१. १ पाकीट ताज्या क्रॅनबेरीज (या अर्ली विंटरमधे - साधारण नोव्हेंबर-डिसेंबरात मिळतात. फ्रोझन वर्षभर मिळतात, पण त्यांचा या सॉसला उपयोग नाही. १ पाकीट १२ औंसांचं म्हणजे साधारण ३४० ग्रॅम्सचं असतं.)
२. अर्धा कप* तेल (हो, टिकवायची तर इतकं लागतं. थोडी करून लगेच संपवायचा प्लॅन असेल तर कमी चालेल.)
३. २ टीस्पून लाल तिखट
४. १ कप* ब्राऊन शुगर
५. १ टीस्पून मीठ
६. मोहरी, मेथी, हिंग - प्रत्येकी अर्धा टीस्पून
(* १ कप म्हणजे ८ औंस. आपल्या आमटीच्या वाटीने अदमासे दीड वाटी होईल.)
१. क्रॅनबेरीज धुवून निथळून घ्याव्यात.
२. जाड बुडाच्या भांड्यात अर्धा कप तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, मेथी यांची फोडणी करावी.
(हे मूळ पाककृतीनुसार. मी स्प्रेडसारखी करते, त्यामुळे मोहरी घालत नाही. त्याऐवजी मला स्वाद आवडतो म्हणून भाजक्या जिर्याची पूड घालते. पण मेथी मात्र हवीच. हवंतर आधी निराळी भाजून पूड करून घ्यावी.)
३. निथळलेल्या क्रॅनबेरीज फोडणीत घालाव्यात. मध्यम आचेवर ढवळत रहावं.
४. क्रॅनबेरीज लगेचच मऊ व्हायला लागतात. त्या चांगल्या घोटाव्यात किंवा मॅशरने मॅश करत जावं.
५. सॉस आळायला लागला की त्यात तिखट आणि मीठ घालावं.
६. पाणी पूर्ण आळलं की गॅस बंद करून दोन मिनिटांनी यात ब्राऊन शुगर घालावी. सॉस गरम असल्याने ती लगेच विरघळते आणि सॉसला सुरेख रंग येतो.
७. पूर्णपणे गार झाल्याशिवाय सॉस बरणीत भरू नये.
८. फ्रीजमधे सहा महिनेसुद्धा टिकतो. (कदाचित आणखीही टिकेल, पण माझा त्याच्या आत संपतोच.)
नुसतासुद्धा पोळी / ब्रेडला लावून छान लागतो. पराठ्यांबरोबर छान लागतो.
मला हा सॉस, थिन स्लाइस्ड कोल्ड कट टर्की, लेट्यूस असं सँडविचही आवडतं.
ही रेसिपी फक्त फ्रेश क्रॅनबेरीजसाठीच आहे. वाळवलेल्या/पाकवलेल्या/गोठवलेल्या इ. क्रॅनबेरीजसाठी/क्रेझिन्ससाठी हिचा उपयोग नाही.
क्रॅनबेरीज तेलावर घालण्याआधी नीट निथळून घ्याव्यात. हवंतर पंचावर किंवा टॉवेलवर घालून टिपून घ्याव्यात. (ही टिप वृंदाताईंकडून साभार.)
सॉस शिजवण्यासाठी जरा मोठंच भांडं घ्यावं म्हणजे क्रॅनबेरीज शिजून फुटायला लागल्या की बाहेर शिंतोडे उडणार नाहीत. (ही टिप सशलकडून साभार. :P)
स्वाती ही रेसिपी मस्तच आहे.
स्वाती ही रेसिपी मस्तच आहे. करुन पाहीन यावर्षी.
आज केले. काय सुपर्ब लागलं.
आज केले. काय सुपर्ब लागलं. पाकॄ करता धन्स स्वाती.
टोस्टेड ब्रेडच्या स्लाईसवरती मेयो + क्रॅनबेरी सॉस यमी लागतय.
दारातल्या आंबट चेरींवरही हा
घरच्या आंबट चेरींवरही हा प्रयोग यशस्वी झाला आहे. ऑल्रेडी दोनवेळा करुन झाला . मस्त चव आली आहे.
परत एकदा धन्यवाद.
आज हा सॉस करणार आहे. म्हटलं
आज हा सॉस करणार आहे. म्हटलं धागा वर आणून ठेवावा.
चला चला सॉस करायची वेळ झाली.
चला चला सॉस करायची वेळ झाली.
सालाबाद प्रमाणे कॉस्टको मधून क्रॅनबेरी आणल्या आहेत. आता वर्षभराचा सॉस रेडी करुन ठेवेन. स्वातीला पुन्हा एकदा धन्यवाद
बायकोच्या डॉक्टर ने (तिला)
बायकोच्या डॉक्टर ने (तिला) क्रॅनबेरीज खायची सूचना केली आहे. बाजारात मिळणारे ज्यूस व स्नॅक्स मध्ये साखर खूप असते म्हणून मी ही चटणी केली.एकदम आवडली. काही निरिक्षणे,
पण तिखट मिठाचा वेगळा अंदाज
पण तिखट मिठाचा वेगळा अंदाज करायची गरजच नाही. कृतीत दिलं आहे अगदी त्या प्रमाणात केल्यास हमखास चवीचा सॉस होतो.
या वर्षीही करेन.
या वर्षीही करेन.
Pages