नाव लावू देणार नाही असा एक महाहास्यास्पद मुद्दा काढला होता. घराण्याचं नाव म्हणजे काय? एकतर त्या घरात तो मुलगा / ती मुलगी जन्माला आली तेव्हाच त्यांना त्या घराण्याचं नाव आपोआप चिकटतं. जसं तुम्हाला चिकटलं तसंच तुमच्या मुलाला. तुम्हीही काही ते नाव स्वकर्तृत्वानं कमावलेलं नाही. दुसरं म्हणजे नाही नाव लावलं तर खरंच त्या मुला-मुलींचं काही बिघडणार आहे का? अशी काय राजे-रजवाडे किंवा सरदार घराणी लागून गेलेत आपली याचा जरा विचार करा. Happy

>> घराण्याचं नाव म्हणजे काय? एकतर त्या घरात तो मुलगा / ती मुलगी जन्माला आली तेव्हाच त्यांना त्या घराण्याचं नाव आपोआप चिकटतं. जसं तुम्हाला चिकटलं तसंच तुमच्या मुलाला. तुम्हीही काही ते नाव स्वकर्तृत्वानं कमावलेलं नाही. दुसरं म्हणजे नाही नाव लावलं तर खरंच त्या मुला-मुलींचं काही बिघडणार आहे का?
<<
अनुमोदन. हाच विचार धर्म/जातीबद्दलही करावा. केवळ अमुक एका आईबापांच्या पोटी आलो म्हणून चिकटलेल्या धर्म/जातीचा किती बाऊ करायचा?

मामी Lol
+१

मामी

ठरवून नको ते यासाठी.. मुलाला स्वजातीय मुलगी पसंत असल्यास ( किंवा उलट) तिथेही मुद्दामून आंतरजातीय हा हट्ट धरण्यात अर्थ नाही. कुणाला कोण आवडेल हे हातात नसतं ना .. इथून पुढे नैसर्गिकपणे मुलांची आवड मान्य होत जाईल अशी चिन्हे दिसताहेत.

मुळात १८ वर्ष पूर्ण झाल्यावर भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला आपले नाव ठरवण्याचा अधिकार देते तर तुम्ही तुमच्या मुलाला/ मुलीला तुमचे नाव लावण्याची बंदी कशी घालणार?
तुमच्या मुलाचे तुम्ही आईबाप नाही हे तुम्ही तुमच्या मनाने, बाजूने ठरवलेत तरी तुमच्या मुलाने/मुलीने तुम्हालाच आईबाप मानणे बंद केले नाही तर त्याचे काय?

आणि ज्यांना १८ वर्ष इतक्या प्रेमाने वाढवलं त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागले नाहीत म्हणून इतक्या सहजपणे डिसओन करणे ते जातीच्या तथाकथित ऑथोरिटीजशी संगनमत करून त्यांचे आयुष्य संपवायची सुपारी देणे हे काय आहे?
मुलांना तुम्ही गुलाम म्हणून जन्माला घालता का?
त्यांना जन्माला घालून तुम्ही उपकार करता का त्यांच्यावर?
तुमच्या आनंदाच्या क्षणातून त्यांचे अस्तित्व निर्माण होते. हे विसरता कसे काय?

मायबोलीच्या इतिहासात अशा प्रकारे पहिल्यांदाच राष्ट्रीय सहमती झाल्याने सत्यनारायण घालण्याचे केले आहे. तीर्थप्रसादास अवश्य यावे . प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये

किरण मुद्दामहून नाही रे. पण अ‍ॅरेंज मॅरेजमध्येसुद्धा क्रायटेरीया बदलून जरा व्यापक करता येतो इतकंच. जास्त चॉईस मिळेल की! Wink

k,
'ठरवून' चा अर्थ 'मुद्दाम' नाही आहे. आंतरजातीय हे फक्त प्रेमविवाहच असावेत असं नाही. अनुरुप जोडीदार शोधतानाच जात बाजूला ठेवायची असा अर्थ आहे.
मामी, बरोबर का?

मामी नक्कीच
मुंबईसारख्या किंवा पुण्यातल्या कल्याणीनगर, कोरेगाव पार्कसारख्या ठिकाणी जेव्हां वेगवेगळ्या जातीधर्माची कुटुंब एकाच इमारतीत नांदत असतात, एकमेकांच्या सुख दु:खाला धावून येत असतात तेव्हां हे अशक्य नाही. उगाचच जातीत लग्न लावून रुसून बसणा-या नातेवाईकांची ब्याद या निमित्ताने आपोआप टळेल Wink

>>जातीच्या तथाकथित ऑथोरिटीजशी संगनमत करून त्यांचे आयुष्य संपवायची सुपारी देणे हे काय आहे?

हा परंपरा, तत्ववादाचा अतीरेक आहे.. थोडक्यात अशा लोकांना "तत्वे" ही नाते संबंध व खुद्द माणसाच्या आयुष्यापेक्षा जास्त महत्वाची वाटतात. नेमकी हेच मला म्हणायचे होते की मूळ तत्वच चूकेच असेल तर ते जोपासायची सर्व कृत्त्ये चूकीचीच असतील. अगदी मारायची सुपारी नाही तरी मनविरुध्द लग्न केले म्हणून स्वताच्या मुला/मुलीचे तोंड न पहाणारे पालक हेही त्याच "अतिकेरी" गटात मोडतील.

स्वाती,
मी बघितला तो भाग.. पण त्यात मूळ गंभीर समस्येपेक्षा एकंदर अतीशय भावनिक सादरीकरण यावर भर दिला होता.. आणि खाप वाल्या लोकांना "अशी तुमची परंपरा का आहे" हा मूळ प्रश्णच विचारला गेला नाही.. सर्व फोकस हा त्यांची अतीरेकी कृत्त्ये यावर होता .. म्हणूनच सत्यमेव चे जवळ जवळ सर्वच भाग हे अतीशय भावनिक रोलरकोस्टर राईड मध्ये लोकांना बसवून शेवटी मूळ मुद्दा बाजूला ठेवून "बापरे डोळे ऊघडले... नव्याने साक्षात्कार झाला" एव्हड्यावरच त्याचा परिणाम आहे.

>> अशी तुमची परंपरा का आहे" हा मूळ प्रश्णच विचारला गेला नाही
प्रश्न कशाला? ते खापवाले तेवढंच बोलत होते की! वर इंग्लंडात संविधान नाही, परंपराच आहेत अशीही ठेवून दिली की त्यांनी!
असो.

>>> हा प्रायोरिटीजचा प्रश्न आहे. त्या प्रत्येकाच्या (आईवडिल व मुले) वेगळ्या असू शकतात. आणि ज्या मुलीला/ मुलाला तडजोडी करायच्या असतात तिने/त्याने आपण कुठे तडजोडी करणार आणि कुठे नाही हे ठरवावे आईवडिलांनी ठरवण्यापेक्षा नाही का?

मुलांनी आपल्या प्रॉयॉरिटीज ठरवाव्यात हे मला मान्य आहे. परंतु याआधी प्रमोद देव, ह.भ.प. लिंबूशास्त्री व इतर काही जणांनी लिहिल्याप्रमाणे, मुले प्रेमात पडल्यावर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक इ. तफावती त्यांच्या लक्षात येत नाहीत व लग्नानंतर काही काळाने प्रेमाचा भर ओसरून वास्तवाची जाणीव झाली की ही तफावत जाचक ठरू लागते आणि यातूनच लग्न अयशस्वी ठरण्याची शक्यता असते.

त्यासाठी पालकांनी अशी तफावत मुलांच्या लक्षात आणून देणे आवश्यक आहे व त्यामुळे लग्नानंतर समस्या निर्माण होऊ शकतील हेदेखील त्यांच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. मुलांना प्रेमात पडल्याने या समस्यांची जाणीव होत नसली तरी आपल्याला एक त्रयस्थ व अनुभवी म्हणून त्या नक्कीच दिसत आहेत व लग्नानंतर हा विवाह यशस्वी ठरणार नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. अशा परिस्थितीत या समस्यांची जाणीव करून देऊन या विवाहाला विरोध करणे आवश्यक आहे. येवढे करून सुद्धा मुले लग्नावर ठाम असतील तर त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून गप्प बसावे. त्यांच्यावर राग धरून संबंध तोडणे किंवा खाप पंचायतीप्रमाणे मारून टाकणे, बहिष्कार टाकणे इ. गोष्टी करू नयेत. पण भविष्यात जेव्हा त्यांना तुमची गरज लागेल, तेव्हा मात्र मागील रागलोभ विसरून त्यांच्या मदतीला जावे.

सत्यमेव जयते के सभी एपिसोडस हमे पसंद आये. यहां पर अच्छा डिस्कशन हो रहा है. हम भी मराठीमे लिखना चाहते थे. लेकिन जब तक हम कुछ लिखें, ये डिस्कशन बोर्ड काफी दूर तक पहुंच जाता है. फिर भी हम लिखेंगे जरूर..

<<< काही म्हणा , प्रत्येक एपिसोड ला ३०० + प्रतिसाद, या धाग्याला तर ४०० उलटले ..स्टार प्लस आणि आमिर यशस्वी झाले,नक्कीच Proud

मास्तुरे आपला प्रतिसाद आवडला. पण आपल्या धोक्याच्या सल्ल्यकडे दुर्लक्ष करून लग्न करणार्‍या अपत्यावर असा प्रसंग आल्यास पुन्हा मदत करणे मला बहुधा जमणार नाही. त्याकरिता फार मोठे मन लागेल.

सगळ्यात मजा तेव्हा असते जेव्हा एखादा मुलगा (प्रेमात पडलेला) मुलीला सांगतो की आई वडीलांच्या इच्छेखातर ह्यांव व त्यांव प्रथा करावे लागतील,असे लग्न करावे लागेल, नातेवाईक नावं ठेवतील. किंवा धर्म नाही बदलला तर कोणी घेणार नाही पुन्हा. असल्या बाता करून मुलीला (व मुलगी मुलाला?) करायला सांगते लग्न करायच्या वेळी तेव्हा किव येते. प्रेम करताना आई वडीलांना विचारून केले नाही ना? मग एकानेच का त्याग करायचा?(त्याग असा की स्वतःच्या विचारांचा, आवडीचा वगैरे).

प्रेम केलत ना मग लग्न हि करा स्वतःच्या हिंमतीवर.. धर्म वगैरेचा बुरखा घेवून असल्या गोष्टींना खतपाणी कशाला घालता?

आई वडील पण नामी असतात, जातीत हुंडा मागणारे असले तरी चालतील पण बाहेरच्या जातीचा खरोखरच विचारने चांगला मुलगा असेल तरी नाकारणार.. का तर घराने की इज्जत जातीबाहेर लग्न केल तर खराब होते. Sad

जातीपेक्षा समान विचारांवर असलेल्या व्यक्तीशी लग्न कधीही चांगलच नाही का?

कित्येक साईटवरून माझ्या काही मैत्रीणीने आपल्या जातीबाहेर लग्न केलीत विचार जुळतात म्हणून.. हुंडा प्रकार टाळायला. खुष आहेत.

जातीत, त्याच धर्मात लग्न करून विचारात तफावत असलेली उदाहरणं कमी नाहीत.

तेव्हा स्वजातीय वा आंतरजातीय असो, विचार जुळतात का बघून लग्न कर असे आई वडीलांनी सांगितले मुलांना व तसे बिंबवले तर असे प्रकार होत नाहीत.

माझ्या माहीतीप्रमाणे खुला संवाद मुला/मुलींमध्ये व आई वडीलांमध्ये असेल तर असे पळून जावून लग्न होत नाहीत. घरातील वातावरण( चुकीचा दबाव) कारणीभूत असते.

पहिल्यापासून माहीत असेल मुलांना की आई वडील माझे एकून तरी घेतील किंवा आई वडील तशी संधी देतात त्या मुला/मुलींना अश्या गोष्टींची गरज भासत नाही. तेव्हा हा बदल दोन्ही कडून असावा लागतो( आई-वडील व मूल).

बाकी समाज काय म्हणील ह्याची चिंता नंतरच करावी, मूल काय म्हणतेय ते बघावे आधी.
निवड चुकीची असेल हे ताडून पाहिले व चुकत असेल तर नक्कीच सांगावे व सोडून द्यावे , दबाव आणून सांगितले तर नक्कीच रीबेल करणार. वेळ द्यावा.

एवढेही करून कारटं एकत नसेल तर सोडूनच द्यावे. व आलिया भोगासी असावे सादर रहावे हेच उरते. Proud

----------------------------------------

जय जय रघुवीर समर्थ!

(आजचा उपदेशाचा कोटा संपला!) Proud

>>पण आपल्या धोक्याच्या सल्ल्यकडे दुर्लक्ष करून लग्न करणार्‍या अपत्यावर असा प्रसंग आल्यास पुन्हा मदत >>करणे मला बहुधा जमणार नाही. त्याकरिता फार मोठे मन लागेल.

बाप रे!
हे खरंच लिहिलंय की उपहासाने?

झंपी +१ ,
आईवडिलांच्या इच्छेबाहेर जायचे धाडस नसेल तर प्रेम तरी का करतात ही मुले ? आधी प्रेम वगैरे करून ऐन लग्नाच्या वेळी आईबाबांच्या इच्छेखातर हुंडा मागणारी मुले पाहिली की किळस येते.

स्वतः कॅटरीनाने तुम्हाला प्रपोज केल्यावर "हुंडा देणार का" असला निरस प्रश्ण विचारण्यासारखे आहे... असो.. एकेकाचे नशीब..<<<

अरेच्च्या! सोन्याची आहे का क्याट्रीना? हुंडा तर घेत्लाच पाहिजे नं?

Pages