Submitted by आनंदयात्री on 20 May, 2012 - 01:39
आज दि २० मे ला प्रसारित झालेल्या तिसर्या भागाबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा..
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील लिंक - http://www.satyamevjayate.in/issue03/
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नंदिनी, मीरा जोशी यांचा
नंदिनी, मीरा जोशी यांचा प्रतिसाद कार्यक्रमाशी संबंधित आहे ना? मग त्यावर त्या बोलल्यात तर बिघडलं कुठे? त्यांचं मत असं समजून पुढे चर्चा करा की. जरा वेगळं मत आलं की मुक्ताफळं?
जरा वेगळं मत आलं की
जरा वेगळं मत आलं की मुक्ताफळं?<<< +१०
आजचा विषय हुंडा होता. हुंडा
आजचा विषय हुंडा होता. हुंडा न घेतला तरी संसार सुखाचा होईलच का, नवरा मारणारच नाही हे कशावरुन , हे मुद्दे अप्रस्तुत आहेत. मुसलमानांच्या संभाषणातही हुंडा ही समस्या होती याचे उल्लेख आलेले आहेत. आणि त्यामुळेच हुंदा न घेता लग्न हा उपाय त्यानी शोधला. ही पद्धत आल्यावर हुंडाबळी झालेले नाहीत हही उल्लेख आहे. ( म्हणजे हुंडा असतानाअ हुंडाबळी होत होते हेही कबुल केल्यासारखेच आहे. ) त्यामुळे हिंदु वाइट, मुस्लिम चांगले असा काही संदेश यातून जात नाही. कुठलाही धर्म असो हुंडा न घेणं महत्वाचं.
हो ना?? प्रत्येक गोष्टीला
हो ना?? प्रत्येक गोष्टीला धार्मिक रंग दिलाच गेला पाहिजे का? शिवाय इतकी पूर्णपणे बेसलेस विधाने करायची खरंच गरज आहे का? आजच्या कार्यक्रमाचा लव्ह जिहाद अथवा तलाक सारख्या गोष्टीशी काय संबंध होता?
आजच्या कार्यक्रमामधे एका शीख मुलीचा इंटरव्ह्यु दाखवला. शिवाय एका ख्रिश्चन मुलीने आत्महत्या केली त्याबद्दल देखील सांगितले. असे असताना फक्त मुस्लीम समाजामधले उदाहरण दिले म्हणून लगेच बोलायची काय गरज?
इस्लाममधे दहेजची संकल्पना नाही. इस्लाममधे मुलाकडून मुलीला मेहेर मिळतो. मात्र, भारतामधे मुसलमानानी भारतीयाच्या काही पद्धती घेतल्या (बाटवणे वगैरे कारणे असतीलच) त्यामधे दहेजची पद्धत आली. यामधे सर्वात जास्त भरडला जातो तो गरीब मुसलमान. त्यामुळे बुर्हाणपूरसारख्या गावामधे जर अशी एखादी मोहिम यशस्वीरीत्या राबवली असेल तर ते कौतुकाला पात्र आहेतच की. तिथे त्यानी केवळ हुंडाबंदीच नव्हे तर लग्नामधे केल्या जाणार्ञा प्रत्येक वायफळ खर्चावरती देखील मर्यादा आणल्या आहेत. हे अजून महत्त्वाचे वाटत नाही का?
ज्या समाजामधे ही समस्या मोठ्या प्रमाणावर आहे त्या समाज धुरीणानी एकत्र येऊन अशा मोहिम आपल्या समाजात जरूर राबवाव्यात.
बरोबर आहे जामोप्या. पण वर
बरोबर आहे जामोप्या. पण वर अगदीच वेगळं मत व्यक्त झाल्यावर मुक्ताफळं, तारतम्य वगैरे शब्द वाचले म्हणून लिहीलं. कारण ह्याच व्यक्तीने मागच्या धाग्यावर:
नंदिनी | 16 May, 2012 - 14:52
आगाऊ +१.
मुळात हा धागा कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आहे. फक्त समस्येवरती चर्चा करण्यासाठी नव्हे. या मधे सादरीकरण, नेपथ्य, वेशभूषा सर्वांवरती चर्चा होऊ शकते. संदेश महत्त्वाचा आहे म्हणून इतर बाबीबद्दल बोलूच नये हे पटलं नाही.
हे बोलली होती. म्हणून जरा आठवण करुन दिली इतकंच.
बुर्हाणपूरचे उदाहरण हुंडा न
बुर्हाणपूरचे उदाहरण हुंडा न घेता लग्नाचे होते की लग्नातल्या अनावश्यक खर्चाला फाटा देण्याचे होते? नो बँड नो बारात असे काहीतरी होते. मुस्लिमांत मुलाकडून मुलीला मेहेर दिला जातो(?).
>>ज्या समाजामधे ही समस्या
>>ज्या समाजामधे ही समस्या मोठ्या प्रमाणावर आहे त्या समाज धुरीणानी एकत्र येऊन अशा मोहिम आपल्या समाजात जरूर राबवाव्यात.
अनुमोदन
इस्लाममधे दहेजची संकल्पना
इस्लाममधे दहेजची संकल्पना नाही. इस्लाममधे मुलाकडून मुलीला मेहेर मिळतो. मात्र, भारतामधे मुसलमानानी भारतीयाच्या काही पद्धती घेतल्या (बाटवणे वगैरे कारणे असतीलच) त्यामधे दहेजची पद्धत आली.
तेच तर.. भारतातील मुस्लिमांमध्ये ही प्रथा हिंदुंकडून गेली असण्याची शक्यता आहे.
ठीक आहे. आता चर्चा पुढे सुरू
ठीक आहे. आता चर्चा पुढे सुरू ठेवा. तोच मुद्दा नको सारखा सारखा.
मंदार. बहुपत्नित्व, तीनदा
मंदार.
बहुपत्नित्व, तीनदा ’तलाक’ शब्द म्हटल्यावर कोणत्याही मुस्लिम महिलेचे निराधार होणे ही हिंदू विवाह पध्द्तीतील समस्या आहे.
५. लव्ह जिहादमुळे धर्मांतर होवून मुस्लिम मुलांशी विवाह झालेल्या हिंदू, ख्रिस्ती, बौद्ध, शीख व इतर भारतीय धर्मीय व भारतीय वंशाच्या मुली अरबी देशात विकून त्यांना वेश्याव्यवसायाला लागून नरकयातना भोगाव्या लागत आहेत हासुद्धा हिंदूंच्या विवाहपध्दतीतला दोष आहे.
६. ज्या लाखो दुर्दैवी मुली धर्मांतर व मुस्लिम समाजात विवाह होवून भारतातून बेपत्ता झालेल्या आहेत, त्या मुलींच्या समस्या सुद्धा भारतीय विवाह पद्धतीशीच निगडीत आहेत.
७. मुस्लिम समाजातील विवाहित पुरुषही भारतीय वंशातील मुलींना आपण अविवाहित असल्याचे सांगून फसवून व त्यांना ब्लॅकमेल करून, त्यांच्याशी शरीरसंबंध जोडून, त्यांच्या शीलाशी स्वत: खेळणे व आपल्या समाजबंधूंनाही त्यात सामिल करणे, प्रकरण गळ्यापर्यंत आल्यावर त्यांचा खून करणे... हे प्रकार फक्त भारतीय विवाह पध्दतीच्या समस्या आहेत. ह्यात मुसलमानांचा काहीही हात नाही.
>>> वरच्या पोस्टमधील या मुद्द्यांचा आजच्या कार्यक्रमाशी नक्की कशाप्रकारे संबंध होता हे जराविषद करून सांगाल का?
मुस्लिम धर्मातली दहेजची पद्धत
मुस्लिम धर्मातली दहेजची पद्धत ही केवळ भारतीय संपर्कातल्या प्रांतांमधेच आहे अन्यथा त्यांच्याकडे वराने वधूस मेहेरची रक्कम द्यायची असते.
मुस्लिम धर्मातील विवाहविषयक इतर कुठल्याही मुद्द्यांचा उच्चारही कार्यक्रमात झालेला नाही आणि तो आजच्या कार्यक्रमाचा विषयही नाही. तेव्हा मीरा जोशी आवरा...
हिंदू धर्मामधे वैयक्तिक पातळीवर हुंडा प्रकरण अनेकांनी त्याजले असले तरी धर्माच्या ऑथोरिटीजनी एकत्र येऊन त्यासाठी विरोध केल्याचे आणि उपाययोजना केल्याचे उदाहरण मी ऐकलेले नाही. कुणाला माहित असल्यास सांगावे.
माबोवर तर हुंड्याचे समर्थन करणारे लोक पण आहेतच.
मीरा जोशी प्रत्येक गोष्टीला हिंदू-मुस्लिम, आमचीच्च्च संस्कृती महान हे रंग लावून बोअर करू नका.
आता हाच मुद्दा लाऊन धरणार की
आता हाच मुद्दा लाऊन धरणार की चर्चा पुढे सुरु ठेवणार?
जा मो प्या सहमत...! आजकाल
जा मो प्या सहमत...!
आजकाल हुंडा देणे आणि घेणे या प्रथा न रहाता, तो एक वरमुलांच्या कुटुंबीयांसाठी व्यवसाय झालाय. आणि असा नफ्यात चालणारा व्यवसाय सहजासहजी बंद होणे कठीण, हुंडाविरोधी कायद्याने इतकी वर्षे हुंडा घेणार्या आणि देणार्या लोकांवर काही फरक पडला नाही, तर आमीरच्या एका ऐपिसोडने समाजावर कीतीसा फरक पडेल हे तर येणारा काळच सांगेल.
मंदार, चर्चा पुढे नेण्यास
मंदार, चर्चा पुढे नेण्यास काही हरकत नाही. पण सतत ते एकच तुणतुणं नको.
हिंदू शब्द आला की काही लोक
हिंदू शब्द आला की काही लोक असेच चवताळतात,मंदार!
कारण हिंदू म्हटलं की त्यांना समोर सगळे जात्यंध लोकच दिसतात....आणि गंमत म्हणजे स्वत: हिंदू असूनही त्यांना तसे म्हणवून घ्यायला लाज वाटते.
दोष कुणाच्यात नाहीत? कोणत्या धर्मात, समाजात नाहीत? मग चर्चा करतांना धर्मांची बंधने का आड येतात?
आपल्या हिंदू धर्मात जे दोष आहेत ते आपण अगदी दुसर्या धर्मियांनीही(इथे अमीरने) सांगितले तरी नीट ऐकून घेतो..इतर धर्मीयांनी ते ऐकून घेणे वगैरे सोडाच...पण आपल्यातल्यालाच तथाकथित पुरोगामी लोकांच्या नाकालाच लगेच मिर्च्या झोंबतात.
असो...सद्द्या हुंडा हा विषय आहे...आणि हुंडा घेणारे जितके क्रूर आणि वाईट समजले जातात तसेच ते देणारेही तेवढेच बेजबाबदार असतात असे माझे मत आहे...तेव्हा असे आपले दोष अमीरखानच्या कार्यक्रमातून समोर येवोत किंवा इतर कुणाच्याही...आपल्या समाजातले हे दोष आहेतच आणि आपण ते दूर केलेच पाहिजेत. ह्यासाठी पहिले पाऊल म्हणून समस्त उपवर मुलींनी आम्ही हुंडा घेणार्या मुलाशी कधीच लग्न करणार नाही अशी शपथ घेऊन ती कसोशीने पाळायला हवीय....तसेच ह्या प्रथेचा बंदोबस्त व्हावा असे मनापासून वाटणार्या समजूतदार तरूणांनीही आपल्या विवाहात हुंडा,मानपान,वरदक्षिणा इत्यादि कोणत्याही प्रकारे वधुपक्षाची लूट न करता अतिशय साधेपणाने लग्न करू अशी शपथ घेऊन ती पाळायला हवी आहे....
एरवी होतंय काय की...असे कार्यक्रम पाहून लोक खूप भारावून जातात...आपणही आता असे वाईट वागणार नाही वगैरे म्हणतात..पण चार दिवसांनी ते सगळं विसरून जाऊन पुन्हा आपल्या जुन्या प्रथांनाच कवटाळून बसतात.
मंदार, घे आता.. चर्चा
मंदार, घे आता.. चर्चा कशाबद्दल आणि चाललंय कुठे...
इथे किती जणांनी आपापल्या
इथे किती जणांनी आपापल्या लग्नात हुंडा दिला नाही आणि घेतला सुध्दा नाही...त्याचबरोबर स्वतःच्या आणि साथीदाराच्या पैश्यातुन लग्न स्वतःचे लग्न केले ?????????????????
आहे कोणी ?
.
जरा बघु इथे किती कोरडे पाषाण आहेत ? कोण कबुल करते खुल्या मनाने... ?
मीरा जोशी यांच्या पोटची फारशी
मीरा जोशी यांच्या पोटची फारशी फिकीर करू नये
माझ्या लग्नात मी हुंडा घेतला
माझ्या लग्नात मी हुंडा घेतला नाही.
.>>इतर धर्मीयांनी ते ऐकून
.>>इतर धर्मीयांनी ते ऐकून घेणे वगैरे सोडाच...पण आपल्यातल्यालाच तथाकथित पुरोगामी लोकांच्या नाकालाच लगेच मिर्च्या झोंबतात.<<
......अगदी सहमत.!
>>तसेच ह्या प्रथेचा बंदोबस्त व्हावा असे मनापासून वाटणार्या समजूतदार तरूणांनीही आपल्या विवाहात हुंडा,मानपान,वरदक्षिणा इत्यादि कोणत्याही प्रकारे वधुपक्षाची लूट न करता अतिशय साधेपणाने लग्न करू अशी शपथ घेऊन ती पाळायला हवी आहे....<<
यामुळे कदाचीत येत्या काळात स्त्रिभृण हत्येलाही आळा बसेल.
उदयवन, मी हुंडा दिला नाही.
उदयवन, मी हुंडा दिला नाही. सतिशने घेतला नाही.
आमच्याकडे लग्नाचा खर्च अर्धा अर्धा करायचे ठरले होते. सतिशकडचा खर्च पूर्णपणे त्यानेच केला. मी काही बाबींचा खर्च उचलला मात्र पूर्ण खर्च उचलणे तेव्हा शक्य नव्हते. सोन्याच्या बाबतीत माहेरकडून पाच तोळे आणि सासरकडून सहा तोळे मिळाले. यादी करताना फक्त कोण कुठले दागिने करणार एवढेच ठरले होते. लग्नानंतरच्या नविन संसाराचा सर्व खर्च मी आणि सतिशनेच केला होता.
मंदार.... मी हे जरूर मान्य
मंदार....
मी हे जरूर मान्य करेन की आमीर खानच्या प्रत्येक एपिसोडनंतर त्या त्या विषयाला फटकून [जरी गाभा विषयांतर्गतचा असला तरी] प्रतिसाद इथे येत राहाणार आणि चर्चा भटकत जाणार. फक्त ती किती भटकू द्यावी याचे तारतम्य येथील प्रत्येक सदस्याने [जे सर्वार्थाने विद्याविभूषित आहेत असे समजायला हरकत नाही] ठेवली तर आमीरची त्या विषयामागील तळमळ वार्यावर विरून जाणार नाही.
शिवाय 'हुंडा इज इक्वल टु हिंदु धर्म अलोन' असाही काही प्रकार नसतो. ही विषवल्ली सर्वच धर्मात/पंथात (प्रमाण कमीजास्त असले तरी) खूप खोलवर रुजली आहे. ख्रिश्चन कम्युनिटीतील त्या मदुराईच्या मुलीने तर मागण्यांनी बेजार होऊन आपले जीवनच संपवून टाकल्याचा प्रकार दाखविला गेलाच. ७० तोळे सोने आणि कार वरतून प्लॅस्टिक सर्जरीचा खर्च.....आणि हे देणारे पालक त्या समाजात आहेतच ना ? परत ती मुलगी लेक्चररच्या पदावर नोकरी करणारी. कसला धर्म आणि कसला शैक्षणिक दर्जा...? जिथे फक्त 'नोट' हीच पात्रता मानली जाते लग्नसंदर्भात तिथे बाकी सार्या गोष्टींचा गच्छंती गार्बेज कॅनमध्येच.
त्यामुळे जे कुणी या प्रथेविरुद्ध जाऊन आपला आवाज उठवितात वा त्या प्रथेची धार काही प्रमाणात का होईना कमी करण्याचा प्रयत्न करतात (प्रसंगी पदरच्या खिशाला कात्री लावून) त्याना निदान शाब्दिक बळ तर आपण देऊ शकतो. मग ते बुर्हाणपूरचे मौलवी असोत वा पंजाबमधील राजकारणाशी संबंधित नेते. ते अमुक एका धर्माचे वा जातीचे आहेत म्हणून आमीर त्याना प्रोजेक्ट करतो की काय अशी भावना बाळगणेही चूकच.
अशोक पाटील
थे किती जणांनी आपापल्या
थे किती जणांनी आपापल्या लग्नात हुंडा दिला नाही आणि घेतला सुध्दा नाही..<<<
मी मुळात कोकणी असल्या कारणाने माझ्या लग्नात मी हुंडा घेण्याचा प्रश्नच नाही.
उदयवन मी नाही घेतला हुंडा.
उदयवन
मी नाही घेतला हुंडा. माझे सासरे गेल्याने मुलीची बाजू लंगडी होती. आम्ही फक्त नारळ द्या म्हटलं. पण सासूने हट्टाने अर्धा खर्च केला. मी स्वतः अंगठी सुद्धा नाकारली. कपडे प्रत्येकाने आपापले करावे हे आजोबांच्या दडपणामुळे ठरले. सगळाच खर्च मी करावा याबद्दल त्यांची कुरकुर होत होती.
इथे जात, प्रदेश आणण्याची गरज
इथे जात, प्रदेश आणण्याची गरज काय आहे ?????????????????????????????????
आणि गंमत म्हणजे स्वत: हिंदू
आणि गंमत म्हणजे स्वत: हिंदू असूनही त्यांना तसे म्हणवून घ्यायला लाज वाटते.<<<
हे अनुमान कशाच्या बळावर?
कुणाला काय म्हणवून घ्यायला लाज वाटते की नाही इत्यादी खाजगी बाबींशी तुमचा काय संबंध?
उदयवन,
मी हुंडा दिला नाही, नवर्याने घेतला नाही. खर्च दोन्ही आईवडिलांनी अर्धाअर्धा केला. कपडे ज्याचे त्याने केले. मानपानाला काट मारली होती. हे सगळं दोन्ही आईवडिलांच्या खुशीने आणि त्यांना परवडत असताना. परवडत नसतं तर केला नसता.
बाकी कोणी काय कबूल करायला हवेय कळले नाही.
हुंडा प्रथेचे इतर बाफंच्यावर जोरदार समर्थन करणारे इथे आहेत त्यांना विचारा कारण. ते बायकोला मारावे याही मताचे आहेत. बघा....
>>हुंडा प्रथेचे इतर
>>हुंडा प्रथेचे इतर बाफंच्यावर जोरदार समर्थन करणारे इथे आहेत त्यांना विचारा कारण. ते बायकोला मारावे याही मताचे आहेत. बघा....<<<<
मी माझे लग्न नोंदणी पद्धतीनेच
मी माझे लग्न नोंदणी पद्धतीनेच केले ....लग्नातल्या मानपान,हुंडा,वरदक्षिणा आणि थाटमाट इत्यादि सर्व फालतू खर्चावर काट मारून....ह्याबद्दल मी माझ्या लग्नाबद्दलच्या लेखात पूर्वीच लिहिलेलं आहे....
पण इथे एकच सांगतो की २५ वर्षांपूर्वी जेव्हा मी असे लग्न केले तेव्हा माझ्या बहुसंख्य नातेवाईकांनी,ओळखणार्यांनी त्याबद्दल निषेधच व्यक्त केला होता...कारण त्यांना मिरवता आले नव्हते....माझ्या लग्नानंतर काही माझे मित्र माझ्या साध्या विवाहाने प्रभावित होऊन म्हणाले होते...आम्हीही असेच साधे वागू....पण दूर्दैवाने त्यातल्या एकानेही त्यांचे बोलणे खरे केले नाही.
माझ्यासारख्या अटी घालणार्या(हुंडा वगैरे नको,लग्न साधेपणानेच हवे इत्यादि) तरूणांकडे समाज काही वेगळ्या नजरेने पाहतो असा माझा स्वानुभव आहे...ह्याच्यात काही तरी व्यंग,कमतरता असणार...नाही तर कशाला असे बोलेल....अशी कुजबुज सुरु होते....कैक वेळेला अशा कुजबुजीमुळेही काही मंडळी माघार घेऊन मग पारंपारिक पद्धतीने विवाहाला तयार होतात....
थोडक्यात काय..तर एखाद्या व्यक्तीमुळे समाज सुधारत नसतो तर समाजात मोठ्या संख्येने असे काही केले तरच बदल होऊ शकतात..किंवा ती एखादी व्यक्ती समाजात उच्चपदी असावी लागते म्हणजे मग लोक तिचे अनुकरण करतात....एरवी शांत पाण्यात एखादा छोटा खडा टाकल्यावर उठणार्या तात्कालिक तरंगांसारखे असते...लोक लगेच सगळं विसरतात.
मी हि नाही हुंडा दिला, वा देऊ
मी हि नाही हुंडा दिला, वा देऊ दिला....हि एक गोष्ट तेवढी मी फार पक्की मनाशी ठरवून होते आणि अमलातही आणली
अर्थात नवर्यानेही घेतला नाही...आणि खर्च अर्धा अर्धा
माझ्या कडे तरी वडलांनी केला, पण नवर्याने अक्षर्हा एकूण एक स्वतच्या पैशाने केले.
शाबास गीतु! तुझ्यासारख्या
शाबास गीतु! तुझ्यासारख्या दृढनिश्चयी तरूणीच ह्या देशाचं उज्जवल भविष्य घडवू शकतात.
Pages