इथे पास्ट लाईफ रिग्रेशनचा अनुभव असलेले कोणी आहे का? मी याबद्दल बरेच वाचले आहे. ठाण्यात एक बाई याचे सेशन्स घेतात हे ऐकले आहे. त्यांच्या पुढच्या सेशनला उपस्थित राहायचे ठरवले आहे. पण याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले कोणी ओळखीत नाही किंवा कोणा ओळखीच्या ओळखीतही नाही. म्हणुन इथे विचारायचे ठरवले. जर कोणाला अनुभव असेल तर कृपया लिहा. अर्थात मी स्वतः तर जाणार आहेच पण जायच्या आधी खालिल गोष्टींबद्दल जाणुन घेतले तर थोडी मदत होइल असे वाटते-
१. आधीच्या जन्माच्या आठवणी कितपत स्पष्टपणे दिसतात?
२. या जन्मात आपल्या अवतीभवतीची माणसेच आधीही असतात असे ऐकले. मग ती माणसे आपल्याला कशी ओळखु येतात. की जस्ट आपल्याला अंतप्रेरणा होते की हा जो दिसतोय तो सध्याच्या जन्मात अमुकअमुक आहे म्हणुन?
आणि कृपया -
मी जरी आज सभासद झालोय तरी मी गेली ५ वर्षे रोमातला मायबोलीकर आहे, इथल्या प्रतिसादांशी मी खुपच चांगल्या प्रकारे परिचित आहे. आणि म्हणुन खालील सुचना -
१. ज्यांचा या सगळ्यावर विश्वास नाही त्यांनी इथे येऊन 'हे फाल्तु आहे' हे सांगण्यात आपला वेळ वाया घालवायची गरज नाही. हे फाल्तु आहे की कसे हे जाणण्यासाठी मी माझा वेळ आणि पैसा वापरतोयच. आलेले अनुभव इथे टाकेनच.
२. इथे आल्या आल्या इतके छान मराठी टायपिंग कसे जमतेय ह्याही शंका घेऊ नयेत. मी जरी इथे आजच सभासद झालोय तरी मायबोली ही एकच मराठी साईट नाहीय. माझ्या स्वतःच्या ब्लॉगवर आणि संकेतजालावर इतरत्रही मराठीतुन लिहिण्याची सोय आहे.
<< त्यामधून कर्मसिद्धांत कसा
<< त्यामधून कर्मसिद्धांत कसा असतो, आपल्या विविध कर्मांमुळे आपल्यास कशाप्रकारच्या जन्माला जावे लागते हे कळून येते. >>
बाकी चर्चा चालू देत पण हा समज अतिशय आक्षेपार्ह असल्याचे सत्यमेव जयते च्या अपंगावरच्या भागात जाणवले. या अशाच समजुतींमुळे मागच्या जन्मी पाप केलेत म्हणुन या जन्मी तुम्ही अपंग झाला आहात. असे लोक निर्लज्जपणे अपंगांबद्दल बोलतात ते ऐकून वाईट वाटले.
या अशाच समजुतींमुळे मागच्या
या अशाच समजुतींमुळे मागच्या जन्मी पाप केलेत म्हणुन या जन्मी तुम्ही अपंग झाला आहात. असे लोक निर्लज्जपणे अपंगांबद्दल बोलतात ते ऐकून वाईट वाटले.
----- डेलिया यांच्या मताशी सहमत... अपंगत्व आणि मागच्या अस्तित्वातच नसलेल्या जन्मात केलेली पापे यांचा संबंध नाही...
डेलिया, +१ कर्मसिद्धांताच्या
डेलिया, +१
कर्मसिद्धांताच्या फडतूस तत्वामुळे आपले खूप नुकसान झाले आहे.
वात कफ पित्त दिसत नाहीत, मग शोधले कुणि ?
आत्मज्ञानातून यांचा शोध लागला.
म्हणजे काय ?
अॅक्युप्रेशर हेही आयुर्वेद, होमिओपॅथी सारखे pseudoscience आहे.
अंजन - छान अनुभव लिहीलेत ,
अंजन - छान अनुभव लिहीलेत , पुढचे काही सेशन अटेंड केलेत तर नक्की तुमचे अनुभव या बाफ वर शेयर करा.
कर्मसिद्धांत म्हणजे काही एकदम
कर्मसिद्धांत म्हणजे काही एकदम चुकीची गोष्ट आहे असे काही नाही, आपल्या रोजच्या आयुष्यात आपण याचा अनुभव घेत असतो. कर्म म्हणजे तरी काय आपण जे रोज लहान मोठे काम मनाने,बुद्धिने,शरीराने करत असतो तेच, एखाद्या मुलाने नीट अभ्यास केला तरच तो पास होणार, त्याने जेवढ्या प्रमाणात अभ्यास केला तेवढ्या प्रमाणातच त्याला यश मिळणार, आता इथे अभ्यास करणे हे त्याचे कर्म आहे व त्याचे फळ म्हणजे त्याला मिळणारे यश-अपयश, एखाद्या चोराने चोरी केली, एखाद्याने एखाद्याचा खुन केला तर आपल्याला वाटतेच ना कि या माणसास शिक्षा मिळायला हवी, तर त्याने केलेले वाईट काम हे त्या माणसाचे कर्म आहे व त्याचे फळ हे त्याला मिळणारच मग ते सरकारकडून शिक्षेच्या स्वरुपात असो ,जे आपण पाहु शकतो कि याला का शिक्षा मिळत आहे किंवा निसर्गाच्या नियमाप्रमाने तो ही शिक्षा इतर प्रकारेदेखिल भोगु शकतो उदा. त्याला पैशाचे नुकसान होणे, आजारपण येणे व तुम्ही हे कितीही अमान्य केलेत तरी या दुनियेत तुम्ही जितक्या जोराने साद घालता तितक्याच जोराने त्याचा प्रतिसाद हा येतोच.
साईबाबांनी सांगितल्याप्रमाने या जगातील प्रत्येक व्यक्ती ही एकमेकांशी रुनानुबंधनाने जोडलेली आहे, या बंधनामुळेच आपण एकमेकांच्या जवळ येतो, प्रेम करतो याच बंधनामुळेच आपण दुरावतो देखिल........... तुम्ही एकदा पुर्नजन्म मान्य केलात तर तुम्हाला जाणवेल कि जन्म्-म्रुत्यु ही एक सतत चालु असलेली साखळी आहे....... आज ज्याचा म्रुत्यु झाला आहे त्याचा उद्या जन्म नक्की आहे, व आज जो जन्माला आला आहे त्याचा उद्या म्रुत्यु नक्की आहे. भगवान श्री क्रुष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाने तु , मी नव्हतो असा कधी काळ नव्हता, फक्त ते सर्व जन्म मी आठवु शकतो व तु नाही. असे खुप संत-महात्मे आहेत ज्यांनी आपली अध्यात्मिक पातळी उंचावल्यावर त्यांना आपल्या मागील अनेक जन्माचे ज्ञान झाले.
अपंग व्यक्ती ही अपंग झाली याला त्याचे आधीच्या जन्माचे पाप आहे असे मानने चुकिचे आहे, चला नको मानु, कोणीही सांगत नाही कि तुम्ही तसे सतत त्या व्यक्तिला सांगुन दुखवा कारण हे नितीमत्तेच्या विरुदधच आहे. आमिरला हेच सांगायचे आहे कि एखादी व्यक्ती अपंग झाली याला मग काही कारण असु दे मग तुम्ही त्याला मागच्या जन्मीचे पाप बोला, नाही तर त्यांच्या आई-वडिलांच्या गुणसुत्रात असलेला दोष, किंवा आईने बाळ गर्भात असतान केलेला चुकीचा आहार किंवा औषधपाणी, पण शेवटी ती व्यक्ती अपंग झाली हेच वास्तव आहे, व हे वास्तव लवकरात लवकर स्विकारून त्यावर मात करणे हेच आवश्यक आहे, नाही तर आई-वडिल आधीच हताश होतात अशी संतती झाली तर व पुढे समाज त्यांना आपल्या टोचून बोलण्याने अजुन हताश करतो.
मी कुठे घुमजाव करतोय?
मी कुठे घुमजाव करतोय? इलेक्ट्रॉनचं स्थिरवस्तुमान मोजण्यातील अंतर्विरोध मीच सर्वप्रथम दाखवला . तोही हिग्जच्या थियरीशिवाय. हिग्जचा विषय तुम्ही आणलात. मी नाही. मला माझं म्हणणं पटवून देण्यासाठी हिग्जमताची गरज भासत नाही.>>>>almost all physics is dynamics, भौतिक जगात परमाणु कधीच गतीशुन्य असणार नाही ,त्यामुळे रेस्ट मास संकल्पना कितीही पॅरॉडॉक्सीयल असली तरी ती सैद्धांतीक पातळीवरच राहील आणि नजिकच्या भविष्यात निकालात निघलेच याची खात्री वैज्ञानिकांना आहे.हिग्जमताची गरज अनेक शास्त्रज्ञांना वाटते, अगदी स्टिफन हॉकिंग हे देखील हीग्जविषयी आग्रही आहेत .आपण हॉकिंग यांच्यापेक्षा विद्वान असाल तर भाग वेगळा.
<<मागे सांगितलं आहे . परत सांगतो की, माणूस जिवंत असेपर्यंत देह सडत नाही. जो देह ७०/८० वर्षे सुखेनैव चालू होता, तो अचानक दोनतीन तासांत सडून नष्ट व्हायच्या मार्गाला लागतो. कारण की या देहाला जिवंत ठेवणारा आत्मा देह सोडून गेलेला असतो.
मेलेला देह सडणे हा एक वस्तुनिष्ठ (objective) अनुभव आहे. आत्म्याचं देहातील अस्तित्व हा एक गण्यगुण (पॅरामीटर) वस्तुनिष्ठपणे (objectively) पडताळता येतो.>>>आत्मा बाहेर पडतो कसा? कुठुन? 'बाहेर पडणे' ही संज्ञा भौतिक प्रक्रीयेसाठी वापरतात. उदा:- गामा पैलवान घराबाहेर पडला . यात गामाला भौतिक अस्तित्व आहे. आत्म्याला असे अस्तित्व नसताना 'आत', 'बाहेर' या संज्ञेला अर्थ उरत नाही.
>>इ.स. १८८० साली पुंजावाद (quantum theory) अस्तित्वातनव्हती. तिचा उदय इ.स. १९२५ च्या सुमारास झाला. तिच्यामुळे स्थूल वस्तुमान, स्थान, संवेग, इत्यादि स्थूल आकलने मोडीत निघाली. म्हणूनंच इ.स.१८८० सालचे निश्चित्यवादी (deterministic) भौतिकशास्त्र आज शक्यतावादी (probabilistic)झाले आहे.>>>>
प्रगतीमुळे काटेकोरपणा येण्याऐवजी अनिश्चितता येऊघातलीये.>>>>सापेक्षता आणि पुंजवाद यांच्यात एकमत नाही. मिसिंग लिंक हे एकमत नसण्याचे कारण आहे .ही मिसिंग लिंक शोधुन ग्रॅण्ड युनिफाईड थेअरी मांडण्याच्या जवळपास वैज्ञानिक पोचले आहे असे हॉकिंग यांचे विधान आहे. ब्रीफ हीस्टरी ऑफ टाईम वाचावे.
>>रीतीमान (methodology) सोपी आहे. आत्मज्ञान झालेल्या ऋषींनी आत्म्याबाबत असलेल्या करुणेमुळे मनुष्याच्या हितासाठी ध्यान लावून शरीरशास्त्र शोधून काढले. आयुर्वेद हे ध्यानावस्थेत प्राप्त झालेलं ज्ञान आहे (किंवा असावं).
जगभरात इतर कोणालाही हे सापडलं नाही कारण तशी जिज्ञासा कोणी दाखवली नाही>>> ध्यानावस्थेत ज्ञान प्राप्ती होऊ शकते असे तुमचे म्हणणे आहे,मग मेटलर्जी ,क्वांटम फिजिक्स, केमिस्ट्री ,जेनेटिक्स ,एरॉनॉटीकल सायन्स ,बायॉलॉजी ,सायटॉलॉजी ,एलोपॅथी ईत्यादिंचे ईत्यंभुत ज्ञान या मुनींना ध्यानधारणेतुन का मिळाले नाही?दृश्य गोष्टीतला कार्यकारणभाव सापडला नाही, परंतु अदृश्य वात कफ पित्त सापडले
माझा खुप विश्वास आहे
माझा खुप विश्वास आहे पुनर्जन्मावर. मी RAAJ PICHHALE JANAM KA अगदी आवर्जुन पाहायचो. माझ्या एका मित्राने Past Life Regression ची थेरपी करुन पाहीली पण तो समाधानी नाहीये. साउथ ला म्हणे असे ज्योतिषी आहेत जे अत्रि रुषींचे वंशज आहेत. अत्रि रुषींनी त्याकाळी धरतीवरील सर्व मनुष्यांचे भविष्य ताडाच्या पानाच्या पट्ट्यांवर कोरले आहे. आपण फक्त आपली जन्मतारीख व जन्मवेळ सांगायची ते त्यावरुन त्या पट्ट्या शोधतात व आपोआप आपले , आपल्या सध्याच्या आई वडीलांचे व भावंडांची नावे सांगतात व ते जर खरे असेल तर पुढची थेरपी करतात. अशा संस्था पुर्णा महाराष्ट्रभर आहेत. ह्या प्रक्रियेला काहीतरी नाव आहे जे मला सध्या आठवत नाहीये.
आठवलं त्याला नाडी ज्योतिष
आठवलं त्याला नाडी ज्योतिष म्हणतात.
१९३५-३६ मध्ये प्रसिद्ध् झालेल्या "साईलीला" मासिकात एका पुनर्जन्माची कहाणी आली होती. वाचायची असल्यास शिर्डी साईबाबा संस्थानची official site www.shrisaibabasanshtan.org / www.sai.org.in वर जाउन "साईलीला" मासिक वाचावे. इथे 1920 पासुन आत्तापर्यंतचे "साईलीला" मासिकाचे सर्व अंक मिळतील.
आठवलं त्याला नाडी ज्योतिष
आठवलं त्याला नाडी ज्योतिष म्हणतात.>>>>
हा प्रकार बोगस असु शकतो. मला आणि नवर्याला ह्याचा प्रत्यय आला. ते लोक आपल्या कडुन खुप सारी माहिती बोलता बोलता काढुन घेतात आणि मग आई वडिलांची नावं सांगुन शेंड्या लावतात. आम्ही स्वतः १५०० रुपयांना गंडलो.
स्वानुभव आहे. फसु नका.
......पहिल्यापासुन सगळॅ
......पहिल्यापासुन सगळॅ प्रतिसाद उगाच वाचले.............
एकाने ही अनुभव लिहिला नाही आहे.............
.
भलत्याच गोष्टींवर चर्चा.........
नाडी ज्योतिषावर मायबोलीवर
नाडी ज्योतिषावर मायबोलीवर शशिकांत ओक नावाचे गृहस्थ माहिती देत होते... ते विंग कमांडर होते . हल्ली नाडी पहातात http://www.maayboli.com/node/4228
>>आठवलं त्याला नाडी ज्योतिष
>>आठवलं त्याला नाडी ज्योतिष म्हणतात.
पण मी म्हणतो "नाडी" वापरावीच का? त्या ऐवजी इल्यास्टिक वापरा ना. नाड्या बांधण्या - सोडण्याची झंझटच नको.
आंग्रे, तुम्ही हिंदु धर्माचा
आंग्रे, तुम्ही हिंदु धर्माचा अपमान करीत आहात.. तुम्हाला हिंदु द्वेष्ट्या लोकानी हायर केले आहे का?
ंमोहन की मीरा, फसवणूक होऊनही
ंमोहन की मीरा,
फसवणूक होऊनही अनुभव लिहिल्याबद्दल धन्यवाद.
त्या नाडीसमर्थक ओकांचा मी अन्य एका संकेतस्थलावर प्रतिवाद करून करून दमले.
अनेक प्रतिसाद असलेला हा धागा
अनेक प्रतिसाद असलेला हा धागा सुटला होता. मला अचानक सापडला.
काही नविन मुद्दे समजले. ही चर्चा पुढे नेण्यास हरकत नाही.
मुळात आत्मा असतो की नाही यावर थोडा प्रकाश टाकावा असे वाटते.
ही लिंक पहा http://en.wikipedia.org/wiki/Duncan_MacDougall_(doctor)
यात मृत्युसमयी आणि मृत्युनंतर लगेचच माणसाचे वजन केले असता २१ ग्रॅम इतका फरक सापडला.
या प्रयोगाची संख्याशास्त्रीय कसोटीत कस लागत नाही कारण संख्याशात्राला पात्र होईल इतकेवेळा हा प्रयोग झाला नाही.
या प्रयोगानंतरही आत्मा असतो हे तर्काने मान्य करावे लागते. स्पष्ट पुरावा नाही.
म्रुत्युसमयी काही विषीष्ठ फोटोग्राफीने हे साधणे शक्य आहे का ?
आणि साधले तरी बुध्दीपामाण्य वादी त्याला एनर्जी म्हणतील. ती एनर्जी पुन्हा शरीरात येते हे पुन्हा तर्कानेच सिध्द करावे लागे.
ज्ञानेश , उदय मी काही
ज्ञानेश , उदय
मी काही अध्यात्मात उच्च पातळी गाठलेल्या लीकांची पुस्तके वाचली आहेत . त्या माहितीवरून
मग पुढच्या जन्मात तुम्ही कुत्रा, बेडूक, साप- काहीही होऊ शकता.मनुष्यजन्म एकदाच मिळतो ही धारणा ठाम आहे >> अगदी भयंकर पापं करणार्यांना हे लागू होता . एकदा मनुष्य जन्म मिळाला कि त्याला पुन्हा प्राणी पक्षी यांचा जन्म सहसा मिळत नाही. मोक्ष मिळेपर्यंत माणसाला कमीत कमी ७ जन्म घ्यावे लागतात . त्यामुळे मागच्या जन्मात आपण माणूस असण्याची शक्यता फार जास्त . जसा जसा माणूस पुढच्या मनुष्य जन्मात जातो तसतशी त्याची अध्यात्मिक प्रगती होत जाते आणि शेवटी तो ब्रम्ह पदाला पोचतो
फुगत असलेल्या जगाच्या लोकसंख्येत आत्मे येतात कुठुन. >>>
आपल्या आजूबाजूला शरीर रूपाने वावरणारे जे लोक आपल्याला दिसतात त्यांची संख्या अशारीररूप अत्म्यांपेक्षा खूप कमी आहे . आपल्या आजूबाजूला असंख्य आत्मे असतात . परंतु भौतिक डोळ्यांच्या मर्यादेमुळे ते साध्या डोळ्यांना दिसत नाहीत . नवीन जन्माला येणारे जीव हे ह्याच अत्म्यान्मधून येत असतात . तसेच जितके जीव रोज जन्माला येतात तेवढेच मरत सुधा असतात .
तसेच मृत्युलोकासारखे अजून ६ लोक आहेत . ह्या लोकातले आत्मे त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे मृत्युलोकात येत असतात .
त्यात एका गुरूने सांगितले कि तो मागच्या जन्मीचा भ्रष्ट योगी आहे. योगामार्गावरून मागे फिरला म्हणून या जन्मी असं झालाय >> योग्मार्गावरून मागे फिरण्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही . योगसाधना करताना एखाद्याला त्याच्या पुर्वाकार्माने मधेच मृत्यू आला तर त्याला 'योगभ्रष्ट' होणं असं म्हणतात . पुढच्या जन्मात त्याच्या योगसाधनेला अनुकूल परीस्थीती तच त्याचा जन्म होतो .
दिसत नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे वेडेच म्हणावे लागतील. >>
तुमची बुद्धी तुम्हाला दिसते का ? हवा दिसते का ? ह्याचा सरळ अर्थ तुम्ही निर्बुद्ध आहात असं होतो .
काही लोक ऑरा ला आत्मा म्हणतात हे चुकीचं आहे . ऑरा हा आत्मा नसून सूक्ष्म देह आहे . आत्मा भौतिक शरीरात पाठीच्या कण्याच्या तळाशी असतो .
आत्मा नसतो असं म्हणणारे ' शरीरातून असं काय निघून गेलं म्हणजे शरीर मृत होतं आणि ते जे काही निघून गेलं असेल ते पुन्हा शरीरात आणून ते पुन्हा जिवंत का करून दाखवता येत नाही हा' प्रश्न medical science का विचारात नाही ?
आत्मा नसतो असं म्हणणारे '
आत्मा नसतो असं म्हणणारे ' शरीरातून असं काय निघून गेलं म्हणजे शरीर मृत होतं आणि ते जे काही निघून गेलं असेल ते पुन्हा शरीरात आणून ते पुन्हा जिवंत का करून दाखवता येत नाही हा' प्रश्न medical science का विचारात नाही ?
>>>.
mihi yaa prashnaache uttar shodhate aahe. ekaa dr lahi vicharale hote, tyaani uttar dile hote, pan malaa niTasekahi kalale naahi. ithe koni dr asatil tar tyaani uttar dyave hi vinanti. shariratali chetana hi nakki kaay ahe, ti kaa jaate te durache, adhi ti yete kuthun he malaa janun ghyayache. jar ti apoaap yete tar mag kahi baale purn nau mahine vaadh hounahi janmatach mrutavasthet ka janmataat?
साधना व इतर डॉ. मेधा
साधना व इतर
डॉ. मेधा खाजगीवाले यांचे आत्म्याचा प्रवास आणि मृत्युपश्चात जीवन हे पुस्तक वाचा.
हे पुस्तक सर्वसमावेशक आहे असा मी दावा करत नाही, पण अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.
साधना, त्या प्रश्नाचं संपूर्ण
साधना, त्या प्रश्नाचं संपूर्ण उत्तर अजून मिळालं आहे असं वाटत नाही. जिवनाचा प्रश्न मेडिकल सायन्स इतकाच भौतिक शास्त्राचाही आहे. आता थोडं डेटेड वाटेल, पण नोबेलविजेत्या श्रॉडिंगरचं 'What is Life' आणि 'Mind and Matter' मिळवून जरूर वाचा.
आशिष, भिंतपर डोका या डोके पर
आशिष,
भिंतपर डोका या डोके पर भिंत आपटनेसे क्या मिलनेवाला?
आश्चिग धन्यवाद. त्या
आश्चिग धन्यवाद. त्या प्रश्नाचे आध्यात्मिक उत्तर खुप वेळा वाचलेय पण वैद्यकिय उत्तर काय असेल याचे खुप कुतुहल आहे. पुस्तकांच्या नावांबद्दल धन्यवाद.
विकीवर 'What is Life' ची ओळख पाहिली, आध्यात्मिक पुस्तके मला जितकी कळतात तेवढेच हेही कळेल हा विश्वास पटला
. आधी विकी वाचुन पचवते आणि काहीतरी कळतेय असे वाटले तर मग अख्खे पुस्तक मिळवायचा प्रयत्न करते.
आवर्जुन उत्तर दिल्याबद्दल मनापासुन आभार.
केळशीकर तुमचेही आभार. खासगीवाल्यांचेही पुस्तक पाहिले. थोडी पाने वाचुन पाहते आधी.
साधना, भारतीयांना आत्मा आणि
साधना,
भारतीयांना आत्मा आणि पास्ट लाईफ रिग्रेशन ही थेअरी नविन नाही. बहिणाबाईंना आपले तेरा जन्म आठवत होते. तुकाराम महाराजांनी सुध्दा आपले पहिले तीन जन्म सांगीतले आहेत.
पतंजल योग सुत्रात याचा उल्लेख आहे. " यम " या अष्टांगातील पहिल्या पायरीच्या अभ्यासातच मागच्या जन्माचे ज्ञान हे फळ वर्णीले आहे.
पुनर्जन्म हे डॉ. प.वि. वर्तक यांचे पुस्तक ही वाचण्यास चांगले आहे. डॉ. प.वि. वर्तक यांच्या विषयी मत मायबोलीवरच्या चर्चा आणि अनिस कार्यकर्त्यांच्या टीका वाचुन बनवु नये तर सर्व साहित्य वाचुन बनवावे ही आग्रहाची विनंती.
सर्वात महत्वाचे पास्ट लाईफ रिग्रेशन ज्या सायकोलॉजीस्ट च्या अभ्यासातुन परदेशात निर्माण झाली त्यांचे अभ्यासपुर्ण विवेचन वाचावे. इंटरनेट वर आहे.
हा विषय गुढ आहे. मायबोलीच काय घरचे लोक सुध्दा असा विषय ऐकला की वेड्यात काढतात. पण धीर सोडु नये.
आशिष, 'What is Life' नाही
आशिष, 'What is Life' नाही बघितले अजून. पण तू मागे 'सटरफवर' वर सुचवलेले 'what is relativity' वाचायचा प्रयत्न केला होता. अगदिच दुर्बोध नव्हते ते पण माझ्यासारख्याला ते कळायचा वेग खूप कमी होता. मग कामात व्यग्र झालो आणि ते वाचन तेवढ्यावरच थांबले. आणि जे वाचले होते (जवळपास १/४ पुस्तक) त्यातले पण सगळेच नीटसे कळले होते असे म्हणवत नाही. म्हणूनच 'विज्ञानिका' चालू ठेवण्याकरता तुझ्या मागे लकडा लावत असतो मी. तुला जसा वेळ मिळेल तसे लिही पण लिही मात्र नक्की.
नितिन, धन्यवाद. हा विषय गुढ
नितिन, धन्यवाद.
हा विषय गुढ आहे. मायबोलीच काय घरचे लोक सुध्दा असा विषय ऐकला की वेड्यात काढतात. पण धीर सोडु नये.
>>> आत्मा नसतो असं म्हणणारे '
>>> आत्मा नसतो असं म्हणणारे ' शरीरातून असं काय निघून गेलं म्हणजे शरीर मृत होतं आणि ते जे काही निघून गेलं असेल ते पुन्हा शरीरात आणून ते पुन्हा जिवंत का करून दाखवता येत नाही हा' प्रश्न medical science का विचारात नाही ? >>>>
मी माझ्या कुवतीप्रमाणे माझे मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. (मी डॉक्टर नाही)
वरील प्रश्नात, शरीर जिवंत असायला त्यात कोणतीतरी "गोष्ट" असावी लागते "जी" निघून गेल्यावर शरीर मृत होते असे गृहीत धरले आहे. पण तसेच का असायला हवे? जर गाडीच्या इंजिनबद्दल हाच प्रश्न विचारायचा झाला तर त्याचे काय उत्तर देत येयील? कोणती गोष्ट असल्यावर ते सुरु(जिवंत) होते व ती गोष्ट निघून गेल्यावर ते बंद(मृत) होते?? इंजीनाच्या बाबतीत अशी कोणतीही गोष्ट नाही. गाडीच्या इंजिनाला सुरु राहण्यासाठी त्याच्या अनेक भागांना व्यवस्थित काम करावे लागते. तीच गोष्ट शरीराची.
माझ्या मते, शरीर हि एक मोठी एकसंध व्यवस्था आहे. हि व्यवस्था बंद पडली कि मनुष्य मृत होतो. त्यातील काही भाग व त्यांची कामे "कमी अथवा जास्त" महत्वाची असतात. महत्वाचे अवयवांनी काम करणे बंद केले कि हि एकसंध व्यवस्था बंद पडते व मनुष्य मृत होतो.
आधुनिक वैद्यकशास्तरातील प्रगतीने काही महत्वाच्या अवयवांची कामे यंत्राने करता येतात कि ज्यामुळे मनुष्य जिवंत राहू शकतो. उदा. किडनी, (हृदय??) ई.
माझ्या माहितीप्रमाणे, ह्रिदय बंद पडल्यामुळे थोड्या वेळासाठी बंद पडलेली हि व्यवस्था (म्रुतवस्था) विद्युत शौक देवून पुन्हा सुरु करता येवू शकते. (अर्थात प्रत्येक वेळी हे शक्य होत नसावे) आता जर हे शरीर त्यातील "काहीतरी निघून गेल्यामुळे" मृत होत असेल तर विद्युत शौक ने ते गेलेले परत येत असेल का???
<<<< jar ti apoaap yete tar mag kahi baale purn nau mahine vaadh hounahi janmatach mrutavasthet ka janmataat? >>>>
या प्रश्नाचे उत्तर वरील स्पष्टीकरणात मिळते. जरी पूर्ण वाढ झाली असली तरी त्या नवजात बालकाच्या शरीरात काही दोष राहिल्यामुळे त्याचे शरीराची एकसंध व्यवस्था काम करू शकत नाही. आणि त्यामुळे ते मृत जन्मते. आता नेमक्या कोणत्या कारणामुळे हि व्यवस्था काम करू शकली नाही; कोठे गडबड झाली ते डॉक्टर तपासणी करून कदाचित सांगू शकतील.
राजेश, छान आहे उत्तर. याही
राजेश, छान आहे उत्तर. याही दिशेने विचार करुन पाहायला हवा.
इंजीन विजेवर / इंधनावर चालते
इंजीन विजेवर / इंधनावर चालते ना?
शरीरातून असं काय निघून गेलं
शरीरातून असं काय निघून गेलं म्हणजे शरीर मृत होतं आणि ते जे काही निघून गेलं असेल ते पुन्हा शरीरात आणून ते पुन्हा जिवंत का करून दाखवता येत नाही हा' प्रश्न medical science का विचारात नाही ? >>>> राजेश ने चांगले उत्तर दिलेच आहे पण माझे ही थोडे
शॉक देवुन थांबलेले हृदय वगैरे चालू करुन मेलेला माणुस जीवंत करता येतो. पण मेल्यावर ( हृदय बंद पडल्यावर ) रक्ताभिसरण आणि ऑक्सीजन पुरवठा लगेच थांबतो त्यामुळे पेशी मरायला सुरुवात होते. त्यामुळे माणुस मेल्यावर थोडा काळ गेल्यावर शॉक दिले काय कींवा कोणी आत्मा आणुन घातला काय, शरीर जीवंत होणार नाही.
Rajesh क तुम्ही मत व्यक्त
Rajesh क तुम्ही मत व्यक्त केलं आहे पण ते पटल नाही . इंजिन आणि मनुष्य प्राण्याच्या शरीराची तुलना तर हास्यास्पद आहे. इंजिन बंद जरी पडलं तरी त्यातले पार्टस replace करून , नवीन oil वगेरे टाकून ते पुन्हा दुरुस्त करता येतं. पण माणूस (आणि इतरही जीव ) एकदा बंद पडला कि त्याला आकाश पाताळ १ करून सुधा जिवंत करता येत नाही (अपवाद दैवी शक्तींचा).
आणि इथे मत अपेक्षित नसून वैद्यक शास्त्राकडून सत्य अपेक्षित आहे .
माझ्या माहितीप्रमाणे, ह्रिदय बंद पडल्यामुळे थोड्या वेळासाठी बंद पडलेली हि व्यवस्था (म्रुतवस्था) विद्युत शौक देवून पुन्हा सुरु करता येवू शकते. >>>
हि माहिती बरोबर आहे . कारण हृदय बंद पडल्याने मृत्यू होतंच नसतो. मेंदूचं काम थांबलं कि मृत्यू होतो .
माझ्या मते, शरीर हि एक मोठी एकसंध व्यवस्था आहे. हि व्यवस्था बंद पडली कि मनुष्य मृत होतो >>>
हे तर सगळ्यांनाच माहित आहे . मृत्यू का आणि कसा होतो हा प्रश्न नाहीचे . एकदा मृत झालेला जीव पुन्हा जिवंत का करता येत नाही हा प्रश्न आहे. पण वैद्यक शास्त्राला काहीच उपाय का शोधता येत नाही ज्याने हि व्यवस्था पूर्ववत होईल आणि माणूस जिवंत होईल .
jar ti apoaap yete tar mag kahi baale purn nau mahine vaadh hounahi janmatach mrutavasthet ka janmataat?>>>
ह्याचं वैद्यकीय नाही पण अध्यात्मिक उत्तर देता येईल. बाल मृत जन्मत कारण त्यात १ तर आत्म्याचा प्रवेशच झालेलाच नसतो किवा मग कर्मभोग छोटे असल्यामुळे जन्माला येवून लगेच त्या शरीराचा त्याग करण एवढंच त्याला भोगायचं असतं.
शॉक देवुन थांबलेले हृदय वगैरे
शॉक देवुन थांबलेले हृदय वगैरे चालू करुन मेलेला माणुस जीवंत करता येतो. पण मेल्यावर ( हृदय बंद पडल्यावर ) रक्ताभिसरण आणि ऑक्सीजन पुरवठा लगेच थांबतो त्यामुळे पेशी मरायला सुरुवात होते. त्यामुळे माणुस मेल्यावर थोडा काळ गेल्यावर शॉक दिले काय कींवा कोणी आत्मा आणुन घातला काय, शरीर जीवंत होणार नाही.
Pages