"सत्यमेव जयते" भाग ५ (Is Love A Crime?)

Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49

आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> रॉयल चॅलेंज ची व्यवस्था केलीय.... <<<< नो, थ्यान्क्स बट्ट!
पण तुमच्याकरता अधिकृतपणे पन्चगव्व्याची व्यवस्था माझेकडे नेहेमीच तय्यार अस्ते! प्रोक्षण अन प्राशनाकरता, याला नाही म्हणता येतच नाही! नाही म्हणुन चालत नाही. Wink Proud
देऊ का चम्चा चम्चा आप्ल, सन्ध्येची पळीपळी भर?

>>> मी माझ्या पोराला/पोरिन्ना स्पष्ट सान्गुन ठेवलय की, लग्न करायची आर्थिक/शैक्षणिक लायकी आल्यावर लग्न करायचे ठरवलेतच, भले प्रेमविवाह करा {सिनेमा/टीव्हीवर दाखवितात तशी प्रेमाची उच्छ्रंखल थेरं एकतर करूच नका अन करायची असतीलच तरी त्याकरताही जातीतीलच शोधा!} वा सेमिअ‍ॅरेन्ज्ड करा वा अगदी ठरवुन वगैरे करा, तरी भावी जोडिदार अनुरुप जाती-पोटजातीतीलच हवा, धर्मबाह्य विवाह नाहीच नाही चालणार. अन तरीही तसे केल्यास, तुमचा नि माझा संबंध तुटलेला असेल,

लिंबूशास्त्री,

इथल्या बहुतेकांचं हेच मत असेल असा माझा अंदाज आहे. जरा विचार करत होतो की इथले किती जण परधर्मातील जावई/सून आणण्यासाठी आनंदाने तयार असतील आणि त्यासाठी मुलीचे/मुलाचे धर्मांतर आनंदाने स्वीकारतील?

>>> इथल्या बहुतेकांचं हेच मत असेल असा माझा अंदाज आहे. <<<<
बरोब्बर मास्तुरे,
पण फक्त आपले पुरोगामित्व सिद्ध करणे ही सध्याची इनथीम असल्याने शिवाय कोणीही सोम्यागोम्या उठून आपल्याला "नेटभगवा" असे म्हणेल की काय या भितीमुळे Proud बहुतेक जण मूग गिळून चुप्पच्चाप बसतात, वा हो ला हो मिळवित रहातात. अहो एका राज्याच्या मुख्यमन्त्री असलेला नरेन्द्र मोदी देखिल जिथे या दहशतयुक्त गोबेल्सटाईप प्रचारातुन सुटला नाही तिथे तुमच्याआमच्या सारख्यान्ची काय हो कथा? लोकं स्पष्ट मत व्यक्त करीत नाहीत यात नवल नाही.

मास्तुरे साहेब माबोवर इतरान्ना शिकवाय्ला नेटभगवे म्हणाय्ला फार काही कष्ट पडत नाहीत. आणि एकदोन उदाहरणे देऊन बघा बघा आम्ही असं केलं असं दाखवले की झाले असा समज अनेकान्चा आहे
'करावं लागलं' असल्यास ते 'आनन्दाने केलं' असं इथे सान्गायची पद्धत आहे ते पण सोडा
शेण खाल्ल्यावर शेण कसे बासुन्दीसारखे लागले ते पण सान्ग्तील इथे

लिंब्या, सगळे तुझ्यासारखेच विचार करतात आणि तूच एकटा खरं बोलतोस, बाकीचे दांभिक असला काही गैरसमज आहे का तुझा?

इथल्या बहुतेकांचं हेच मत असेल असा माझा अंदाज आहे. जरा विचार करत होतो की इथले किती जण परधर्मातील जावई/सून आणण्यासाठी आनंदाने तयार असतील आणि त्यासाठी मुलीचे/मुलाचे धर्मांतर आनंदाने स्वीकारतील? >>>

परधर्मातील जावई /सून /जोडीदार असण्यासाठी धर्म बदलण्याची काय गरज?
जवळच्या ओळखींमध्ये /नात्यांमध्ये हिंदू मुलगी + ख्रिश्चन मुलगा, हिंदू मुलगा + ख्रिश्चन मुलगी, मुस्लिम मुलगा + ख्रिश्चन मुलगी, मुस्लिम मुलगा+ हिंदू मुलगी, मुस्लिम मुलगी + हिंदू मुलगा, बौद्ध मुलगा + जैन मुलगी, बौद्ध मुलगा + हिंदु मुलगी, लिंगायत मुलगा + बौद्ध मुलगी अशी बरीच उदाहरणं आहेत. यापैकी कोणीही धर्म बदललेला नाही.

जातीबाहेर, प्रदेशाबाहेर लग्नाची तर असंख्य उदाहरणं आहेत. आणि ती सगळीच प्रेमविवाहाची उदाहरणं नाहीयेत.

उगाचच काय बाउ केला जातोय............फार कमी धर्मांतर होत असते...... सेलेब्रिटीमधे बघा.......कोणी केले आहे का..? सलमान तर गणपती सुध्दा बसवतो घरात ... आईचे संस्कार म्हणुन... शाहरुख आपल्या मुलांना कुराण चे पाठ तर देतच आहे बरोबर भगवदगीता सुध्दा वाचुन दाखवतो..
.

.
.हा आहे आजचा समाज ..

अगदि कहर आहे हा धागा, आणि या धाग्यावर लिहणारे, स्वत:ला पुरोगामि म्हणवून घेणारे सुसक्षित अडाणी.
ज्यांना स्वधर्म निष्ठा नाही, त्यांचा भाग्योदय कसा होणार..!!

>>> परधर्मातील जावई /सून /जोडीदार असण्यासाठी धर्म बदलण्याची काय गरज?

माझ्या ओळखीच्या दोन हिंदू मुलींना ख्रिश्चन मुलाशी लग्न करण्याआधी त्यांना चर्चमध्ये जाऊन बाप्तिस्मा घ्यावा लागला होता. त्यानंतरच त्यांचे लग्न लागले.

अजून एका प्रकरणात एका हिंदू मुलाला ख्रिश्चन मुलीशी लग्न करण्याआधी धर्मबदल करावा लागला होता.

माझ्या चुलत काकानी ख्रिश्चन मुलीशी लग्न केले.......त्यांनी नाही धर्मांतर केले...
माझ्या सख्या मावशीने बौध्द धर्मातल्या मुलाशी लग्न केले .......तिने नाही धर्मांतर केले........
.
.
.
हे मास्तुरे दुसरी बाजु......प्रत्येक गोष्टीला दोन बाजु असतातच...... म्हणुन का सतत एकच बाजु बघायची.. ?

बरोबर आहे. माझ्या माहितीतल्या अजून दोन हिंदू मुलींनी जैन मुलांशी लग्न केले आहे. त्यांना धर्मबदल करावा लागला नाही किंवा तसे त्यांना कोणी सांगितले सुद्धा नाही. किंबहुना त्या लग्नानंतर सुद्धा चतुर्थीचे उपास, मंदीरात जाऊन दर्शन इ. नियमित करतात. एका शीख सरदाराशी लग्न केलेल्या हिंदू मुलीला सुद्धा धर्म बदलावा लागलेला नाही. एकंदरीत लग्नाआधी/नंतर धर्मबदल करण्याचे प्रमाण ख्रिश्चन व मुस्लीम यांच्यातच मुख्यत्वेकरून आहे असे दिसते. जैन, बौद्ध, शीख आणि हिंदू हे प्रचारकी व प्रसार करणारे धर्म नसल्याने ते धर्मबदलाबद्दल आग्रही नसावेत.

मास्तुरे, अनुमोदन. माझ्याही ओळखीत एकीने शीख मुलाशी लग्न केले तिच्याही बाबतीत धर्मबदलाचा विषय पण कुणी काढला नाही.

मग हे आधी का नाही सांगितले..........नकारात्मक बाजु आधी मांडायची वृत्ती बरी नव्हे..... दोन्ही बाजु मांडाव्यात....

माझी मामी तामिळ ख्रिश्चन आहे. ना तिने धर्म बदललाय ना मामाने. मामी गणपती आणि साईबाबांना खूप मानते. तिच्या आग्रहासाठी मामाने कित्येकदा टिटवाळ्याच्या गणपतीची यथासांग पुजा केलीये जोडीने आणि ती बुधवारी चर्चमध्ये मासला पण जाते. तिच्या भावाची बायको हिंदू आहे. तिने पण धर्म नाही बदलला. त्यांच्या घरी गणपती बसतो, देव्हारा आहे आणि ख्रिसमस पण साजरा होतो.

बाबांच्या मुस्लिम मित्राची बायको ख्रिश्चन आहे. त्यांच्याकडे पण कोणी धर्म बदलला नाही. ईद आणि ख्रिसमस दोन्ही साजरा करतात आणि त्याचबरोबर गृहप्रवेशाच्यावेळी कलशपुजापण. ही सगळी उदाहरणं माझ्या आधीच्या पिढीतली आहेत आणि अगदी जवळची.
बाकी ओळखीमधली पण बरीच उदाहरणं आहेत.

लग्नामुळे धर्म बदलणे कायद्याने बंधनकारक नाहीये हे अनेकींना माहित नसते त्यामुळे धर्म बदलण्याची सक्ती करणे सोपे होते.

समजा रात्रीची वेळ आहे. नायगारा धबधब्यावर तुम्ही आहात. तुम्हाला अर्नोल्ड सारख्या एका धटिंगणाने एका पायाला धरून अधांतरी ठेवलंय. तुमचं डोकं खाली आल्याने पाण्याचा भयप्रद आवाज तुमच्या कानात शिरतोय. तुम्ही त्याला सोडा सोडा ऐवजी धरा धरा अशी विनवणी करताय.

अशा वेळी जर त्या धटिंगणाने बोल ब-या बोलाने धर्मांतराला तयार होतोस कि नाही अशी पृच्छा केली तर तुम्ही काय कराल ?

खरं खरं सांगा हं.

( मी तर लगेच तयार होईन ब्वॉ )

किरण्या, जास्त झालीये का?
शंभूराजांच्या महाराष्ट्रात हे असं? Sad

अशा वेळी जर त्या धटिंगणाने बोल ब-या बोलाने धर्मांतराला तयार होतोस कि नाही अशी पृच्छा केली तर तुम्ही काय कराल ?

खरं खरं सांगा हं.

( मी तर लगेच तयार होईन ब्वॉ )<<

तुमच्या सारख्यांना तर आधी त्या धबधब्यात फेकून द्यायला पाहीजे, कारण ज्याला स्वत:च्या धर्माचा अभिमान नाही त्यांना जगण्याचाही अधिकार नाही.

समजा रात्रीची वेळ आहे. नायगारा धबधब्यावर तुम्ही आहात. तुम्हाला अर्नोल्ड सारख्या एका धटिंगणाने एका पायाला धरून अधांतरी ठेवलंय. तुमचं डोकं खाली आल्याने पाण्याचा भयप्रद आवाज तुमच्या कानात शिरतोय. तुम्ही त्याला सोडा सोडा ऐवजी धरा धरा अशी विनवणी करताय.

अशा वेळी जर त्या धटिंगणाने बोल ब-या बोलाने धर्मांतराला तयार होतोस कि नाही अशी पृच्छा केली तर तुम्ही काय कराल ?<<<<

माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या धर्मांतरासाठी कोणी एवढे कष्ट घेतोय हे बघून मला तर बै गहिवरूनच येईल Happy

माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या धर्मांतरासाठी कोणी एवढे कष्ट घेतोय हे बघून मला तर बै गहिवरूनच येईल >>>>>>>>>>> Happy

तुमच्या सारख्यांना तर आधी त्या धबधब्यात फेकून द्यायला पाहीजे, कारण ज्याला स्वत:च्या धर्माचा अभिमान नाही त्यांना जगण्याचाही अधिकार नाही.

Rofl

<<माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या धर्मांतरासाठी कोणी एवढे कष्ट घेतोय हे बघून मला तर बै गहिवरूनच येईल >> केवळ खल्लास Rofl

>>माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या धर्मांतरासाठी कोणी एवढे कष्ट घेतोय हे बघून मला तर बै गहिवरूनच येईल <<
सर्वदुर दुर्गम भागातील आणि अडलेल्या नडलेले आदिवासी धर्म परिवर्तन इतके सहज कसे करतात या प्रश्नाचा उलगडा वरिल प्रतिक्रिया वाचुन सहज होऊ शकतो. त्यांच्या (आदिवासी) सारख्या सामान्य माणसांच्या दारात त्यांचे धर्म परिवर्तन करण्यासाठी स्वत: मुल्ला मौलवी अथवा चर्च चे पादरी येत असतील तर ते बघुन त्या आदिवासीनाही किती गहीवरुन येत असेल.

>>> समजा रात्रीची वेळ आहे. नायगारा धबधब्यावर तुम्ही आहात. तुम्हाला अर्नोल्ड सारख्या एका धटिंगणाने एका पायाला धरून अधांतरी ठेवलंय. तुमचं डोकं खाली आल्याने पाण्याचा भयप्रद आवाज तुमच्या कानात शिरतोय. तुम्ही त्याला सोडा सोडा ऐवजी धरा धरा अशी विनवणी करताय.
अशा वेळी जर त्या धटिंगणाने बोल ब-या बोलाने धर्मांतराला तयार होतोस कि नाही अशी पृच्छा केली तर तुम्ही काय कराल ? खरं खरं सांगा हं. ( मी तर लगेच तयार होईन ब्वॉ ) <<<<

पहिले म्हणजे, त्या ठळक केलेल्या वाक्यात "भूतकाळात घडलेल्या घटनान्ना" "भविष्यकाळाचे रूप" देऊन मान्डू नका! Proud
दुसरे म्हणजे अर्नॉल्ड सारखा तो धटिन्गण कोण होता त्याचे नाव काय होते, फोटो बिटो काढुन घेतलात की नाही ते खर्रखर्र सान्गा! Wink Proud
तिसरे म्हणजे नायगार्‍याकडे तुम्ही शुम्भासारखे एकटेच गेला होतात की...... जोडीलाही कोणी होते? सुठें होते की उंनिं होते? Wink
क्काय राव, धाग्याचा विषय काय, अन तुम्ही पीजेच्या वरताण कस्ली जरतरची स्वगतरुपी स्वप्ने जुगवुन मान्डताय?

Pages