पास्ट लाईफ रिग्रेशन

Submitted by अंजन on 27 April, 2012 - 02:32

इथे पास्ट लाईफ रिग्रेशनचा अनुभव असलेले कोणी आहे का? मी याबद्दल बरेच वाचले आहे. ठाण्यात एक बाई याचे सेशन्स घेतात हे ऐकले आहे. त्यांच्या पुढच्या सेशनला उपस्थित राहायचे ठरवले आहे. पण याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले कोणी ओळखीत नाही किंवा कोणा ओळखीच्या ओळखीतही नाही. म्हणुन इथे विचारायचे ठरवले. जर कोणाला अनुभव असेल तर कृपया लिहा. अर्थात मी स्वतः तर जाणार आहेच पण जायच्या आधी खालिल गोष्टींबद्दल जाणुन घेतले तर थोडी मदत होइल असे वाटते-

१. आधीच्या जन्माच्या आठवणी कितपत स्पष्टपणे दिसतात?
२. या जन्मात आपल्या अवतीभवतीची माणसेच आधीही असतात असे ऐकले. मग ती माणसे आपल्याला कशी ओळखु येतात. की जस्ट आपल्याला अंतप्रेरणा होते की हा जो दिसतोय तो सध्याच्या जन्मात अमुकअमुक आहे म्हणुन?

आणि कृपया -

मी जरी आज सभासद झालोय तरी मी गेली ५ वर्षे रोमातला मायबोलीकर आहे, इथल्या प्रतिसादांशी मी खुपच चांगल्या प्रकारे परिचित आहे. आणि म्हणुन खालील सुचना -

१. ज्यांचा या सगळ्यावर विश्वास नाही त्यांनी इथे येऊन 'हे फाल्तु आहे' हे सांगण्यात आपला वेळ वाया घालवायची गरज नाही. हे फाल्तु आहे की कसे हे जाणण्यासाठी मी माझा वेळ आणि पैसा वापरतोयच. आलेले अनुभव इथे टाकेनच.

२. इथे आल्या आल्या इतके छान मराठी टायपिंग कसे जमतेय ह्याही शंका घेऊ नयेत. मी जरी इथे आजच सभासद झालोय तरी मायबोली ही एकच मराठी साईट नाहीय. माझ्या स्वतःच्या ब्लॉगवर आणि संकेतजालावर इतरत्रही मराठीतुन लिहिण्याची सोय आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहाहा... मला तुमच्या शेवटच्या सूचना खूप आवडल्या. Happy असो.

माझा प्रत्यक्ष काही अनुभव नाही पण माझ्या आधीच्या कंपनीमध्ये एक ट्रेनर आला होता तो पण अशी सेशन्स घ्यायचा. त्याने फार डीटेल्स सांगितले नव्हते पण त्याने सांगितलं होतं की त्याला ३-४ महिला भेटल्या आहेत की ज्यांनी सांगितलं की त्या पूर्व-जन्मी झाशीची राणी होत्या. असो.

तो ट्रेनर मुंबईचा आहे. तुम्हाला त्याचा इमेल आयडी देऊ शकेन (जरा शोध-शोध करून). तुम्ही पुढची चौकशी करू शकाल.

मागे ११-११-११ च्या मुहुर्तावर वाशीमध्ये एक मोठा ईव्हेंट झाला होता. ई-मेल आहे का बघतो त्यांचा आणि कळवतो.

ते जामोप्याच्या प्रश्नाचे प्लिज उत्तर द्या.. मलाही उत्सुकता आहे.. Wink

मनस्विता, धन्यवाद. त्याचा आयडी विपुत टाकालका??

जागोमोहनप्यारे,

अर्थात मी स्वतः तर जाणार आहेच पण जायच्या आधी खालिल गोष्टींबद्दल जाणुन घेतले तर थोडी मदत होइल असे वाटते-

हे लिहिलेय ना??

आपल्या सबकाँशन माईंडमध्ये भुतकाळातील घटना नोंदलेल्या असतात. ह्या रिग्रेशनचा उपयोग करुन ह्या घटनांमध्ये डोकावता येते. आज आपल्या आयुष्यात जे प्रश्न आहेत त्यांचा आपल्या भुतकाळाशी काही संबंध आहे का? हे शोधता येते. तो संबंध असल्यास आजच्या त्रासाचे कारण कळते आणि त्यामुळे तो त्रास जरी नाहीसा झाला नाही तरी त्याचे कारण कळल्याने मानसिक त्रास व्हायचे थोडे कमी होऊ शकते. एनी वेज, हे सगळे वाचलेले. प्रत्यक्षात जेव्हा जाईन तेव्हा कळेलच.

माफ करा इथे कटपेस्ट् करतोय, पण मला जे काही याबद्दल समजलेय ते मला स्वतःला योग्य शब्दात मांडता येणार नाही म्हणुन कटपेस्टचा आधार घेतोय. -

Past Life Regression helps one to experience the big picture of life, understand the higher dimensions and to live this life at its best. It also helps one find joy, peace, love, confidence, courage and the spark in life.

This is done by accessing memories of the past, which are stored in the sub-conscious mind. These memories are the root cause of the relevant issues. The root cause could lie within the past memories of the present life or one or more previous life times.

Past life regression helps one to retrieve energies from the past, transform the negative energy patterns into positive energy patterns and assimilate them into the present life situations.

To understand how past life regression works as a therapy, we need to know the process of storage and retrieval of information.

Information is stored in the brain in the form of energy/ vibrations with the help of the five senses and the mind. Every piece of information is stored in the form of sounds, physical sensations of touch, images or visuals, tastes, smells and emotions individually and with combinations. When we intend to memorize, this information is retrieved with our senses. According to our need of intentions, we have an inbuilt capacity of transforming the vibrations of any/all the senses to the intended sense form we want. All senses are at par, none being of lesser importance than the other. The memories of this information create desires and thoughts.

Past Life Regression helps us to heal holistically. It can resolve issues related to:

Health: It includes
i.Physical - simple, chronic, unexplainable, undiagnosed, etc.
ii.Emotional - unwanted Individual character issues like anger, lethargy, anxiety, etc.
iii.Mental - stress, vices, recurring negative patterns, lack of clarity of thoughts, lack of confidence, over confidence, etc.
iv.Intellectual – educational or learning barriers
v.Spiritual - stagnation or obstacles in spiritual growth.
Wealth: includes any financial issues

Relationship issues: helps improve interpersonal relationships.

Fears, Phobias, Addictions, etc.

This healing technique helps release blocked energy patterns and transform them or erase them.

तुम्ही सेशन्स जेव्हा घ्याल तेव्हा ""स्वप्न"" ह्यावर नक्कीच तुमची चर्चा होणार ,,,त्या भागाविषयी जाणुन घ्याय्ला मला आवडेल...
all the best for sessions. Happy

अवश्य अनुसया.

plr मध्ये स्वप्ने पण चर्चितात का हे माहित नाही. असले तर बरेच आहे. मलाही माहिती मिळेल.

मुंबईतले संतोष जोशी सेशन घेतात. त्यांच्याबद्दल मुंबई मिररमध्ये लेख होता. तुमचा अनुभव मात्र इथे नक्की लिहा.

तुमचा अनुभव मात्र इथे नक्की लिहा. >>> + १ मला फक्त उत्सुकता आहे तुमचा अनुभव ऐकण्याची.

तुमच्या दोनही तळटीपा आवडल्या. Proud

हे सगळे (म्हणजे त्या सेशन मधे मागील जे आठवते ते ) नंतर लक्षात रहाते??? हा हिप्नोटिझम सारखा प्रकार नाही का? त्यात (बहुदा) तेवढ्या काळातले आठवत नाही ना? Uhoh

तुमच्या अनुभवाच्या पोस्टच्या प्रतिक्षेत Happy कधी जाणार आहात?

माफ करा, पण या माहिती विचारणार्‍या धाग्याचा एकंदर सूर जाब विचारल्यासारखा आहे. सूचना किंचित आक्रमक. मात्र विषय असा आहे की त्याबद्दल ठाम अनुभव असणारे असे दुर्मीळ व ऐकीव माहिती असणारे अनेक. ही माहिती अविश्वसनीय आहे असे म्हणणारेही अनेक.

किमयागार की अंतराळासंबंधातील एका पुस्तकात असे प्रतिपादन होते की विशिष्ट वातावरण, पाणी, मूलद्रव्ये हे घटक काही काळ एकत्रीत स्वरुपात अस्तित्वात राहिल्यास रासायनिक प्रक्रियेतून जीव आपोआप निर्माण होतो. म्हणजे पहिला जीव असा आपोआप निर्माण झाला. हे भावनि अथवा श्रद्धाबेस्ड मत नसून शास्त्रीय मत आहे. अशाच प्रकारे माणूस मेल्यावर त्याच्या देहाचे मटेरिअल विविध स्थितीत जाऊन रुपांतरीत अवस्थेतच राहते. पहिला जीव निर्माण झाल्यानंतर पुनरुत्पादन दोन जीव करू शकतात. मात्र मेलेल्या देहाचे मटेरिअल पुन्हा माणूस या स्थितीत रुपांतरीत करणे मानवाच्या हातात नाही वा निसर्गासही ते हवे असते असे नाही. एकाची जळलेली स्कीन धूर या अवस्थेत वातावरणात जाईल व त्याची ठिसूळ झालेली व भाजली गेलेली हाडे नदीतून जमीनीत जातील. धूर होऊन वर गेलेल्या मटेरिअलचा पुन्हा त्याच हाडांशी संबंध येणार नाही, येणे अवघड. याप्रमाणे मटेरिअलचा प्रत्येक भाग स्वतःसाठी नवनवीन कॉम्बिनेशन्स शोधत सजीव होईतोवर फिरत राहील वा जमीनीत गाडला गेलेला राहील. याचवेळी जीव निर्माण होणे ही प्रक्रियाही चालू असल्याने पुन्हा आधीच मेलेल्या माणसाच्या मटेरिअलला सजीव होण्याची गरज राहिलेली नसणार. त्यामुळे पुनर्जन्म ही बाब मानवकल्पीत असण्याची शक्यता जास्त. कारण तेच नातेवाईक याही जन्मात असण्यासाठी, तसेच मागच्या जन्मातील कृत्यांचे त्रास या जन्मात होण्यासाठी मुळात रुपांतरीत झालेल्या मटेरिअलला एकत्र येऊन पुन्हा सजीव बनणे आवश्यक आहे. हे होणे अशक्यच.

संपूर्ण विश्व पृथ्वीभोवती फिरते म्हणणार्‍यांनी पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणणार्‍यांचा छळ केला. मानवकल्पीत भाकडकथा हळूहळू लोप पावू लागतील. माणसाने आपल्या आयुष्यात नीट वागावे व सत्कृत्ये करावीत या उद्देशाने निर्माण झालेल्या कपोलकल्पीत तत्वज्ञानाचा एक भाग म्हणजे पुनर्जन्म असे मत नोंदवून थांबतो.

-'बेफिकीर'!

जन्ममृत्यु बायॉलॉजिकल प्रक्रिया आहेत. आपण एकविसाव्या शतकात आहोत याचे भान ठेवावे.बेफिकिर यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे मी.

हैद्राबाद मधील डॉ. न्यूटन कोंडापल्ली आणि डॉ. लक्ष्मी कोंडापल्ली हे पूर्व जीवनावर आधारीत मानसिक थेरपी वापरून रूग्णांवर उपचार करतात. त्यांच्या अनुभवांवर व उपचारपद्धतींवर मी एक पुस्तक वाचले होते.

हे त्यांचे संकेतस्थळ (पास्ट लाईफ रिग्रेशनवर आधारीत उपचार)

http://www.liferesearchacademy.com/

इथे खूपच इंटरेस्टिंग माहिती आहे. एकदा वाचून बघा.

>>माणसाने आपल्या आयुष्यात नीट वागावे व सत्कृत्ये करावीत या उद्देशाने निर्माण झालेल्या कपोलकल्पीत तत्वज्ञानाचा एक भाग म्हणजे पुनर्जन्म असे मत नोंदवून थांबतो.<<
अगदि सहमत!

माणसाने आपल्या आयुष्यात नीट वागावे व सत्कृत्ये करावीत या उद्देशाने निर्माण झालेल्या कपोलकल्पीत तत्वज्ञानाचा एक भाग म्हणजे पुनर्जन्म असे मत नोंदवून थांबतो

हे असेच असेलही किंवा नसेलही. ठामपणे कोण सांगु शकणार? मी तरी अजुन कसल्याच निषकर्षाला आलेलो नाही.

जन्ममृत्यु बायॉलॉजिकल प्रक्रिया आहेत

हो, पण याच्यापुढे एक आत्मा म्हणुनही काहीतरी आहे. आता हाही असेल किंवा नसेलही. ठामपणे कोण सांगु शकणार? मी या बाबतीतही अजुन कसल्याच निष्कर्षाला आलेलो नाही.


माफ करा, पण या माहिती विचारणार्‍या धाग्याचा एकंदर सूर जाब विचारल्यासारखा आहे.

अहो, जाब कोणाला विचारणार इथे? मी फक्त आधी कोणी अनुभव घेतलाय का हे विचारतोय.

सूचना किंचित आक्रमक

हे मात्र खरे असु शकेल. मायबोलीवरच्या ब-याच धाग्यांवर मुळ विषय बाजुला पडुन भलत्याच प्रश्नांवर चर्चा रंगते हे पाहिलेय म्हणुन ह्या सुचना केल्यायत. धागा काढण्याचा माझा उद्देश माहिती मिळवणे हा आहे, उगीच मुळ विषय सोडुन भलतेच काहीतरी पकडुन त्यावर प्रतिसाद देणारे लोक इथे जमवणे हा नाहीय. (बेफिकीर, हे तुम्हाला उद्देशुन लिहिलेले नाहीय, उगीच गैरसमज नसावा)

बेफिकीर,

आपण जे मेलेल्या देहाबद्दल बोलत आहात, नेमके तेच जिवंत देहालाही लागू पडते. उदा:

>> एकाची जळलेली स्कीन धूर या अवस्थेत वातावरणात जाईल व त्याची ठिसूळ झालेली व भाजली गेलेली
>> हाडे नदीतून जमीनीत जातील.

>> धूर होऊन वर गेलेल्या मटेरिअलचा पुन्हा त्याच हाडांशी संबंध येणार नाही, येणे अवघड.

कारण की देहातून सतत देहवस्तू (मटेरियल) उत्सर्जित होत असते. कारण देह सतत जळत असतो. मेणबत्तीची ज्योत म्हणजे स्थिर वस्तू नसून चल वायूंचा प्रवाह आहे. तद्वत देह जरी स्थिर भासला तरी प्रत्यक्षात तो एक जळता निखारा आहे. अग्नी हा कोळसा आणि राख या दोघांहून वेगळा आहे, तद्वत जीवशक्ती (life force) ही देहापासून वेगळी आहे. तिच्यामुळे देहाला जिवंतपणा येतो.

या जीवशाक्तीचा अविष्कार म्हणजे देह. जर या शक्तीला एक देह धारण करता येत असेल तर तो टाकून दुसरा धारण करणे सहज शक्य आहे. पुनर्जन्म म्हणतात तो या अर्थी.

आ.न.,
-गा.पै.

<<>>माणसाने आपल्या आयुष्यात नीट वागावे व सत्कृत्ये करावीत या उद्देशाने निर्माण झालेल्या कपोलकल्पीत तत्वज्ञानाचा एक भाग म्हणजे पुनर्जन्म असे मत नोंदवून थांबतो.<<
अगदि सहमत!>>em>

पुनर्जन्मामागचे तत्त्वज्ञान कपोलकल्पित आहे हे एका हिंदुत्ववाद्याला कसे काय पटले?

हा प्रतिसाद म्हटले तर अवांतर आहे, म्हटले तर नाही. त्यासाठी चर्चा भरकटण्याची गरज नाही.

मी ह्या बद्दल एक ब्लॉग वाचलेला आहे त्या ब्लॉग च्या लिंक खाली देत आहे.
शुभा येरी यांछा तो ब्लॉग आहे आणि त्या माझ्या माहिती प्रमाणे डॉ. न्यूटन यांच्याकडून PLR शिकल्या आहेत.
http://www.goinghomeshubhayeri.blogspot.com/
http://www.goinghomemarathi.blogspot.com/

Many master many lives हे पुस्तक वाचून माझी ह्या प्रकारा बद्दलची उत्सुकता चाळवली होती. असो.

अंजन, खूपच रोचक आणि चांगला विषय. तुम्ही इथल्या निरर्थक प्रतिसादांकडे दुर्लक्ष करुन लिहा आणि वाचा. अधूनमधून चांगले लिहिणारे लोक इथे येतातच असा माझा अनुभव आहे.

ह्या विषयावर जगात संशोधन सुरु आहे.

माझा असा अनुभव आहे की कित्येकदा एखादी घटना पुर्वी घडून गेली आहे असे वाटत राहते. पण नक्की आठवत नाही नक्की कधी असे झाले होते. त्याला ईंग्रजी मधे एक शब्द आहे पण तोही आता आठवत नाही.

स्वामी विवकानंदांनी कुठेतरी असे म्हंटले होते की त्यांनी ध्यान करत असताना त्यांना बुद्धाचे दर्शन झाले होते.

असो..

अंजन,

तुमच्या सूचना आवडल्या. या विषयाबद्दल काहीच माहिती नसल्याने याच्या विरोधी/सपोर्ट मधे मत देउ शकत नाही.
पण तुमची आधीच क्षमा मागुन एकच फुकटचा सल्ला:
या विषयात रस दाखवणार्‍यांच्या vulnerability चा फायदा घेउन स्वतःचा आर्थिक लाभ करुन घेउ पाहणारे लोक (Con-men) यात बरेच असु शकतात त्यामुळे त्याबाबतीत सावधानता बाळगलीत तर होणारे आर्थिक/मानसिक शांतीचे नुकसान टाळु शकाल. ('Birth' या नावाचा एक चित्रपट आला होता त्याची आठवण आली).

अंजन,

May be following youtube videos will help you to understand the concept of PLR (Past Life Regression) and reincarnation in depth.

Must watch eye opening documentory on supernatural reincarnation.

http://www.youtube.com/watch?v=M9sjf-Y2Njo&feature=g-vrec
http://www.youtube.com/watch?v=TBa17_dSv2A
http://www.youtube.com/watch?v=Wd59EJlU2Xo
http://www.youtube.com/watch?v=abdyNakmoz0
http://www.youtube.com/watch?v=LF1huzEYPQc

पास्ट लाईफ फ्युचर लाईफ खोटेपणा आहे त्याला काहीच अर्थ नाही. पास्ट लाईफ प्रयोग करुन पैसे कमावणारे जे आहेत त्यांचेवर कंझ्यूमर फोरममध्ये खटले दाखल करायला हवेत.माणसे गंडतात म्हणून काहिहि चालते का?

भाजीची पेंड आनायला जातो तेव्हा सगळी चौकशी करतो ताजी आहे का etc. हा पास्ट लाईफचा extraordinary claim ahe, it requires extraordinary proof.

अंजन ,
Many master many lives हे पूस्तक वाचून मी ही काही काळ विचारात पडले होते....पण पुनर्जन्मावर विश्वास नाही असे मी ठामपणे नाही म्हणू शकत... discovery वर मागे पास्ट लाईफ रिग्रेशन वर एक फिल्म दाख्वली होती ..अंजन तुम्च्या सेशन्स बद्दल जाणून घ्यायला आवडेल्....please check the authenticity of the person before attending the sessions...चूकीच्या व्यक्ति च्या आहारी जायचा धोका आहे...

All the Best,
सामी

> या जन्मात आपल्या अवतीभवतीची माणसेच आधीही असतात असे ऐकले. मग ती माणसे आपल्याला कशी ओळखु येतात. की जस्ट आपल्याला अंतप्रेरणा होते की हा जो दिसतोय तो सध्याच्या जन्मात अमुकअमुक आहे म्हणुन?

आपल्या अवतीभवतीच्या माणसांचे आत्मे असतात - प्रत्यक्ष माणसे न दिसता आत्मे दिसतात.
आत्मे धुसर आणि निराकार असल्यामुळे ते आपल्याला ओळखु येत नाहीत. असे सेशन्स घडवून आणणारेच आपल्याला सांगतात आपल्याला काय दिसले ते.

पण मधे एकदा गम्मत झाल्याचे ऐकिवात आहे. एका नाटककाराचा आत्मा भलतेसलते रुपं घेऊन आला आणि त्यामुळे तो सेशनकारही फसला Happy

कॅलिफोर्नीयात बिग सर ला काही ड्रग्स घेऊन पण असे करता येते. एका मोठ्या टाकीत उतरुन आपले सेन्सेस दाबले की पण असे काहीसे होते म्हणे. दोन्ही करता एक मोठी इंन्स्टीट्युट आहे. पण हे गव्हर्नमेंट वाले लुच्चे आहेत (भारतात काय आणि इथे काय) असल्या प्रकाराला अनुदान देतच नाहीत - टेक्सासला किंवा आरकिंन्सॉला मुव्ह व्हायचा ते विचार करताहेत.

कोणाला तरी इतक्यातच एक २२०० मधील आत्मा भेटायला आला होता (पास्ट लाईफ रिग्रेशन करुन). पण त्यामुळे याचे आयुष्य जसे घडणार होते तसे न होत वेगळेच वळण लागले - तो आता त्यावर एक हॉलिवुड सिनेमा काढतो आहे.

Pages