
१. १ पाकीट ताज्या क्रॅनबेरीज (या अर्ली विंटरमधे - साधारण नोव्हेंबर-डिसेंबरात मिळतात. फ्रोझन वर्षभर मिळतात, पण त्यांचा या सॉसला उपयोग नाही. १ पाकीट १२ औंसांचं म्हणजे साधारण ३४० ग्रॅम्सचं असतं.)
२. अर्धा कप* तेल (हो, टिकवायची तर इतकं लागतं. थोडी करून लगेच संपवायचा प्लॅन असेल तर कमी चालेल.)
३. २ टीस्पून लाल तिखट
४. १ कप* ब्राऊन शुगर
५. १ टीस्पून मीठ
६. मोहरी, मेथी, हिंग - प्रत्येकी अर्धा टीस्पून
(* १ कप म्हणजे ८ औंस. आपल्या आमटीच्या वाटीने अदमासे दीड वाटी होईल.)
१. क्रॅनबेरीज धुवून निथळून घ्याव्यात.
२. जाड बुडाच्या भांड्यात अर्धा कप तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, मेथी यांची फोडणी करावी.
(हे मूळ पाककृतीनुसार. मी स्प्रेडसारखी करते, त्यामुळे मोहरी घालत नाही. त्याऐवजी मला स्वाद आवडतो म्हणून भाजक्या जिर्याची पूड घालते. पण मेथी मात्र हवीच. हवंतर आधी निराळी भाजून पूड करून घ्यावी.)
३. निथळलेल्या क्रॅनबेरीज फोडणीत घालाव्यात. मध्यम आचेवर ढवळत रहावं.
४. क्रॅनबेरीज लगेचच मऊ व्हायला लागतात. त्या चांगल्या घोटाव्यात किंवा मॅशरने मॅश करत जावं.
५. सॉस आळायला लागला की त्यात तिखट आणि मीठ घालावं.
६. पाणी पूर्ण आळलं की गॅस बंद करून दोन मिनिटांनी यात ब्राऊन शुगर घालावी. सॉस गरम असल्याने ती लगेच विरघळते आणि सॉसला सुरेख रंग येतो.
७. पूर्णपणे गार झाल्याशिवाय सॉस बरणीत भरू नये.
८. फ्रीजमधे सहा महिनेसुद्धा टिकतो. (कदाचित आणखीही टिकेल, पण माझा त्याच्या आत संपतोच.)
नुसतासुद्धा पोळी / ब्रेडला लावून छान लागतो. पराठ्यांबरोबर छान लागतो.
मला हा सॉस, थिन स्लाइस्ड कोल्ड कट टर्की, लेट्यूस असं सँडविचही आवडतं.
ही रेसिपी फक्त फ्रेश क्रॅनबेरीजसाठीच आहे. वाळवलेल्या/पाकवलेल्या/गोठवलेल्या इ. क्रॅनबेरीजसाठी/क्रेझिन्ससाठी हिचा उपयोग नाही.
क्रॅनबेरीज तेलावर घालण्याआधी नीट निथळून घ्याव्यात. हवंतर पंचावर किंवा टॉवेलवर घालून टिपून घ्याव्यात. (ही टिप वृंदाताईंकडून साभार.)
सॉस शिजवण्यासाठी जरा मोठंच भांडं घ्यावं म्हणजे क्रॅनबेरीज शिजून फुटायला लागल्या की बाहेर शिंतोडे उडणार नाहीत. (ही टिप सशलकडून साभार. :P)
मला नाही वाटत स्ट्रॉबेरीला ही
मला नाही वाटत स्ट्रॉबेरीला ही रेसिपी सूट होईल असे. कारण स्ट्रॉबेरीला वास/ फ्लेवर खूप असतो स्वतःचा , तो मेथीच्या जोडीने झेपणार नाही.
फाको म्हणजे काय? खुप
फाको म्हणजे काय?
खुप स्ट्रॉबेरी आहेत..नुसत्या खावून कंटाळा आलय..आणि ice cream बनवायचे नहिये..मग काय करावे
थोडीशी साखर घालून किंवा
थोडीशी साखर घालून किंवा नुसत्याच शिजवून ठेवा. मिल्कशेक खूप भारी लागतो अशा स्ट्रॉबेरीजचा.
स्वाती,
फाको म्हणजे फालतू कोट्या.
फाको म्हणजे फालतू कोट्या.
स्ट्रॉबेरीचं स्मूदी /जॅम / जेली / केक्स / टार्ट्स असं बरंच काही बनवता येईल. नेटवर सर्च मारून बघा.
हे गुळाच्या पाकातल्या
हे गुळाच्या पाकातल्या बोरा़ंसारखं लागतं का?
बाटली आतून नीट स्वच्छ केली
बाटली आतून नीट स्वच्छ केली नाहीये, सॉसने (जेलीने) लडबडलेली आहे
(सुग्रास अन्न पाण्याचे शिंतोडे असलेल्या ताटात वाढल्यावर कसं वाटेल ..)
इब्लिस, बोरापेक्षा बर्याच
इब्लिस, बोरापेक्षा बर्याच आंबट असतात क्रॅनबेरीज. मेथांब्यासारखा स्वाद म्हटलंय ना नावात? लिंबाचं आंबटगोडतिखट लोणचं किंवा छुंद्यासारखी कैरीची कुठलीही (कच्च्या वा शिजवून) चटणी अशांसारखी चव असते.
राजसी, उलट त्यामुळे त्या सॉसचं नेमकं टेक्स्चर / कन्सिस्टन्सी कशी आहे (किती घट्ट/पातळ आहे, पाक आणि फळं निराळी राहिलीत की एकजीव झालीत इ.) ते लक्षात येतंय. काहींनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच प्रोफेशनल मासिकांमधल्या फोटोंच्या तोडीचा आला आहे सीमाचा फोटो.
खरोखरच प्रोफेशनल
खरोखरच प्रोफेशनल मासिकांमधल्या फोटोंच्या तोडीचा आला आहे सीमाचा फोटो.>> ओके
सगळे 'फूड अॅन्ड वाइन'वरचे
सगळे 'फूड अॅन्ड वाइन'वरचे आहेत :
http://www.foodandwine.com/recipes/blue-barb-jam
http://www.foodandwine.com/recipes/doughnut-holes-with-raspberry-jam
http://www.foodandwine.com/recipes/almond-butter-and-jelly-french-toast
http://www.foodandwine.com/recipes/hot-pepper-jelly
http://www.foodandwine.com/recipes/sunchoke-pickle-relish
स्वाती, ओके. माझं पहिली
स्वाती, ओके. माझं पहिली पोस्ट 'होतकरू आणि शिकाऊ' फोटोग्राफरच्या फोटोबद्द्ल अभिप्राय होता. ह्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीने अश्या प्रकारची फोटोग्राफी करणं, शिकणे किंवा टाकणे बंद करावे, म्हणून मी दुसर्या पोस्टमध्ये टाकलेल्या लिंक्स खोडून टाकल्या.
राजसी, आणि मी असं सांगते आहे
राजसी, आणि मी असं सांगते आहे की तो शिकाऊपणामुळे फोटो/ सेटिंगमधे राहिलेला दोष नसून मुद्दाम केलेली अरेन्जमेन्ट असू शकते. आणि त्याचं संभाव्य कारणही (टेक्स्चर / कन्सिस्टन्सी दर्शवणं) सांगितलं. मी दिलेल्या लिंक्स पाहिल्यात तर तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणते आहे ते.
राजसी , कॅनिंग करत होते.
राजसी , कॅनिंग करत होते. त्यामुळ बाटली अतिशयच स्वच्छ करुन घेतलेली. फोटो काढताना वरचा दिसणारा सॉस पण स्वच्छ केलेला. पण फोटो आर्टिफिशिअयल येत होता. मी शिकत असल्याने सध्याचे ट्रेंड बघून शिकत आहे. (वरती स्वातीने लिंक दिल्या आहेत. अगदी तसा. )त्यात असा मेसी लुक जास्त अपीलिंग वाटला. सो तसा काढायचा प्रयत्न केला.
रेसीपी बद्दल कमेंट टाका लोकहो. फोटो विषयी नको प्लिज.
सीमाच्या सॉसचा फोटो मस्त आला
सीमाच्या सॉसचा फोटो मस्त आला आहे.
सॉस फारच अप्रतिम लागतो आहे
सॉस फारच अप्रतिम लागतो आहे चवीला. माझ्याकडे ब्राऊन शुगर नव्हती म्हणून साधी साखरच घातली. पण मस्त झालाय.
स्लर्प
स्लर्प
सीमा, मस्त फोटो आलाय
सीमा, मस्त फोटो आलाय !!!
रेसीपी, कॉमेंट्स, आणि सुंदर फोटो पाहुन आता हा सॉस करायचा मोह होतोय..
स्वाती, मस्त झालाय सॉस
स्वाती, मस्त झालाय सॉस
सीमा (की प्राजक्ता? ) ने बार
सीमा (की प्राजक्ता? :)) ने बार फार वर नेल्यामुळे इथे सगळे एकसे एक आर्टिस्टिक फोटो टाकत आहेत ..
राखी, छान आला आहे रंग .. म्यॅचिंग किचन टॉवेल चाही छान आहे ..
(तेरेवालेको ग्लेझ कुछ ज्यादाही लग रैला है .. दिव्यांनीं काही अॅडिशन दिली का? :))
(BTW, अजिबात कुठलंही मॉडिफिकेशन न करता केलेल्या हॅण्डफुल रेसिपींपैकी बरं का ही ..
:हाहा:)
नै ऐसाईच दिख रेला है रिअलमें
नै ऐसाईच दिख रेला है रिअलमें भी. ब्राऊन शुगर थोडा ज्यादा डाला रहेंगा.
राखी, तुझा क्रॅनबेरीसॉस अगदी
राखी, तुझा क्रॅनबेरीसॉस अगदी ग्लॅमरस दिस्तोय. पण मागे त्याच रंगाचा किचन टॉवेल ठेवल्यामुळे (हहच्या शब्दांत) सॉस सोडून टॉवेलशी नजरानजर जास्त होतेय.
राखी., मस्त फोटो क्रॅनबेरी
राखी., मस्त फोटो
क्रॅनबेरी सॉस सॉवरीया स्टाईल
काय भारी रंग आला आहे.
काय भारी रंग आला आहे.
सावरीयाचा हँड टॉवेल नसून बाथ
सावरीयाचा हँड टॉवेल नसून बाथ टॉवेल होता याची इच्छुकांनी नोंद घ्यावी
>>सॉस सोडून टॉवेलशी नजरानजर
>>सॉस सोडून टॉवेलशी नजरानजर जास्त होतेय
तरी नवरा म्हणला बरंका, पण...
सॉवरीया स्टाईल
>>सावरीयाचा हँड टॉवेल नसून
>>सावरीयाचा हँड टॉवेल नसून बाथ टॉवेल होता याची इच्छुकांनी नोंद घ्यावी
ह्यावर मला दुल्हेराजा पिकचर मध्ये प्रेम चोप्रा सारखा म्हणायची ती म्हण आठवली.
छान आलाय रंग राखी. ब्राउन
मस्त फोटो राखी.
मस्त फोटो राखी.
माबोकरीण मैत्रीणीच्या कृपेने
माबोकरीण मैत्रीणीच्या कृपेने आज हा सॉस खाल्ला. अप्रतिम झाला होता. उद्या क्रॅनबेर्या मिळतात का हे पाहून ताबडतोब करण्यात येईल.
बाकी सगळ्यांचे फोटोज जबरदस्त तोंपासू!
हाय्ला सगळे नवे फोटो खतरनाक
हाय्ला सगळे नवे फोटो खतरनाक आहेत... बोके काय आणि सावरिया स्टाइल काय्...आमचे गरीब फोटो कुठच्याही पाकृवर टाकताना हात आखडता घ्यावा लागेल
rmd कढई मस्त आहे.
मी विकेंडला हा सॉस केला,
मी विकेंडला हा सॉस केला, अप्रतिम झालाय.
धाग्याच्या परंपरेनुसार सुंदर भांड्यात काढून फोटोसेशन करायचं मात्र राहिलं :फिदी:.
Pages