नाडी ग्रंथ भविष्य - अत्री जीव नाडी

Submitted by शशिकांत ओक on 22 October, 2008 - 08:51

अत्री जीव नाडी
विंग कमांडर (नि)शशिकांत ओक. मोः ०९८८१९०१0४९.
नाडी ग्रंथ भविष्य ही संज्ञा आता मराठी लोकांना गेल्या १०-१५ वर्षांच्या काळात थोडीफार परिचित झालेली आहे. दक्षिण भारतात तमिळ भाषेत ताडपत्रावर कूट लिपितून कोरलेले भविष्य आता महाराष्ट्रातील अनेक शहरात पहायला उपलब्ध आहे. रामायण, महाभारत, भागवत या धार्मिक ग्रंथांतून सामान्यपणे उल्लेखलेल्या अनेक महर्षींच्या नावाने या नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्या उपलब्ध आहेत. त्यापैकी अगस्त्य, महाशिव, कौशिक म्हणजेच विश्वामित्र, वसिष्ठ, शुक, भृगु, काक भुजंदर (भुशुंडी) आदि महर्षींची नावे असलेल्या नाड्या सध्या जास्त प्रचलित आहेत.
ज्यांना नाडी ग्रंथ भविष्याची काहीच माहिती नाही त्यांच्या सोईसाठी थोडक्यात असे सांगता येईल की या महर्षींनी आपल्या प्रज्ञाचक्षूंच्या सामर्थ्यावर अनेकांचे जीवनपट पाहिले व आपल्या निर्देशनाखाली शिष्यगणांकडून त्याची काटेकोरपणे नोंद केली व अनंत काळपर्यंत मानवाला उपयोगी पडणाऱ्या नाडी ग्रंथ भविष्याची निर्मिती केली.
नाडी ग्रंथ भविष्य पहाण्यासाठी पुरुषांना उजव्या व स्रियांना डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा त्यावरील सर्व रेषा ठळक व व्यवस्थित दिसतील अशा बेताने उमटवून द्यावा लागतो. त्या रेषांच्या ठेवणीवरून महर्षींनी १०८ विभाग पाडलेले आहेत. नाडीकेंद्रात त्यापैकी उपलब्ध पट्यांशी त्या ठशांना पडताळून त्यांच्याशी जुळणाऱ्या पट्यांचे पॅकेट आणले जाते. नंतर त्यातील एकएक पट्टीतील थोडा थोडा मजकूर वाचून तो जातकाच्या माहितीशी जुळतो का, ते पाहिले जाते. बऱ्याच न जुळणाऱ्या पट्या बादकरून शेवटी एक अशी पट्टी येते की त्यातील सर्व माहिती जातकाशी तंतोतंत जुळते. उदाहरणार्थ स्वतः नाव, आई-वडिलांचे, पती-पत्नीचे नाव, जन्मतारीख, वार, महिना, साल, व त्यावेळची आकाशस्थ ग्रहांची स्थिती, शिक्षण. नोकरी-व्यवसाय, भावाबहिणींची, मुलाबाळांची संख्या व अशी काही माहिती जी केवळ त्याच व्यक्तीला ताडता येऊ शकते. त्यानंतर जेंव्हा व्यक्ती आपणहून मान्य करते की पट्टीतील सर्व माहिती १००टक्के जुळते आहे. तेंव्हाच त्या पट्टीतील कूट तमिळ लिपितील मजकूर एका ४० पानी वहीत सध्याच्या तमिल भाषेत उतरवला जातो. त्यावरून भाषांतरकाराच्या मदतीने एकएक वाक्याचा सावकाश अर्थ लाऊन ते सर्व एका ऑडिओ कॅसेटमधे रेकॉर्ड करून मग ती वही व कॅसेट ग्राहकाला सुपुर्त केली जाते व मग मेहनताना पूजारुम मधील शिव-पार्वतीच्या, महर्षींच्या फोटो समोर ठेवायला सुचवले जाते.
कुंडलीताल बारा स्थाने व्यक्तीच्या जीवनातील महत्वाच्या अंगांचा विचार करतात. त्याच धरतीवर लग्न स्थानाच्या भविष्याला जनरल किंवा पहिल्या नंबरचे कांडम असे म्हटले जाते. त्यात सर्व स्थानांचे त्रोटक भविष्य कथन केले जाते. एखाद्याला कोणा एका विशिष्ठ स्थानाचे जास्त भविष्य जाणून घ्यायचे असेल तर, उदा. विवाह विषयक ७ नंबरचे, नोकरीसाठी १० नंबरचे, ते ते कांड काढून त्यातून विशेष माहिती मिळवता येते. नाडी ग्रंथ भविष्याचा पाया पुनर्जन्म व कर्मविपाक सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे पुर्वजन्मातील पाप-पुण्यांच्या कमीजास्त प्रमाणात व्यक्तीला विविध मंदिरांना भेटी तेथे पुजा-अर्चना, अन्न-वस्त्र-जलदान, अपंगांना मदत करण्याला सुचवलेले असते. शिवाय जपसाधनाही सुचवली जाते. सध्याच्या धामधुमीच्या जीवनरहाटीत तो जप करण्याचा भार आपण नाडी केंद्राला सांगून करवून घेता येतो. त्याच्यासाठी वेगळा मेहनताना घेतला जातो.
हा झाला नाडी भविष्य जाणण्याचा सामान्य प्रकार. या शिवाय जीव नाडी असा एक विशेष नाडीचा एक प्रकार आहे.त्यात महर्षींशी आपण सद्यपरिस्थितीत आपल्या समस्या कथन करून त्यावर सल्ला-विचार विनिमय करून त्यातून वाट शोधू शकतो. सामान्य नाडी पट्टीतील मजकूर वाचून त्याचे भाषांतर करून सांगताना अनेकदा तात्कालिक समस्यांवर महर्षी काही भाष्य करताना दिसत नाहीत. त्यामुळे अनेकांचा विरस होतो. नाडी ग्रंथ भविष्या बद्दल नाही नाही त्या शंका येऊ लागतात. जीवनाडीतून अशा समस्यांचे-शंकांचे समाधान होते.

अत्री जीव नाडी पहाण्याची पद्धत

अशीच एक जीव नाडी पुण्याच्या केंद्रात उपलब्ध आहे. ती म्हणजे महर्षी अत्रींची जीव नाडी. या जीव नाडी भविष्याच्या ताडपट्या दिसायला साधारण अन्य नाडी ग्रंथ भविष्याच्या पट्ट्याप्रमाणेच दिसतात. अत्री जीव नाडीच्या साधारण १०० ताडपट्ट्या तीन पॅकेटमधे विभागून एका दोरीने ओऊन घट्ट बांधून ठेवलेल्या असतात. एवढ्याच ताडपट्ट्यातून सर्व उत्तरे दिली जातात.
प्रार्थनाः जातकाने १२ कवड्यांचे दान टाकण्याआधी हात जोडून महर्षींची मनोमन प्रार्थना करावी की, “हे महर्षी अत्री आणि माता अनुसूया मी आपल्या चरणांवर माथा टेकून विनम्र होऊन, मला सध्या पडलेल्या समस्येवर, काळजीवर, वैचारिक गोंधळावर मार्गदर्शन करावे अशी विनंती करतो. ”
या नंतर जातकाने कवड्याचे दान टाकून, आपले म्हणणे भाषांतरकाराला थोडक्यात आपल्या भाषेत सांगावे. तो ते नाडी वाचकाला तमिळमधे सागंतो. त्यानंतर नाडीवाचक तीन पैकी एका पॅकेमधील एक ताडपत्र पडलेल्या दानाच्या अनुषंगाने काढून वाचायला लागतो. त्यानंतर त्या वाचनातून सांगितला जाणारा मतितार्थ, भाषांतरकार आपणास समजाऊन सांगतो.

महर्षी अत्री सत-चित-आनंदमय शिवतत्वाला वंदन करून उत्तर देताना अनेकदा माता अनुसूया त्यांच्याशी संभाषण करतात असे पट्टीतील वाचनातून कळते. त्यातून अनेक वेळा जातकाचा प्रश्न जास्त समर्पक शब्दात अत्रींना त्या पुन्हा विचारतात. तेंव्हा आपल्या मनातील शंका की तमिळनाडीवाचकाला प्रश्न नीट कळला असावा किंवा नाही हा संभ्रम दूर होतो. कारण आपल्या फाफटपसारा करून विचारलेला प्रश्नांना सुटसुटीत शब्दात बांधलेले ऐकून आपल्याला असे का विचारता आले नाही असे वाटायला लागते!
सामान्यपणे समाधानकारकच उत्तर मिळते. कधी कधी महर्षींच्या उत्तरातून अनपेक्षितपणे कारणमीमांसा ऐकून थक्क व्हायला होते. अनेकदा जातकाच्या अपेक्षेच्या विपरीत पण त्याला हितकारक सल्ला दिला जातो. त्यामुळे तात्कालिक खट्टू व्हायला होते. पण शांतपणे विचार करून आपले विचार-मत तपासून पाहण्याची संधी मिळते.
एखाद्याला घाटातील रस्त्याने जात असताना पुढील वळणांचा, धोक्यांचा अंदाज येत नाही तेंव्हा जर उंच उडणाऱ्या हेलिकॉप्टरमधून पहाणी करणाऱ्याने त्याला वरून पाहून, “ रस्ता निर्धोक आहे किंवा मार्गात पुढे अडथळा आहे. परत फीर किंवा मार्ग बदल ” असा इशारा द्यावा, असाच काहीसा सल्ला महर्षींच्याकडून मिळतो. सामान्यपणे शांती-दीक्षा करण्याच्या कठीण व खर्चिक अटी सांगितल्या जात नाहीत. पण कधी जर अनिवार्य असेल तर मात्र ते उपायही सांगितले जातात.
माता अनुसूया देवींच्या करुणापुर्ण भूमिकेमुळे अनेकदा असे पाहण्यात आले आहे की जातकाला पडलेल्या कठीण समस्यांची करुणा येऊन आईच्या ह्रदयाने माता अनुसूया, पती अत्रींची विनवणी करून काही उपाय सुचवावा अशी गळ घालतात. त्याला साद देत एरव्ही थोडे कठोर मुनी त्या जातकाला उपायांची सोडवणूक देतात. प्रश्न वैयक्तिक असतात. त्यासाठी कधी कधी बरोबरच्या व्यक्तींना, अगदी पती वा पत्नीलाही बाहेर पाठवले जाते. तर कधी छोट्या कथेने उत्तराची सुरवात होते. अंती त्याचा संदर्भ प्रश्नांशी कसा लागतो ते ध्यानात येते. जातकाची नियत, भावना व गरज आदी सर्व बाबी उत्तरातून कळून येतात. नाडी वाचकाने जर काही उत्तर देताना गफलत केली तर त्याचा वा जातकाचा कान पकडायला महर्षी कमी करीत नाहीत. त्यामुळे कधी कधी हे वाचन काही काळापुरते बंदही असते. अनेकांनी या जीव नाडीचा अनुभव घेतला आहे. आलेल्या अदभूत अनुभवामुळे कुठलेही कार्य करताना अत्रीमहर्षींचा सल्ला, आशीर्वाद घेऊन सुरवात करण्याचा काहींचा प्रघात आहे. माझ्यासारखा एका विशिष्ठ दिवशी महर्षींना फुले व दीप दर्शवण्याचा परिपाठ करतो.
अत्री जीव नाडीचे काही किस्से
एकदा सामान्यांच्या उत्सुकतेचे प्रश्न विचारले गेले. प्रश्नकार होते प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. दिवस होता ३ जुलै २००७!
प्रश्न - भारतीय हिंदू संस्कृती किती दिवस टिकणार?
त्यावर उत्तर आले की जातकाने हा महत्वाचा प्रश्न श्रावण महिन्यातील धनिष्ठा नक्षत्र चालू असताना केला आहे. हा प्रश्न स्वतः साठी नसून जनकल्याणासाठी आहे. हिंदू धर्म कधीच संपणार नाही. उलट त्याची अध्यात्मिक क्षेत्रात वाढच होईल. प्रगती होईल. ४००शे वर्षांनी सर्वधर्म हिंदू धर्मालाच मानणारे होतील. हिंदूधर्मातही तो पर्यंत परिवर्तन होईल.
प्रश्न - मुस्लिम व ख्रिश्चन धर्म संपणार असे म्हणतात हे खरे काय? व केंव्हा?
धर्माला कोणी संपवू शकणार नाही. कारण तेही शिवमय आहेत. ती शक्ती आहे. तिचा दुरुपयोग केला जातो. सध्याही हिंदूधर्माला मानणारे अन्य धर्मात आहेत. यापुढे तांत्रिक - मांत्रिक धर्मांची कट्टरता कमी होईल. यापुढे १३५ वर्षांनी हिंदू धर्माचा नवा अविष्कार प्रचलनात येईल. तो बुद्धाला व शिवाला मानणारा असेल.
प्रश्न – हिंदू धर्माला नव वित्राज्ञानाचा आधार मिळणार काय?
उत्तर – होय. नवनवीन विज्ञानाच्या कक्षा वाढत जाऊन नववैज्ञानिक हिंदू धर्मातील तत्वांचे समर्थन करणारे होतील. आजही नवग्रहांचा आशीर्वाद घेऊन शास्त्रज्ञ काम करतात. त्यांच्या संख्येत वाढच होईल.
प्रश्न – माझा(गळतगे यांचा) पूर्व जन्म कुठे कसा झाला? त्याचे कारण काय?
उत्तर – या प्रश्नाचे उत्तर माझ्यापाशी मिळवण्याचा अधिकार आपल्याला नाही. तो अंगठ्याच्या ठशावरील भविष्यातून पहावा. (ती वेळ अद्याप आलेली नाही!)
श्री. ईश्वरनना याच्या नाडी केंद्रात एकदा फोन आला. ‘मी एका इंग्रजी नियतकालिकाची पत्रकार, आपला इंटरव्ह्यू घ्यायला येत आहे’. काही काळाने एक मॉडर्न वेशातील बाई हजर झाल्या. प्रश्न-उत्तरे सुरु झाली. तेंव्ढ्यात श्री. ईश्वरनजींनी सुचवले, ‘माझा इंटरव्ह्यू घेण्याआधी आपण आपले नाडी भविष्य पहावे म्हणजे मी काय म्हणतो त्याचा आपणाला प्रत्यक्ष पुरावा मिळेल. प्रत्यय ही येईल. मग आपणाला आणखी काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा’. त्या बाईंनी म्हटले, ‘मला एक तर इतके थांबायला वेळ नाही. शिवाय भविष्य या प्रकारात मुळीच रस नाही. फक्त माझ्या वरिष्ठांनी सांगितल्यावरून मी हे काम करायला आलेली आहे. शिवाय माझ्या धार्मिक प्रथाही अशा प्रकारांना मान्यता देत नाहीत म्हणून मला ताडपट्टया पहायच्या नाहीत’.
‘जशी तुमची मर्जी’ म्हणून ईश्वरन यांनी म्हटले. तथापि, काय झाले कोणास ठाऊक त्या व्यक्तीने आपले भविष्य पाहण्याचे ठरवले. त्यांची पट्टी सापडल्यावर त्यात केलेल्या वर्णनावरून त्या व्यक्तीला धक्का बसला की माझी ही सर्व माहिती यांना कळाली कशी? कारण ‘नाडी केंद्राच्या प्रथेप्रमाणे व एक जागरूक पत्रकार म्हणून फक्त हो-नाही इतकेच सांगा’ असे निक्षून सांगण्यावरून तिने फार दक्षतापूर्वक लक्ष ठेऊन नाडी पट्टीचा वेध घेतला होता. मात्र तिची सध्याची परिस्थिती, पुर्वी झालेले दोनदोन विवाह, त्यातून तिला मिळालेली शारीरिक अत्याचाराची-मानहानीची वागणूक. याचा उल्लेख ऐकून ती चक्राऊन गेली. तिने आता पुन्हा लग्नाचा विचार मनातून काढला होता. त्यावर क़डी म्हणजे तिचा तिसरा विवाह परदेशी व्यक्तीशी होईल व मुलही होईल म्हणून सांगितल्यामुळे तिला नाडी ग्रंथांवर विश्वास ठेवावा का नाही असा संभ्रम झाला.
त्या पुढची बातमी अशी की तिचा लेख आला. शांती दीक्षेचे उपाय करून यथावकाश पुढे गल्फ देशातील एकाशी तिचा तिसरा विवाह झाला व तिला अपत्य होण्याच्या मार्गावर आहे. असे नुकतेच कळाले!

असाच एक किस्सा – एक ग्रहस्थ नाडी केंद्रात खेटे मारत होते. या अपेक्षेने की त्यांना हवे असलेले अपेक्षित उत्तर महर्षीं देतील. शेवटी एकदाचे अत्री महर्षींनी त्याला सुचवले, ‘असे कर की दक्षिणेत अमुक अमुक मंदिरांना भेटी दे. इतक्या जणांना दान-दक्षिणा दे’. वगैरे. त्यावर ते ग्रहस्थ थोडेसे रागावले. कारण त्यांना सांगितलेली शांतिदीक्षा त्यांच्या आर्थिक आवाक्याच्या बाहेरची होती. त्यांनी श्री. ईश्वरंना म्हटले, ‘काहो, तुमचे महर्षी तर सर्वज्ञानी म्हणवतात, पण सध्याच्या माझ्या बिकट आर्थिक परिस्थितीची जाणीव त्यांना नाही, असे मी समजायचे काय? शिवाय असे खर्चिक सोपस्कार सांगितल्यामुळे मला तुमच्या सचोटीबद्दल शंका उपस्थित होत आहे. ही गोष्ट मी विंग कमांडरांच्या कानावर घालणार आहे. या प्रकाराला ते नक्कीच वाचा फोडतील’. काही दिवसांनी मी ईश्वरनना या प्रकाराबद्दल विचारणा केली. तेंव्हा त्यांनी जे उत्तर दिले ते त्यांच्याच शब्दात देतो, ‘माझ्या पहाण्यात आले आहे की जेंव्हा प्रश्नकर्त्याला त्याला अपेक्षित उत्तर मिळत नाही तेंव्हा तो इरेला पडतो. तोच तोच प्रश्न विचारून भंडावतो. निवडणूकीतील उमेदवारी, लग्नसंबंधातील गुंतागुंतीचे ताणतणाव, वगैरे कारणांनी जादा. तुमच्याशी संपर्क केलेल्या त्या ग्रहस्थांना दक्षिणेत जा म्हणून सांगून त्याला अवांछनीय कर्मापासून परावृत्त होण्यासाठी खर्चाने अशक्य गोष्ट सांगून सुचवले होते. या उलट अनेकदा पृच्छकाला नकोसे उत्तर मिळाले तर तो वाट्टेल तेवढ्य़ा रकमेची शांती-दीक्षा करीन म्हणून मागे लागतो. त्यावेळी आम्हाला पैशाच्या मोहापासून दूर राहावे लागते.

एक आणखी किस्सा सुचवताना श्री. ईश्वरन म्हणाले, ‘एक सुस्थितीतील स्त्री डॉक्टर. तिने अत्री महर्षींचा सल्ला मागितला की मला अमक्याशीच विवाह करायचा आहे’. करू काय? महर्षींनी उत्तर देण्याआधी तिला दक्षिणेतील एका मंदिराला भेट द्यायला सांगितल्यावर, ‘हे काय नविन लचांड’ असे वाटून तिचा विरस झाला. तरीही ती त्याप्रमाणे जाऊन आली. परत संपर्क करून म्हणाली, ‘मी त्या मंदिराला भेट देऊन आले. शिवाय तुम्ही सुचवलेले नसतानाही ज्याच्याशी विवाह करू इच्छिते त्याला ही बरोबर घेऊन गेले होते. प्रवासाच्या दरम्यान मला असे कळले की मादक पदार्थांचे टोचून घेऊन सेवन करण्याची त्याला त्याला सवय आहे. महर्षींनी तिलाच विचारले की आता तूच ठरव काय करायचे ते. मी ‘करू नकोस’ सांगितले असते तर तुला ते कधीच मान्य झाले नसते.

श्रीमंतांपासून गरीब सामान्यांपर्यंत, नट-नट्यांपासून ज्योतिषशास्त्रांपर्यंत अनेक थरातील, वर्गातील, व्यवसायातील व्यक्तींनी आजपर्यंत जीननाडीचे अनुभव घेतलेले आहेत. ही जीव नाडी थेरगाव येथील डांगे चौकातील लक्ष्मीतारा कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावरील श्री. ईश्वरन यांच्या नाडी केंद्रात उपलब्ध आहे. प्रत्येक प्रश्नाला रु.१००. प्रमाणे एकावेळी पाच प्रश्न विचारण्याची सोय आहे. फोन – ०२०-२७२७४२४७. सोमवारी बंद.
नाडी ग्रंथ भविष्याची वेब साईट naadiguruonweb.org सुरु करण्याची प्रेरणा याच जीवनाडी वाचनातून श्री. उदय व सौ. प्रिती मेहता कुटुंबियांना मिळाली. आज त्यांच्या वेबसाईटचा लाभ परदेशातील लोकही घेऊ शकतात.
लेखक – विंग कमांडर (नि) शशिकांत ओक.
पत्ता - ए - ४/४०४ गंगा हॅमलेट हौ. सोसायटी, विमान नगर, पुणे. ४११०१४. Mo: 9881901049. Email:shashioak@gmail.com

गुलमोहर: 

असेच एक ठिकाण पुण्यात कोथरूड ला पण आहे.

भविष्य, ज्योतिष, कुंडली हे सगळं मला 'वार्‍यावरची वरात' वाटते.. पण आता साक्षात 'विंग कमांडर' बरोबर आहेत म्हटल्यावर एकदा अनुभव घेण्याची इच्छा आहे.. Happy पुण्याला आलो की भेटेन.. आधी अपॉइन्ट्मेंट घ्यावी लागते का ? की अचानक आले तर चालते..

याबाबत माझ्याही काही सूचना/विनंत्या/शंका आहेत...

१. बोटांच्या ठशावरून नेमके भविष्य सांगता येते, तर विशिष्ट भागातील लोकांचे ठसे मोठ्या प्रमाणावर घेऊन डेटा बेस तयार करता येइल का ? उदा. भूकंपग्रस्त भागातील लोकांचे ठसे घेऊन संभाव्य भूकंपाचा अंदाज घेणे.. दंगल ग्रस्त भागातील भावी दंगलींचा अंदाज घेणे.

२. गुन्हेगारांचा डेटा बेस तयार करून तो पुढचा गुन्हा कधी करेल/ केलाच तर कुठे पळेल्/पळालाच तर कुठल्या नेत्याच्या घरात लपेल... अशा संभाव्य शक्यता आधी कळू शकतील का?

३. विशिष्ट रोग असणारे लोक उदा. डायबेटिस, त्यांच्यापैकी किती लोकाना/कुणाला हार्ट अटॅक येतील, मॅटर्निटी असेल तर कुठली केस अचानक कॉम्लिकेशनमध्ये जाईल हे आधी कळू शकेल का ? लहान मुलांचे ठसे घेऊन कोण कुठल्या व्यसनाला बळी पडेल याचा अंदाज घेऊन आधी उपाय करता येतील का ?

सुप्रभात, मोहन प्यारे व अन्य मायबोलीकरांना यंदाच्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

सुप्रभात, आपण म्हणता तसे

  • कोथरुडमधे एक नाडीकेंद्र आहे.
    मोहनप्यारेजी,
  • आपल्या सर्व शंकांचे उत्तर आपण नाडी ग्रंथ प्रत्यक्ष पाहिल्यावर होईल. माझी मदत हवी तर सांगा.
    नाडीग्रंथप्रेमी
    विंग कमांडर शशिकांत ओक (नि)
    ए-४/ ४०४, गंगा हॅमलेट हौसिंग सोसायटी ,
    विमान नगर पुणे. ४११०१४.
    मो - ०९८८१९ ०१०४९.

    ओक साहेब,

    किमान तुमच्या सारख्या सुशिक्षीत लोकानी तरी अशा अंधश्रधेचा प्रचार करु नये.

    ओक साहेब ,
    नाडीग्रंथ भविष्याविषयी माहीती दिल्याबद्दल धन्यवाद .
    मी स्वतः अशा प्रकारात रस घेत नाही , पण आपल्या प्राचीन शास्त्रांविषयी मला पुर्ण आदर आहे.
    ह्याविषयी आणखी वाचायला आवडेल.

    ओकसाहेब,मला वाटते सर्वप्रथम तर वरील अदभुत नाडी ग्रंथ भविष्याबद्दल लोकांना 'पैलतीर' मासिकातून आपणच माहिती करून दिली होती. चेन्नईला डॉ. उलगनाथन यांचेकडे आपल्याला आलेले अनुभव मी त्या मासिकात वाचले होते. आणि त्यानंतर मीदेखील कुतुहलापोटी पुण्याला वनाज कंपनीजवळ मुत्तुस्वामी यांचेकडे नाडीग्रंथ भविष्य जाणून घेण्यासाठी गेलो होतो.
    अंगठ्याचा ठसा, जन्मवेळ व जन्मठिकाण ही माहिती दिल्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी नाडीवाचन करण्यासाठी बोलावले होते. आणि जुजबी प्रश्नांची उत्तरे पडताळून बघितल्यावर अगस्ती ऋषींच्या नावे असलेली पट्टी वाचन सुरू झाले आणि मी उडालोच! अगदी आईवडीलांच्या नावासह त्यांचा व्यवसाय, भावाबहिणींची संख्या, त्यांचा व्यवसाय, माझ्या नोकरीचे स्वरूप, पत्नीचे नाव, मुलाचे नाव एव्हढेच नव्हे तर सगळी भूतकाळातील बारीकसारीक माहिती आणि ती पण बिनचूक तपशीलासह पट्टी वाचतांना सांगितल्या जात होती. अगदी एका आठवड्यापूर्वी झालेल्या बदलीबद्दल, तीन दिवसांपूर्वीच घेतलेल्या नव्या गाडीबद्दल पण अचूक माहिती सांगितल्या गेली. अगदी पूर्वजन्मातील माहिती पण!(अर्थात ती खरी की खोटी हे देव जाणे)
    मात्र भविष्यकाळाबद्दल माहिती जी सांगीतली ती स्वतःजवळची सांगितल्यासारखे वाटले आणि खरोखरीच त्यातील बरीचशी माहिती खरी झाली नाही. पण भूतकाळातील सगळ्या गोष्टी मात्र तंतोतंत जुळल्या.
    माझ्यामुळे नंतर बर्‍याच मित्रांनी हा अदभुत अनुभव घेतला आणि त्यांना पण असाच विलक्षण अनुभव आला.
    मात्र जीवनाडी बाबत माहिती नव्हती. ती आपण करू दिलीत याबद्दल धन्यवाद. लवकरच भेट देतो.
    फक्त भविष्यकाळाबाबत नाडीग्रंथ भविष्य विश्वसनीय आहे किंवा त्यासाठी वेगळ्या नाडीचे वाचन आवश्यक आहे याबाबत माहिती दिली तर बरे होईल.
    बर्‍याच दिवसांपासून आपणाला भेटायची ईच्छा होती. आपल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधतोच आहे.
    धन्यवाद!

    उमेश कोठीकर, श्री१२३ , मधुकर.७७ आणि
    सर्व अन्य प्रियवाचक हो
    आपण दाखवलेल्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे हे लेखन मी करत आहे. अन्यथा नाडी ग्रंथांवरील चर्चा "अंधश्रद्धेला खत पाणी" या वळणावर जाते व नंतर उगाचच तट पडतात व विचारांना विकृत वळण लागते असे माझे अनुभव असल्याने या फोरमवर फक्त अशाच प्रतिसादांना उत्तरे पाठवावीत की ज्यामुळे नाडी ग्रंथकर्त्या महर्षींच्याबद्दल ज्या लोकांना आदर व श्रद्धाभाव आहे, त्यांना योग्य ते मार्ग दर्शन करता यावे. त्यांच्या शंकांना माझ्याकडून यथोचित उत्तरे दिली जावीत.
    सुरवातीलीच स्पष्ट करतो की मी कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. उलट नाड़ी ग्रंथ हे थोतांडच आहेत असे म्हणून मी स्वतः या विषयाकडे सुरवातीला पहात होतो. मात्र नाडीग्रंथांची आणखी जवळून ओळख होऊ लागल्यावर हळूहळू त्या माझ्या विचारात फरक पडत पडत आता या विचारावर यावे लागले की जर आपल्याकडून माहिती न काढता ती माहिती जर जुन्या ताडपत्रावर तमिळ सारख्या सुदूर भाषेच्या कूट लिपित कोरुन लिहून येत असेल तर तो आजच्या विज्ञानाला प्रचंड मोठा धक्का आहे. प्रचलित विज्ञानाच्या, सध्याच्या विवेकवादी विचारांना, गृहित तत्वांना वेगळे विचार करायला लावायला उद्युक्त करणारा 'पुरावा" आहे.
    अशी विचार करण्यची पाळी आली आहे, असे फक्त मलाच वाटत नाही. अनेक देशी व विदेशी वैज्ञानिकांना व विचारकांना वाटत आहे. त्यामुळे ओकांसारख्या सुशिक्षित वा सैनिकी पेशातील वरिष्ठ हुद्द्यावरील व्यक्तीने असे श्रद्धाळू म्हणजेच थोडक्यात हिंदू संस्कृतीच्या भोळसट व निरर्थक विषयांनी अन्य लोकांचे भ्रम दूर करण्याऐवजी त्यांना आणखी गोंधळात टाकू नये. असे सतत म्हणणाऱ्यांना माझी विनंती आहे. पुर्वमताग्रह सोडून जर आपणास नाडी ग्रंथांकडे पाहिलेत तर आपणास एक वेगळी 'अनुभूती' मिळेल. अनुभुती हा शब्द मी अशासाठी वापरतो की भौतिक व मानसिक पातळ्यांवर त्याचा पुरावा मिळतो म्हणून. असा अनेकांचा अनुभव आहे. म्हणून तो मानसिक पुरावा प्रत्येकाला मिळतो असा माझा दावा नाही. मात्र जे भौतिक - वैज्ञानिक पातळीच्या कसोट्या जितके वेळा तपासू इच्छितात त्यांनी हवे तेवढ्यावेळा त्या तपासाव्यात आणि आपापले निकर्ष काढावेत. तेंव्हा घरबसल्या बसल्या थोतांड आहे किंवा असेल असे 'हवेत गोळीबार' करणारे मत प्रदर्शन न करता शोधकार्य करावे.

    या शोधकार्यात माझ्याकडून जर मदत होणार असेल तर माझी अन्य व्यवधाने सांभाळून जरूर मी आनंदाने पुढाकार घेईन.
    अर्थात कसेही करून नाडी ग्रंथांना थोतांड ठरवण्याचा ज्यांनी आधीच चंग बाधला आहे. ज्यांची विशिष्ठ विचारधारेशी इमानदारी आहे. सत्य शोधनाशी ज्यांना काही देणे घेणे नाही अशा लोकाच्या वा संस्थांच्या कडून समतोल वा खऱ्या विज्ञाननिष्ठेने शोधकार्य होणार नाही. हे सर्व विदित असल्याने अशांशी मला काही देणे घेणे नाही.

    हे सगळं मला 'वार्‍यावरची वरात' वाटते..
    असे म्हणणाऱ्यांना मी अशी नम्र विनंती करतो की आपण अनुभव घ्यावा .

    माझा अनुभव बराचसा उमेश कोठीकर यांच्या अनुभवाशी मिळता जुळता आहे. भूतकाळातले अगदी तंतोतंत खरे निघते. आई वडिलांची भावडांची नावे, व्यवसाय ई. बरोब्बर असते. चक्रावून जायला होईल असा प्रभाव पडतो त्याचा. पण भविष्य मात्र खरे विशेष खरे निघेल असे नाही.

    एवढे दिवस झाले.... पण जीव नाडीच्या या धाग्याची नाडी जीव नसल्यागत मन्द चालते आहे... Happy

    आई बापाची नावे , बहिण भावान्ची नावे बघायला काय खाजगी डिटेक्टिव पण करतो की..... आणि ही माहिती ' भविष्य' या सदरात कशी मोडेल.....

    नाडी, भविष्य, श्रधा, अंधश्रधा किंवा शास्रीय माहिती, संशोधन यावरील येणारे लेख हे अनेक लोकांकडून वाचले जातात. येथे देखील शास्रशुध्द माहिती दिल्या गेल्यास योग्य होईल. वरील लेख वाचतांना सुरवातीला तो शास्रीय वाटला पण नंतर त्यास जाहिरातीचे स्वरुप दिल्यासारखे मला वाटले.

    काल रात्रि ९ नंतर तुम्हाला फोन लावला होता.. पण बिजी होता..
    क्रुपया,तुम्ही मुंबई चे पत्ते इथे टाकाल का ?

    कल्प, आणि अन्य वाचकांच्या विचारांना मान देऊन
    व अन्यथाही, मी येथे नाडी केंद्रांचे पत्ते (जाहिरात केल्याप्रमाणे वाटू शकतात म्हणून) देण्याचे टाळतो. लेखात म्हटल्याप्रमाणे नाडीवरील वेबसाईट पाहिल्यास आपणांस हवी ती माहिती मिळू शकेल.

    माझा अनुभवही अगदी उमेश शी मिळता जुळता आहे, माझा भूत काळ व इतर वर्णने आश्चर्यकारकरित्या अचुक निघाली मात्र भविष्य नाही, एका स्वामीने माझ्या दुखर्‍या प्रश्नावर इतके खोदुन खोदुन मलाच प्रश्न विचारले की मला त्या माणसाची किळस आली. Sad हे शास्त्र आहे हे मला मान्य आहे पण वाईट ह्याचे वाटते की ते बहुधा चुकीच्या लोकांच्या हातात पडले आहे. तेव्हा, प्रश्नार्थींनी सावध रहावे, स्वतःची वैयक्तीक माहिती पुरवु नये.

    जीव नाडीचा अनुभव सर्वस्वी वेगळा आहे.
    मित्र हो,

    हा लेख अत्री जीव नाडी बद्दलचा आहे. आपले अनुभव की आपणाकडून माहिती काढून तीच आपणाला सांगतात किंवा भूतकाल बरोबर पण भविष्य काळ चूक असे सामान्य नाडीवाचनाबद्दल लागू पडतेही पण हा जीव नाडीचा अनुभव सर्वस्वी वेगळा आहे. अनुभव घ्यावा व ठरवावे.

    तुमच्या लेखाकरता थँक्स..
    नाडी भविष्याचा माझा (म्हणजे, मी आईबरोबर गेलेले) अनुभवही फारसा चांगला नाही.. पण असं म्हणतात की शेवटी तुम्ही ज्या माणसाकडे जाता त्याला कितपत कळतं हे ही महत्त्वाचं...
    अर्थात, माझा अजुनतरी ह्या गोष्टीवर विश्वास नाहीये, पण तुम्ही म्हणता तसा अनुभव घेऊन मग ठरवणंच विज्ञानाला धरून होईल.