
१. १ पाकीट ताज्या क्रॅनबेरीज (या अर्ली विंटरमधे - साधारण नोव्हेंबर-डिसेंबरात मिळतात. फ्रोझन वर्षभर मिळतात, पण त्यांचा या सॉसला उपयोग नाही. १ पाकीट १२ औंसांचं म्हणजे साधारण ३४० ग्रॅम्सचं असतं.)
२. अर्धा कप* तेल (हो, टिकवायची तर इतकं लागतं. थोडी करून लगेच संपवायचा प्लॅन असेल तर कमी चालेल.)
३. २ टीस्पून लाल तिखट
४. १ कप* ब्राऊन शुगर
५. १ टीस्पून मीठ
६. मोहरी, मेथी, हिंग - प्रत्येकी अर्धा टीस्पून
(* १ कप म्हणजे ८ औंस. आपल्या आमटीच्या वाटीने अदमासे दीड वाटी होईल.)
१. क्रॅनबेरीज धुवून निथळून घ्याव्यात.
२. जाड बुडाच्या भांड्यात अर्धा कप तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, मेथी यांची फोडणी करावी.
(हे मूळ पाककृतीनुसार. मी स्प्रेडसारखी करते, त्यामुळे मोहरी घालत नाही. त्याऐवजी मला स्वाद आवडतो म्हणून भाजक्या जिर्याची पूड घालते. पण मेथी मात्र हवीच. हवंतर आधी निराळी भाजून पूड करून घ्यावी.)
३. निथळलेल्या क्रॅनबेरीज फोडणीत घालाव्यात. मध्यम आचेवर ढवळत रहावं.
४. क्रॅनबेरीज लगेचच मऊ व्हायला लागतात. त्या चांगल्या घोटाव्यात किंवा मॅशरने मॅश करत जावं.
५. सॉस आळायला लागला की त्यात तिखट आणि मीठ घालावं.
६. पाणी पूर्ण आळलं की गॅस बंद करून दोन मिनिटांनी यात ब्राऊन शुगर घालावी. सॉस गरम असल्याने ती लगेच विरघळते आणि सॉसला सुरेख रंग येतो.
७. पूर्णपणे गार झाल्याशिवाय सॉस बरणीत भरू नये.
८. फ्रीजमधे सहा महिनेसुद्धा टिकतो. (कदाचित आणखीही टिकेल, पण माझा त्याच्या आत संपतोच.)
नुसतासुद्धा पोळी / ब्रेडला लावून छान लागतो. पराठ्यांबरोबर छान लागतो.
मला हा सॉस, थिन स्लाइस्ड कोल्ड कट टर्की, लेट्यूस असं सँडविचही आवडतं.
ही रेसिपी फक्त फ्रेश क्रॅनबेरीजसाठीच आहे. वाळवलेल्या/पाकवलेल्या/गोठवलेल्या इ. क्रॅनबेरीजसाठी/क्रेझिन्ससाठी हिचा उपयोग नाही.
क्रॅनबेरीज तेलावर घालण्याआधी नीट निथळून घ्याव्यात. हवंतर पंचावर किंवा टॉवेलवर घालून टिपून घ्याव्यात. (ही टिप वृंदाताईंकडून साभार.)
सॉस शिजवण्यासाठी जरा मोठंच भांडं घ्यावं म्हणजे क्रॅनबेरीज शिजून फुटायला लागल्या की बाहेर शिंतोडे उडणार नाहीत. (ही टिप सशलकडून साभार. :P)
केला, केला... बेष्ट झाला
केला, केला... बेष्ट झाला एकदम. धन्यवाद आत्याबाई!
ब्राऊन शुगरचे व्यसन नसल्यामुळे साधी साखरच घातली

शुक्रवारी एकदाचा केला. जास्त
शुक्रवारी एकदाचा केला. जास्त दिवस असावा म्हणून मी वरच्या चित्रातलेच दोन क्रॅनबेरीचे पॅक्स आणले आणि वरच्या जिन्नसांचं प्रमाण डबल केलं. त्यात तेल एवढं घायला नको होतं. शेवटी आळता आळेना म्हणून शेवटी वाटी, सव्वा वाटी तेल काढून ओतून टाकलं. ब्राऊन शुगर घातल्यावर खरंच सुरेख रंग आला सॉसला. चवीलाही छान झाला आहे. धन्यवाद स्वाती.
रसायन, साध्या साखरेने चव येईल
रसायन, साध्या साखरेने चव येईल पण रंग?
सायो, खूप मोठ्या आचेवर केलास का? तेल का सुटं राहिलं असावं लक्षात येत नाही. फ्रीजमधे ठेव बाटली.
अरे देवा!!!! मला वाटतंय मी
अरे देवा!!!! मला वाटतंय मी तेलाचं प्रमाण एक कप वाचून माझ्या क्वांटिटीप्रमाणे ते दोन कप केलं की काय??? मलाही आठवत नाहीये
काल ह्या पद्धतीने क्रॅनबेरी
काल ह्या पद्धतीने क्रॅनबेरी सॉस करुन पाहिला. अफाट चवीचा झाला आहे. स्वाती तुला खुप धन्यवाद इतकी मस्त रेसिपी इथे शेअर केल्याबद्दल. हा फोटो.

या कृतीने सॉस केला. अफलातून
या कृतीने सॉस केला. अफलातून चव आहे. अजून एक पाकीट बेरीज आणण्यात आलेल्या आहेत.
धन्यवाद स्वाती!
मी हा सौस करुन पाहीला. एक्दम
मी हा सौस करुन पाहीला. एक्दम मस्त झाला. पण मी १/२ तेल घातले,मग घाबरुन ते काढुन घेतले..थोडेच ठेवले सौस मधे....सौस चान्ग्ला राहीला आहे..
हा सॉस माझ्याकडे इतका पटकन
हा सॉस माझ्याकडे इतका पटकन संपतो की मी कमी तेलातच करायला सुरूवात केली आहे. मग शेवटची बॅच जास्त तेलवाली करायची आणि पुरवून पुरवून वापरायचा असं ठरवतेय.
मी प्रत्येकवेळी एका पाकिटाचा करते. तो संपला की पुन्हा...अलरेडी दोनदा झालाय. या विकेंडला पुन्हा एक घाणा करेन्...माझ्या लेकाला डब्यात काय द्यायचं याचं उत्तर या सॉसमुळे मला मिळालंय. इडली-सॉस, चपाती-अब-सॉस, डोसा-सॉस,अब्-सॉस सँडविच चार दिवसाची सोय झाली आणि एक दिवस मग खिचडी,पास्ता-बिस्ता काहीतरी शोधायचं हुश झाले पाच दिवस...
यंदा शेवटी फ्रीज करून टिकतो का ते पाहायचंय.
स्वाती ही रेसिपी टाकल्याबद्दल पुढील अनेक वर्षांचे धन्यवाद मी तुला आधीच देऊन ठेवते...गुड जॉब
मी पहिल्यांदाच केला यावेळी.
मी पहिल्यांदाच केला यावेळी. आधी दोनवेळा आयता खाऊन आवडला होताच. हीट्ट झालाय आमच्याकडेही.
ब्रेडवर एकीकडे हा सॉस लावून त्यावर जवस, कढिपत्ता अशी कोणतीही जरा तिखट चटणी लावून मस्त झटपट सँडविच तयार होतं.
ब्राउन शुगर ऐवजी गुळ पण
ब्राउन शुगर ऐवजी गुळ पण चांगला लागेल असं वाटतय , करायला हवा ( पण अशा गोष्टी भाजीसारख्या एका जेवणातच वाटीभर संपवायची टेंडन्सी आहे तिला कंट्रोल करायला जालीम उपाय आहे का कोणाकडे ?
)
मी वापरला होता गूळ डीज्जे. पण
मी वापरला होता गूळ डीज्जे. पण बहुधा कमी पडला. मझ्या शौकापेक्षा जरा जास्तच आंबट झाला सॉस, आणि घट्ट पण, कदाचित घट्टपणा जास्ती शिजवल्याने असेल.
पण परत एकदा करणार आहे नक्की.
पाकक्रुति योग्यवेळि वर
पाकक्रुति योग्यवेळि वर आणन्याबद्दल धन्यवाद, एका पॉटलकला नेण्यचा प्लॅन आहे..
प्राजक्ता, नक्की ने! अगदी
प्राजक्ता, नक्की ने! अगदी हिट्ट आहे ही रेस्पी. आधी मी साधी चटणी करायचे क्रॅनबेरींची. पण स्वातीताईची रेस्पी मस्तच. अजूनही गोडाचा कंटाळा आला तर करते चटणी पण ह्या सॉसलाच डीमांड जास्त असते
करायचा आहे म्हणून रेसिपी वर
करायचा आहे म्हणून रेसिपी वर आणून ठेवतेय.
काल केला . खुप छान चव आणि कलर
काल केला . खुप छान चव आणि कलर !
आज पुन्हा एका पाकीटाचा सॉस
आज पुन्हा एका पाकीटाचा सॉस केला पण शुगर घालायला घाई झाली बहुतेक. सॉस पातळ झालाय. पुन्हा आटवला तर चालेल का?
ज्ञाती, थोडे क्रॅनबेरीज
ज्ञाती, थोडे क्रॅनबेरीज शिजवून घालून बघ. इतर प्रमाणही अॅडजस्ट करावे लागेल मग. फ्रीजमध्ये ठेवल्यास थोडा घट्ट होतो.
मेथी किति घालायचि? मी सुधा १२
मेथी किति घालायचि? मी सुधा १२ oz च पाकिट आणालय..सॉस ़जमला तर फोटो टाकेल..
छानच झाला. सुरेख रंग आणि चव.
छानच झाला. सुरेख रंग आणि चव. सोप्पी रेसिपी. थँक्स स्वाती.
ह्याची दिवसेंदिवस वाढती
ह्याची दिवसेंदिवस वाढती पॉप्युलारिटी बघून मीही आज हे करण्याचा घाट घालणार आहे ..
प्रयत्न यशस्वी झाल्यास फोटो आकण्यात येईल ..
@ज्ञाती, एक चटका देऊन
@ज्ञाती, एक चटका देऊन बघ.
@प्राजक्ता, एका पाकिटाला एक सपाट लहान (मिसळणाचा) चमचा किंवा अर्धा टीस्पून मेथी घाल.
@सशल, आक नक्की.
स्वाती, .. आशीर्वादाबद्दल
स्वाती,
..
आशीर्वादाबद्दल धन्यवाद .. आही लागलं तर उणाकडे जायचं हे माहित आहेच ..
सॉस केला मी आज. छान झाला
सॉस केला मी आज. छान झाला चवीला पण मला वाटलं अजुन बराच गूळ चालला असता. माझा गूळ कमी गोड असेल तर माहिती नाही पण मी १ कपच्यावर गूळ घेतला आणि मग त्यात थोडं सिंपल सिरप पण घातलं. रंग खूपच छान आला आहे पण आंबट झाला आहे थोडा. काय करता येईल. आणि हिंग टाकायचा राहूनच गेला. त्याने खूप फरक पडतो का चवीत किंवा टिकावूपणात? बरणीत भरल्यावर फोटो टाकतेच. अगदी छान जॅम कन्सिस्टंसी झाल्यामुळे साखर / गूळ टाकून पातळ होऊन जाउ नये असं वाटतं.
क्रॅनबेरीज् आणून धुतल्या,
क्रॅनबेरीज् आणून धुतल्या, निथळल्या (पण हाय रे दैवा, बहुदा पुरेशा निथळल्या नाहीत) ..
फोडणी झाली (घाईघाईत तेल थोडं जास्त तापल्याची शक्यता नाकारता येत नाही .. मेथ्या थोड्या काळपट ब्राऊन झाल्या बहुतेक ) .. मग क्रॅनबेरीज् घातल्या तर हाय रे दैवा टपाटप सगळीकडे शिंतोडे उडालेले आहेत .. (नवीन कोर्या बॅकस्प्लॅश वर शिंतोडे गेल्यामुळे जीव खुपच खालीवर झाला!) .. मग सगळं प्रकरण जरा निवलं तर जसजशी हीट लागत आहे तसतशा क्रॅनबेरीज् पॉप होत आहेत .. प्रत्येक पॉपला नविन ग्रॅनिट, नविन शेगडी, नविन ब्लॅकस्प्लॅश आठवतो आणि धकधक करने लग्गा होतंय ..
पुढचा वृत्तांत इथेच अपडेट करण्यात येईल ..
अरेरे कसं व्हायचं!!! तुला
अरेरे कसं व्हायचं!!! तुला सोप्प्या रेसिपीज एका फटक्यात जमत नाहीत असं दिसतंय (मब)
आधी गॅस बंद कर. मिश्रण मोठ्या
आधी गॅस बंद कर. मिश्रण मोठ्या भांड्यात ओत. मागे स्प्लॅटर स्क्रीन ठेव. आता गॅस सुरू करून आच अॅड्जस्ट कर. माझं स्मरण कर आणि चालव मॅशर!
नविना, हिंग राहिला तर राहू
नविना, हिंग राहिला तर राहू दे. नो बिग डील. गूळ/साखर तुमच्या आवडीनुसार अजून घातलीत तरी चालेल की.
बरं, रांधण फेज संपलेली आहे ..
बरं, रांधण फेज संपलेली आहे .. हा पहिला क्रूड फोटो .. उर्वरीत वृत्तांत आणि आकर्षक सटात काढून जरा बरा फोटो थोड्या वेळाने पेश करण्यात येईल ..
चव मस्त आहे .. रेसिपीकरता धन्यवाद !
माझा हि झालाय आजच करुन,
माझा हि झालाय आजच करुन, भाजक्या जिर्याचि पुड मस्त वास, चव देते..मि ब्रॉउन शुगर जरा जास्त घातलिय.. एक कप मापाने जरा आम्बट वाटलेला..
( फोटो काही अपलोड होता होत नाहिये, आयपॅड वरुन होत नाहिये , पीसि व रुन टाकते.)
झाला फोटो अप्लोड
झाला फोटो अप्लोड
Pages