"सत्यमेव जयते" भाग ५ (Is Love A Crime?)

Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49

आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दूर्दैवाने ते खरंय मयेकरजी!
आपली मुलगी दुसरीकडे जातांना तिच्याबद्दल काळजी करणारी माणसं त्याच न्यायाने आपल्या सुनेची काळजी घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
एकच व्यक्ती वेगवेगळ्या भूमिकेत कशी वेगवेगळी वागते हे आपण पाहू शकता...
उदा. अतिशय प्रेमळ आई सासूच्या भूमिकेत गेल्यावर सूनेबरोबर वेगळीच वागते.
प्रेमळ बहीण नणंदेच्या भूमिकेत भावजयीबरोबर वेगळीच वागते....
आईची आज्ञाधारक मुलगी सून म्हणून सासरी वेगळीच वागते.
माहेरी लाडावलेली लेक सासरी गेली की एकदम कर्ती-सवर्ती होते.
हे पुरुषांबाबतही लागू आहेच.
आपल्या रोजच्या जीवनात आपण वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो..कैक वेळेला अगदी परस्पर विरोधी...
त्यामुळे आपली मतंही परिस्थितीनुरुप,भूमिकेनुसार बदलत असतात असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
वर किरणने जे म्हटलंय की आपण सगळेच ढोंगी आहोत...ते इथे सिद्ध होतं.
कुणी ह्याला डबल ढोलकी असेही म्हणेल आणि तेही योग्यच आहे....आपापलं आत्मपरीक्षण केलं तर लक्षात येईल की आपण सगळेच कमीजास्त प्रमाणात रोज असेच जगत असतो..वेगवेगळ्या भूमिकेत!

हे कळतंय तर वळत का नाही? लग्न करून दुसर्‍या घरी जाणार्‍या मुलीने स्वतःच्या २०-२५ वर्षांच्या आयुष्यात बनलेल्या मतांना, सवयींना मुरड घालून नव्या परिस्थितीत स्वत:ला संपूर्णपणे बदलावे ( याचसाठी बालविवाह योग्य असा सूर कुठूनतरी ऐकू येतोय; प्रेमविवाहाचा, त्यातील धोक्यांचा व त्याला होणार्‍या विरोधाचाही प्रश्न सुटला)ही पद्धत बदलता येणारच नाही का? हा काही निसर्गनियम नाही.
"आपण सगळेच हेच करतो" हे म्हणणे ही सोयीस्कर पळवाट आहे. असे न करणार्‍या व्यक्ती/कुटुंबे असतात.

हे कळतंय तर वळत का नाही? लग्न करून दुसर्‍या घरी जाणार्‍या मुलीने स्वतःच्या २०-२५ वर्षांच्या आयुष्यात बनलेल्या मतांना, सवयींना मुरड घालून नव्या परिस्थितीत स्वत:ला संपूर्णपणे बदलावे ( याचसाठी बालविवाह योग्य असा सूर कुठूनतरी ऐकू येतोय; प्रेमविवाहाचा, त्यातील धोक्यांचा व त्याला होणार्‍या विरोधाचाही प्रश्न सुटला)ही पद्धत बदलता येणारच नाही का? हा काही निसर्गनियम नाही.
"आपण सगळेच हेच करतो" हे म्हणणे ही सोयीस्कर पळवाट आहे. असे न करणार्‍या व्यक्ती/कुटुंबे असतात.
>>>>>>>>> भरत मयेकर +१

मुलीलाच सगळं सोसावं लागतं ही मानसिकता असेल तर हेच लॉजिक पुढे नेऊन बायकोलाच सगळं सोसलं पाहिजे, सुनेनेच सगळी अ‍ॅडजस्टमेंट केली पाहिजे असं करत करत बायकांनीच सगळं सोसलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, संस्कृतीरक्षण आणि वर्धन केलं पाहिजे ...... इ.इ. हे ओघानंच येतं. मुळात ही खाप-मानसिकताच बदलायला पाहिजे.

बरोबर आहे...कळतंय पण वळत नाही...हाच तर प्रश्न आहे...समाजात घडणारा चांगला/वाईट बदल हा मुंगीच्या पावलांनी होत असतो त्यामुळे किमान तुमच्या आमच्या हयातीत तसे काही घडून येईल असे म्हणणं कठीणच आहे.
(मला असं वाटतंय की ही चर्चा बहुधा वैयक्तिक व्हायला लागलेय...मी व्यक्त करतोय त्या मतांवर ज्या पद्धतीने काही विशिष्ट लोकांच्या प्रतिक्रिया येताहेत ते पाहून मी आता इथे काही बोलणार नाहीये...माझ्याशी वैयक्तिक पातळीवर चर्चा करायची असेल तर आपण ती एकमेकांच्या विपूतूनही करू शकतो)
धन्यवाद!

माझ्या आधीच्या पिढीतल्या लोकांना सतत टोचून टोचून त्यांना आपली मते/दृष्टिकोन चुकीचा आहे याची जाणीव मी करून दिलेली आहे. काहींच्या वागण्या/बोलण्यातही फरक पडला.

माझ्या हयातीत सकारात्मक बदल घडून येतील आणि त्यात माझा सहभाग असेल याची मला खात्री आहे.

तेव्हा माझ्या हयातीत सकारात्मक बदल घडून येतील आणि त्यात माझा सहभाग असेल याची मला खात्री आहे. -- सहमत.

एका सुनेने सासुला "तुम्ही तुमच्या मुलांना घरातली कामे शिकवली नाहीत त्याचा त्रास मी भोगतेय. मी माझ्या मुलाला ही कामे शिकवणार." हे सांगितलेले ऐकले आहे.>> हे माझ्या आज्जीने केले होते. माझ्या आजोबाना टेबलवरती चहा नेऊन दिल्यावर बशीत ओतून पण द्यावा लागायचा Proud म्हणून आज्जीने दोन्ही मुलाना भाकर्‍या बडवण्यापासून ते मोरी धुण्यापर्यंत सर्व कामे शिकवली. आज ते घरात रोज ही कामे करतात असे नाही पण वेळ आली तर करू शकतात आणि दुसरे म्हणजे "घरकाम" हे कष्टाचे काम आहे याची जाणीव दोघानाही आहे. Happy

एका सुनेने सासुला "तुम्ही तुमच्या मुलांना घरातली कामे शिकवली नाहीत त्याचा त्रास मी भोगतेय. मी माझ्या मुलाला ही कामे शिकवणार." हे सांगितलेले ऐकले आहे.>> बाप्रे. आता सासू-सुनेकडे वळली चर्चा Rofl

चांगली चाललीये चर्छा मधले काही खोडसाळ प्रतिसाद वगळल्यास.

जात कुठलीही असली तरी मुलगा निर्व्यसनी, स्वभावाने चांगला अन शिकलेला असावा (मुलगी जर जास्त शिकलेली नसेल तर ही अटही शिथील होऊ शकेल. दोघेही दहावी पासच वगैरे Happy असे माझे मत आहे. शिवाय टीनेज विवाह नसेल तर बरे कारण शिक्षण पुर्ण करणे अवघड आहे प्रपंच करता करता.
जात, शिक्षण, आर्थिक परिस्थितीतली तफावत काही ही असो, दोघांचे एकमेकां वर प्रेम अन वय किमान २५ च्या पुढे ( म्हणजे मॅच्युअर आणि पायावर उभे आहेत असे मानुया) असावेत. Happy

मी माझ्या पोराला/पोरिन्ना स्पष्ट सान्गुन ठेवलय की, लग्न करायची आर्थिक/शैक्षणिक लायकी आल्यावर लग्न करायचे ठरवलेतच, भले प्रेमविवाह करा {सिनेमा/टीव्हीवर दाखवितात तशी प्रेमाची उच्छ्रंखल थेरं एकतर करूच नका अन करायची असतीलच तरी त्याकरताही जातीतीलच शोधा!} वा सेमिअ‍ॅरेन्ज्ड करा वा अगदी ठरवुन वगैरे करा, तरी भावी जोडिदार अनुरुप जाती-पोटजातीतीलच हवा, धर्मबाह्य विवाह नाहीच नाही चालणार. अन तरीही तसे केल्यास, तुमचा नि माझा संबंध तुटलेला असेल, मग आयशीबापसाचे नावच काय, आडनावही लावायचे/वापरायचे/घ्यायचे काम नाही! उद्याच्या आमच्या म्हातारपणच्या काठ्या वगैरे समजुत करुन घेऊन तुमची नस्ती थेरं मी खपवुन घेणार नाहीच नाही, पण तुमच्यावर अवलम्बुन रहायला नको अशी आमच्या उद्याच्या म्हातारपणची व्यवस्था देखिल आत्ताच करुन ठेवेन!
अन फक्त हे अन हेच अशाप्रकारेच जातीबाह्य/धर्मबाह्य करण्याची येवढी खाजच असेल, तर आधीच वेळच्यावेळीच आयशीबापसान्च्याच जीवावर आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर सबळपणे उभे रहायला शिका अन मग जे काय करायचे ते करा! तुमच्या वयाच्या अठरा वर्षानन्तर मी देखिल तुमच्याकरता कशालाही कायद्याने जबाबदार नाही.
हे माझे मत नसुन, जे प्रत्यक्षात सान्गितले आहे तेच मान्डले! कारण मी नस्ती सोन्गेढोन्गे करीत नाही, जे आहे ते सु:स्पष्ट. आमच्यात अस्सेच अस्ते.

लिंबूकाका, अगदी अगदी. Happy
इथे झोपडपट्टी वगैरे शब्द वाचून जाम हसायला आलं पण. काहीही चाललंय.

>> लिंबु आण्णा , खाप पं चायतेचे चेअर्मन व्हाअ
डॉलर नाण्या, आमच्यात एकेकटा कोब्राच एकेक काय, अनेकान्करता पन्चायती बनलेला अस्तो! Proud

लिंबु आण्णा , खाप पं चायतेचे चेअर्मन व्हा>

डॉलर बहुतेक तुम्हाला खाप पंचायत म्हणजे काय हे कळलेच नाही . लिंबू अण्णा नि जे लिहिलेय ते त्यांनी स्वताच्या मुलांना सांगितलंय आणि खाप पंचायत जे निर्णय घेतात ते इतरांच्या मुलांसाठी घेतात. इतरांसाठी निर्णय देणे सोप्पे असते हो. माझ्या माहितीतील कोणतेही कर्तव्यदक्ष, प्रेमळ आणि समजूतदार वडील मुलांना हेच सांगतील जे लिंबू अण्णा म्हणताहेत. इवन माझे वडील सुद्धा. पण हीच वडील मंडळी उद्या जर आपली मुलगी /मुलगा प्रेमात पडले तर त्यांची बाजू समजून घेऊन योग्य तो निर्णय हि देतील . याचा संबंध खाप पंचायातीशी लावणे याची कीव करावीशी वाटते.

या चर्चेत सहभागी झालेल्या खूप जणांचे यशस्वी प्रेमविवाह झाले असतील पण कुणाच्याही आई वडिलांनी मुलांना बेटा कोणत्याही जाती धर्मातल्या मुलाशी/मुलीशी विवाह कर आंम्ही आनंदाने संमती देऊ असे सांगितले नसेल.

जिस्ट हेच आहे कि प्रत्येक प्रकरण, 'Individual basis' वर evaluate करावे! (इब्लिस)

न कळणाऱ्या वयात आई वडिलांचे न ऐकता लग्न केल्यावर पश्चाताप करणारी उदाहरणे आहेत तसेच , आई वडिलांच्या विरोधात जाऊन शून्यातून जग निर्माण करून सुखी झालेली उदाहरणे सुद्धा आहेत.

double post

सामी, अगदी बरोबर. धन्यवाद.
शिवाय या प्रश्नाला अजुन एक मोठ्ठा कन्गोरा आहे. मला तरी जाणवतोय, म्हणुन दाखवु पहातो.
मराठीमधे दोन म्हणी आहेत, एक "तुला नस्त्या चाम्भारचौकशा कशाला?" दुसरी "तुला नस्त्या पन्चायती हव्यात कशाला"
पहिलीचा संदर्भ/स्पष्टीकरण मला उमगले नाहीये, पण दुसरीतील "पन्चायत" पूर्वी लहानपणी मी पन्चाईत म्हणजे अडचण अशा अर्थाने समजायचो, कालान्तराने ती पन्चाईत-अडचण नसुन "पाचामुखी परमेश्वर अशी बसवलेली पन्चायत" हा अर्थ कळला Happy पण ते असो. मूळ मुद्दा असा की, या एकूण समाजात विशिष्ट (अन खास करुन उच्चवर्णीय) जाती अशा आहेत, की ज्यान्च्यात स्वत:च्या जातकर्‍यान्च्या भावकीत/पन्चायतीत वा एकुण गावातील म्हणुन अशा पन्चायतीत वैयक्तिक/कौटुम्बिक प्रश्न मान्डायची चाल नाही, व तिथे जे प्रश्न मान्डले जातात/जायचे, ते सर्वथैव औपचारिक सदरातील व अपवादात्मक परिस्थितीतच मान्डले जायचे. या जातीत, स्वतःचे /कुटुम्बाबाबतचे निर्णय स्वतःच न घेण्याचे व त्याकरता पन्चायतीच्या ओन्जळीने पाणी प्यायचे कधीच मानले जात नाही वा दुसर्‍या शब्दात, असे निर्णय घेऊन ते ठामपणे राबविण्यास ते मानसिकदृष्ट्या जास्त सक्षम अस्तात असा अनुभव आहे. वरील खाप पन्चायत वगैरे उदाहरणे जिथे जिथे आहेत, तिथे तिथे या पन्चायती कोणत्या प्रदेशनिहाय व कोणकोणत्या जातीवर्गाशी संबन्धित आहेत, याचाही अभ्यास व्हायला हवा. कारण कोकणात तरी एकेकटा माणुसही "वाळीत" टाकण्याला भीक घालित नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे. अन कोब्रा तर नाहीच नाही. त्यामुळेच, सर्वात जास्त सुधारक देखिल याच कोकणातील आहेत हा काही अवचित योगायोग नाही.
असो.
समाजाबद्दलचे प्रश्न विचारात घेताना अशा अनेक सूक्ष्म पण महत्वाच्या बाबी देखिल विचारात घ्याव्याच लागतात. उगाच या क्षणी, क्यान्टीनचे मस्त हाणुन आल्यावर भरल्यापोटि पेन्ग येता येता मला पूर्वग्रहानुरुप काय वाटते ते कस्ल्यातरी मतदानाच्या कर्तव्यपूर्तीच्या समाधानात कसेतरी पण हुकमी अविर्भावात टाईपणे म्हणजे आपणही समाजसुधारकान्च्या पन्क्तित जाऊन बसलो (होतो) असे वाटून घ्यायचे खरे तर कारण नाही. शिन्च्या लिम्ब्या, तू तर क्यान्टीनात जाऊन स्वस्तातील सबसिडाईज्ड फुड गिळून आलास, कशाला बाता कर्तोस? कस्ल्या स्वातन्त्र्याच्या? Wink

त्या वरल्या पहिल्या म्हणीचा अर्थ मला लागला आहे/सान्गितला गेला आहे, तो मात्र इथे मान्डायचे धाडस नाही होत बोवा! Wink

लिंबूकाका ________________________/\________________________

लिंबूकाका या संदर्भात मी एक इमेल न राहवून देव काकांना केली आहे. तुम्हाला पण फोरवर्ड करते . इथे पोस्ट करायला आवडले असते पण त्या पोस्ट वरील रिप्लाय ना रीस्पोंड करण्या एवढा वेळ नाही आहे
माझ्याकडे.

डॉलर | 5 June, 2012 - 15:05
नेटभगव्यानी धागा हायक्याक केला. खल्ल्लास!!

Rofl

Rofl

Pages