"सत्यमेव जयते" भाग ५ (Is Love A Crime?)

Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49

आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Kiran..

'डोके वापरून' विचार करणारे तुम्ही दिसता. तुमच्या फ्यान क्लब ला अ‍ॅप्लिकेशन पाठविले आहे.

पण आपल्या धोक्याच्या सल्ल्यकडे दुर्लक्ष करून लग्न करणार्‍या अपत्यावर असा प्रसंग आल्यास पुन्हा मदत करणे मला बहुधा जमणार नाही. त्याकरिता फार मोठे मन लागेल.

>>>> साती, मुलांपेक्षा आपले इगो, संस्कृतीरक्षण, समाज हे महत्त्वाचं आहे का? उलट "देव न करो, पण जर तुमचा निर्णय चुकीचा ठरला तरी आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत" असा दिलासा देणे मला तरी योग्य वाटते. केवळ लग्नाच्याच नाही तर आयुष्यातल्या इतर कोणत्याही निर्णयाबाबत. असा भावनिक दिलासा कोणालाही खूप बळ मिळवून देतो.

<<पण आपल्या धोक्याच्या सल्ल्यकडे दुर्लक्ष करून लग्न करणार्‍या अपत्यावर असा प्रसंग आल्यास पुन्हा मदत करणे मला बहुधा जमणार नाही. त्याकरिता फार मोठे मन लागेल.>>

अरे बापरे !! हे खरेच लिहिले आहे का ? आणि तेही स्त्री आयडी ने. माझ्या मुलीने काहीही केले तरीही मी तिच्याशी संबंध तोडण्याची किन्वा तिच्या अडचणीत मदत न करण्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. जात, धर्म , समाज ,नातेवाईक सगळे गेले तेल लावत. आईला तरी पोरच सगळ्यात महत्वाचे.

मामी
कुणीतरी वर लिहीलंय. मुलांमधे निर्णयक्षमता विकसित करणे. त्यांच्यामधे सल्लामसलत करण्याची सवय राहू द्या मात्र त्यांचे निर्णय त्यांनाच घेऊ द्यात. आपल्याला जसे आधीच्या पिढीचे कित्येक निर्णय खटकत होते तसे त्यांनाही मोठे झाल्यावर आपले कित्येक निर्णय पटणार नाहीत. मेंटॉरची संकल्पना अंगी बाणवायची गरज आहे.

मामी आणि लाजो, अगदी बरोबर . पण खरंच तशी वेळ आल्यास स्वतःच्या इगोपुढे मुलासाठीचे प्रेम मोठे ठरेल का याबद्दल स्वतःची खात्री वाटत नाही. Happy इगोपेक्षा मुलांबद्दलचं प्रेम मोठं ठरो अशी फक्त अपेक्षाच करू शकते. बाकी २५ वर्षांनी यातलं काय रिलेवंट राहणार आणि विवाहसंस्थेचं रूप काय असेल हा एक प्रश्नच आहे. ( अजून आमची मुलगी जन्माला यायची आहे.). आणि लग्नाला समाज संस्कृतीरक्षण या कारणसाठि विरोध म्हणत नाही मी. तर मुलांनी शोधलेला
पार्टनर अनुरूप नसल्याने किंबा या लग्नामुळे असेअसे प्रॉब्लेम होतील असे समजावून सुद्धा जर मुलांनि तो विवाह केला तर पुढे तेच प्रॉब्लेम झाल्यावरचं म्हणतेय मी.

<<पार्टनर अनुरूप नसल्याने किंबा या लग्नामुळे असेअसे प्रॉब्लेम होतील असे समजावून सुद्धा जर मुलांनि तो विवाह केला तर पुढे तेच प्रॉब्लेम झाल्यावरचं म्हणतेय मी. >>
दुसर्‍यांनी सांगून कोणालाही पटत नाही , कळत नाही. प्रेमाच्या बाबतीत तर नाहीच. कळाले तरी वळत नाही. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसे आहे ते. आपलेही 'त्या' वयातले दिवस आठवून बघावे.
अगदीच चूकीचा निर्णय वाटत असेल तर लग्नाएवेजी 'लिव्ह इन' मधे रहा म्हणेन २-३ वर्ष Happy ( अजुन २०-२५ वर्षानी लिव्ह इन सहज शक्य होईल असे वाटते Happy )

इब्लिस
Biggrin

फॅन क्लब काढल्यावर माझी अधोगती होईल अशी भीती वाटते. Wink
मी स्वतः मामी, अश्विनीमामी, साती, नीधप, अकु इ. इ. महिलामंडळाचा फॅन आहे. त्याचबरोबर दिनेशदा, अशोक पाटील यांचे विचार प्रभावित करत असतात. तुमचाही फॅन आहेच. पण एकंदरीत अनेक ठिकाणी महिलामंडळाकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे..

बरेचदा मास्तुरेंचं आणि लिंबुटिंबु यांचंही लिखाणही आवडतं.

कुणीतरी वर लिहीलंय. मुलांमधे निर्णयक्षमता विकसित करणे. त्यांच्यामधे सल्लामसलत करण्याची सवय राहू द्या मात्र त्यांचे निर्णय त्यांनाच घेऊ द्यात. आपल्याला जसे आधीच्या पिढीचे कित्येक निर्णय खटकत होते तसे त्यांनाही मोठे झाल्यावर आपले कित्येक निर्णय पटणार नाहीत. मेंटॉरची संकल्पना अंगी बाणवायची गरज आहे. >>>> अगदी. अगदी.

मी स्वतः मामी, अश्विनीमामी, साती, नीधप, अकु इ. इ. महिलामंडळाचा फॅन आहे. त्याचबरोबर दिनेशदा, अशोक पाटील यांचे विचार प्रभावित करत असतात. तुमचाही फॅन आहेच. पण एकंदरीत अनेक ठिकाणी महिलामंडळाकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे..

>>>>>>>>अरे वा, किरण. आमचे प्रत्येकी एकेक फॅनक्लब कधी काढतोयस मग? Proud

Lol

लाजलो ना आम्ही किरण! Happy पण पि व्हीं वरच्या सारखं ही माझी शेवटची पोस्ट असं म्हणू नकोस. जसजसे आक्षेप येतील तस्तशि उत्तरे देत जावी. आम्हा पामरांनाही ज्ञानकण मिळतात.

आमिरखानने हा धागा वाचला तर एकतर झीट येऊन पडेल! Proud किन्वा टीव्हीशो वगैरे भानगडी करण्यापेक्षा सरळ "मायबोलीमेम्बर" बनुन इथेच लिहायला सुरुवात करेल Lol

"त्याचबरोबर दिनेशदा, अशोक पाटील यांचे विचार प्रभावित करत असतात....."

~ खरे पाहिले तर उलटपक्षी मीच तुमच्या या भावनेने फार प्रभावित झालो आहे, किरण.

थॅन्क्स.....तसा या ४००+ धाग्यावर मी बहुतेकवेळी 'वाचनमात्र' च आहे, पण सर्टनली एन्जॉईंग सो मच; इररिस्पेक्टिव्ह ऑफ कन्टेन्ट्स.

अशोक पाटील

लिंबू, नुसता झीट येऊन पडणार नाहि तर थोडंफार मराठी बोलायला शिकत होता ते सोडून देईल. माबोकर झाला तर फक्त रोमात राहिल. Happy

विचार आणि आचार यात जमीन आस्मानाचा फरक असतो ,ईथे उत्तम विचार मांडले गेले आहेत, परंतु वास्तवात असे विचार आचरणात आणायची वेळ आली तर कितीजनांची तयारी आहे?
एकोणीसाव्या शतकातच्या शेवटी
विधवा विवाहाचा पुरस्कर्ता असलेल्या एका समाजसुधारकाने पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर दुसरा विवाह विधवेशी करुन आपल्या विचारांना मुर्तस्वरुप देणे गरजेचे होते .परंतु त्या महाभागाने घरातल्या ज्येष्ठांचा सल्ला ऐकुण बालविवाह केला .असले ढोंगी" तोंडाळ समाजसुधारक "ईथे होईन गेले ,तिथे सामान्यांची काय कथा.

http://www.humanitytrust.com/

About us:
Humanity Foundation is managed by a Board of Advisors which comprises of individuals from diverse backgrounds and expertise.We are working to create permanent change in the lives of children, families and communities living in poverty and injustice.We serve all people regardless of religion, caste, race, ethnicity or gender.
Executive Committee:
1. Mr. Jagabar Ali.
2. Mr. R.Hakkim Ali.
3. Mr. Fazulutheen.
Members of the Board of Advisors are as follow:
1. Mr. M.L.Raja Mohamed
2. Mr. M.S.NASICK
3. Mr. A Ahmed Irzath
4. Mr. S.Abdul Basith

Objective:

·Free medical helps for people in emergency.
·Educational Scholarships/financial assistance for school students (Fees/Schoolbags/Uniforms/Accessories).
·Masjid Construction assistance. (Bore/construction helps)
·Etheemkhana (Feeding/helping/Sheltering the Orphan)

·Placement assistance for Islamic youngsters (notifications about jobs across various geographies)
·Counseling of school or college students regarding education or career guidance.
·Bore-Well in the most water scarcity areas.
·Widows, Old people rehabilitation programs.

Vision and Mission

·Humanity Foundation is mainly for upliftment of the poor and needy across our country.
·Child sponsorship programs brining relief and putting a smile on the faces of thousands of children’s.

आता बोला!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

मामी, हाच मुद्दा मी माझ्या आधीच्या पोस्ट मधे मांडला होता. काहिही झाले, निर्णय चुकला, तरी पालकांचा
पाठींबा, मदत हि मिळालीच पाहिजे. त्यावेळी, बघ तेव्हा आमचं ऐकले असतस तर, असा राग आळवण्यात अर्थ नसतो.
ज्या परंपरा, अपत्यप्रेमाच्या आड येतात, त्यांना मी तरी मानत नाही.

मंदार कात्रे, तुम्ही १५ पानांनंतर पुन्हा तोच मुद्दा घेऊन आलात. तुमच्या मुद्द्याला उत्तर पहिल्याच पानावर दिलेले आहे. तुम्ही म्हणताय तो ह्युमनिटी ट्रस्ट आणि आमीर सांगतोय तो या दोन्ही वेगवेगळ्या संस्था आहेत. सत्यमेव जयतेच्या संकेतस्थळावर पश्चिम बंगालमधल्या वैद्यकसेवाक्षेत्रात करणार्‍या संस्थेविषयी माहिती दिलेली आहे.

>>लिंबू, नुसता झीट येऊन पडणार नाहि तर थोडंफार मराठी बोलायला शिकत होता ते सोडून देईल. माबोकर झाला तर फक्त रोमात राहिल.<<

या पोष्टमधला रोमात हा शब्द अनेक वेळा मोयबोलीवर वाचलाय, पण हा शब्द कोणत्या अर्थी इथे लिहतात तेच कळत नाही, तर रोमात राहिल म्हणजे नक्की कुठे राहील?

काहिही झाले, निर्णय चुकला, तरी पालकांचा पाठींबा, मदत हि मिळालीच पाहिजे. त्यावेळी, बघ तेव्हा आमचं ऐकले असतस तर, असा राग आळवण्यात अर्थ नसतो. <<<
बरोबर

म्हणजे पालकांचं मत न जुमानता मनमानी करुन लग्न करायचं आणि तोंडावर आपटल्यावर परत पालकांनी मदत करावी ही अपेक्षा? मज्जाय!!!

Pages