पास्ट लाईफ रिग्रेशन

Submitted by अंजन on 27 April, 2012 - 02:32

इथे पास्ट लाईफ रिग्रेशनचा अनुभव असलेले कोणी आहे का? मी याबद्दल बरेच वाचले आहे. ठाण्यात एक बाई याचे सेशन्स घेतात हे ऐकले आहे. त्यांच्या पुढच्या सेशनला उपस्थित राहायचे ठरवले आहे. पण याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले कोणी ओळखीत नाही किंवा कोणा ओळखीच्या ओळखीतही नाही. म्हणुन इथे विचारायचे ठरवले. जर कोणाला अनुभव असेल तर कृपया लिहा. अर्थात मी स्वतः तर जाणार आहेच पण जायच्या आधी खालिल गोष्टींबद्दल जाणुन घेतले तर थोडी मदत होइल असे वाटते-

१. आधीच्या जन्माच्या आठवणी कितपत स्पष्टपणे दिसतात?
२. या जन्मात आपल्या अवतीभवतीची माणसेच आधीही असतात असे ऐकले. मग ती माणसे आपल्याला कशी ओळखु येतात. की जस्ट आपल्याला अंतप्रेरणा होते की हा जो दिसतोय तो सध्याच्या जन्मात अमुकअमुक आहे म्हणुन?

आणि कृपया -

मी जरी आज सभासद झालोय तरी मी गेली ५ वर्षे रोमातला मायबोलीकर आहे, इथल्या प्रतिसादांशी मी खुपच चांगल्या प्रकारे परिचित आहे. आणि म्हणुन खालील सुचना -

१. ज्यांचा या सगळ्यावर विश्वास नाही त्यांनी इथे येऊन 'हे फाल्तु आहे' हे सांगण्यात आपला वेळ वाया घालवायची गरज नाही. हे फाल्तु आहे की कसे हे जाणण्यासाठी मी माझा वेळ आणि पैसा वापरतोयच. आलेले अनुभव इथे टाकेनच.

२. इथे आल्या आल्या इतके छान मराठी टायपिंग कसे जमतेय ह्याही शंका घेऊ नयेत. मी जरी इथे आजच सभासद झालोय तरी मायबोली ही एकच मराठी साईट नाहीय. माझ्या स्वतःच्या ब्लॉगवर आणि संकेतजालावर इतरत्रही मराठीतुन लिहिण्याची सोय आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक गोष्टीच्या काही प्रॉपर्टीज असतात. या प्रॉपर्टीज त्या गोष्टीच्या विशिष्ट इंटरअ‍ॅक्शन्समुळे सिद्ध होतात, त्या तशाच पुन्हा घडवुन आणता येतात. उदा. विशिष्ट किरणोत्सार योग्य धातुवर पोचल्यास त्या प्रकाशकणांमुळे इलेक्ट्रॉन्स जास्त प्रवाही बनतात.

आत्मावगैरे सारख्या गोष्टींबद्दल या प्रॉपर्टीज आत्म्यापेक्षाही धुसर असतात. "साधना केलीत तर", 'विशिष्ट" स्थितीत तुमचे मन पोचले तर ...
पण ही विशिष्ट स्थिती ही इतर अविशिष्ट गोष्टींवरुन(च) सांगीतल्या जाते उदा. तुमचा पूर्ण विश्वास असेल तर, तुम्ही पूर्ण शरण गेला असलात तर वगैरे. बुद्धीबाबत ते तितके खरे नाही. आत्मा असलेले साधना करणारे पूर्णपणे सतत शरण गेलेले कदाचीत मानणार नाहीत पण अचानक अबंदिस्त जिवंत (वगैरे) सिंह समोर आल्यास चड्डी ओली करुन पळुन जाणे हीच बुद्धीची प्रॉपर्टी आहे (या पोस्टचा मतितार्थ सोडुन त्या ओल्या चड्डीलाच कोणी उचलुन मिरवले तर ती त्या मायबोलीकरांची प्रॉपर्टी म्हणता येईल).

एकुण काय तर "दिसणे" हे आपल्या चक्षूंपुरते मर्यादीत नसले तरीही चक्षुंपर्यंत पोचु शकेल अशी साखळी बनवता यायला पाहिजे. असंतुष्ट आत्म्यांना हे पटणार नाहीच बहुतेक. हलके आहातच, हलके घ्या.

बेफिकीर,

>> अध्यात्मिक साधनेने असे काही कळते हे कुठे सिद्ध होते?::स्मित:
>> (म्हणजे विश्वासच ठेवणे भाग असे म्हणायचे आहे)

एका अर्थी विश्वास ठेवणे भाग आहेच असं म्हणायला पाहिजे. कारण आत्मा डोळ्याने दिसत नाही. मात्र साधनेमुळे आत्मतत्त्व जगात कसे कार्य करते ते आपोआप उमजू लागते. लक्षावधी लोकांनी याची अनुभूती घेतली आहे.

तसं बघायला गेलं तर आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो (उदा.: पोटदुखीमुळे) तेव्हा आपण त्याच्यावर एक प्रकारचा विश्वासच टाकत असतो. आणि तो आजून इतरत्र कोणावर (त्याचं शिक्षण, शिक्षक, अनुभव, इत्यादि) विश्वास टाकून औषध देतो. या प्रक्रियेत तुमचं पोट सर्वसामान्यांसारखंच असेल हे गृहीत धरलेलं असतं (उदा.:जठराच्या जागी जठरच असेल). जगाचा बहुतांश व्यवहार विश्वासावर चालतो.

त्यामुळे अध्यात्मिकदृष्ट्या उन्नातांवर विश्वास टाकून साधनेस बिनधास्त सुरुवात करावी. Happy

मात्र अध्यात्मिकदृष्ट्या उन्नत कोण आणि लबाड कोण हे ओळखता यायला पाहिजे. त्याकरिता नामजप उपयोगी पडतो. तसेच पूरक प्रयत्न म्हणून संतचरित्रे वाचल्याने माणूस आपोआप भक्तीचे बीज रुजते.

आ.न.,
-गा.पै.

तसं बघायला गेलं तर आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो (उदा.: पोटदुखीमुळे) तेव्हा आपण त्याच्यावर एक प्रकारचा विश्वासच टाकत असतो. आणि तो आजून इतरत्र कोणावर (त्याचं शिक्षण, शिक्षक, अनुभव, इत्यादि) विश्वास टाकून औषध देतो. या प्रक्रियेत तुमचं पोट सर्वसामान्यांसारखंच असेल हे गृहीत धरलेलं असतं (उदा.:जठराच्या जागी जठरच असेल). जगाचा बहुतांश व्यवहार विश्वासावर चालतो.>>> डॉक्टरची डीग्री, त्याची प्रॅक्टीस त्याचे शल्य कौशल्य याविषयी खात्री झाल्यावरच लोक डॉक्टरवर विश्वास ठेवतात. तुम्ही आत्म्याविषयी कसलीही खात्री पटवुन देत नाही. आत्मा आहे याचा एक तरी भौतीक पुरावा अथवा त्याचे मेजरमेंट्स तरी दाखवा.

तसं बघायला गेलं तर आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो (उदा.: पोटदुखीमुळे) तेव्हा आपण त्याच्यावर एक प्रकारचा विश्वासच टाकत असतो. आणि तो आजून इतरत्र कोणावर (त्याचं शिक्षण, शिक्षक, अनुभव, इत्यादि) विश्वास टाकून औषध देतो.
------ डॉ. वर आपण विश्वास टाकतो पण तो टाकण्याअगोदर आपण खातरजमा करुन घेतो, त्यांना काही पात्रतेच्या परिक्षांना सामोरे जावे लागते. आधी शिफारस केलेली असण्यापासुन तर तुमचे निरीक्षण आणि अनुभव.

डॉ. हा पेशंट कडे बघतांना कुणावरही विश्वास टाकत नाही. त्याच्या शिक्षकांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची (शिकत असतांना) त्यांनी खात्री करुन घेतलेली असते. केवळ शिक्षकांनी सांगितले आहे म्हणुन असे होते नाही.

या प्रक्रियेत तुमचं पोट सर्वसामान्यांसारखंच असेल हे गृहीत धरलेलं असतं (उदा.:जठराच्या जागी जठरच असेल). जगाचा बहुतांश व्यवहार विश्वासावर चालतो.
---- कारण त्याची खातर जमा करुन घ्यायची बहुतेक वेळा ग्रज भासत नाही. ९९.९ % लोकांचे हृदय, फुफ्फुस असायला हवे त्या जागेवरच असते.... पण थोडीजरी शंका आली तर त्यांच्या अस्तित्वाची खात्री करुन घेण्यासाठी साधने उपलब्द आहेतच. "सर्वसाधारण" पणे खर्च, वेळ वाचवण्यासाठी अगदी जरुर असेल तरच अशा चाचण्या करणे भाग पडते.

किती प्रतिसाद आलेत, उलट सुलट दोन्ही. Happy

पण जी मंडळी ह्याला बकवास समजताहेत त्यांनी एकदातरी अनुभव घ्यायला पाहिजे असे मला तरी वाटते.

देव/आत्मा आहे की नाही हे एकवेळ समजणार नाही कारण "साधना केलीत तर", 'विशिष्ट" स्थितीत तुमचे मन पोचले तर ... ह्या तथाकथित कुबड्या पुढे केल्या जातात. मग पास्ट लाईफ रिग्रेशनच्या एका सेशनला हजर राहण्यात काय वाईट आहे? तिथे तुम्हाला काहीच दिसले नाही तर 'तुम्ही रिलॅक्स झाला नाहीत' ही कुबडी पुढे करण्यात येईल. पण तुम्ही रिलॅक्स होता की नाही ते तुम्हाला स्वतःला नीट माहित असेलच ना. म्हणजे समोरचा खोटे बोलतोय की खरे हे तुम्हाला ओळखता येईल.

पिएलार करताना जे दिसते ते अगदी धुसर्/नीट दिसत नाही.जे दिसतेय त्याचा अर्थ पिएलारवालेच सांगतात आणि आपण तो मानायचा हे खरे आहे की उगीच कोणीतरी ठोकुन दिलेय आणि आपण ते खरे आहे असे मानुन चाललोय हे तर तुम्हाला स्वतःला ठरवता येईल ना?

प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर घासुन बघणा-यांनी एकदातरी देव्/आत्मा/जन्म/पुनर्जन्म या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघायचा प्रयत्न करा आणि मग खुशाल लिहा की या सगळ्या भाकडकथा आहेत म्हणुन. उगीचच केवळ तुमच्या बुद्धीला पटत नाही म्हणुन या सगळ्या भाकडकथा असे थोडेच आहे? जे तुम्हाला पटत नाही ते जगात अस्तित्वातच नाही?

विज्ञान नावाच्या गाईचे शक्य तितके दुध आता काढुन झालेय आणि यापुढे थेंबभरही दुध तिच्यातुन निघणार नाही? यापुढे नविन शोध अजिबात लागणार नाही? गेल्या शतकात जे एकतर चमत्कार किंवा धादांत खोटे वाटत होते ते या शतकात फिजिक्सचे नियम लावुन समजावुन घेणे शक्य झाले, पुढच्या शतकात यापुढची मजल गाठलीच जाणार नाही?

एनी वेज, प्रतिसादांबद्दल आभार.

Er.Rohit,

>> radiatio डीटेक्ट करता येते. आत्मा डीटेक्टर बनवुन दाखवा सगळे विश्वास ठेवतील.:फिदीफिदी:

इंद्रियातीत वस्तूसाठी इंद्रियगम्य पुरावा कसा चालेल?

त्यातूनच हवा असेल तर अनुमानजन्य पुरावा मिळेल. तुम्ही जिवंत आहात हाच पुरावा! देह म्हणजे तरी काय? आणि त्याला खायला का लागते? आपोआप का तग धरीत नाही? ज्यामुळे तो प्रेत होण्यापासून रोखला गेला आहे, त्या वस्तूला आत्मा म्हणतात.

जगातल्या सगळ्या गोष्टी बदलतात. तर मग स्थिर काय आहे? जी स्थिर वस्तू आहे त्याला आत्मा म्हणतात.

आ.न.,
-गा.पै.

माझा वरचा प्रतिसाद वाचुन मी पास्ट लाई.. ची जाहिरात करतोय असेही काहींना वाटेल. पण माझा तो हेतू नाहीय,. मी अजुनपर्यंत एकाही पिएलारवाल्याला व्यक्तिश: ओळखत नाही, माझ्या ओळखीत कोणीही हा धंदा करत नाही आणि पुढेमागे हा धंदा करण्याचा माझा स्वतःचाही हेतू नाही. (मी जायचे असे ठरवलेय पण अजुन त्या संदर्भात काहीही केलेले नाहीय, काही दुस-या कामांमध्ये बिझी आहे)

मी इथे कोणाला अनुभव आहे का हे विचारायला हा धागा उघडला. ज्यांना अनुभव आहे त्यांनी इथे येण्याचे टाळलेय (कारण अर्थातच इथे त्यांच्या टिंगलीशिवाय अजुन दुसरे काहीच होणार नाही) आणि ज्यांना अजिबात अनुभव नाहीय ते पुरावे मागताहेत. Proud स्वतः एकदा करुन पाहा आणि फर्स्टहँड अनुभव मिळवा की राव. मग तुम्हाला अगदी छातीठोकपणे स्वतःच पुरावा देता येईल, असा पुरावा जो कोणीच हाणुन पाडु शकणार नाही.

>११० वर्षांपुर्वी, १८०० साली, जगाची लोकसंख्या १०० कोटी होती. आज २०१२ मधे ७०० कोटी पेक्षा जास्त आहे. प्रत्येक शरिरात किमान एक आत्मा असायला हवा हे गृहित धरले तर ६०० कोटी extra आत्मे आलेत कुठुन?

संगणकाप्रमाणेच Object Pool ची संकल्पना असेल तर? परमात्म्याने सुरुवातीला शम्भरेक कोटी आत्म्याचा पूल तयार केला आणी होता होईतो तेच आत्मे वापरले. अगदी कमी पडले तेव्हा शंभर कोटी नवे आत्मे केले. असेही असू शकेल ना?

पण शंभर कोटी नवे जे आत्मे असतील, त्यानी पूर्वी कुठेच जन्म न घेतल्याने त्यांच्या कर्मविपाकाचा काही बॅक बॅलन्सच असनार नाही.. मग त्याना जन्म कुठल्या योनीत द्यायचा हे कसे ठरवले? मुळात ज्या आत्म्याला मागचा काही कर्म बॅलन्स शिल्लक नाही, तो शून्य आहे, त्याला जन्म तरी कसा मिळेल?

अंजनः उत्तम पोस्ट. इथे खर तर खूप जणानी दोन्ही बाजूंनी छान पोस्टी टाकल्या आहेत.

ज्यांना अनुभव आहे त्यांनी इथे येण्याचे टाळलेय मी त्यातली एक.

(कारण अर्थातच इथे त्यांच्या टिंगलीशिवाय अजुन दुसरे काहीच होणार नाही)
काय म्हणता? टिंगल????

मी कुणालाही घाबरत नाही पण उगाच शब्दांची उधळण करून समजण्यासारखा वा समजावण्यासारखा हा विषय नाही. पुस्तकातून, भाषणातून, चर्चेतून फक्त दुसर्‍यांचे अनुभव कळतात. ते मेंदूला खाद्य असत. पण कुतुहल असेल आणि प्रचिती पाहिजे असेल तर स्वानुभवच घ्यायलाच पाहिजेच. पोहणारी माणस नुसती बघून आपल्याला पोहता येईल का? त्याला ज्याप्रमाणे skiil and practice लागते त्यासारखाच काहिसा हा प्रकार आहे. मी अजून शिकते आहे. अनुभव खूप आले आणि येतात, पण त्यांना चिकटून राहिल्याने प्रवास आणि आभ्यास थांबतो अस मला वाटत. रेकीच्या धाग्यावर मी या विषयावर एक पोस्ट टाकली होती. तुम्हाला विपूत नंबर पाठवला आहे तेव्हा नक्की बोलू. TGIF.

object pool Biggrin

बाकी काही नाही तरी असे समजावून सांगितले तर object pooling ची कन्सेप्ट तरी नक्कीच चांगली समजेल

इंद्रियातीत वस्तूसाठी इंद्रियगम्य पुरावा कसा चालेल?>>>ही इंद्रियातीत वस्तु इंद्रियगम्य शरीरात काय करत असते? ईतके तिचे ताकदीचे अस्तित्व असताना तिला इंद्रियगम्य शरीरात रहायची आसक्ती का पडावी? डायरेक्ट फक्त आत्मेच का जन्म घेत नाहीत ?.त्यांना रहायला घर लागणार नाही, खायला अन्न नको ,इंटरनेट नको ,प्रवासाचा खर्च नको. किती मज्जा असेल आत्म्यांच्या जगात.
पास्ट लाईफ म्हणजे मागचा जन्म आठवु शकतो, मग त्याआधीचे अनेक जन्मही आठवले पाहीजेत, उदा: किडा, मुंगी, अमीबा वगैरे Lol प्रत्येकाचा मागचा जन्म माणसाचाच कसा बरं असतो? काहींना आपण मागच्या जन्मी नाकतोडा होतो असे आठवल्याचे ऐकिवात नाही . Proud

Er.Rohit,

१.
>> ही इंद्रियातीत वस्तु इंद्रियगम्य शरीरात काय करत असते?

शरीर त्याच्याभोवती आकार घेते. ती शरीरात जाऊन बसत नाही.

२.
>> ईतके तिचे ताकदीचे अस्तित्व असताना तिला इंद्रियगम्य शरीरात रहायची आसक्ती का पडावी?

आसक्ती विस्मृतीमुळे होते. ही विस्मृती का होते याला कारण नाही. मात्र तिच्यावर मात करता येते. त्यासाठी ध्यास असावा लागतो. आत्म्याला मूळ स्वरूप शोधण्याचा ध्यास लागला की नरजन्म मिळतो.

३.
>> डायरेक्ट फक्त आत्मेच का जन्म घेत नाहीत ?.

नक्की कळला नाही हा प्रश्न. आत्मे जन्म घेत नाहीत तर कोण जन्म घेतं?

४.
>> त्यांना रहायला घर लागणार नाही, खायला अन्न नको ,इंटरनेट नको ,प्रवासाचा खर्च नको.
>> किती मज्जा असेल आत्म्यांच्या जगात.

आहेच मुळी मज्जा! वादच नाही. यालाच आत्मानंद म्हणतात. पण आत्मविस्मृती झाल्यास ही मज्जा दिसणार नाही.

याचा आत्म्यांनी भूतलावर जन्म घेण्याशी काय संबंध?

५.
>> मग त्याआधीचे अनेक जन्मही आठवले पाहीजेत, उदा: किडा, मुंगी, अमीबा वगैरे

तसंच माणसाला मागचे मनुष्येतर जन्म आठवत नाहीत कारण त्या भोगयोनी आहेत. त्यांत कर्मस्वातंत्र्य नसते. त्या जन्मांतून शिकण्यासारखे काहीच नसते.

आ.न.,
-गा.पै.

शरीर त्याच्याभोवती आकार घेते. ती शरीरात जाऊन बसत नाही.

किती विनोद! आत्मा शरीरात जाउन बसत नाही, तर आधीपासुन असतो का? आईच्या पोटात बाळाचा आत्मा पूर्वीपासुन असतो आणि त्याच्या भोवती बाळ तयार होते का? Proud

मांजराने झुरळ गिळले तर मांजराच्या शरीरात दोन आत्मे तयार होतात का?

आत्म्याला मूळ स्वरूप शोधण्याचा ध्यास लागला की नरजन्म मिळतो.
---- आत्म्याचे मुळ स्वरुप म्हणजे काय?

दोन जिव एकत्र आले, आणि निसर्गाने परवानगी दिल्यावर मानवाचा जन्म होतो. हा निर्णय सर्वस्वी दोन मानव घेतात. आता आत्म्याला मुळ स्वरुप शोधण्याचा ध्यास असणे वा नसणे महत्वाचे कुठे आहे? जर दोन सजिव एकत्रच आलेच नाहीत तर स्थिर आत्मा कुचकामी आहे.

हे आत्मा आणि त्याचे तत्वज्ञान मला पचतच नाही आहे किंवा ते समजण्याची कुवत नाही :स्मित:.

मांजराने झुरळ गिळले तर मांजराच्या शरीरात दोन आत्मे तयार होतात का?
---- आत्म्यांची टंचाई निर्माण झालेली आहे, ते दोन दोन आत्मे एकाच शरिरांत टाकू नका.

शरीर त्याच्याभोवती आकार घेते. ती शरीरात जाऊन बसत नाही.>>>'त्याच्याभोवती' हा शब्द 'भौतिक' अस्तित्वासाठी वापरतात .किल्ल्याच्याभोवती तटबंदी, यात किल्ल्याला भौतिक अस्तित्व आहे. आत्म्याच्या भोवती शरीर आकार घेते याचा अर्थ त्याला भौतिक अस्तित्व आहे हेच तुम्ही सांगत आहात .मग तेच अस्तित्व सिद्ध करुन दाखवा.
माणसाला मागचे मनुष्येतर जन्म आठवत नाहीत कारण त्या भोगयोनी आहेत. त्यांत कर्मस्वातंत्र्य नसते. त्या जन्मांतून शिकण्यासारखे काहीच नसते.>>>कर्मस्वातंत्र्य नसते हे अजबच सांगताय. गायीला देवता मानले आहे, तिच्या पोटात ३३कोटी देव असतात, तरीही गाय भोगयोनीत समजायची का?

Er.Rohit,

>> गायीला देवता मानले आहे, तिच्या पोटात ३३कोटी देव असतात, तरीही गाय भोगयोनीत समजायची का?

हो. गाई मांस खात नाहीत म्हणून त्या मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का, असा प्रश्न विवेकानंदांनी विचारला होता. गाय सर्व देवांची पवित्रके आकर्षित करून घेऊ शकते. मात्र यामुळे ती मानवांना वंद्य असली तरी तिची योनी भोगयोनीच आहे.

आ.न.,
-गा.पै.

उदय,

१.
>> आत्म्याचे मुळ स्वरुप म्हणजे काय?

आत्मा मुळातून सच्चिदानंदस्वरूप आहे. तो सत् आहे कारण मी अस्तित्वात आहे ही जाणीव सर्व माणसांत (आणि प्राण्यांतही) असते. सत् ही स्थिर वस्तू आहे.

तो चित् आहे कारण तो चेतनास्वरूप आहे. चित् म्हणजे हलणारी वस्तू.

तो आनंदही आहे. तो प्राप्त झाला की काही न करता आनंद वाटू लागतो. लौकिक सुख आणि दु:ख सारखेच कंटाळवाणे होतात.

२.
>> दोन जिव एकत्र आले, आणि निसर्गाने परवानगी दिल्यावर मानवाचा जन्म होतो.

ज्याला तुम्ही निसर्गाची परवानगी म्हणता त्याला आत्म्याची शक्ती म्हणता येईल.

३.
>> जर दोन सजिव एकत्रच आलेच नाहीत तर स्थिर आत्मा कुचकामी आहे.

ज्याअर्थी ते सजीव आहेत त्याअर्थी त्यांच्यात चेतना आहे. आत्मा हा चेतनास्वरूप असल्याने प्रजोत्पादन हेही आत्म्याच्याच शक्तीने होत असते.

४.
>> हे आत्मा आणि त्याचे तत्वज्ञान मला पचतच नाही

तसं पचण्याची गरजही नाही. मी कोण आहे हा प्रश्न भंडावू लागला की (जे कळायला पाहिजे ते) आपोआप कळू लागतं.

आ.न.,
-गा.पै.

जामोप्या,

१.
>> मांजराने झुरळ गिळले तर मांजराच्या शरीरात दोन आत्मे तयार होतात का?

झुरळ मांजरीच्या पोटात जिवंत असेल तर हो एका शरीरात दोन आत्मे राहतात. अन्यथा झुरळाचा आत्मा पुढील देह मिळवण्यास पात्र ठरतो.

२.
>> आईच्या पोटात बाळाचा आत्मा पूर्वीपासुन असतो आणि त्याच्या भोवती बाळ तयार होते का?

हो. तो अन्नातून बापाच्या अंगात शिरतो. मग बापापासून विलग होऊन आईच्या पोटात जाऊन बसतो. गर्भाच्या चौथ्या महिन्यात तो टाळू फोडून गर्भशरीराशी लिप्त होतो. याच वेळेस गर्भाचे लिंग ठरते.

आ.न.,
-गा.पै.

मांजराने झुरळ गिळले तर मांजराच्या शरीरात दोन आत्मे तयार होतात का?

मांजराने गिळण्याआधीच झुरळ मृत होईल. म्हणजे त्याचा (झुरळाचा) आत्मा कुडी सोडून निघून गेलेला असेल.

हो. तो अन्नातून बापाच्या अंगात शिरतो. मग बापापासून विलग होऊन आईच्या पोटात जाऊन बसतो.

क्लोनिंग मध्ये मुदलात बापच नसतो. मग आत्मा कुठून येतो ?

२.
>> दोन जिव एकत्र आले, आणि निसर्गाने परवानगी दिल्यावर मानवाचा जन्म होतो.
ज्याला तुम्ही निसर्गाची परवानगी म्हणता त्याला आत्म्याची शक्ती म्हणता येईल.

बलात्कारातही दोन 'जिव' एकत्र येतात, व त्यापासुनही अपत्याचा जन्म होऊ शकतो. ही कोणत्या आत्म्याची शक्ती?

क्लोनिंग मध्ये मुदलात बापच नसतो. मग आत्मा कुठून येतो ?

क्लोनिंगच कशाला, किती तरी जीव हे स्त्री पुरुष दोन्ही अवयव एकत्रच बाळगून असतात. अशा प्राण्यांमध्ये काय होते?

गर्भाचे लिंग चौथ्या महिन्यात ठरते. हे मात्र अगदीच अशास्त्रीय आहे. जेंव्हा शुक्र आणि ओवम यांचे फलन होते त्याच क्षणाला लिंग ठरते. आता अवयव हळुहळू नंतर तयार होतात, पण निसर्गाने लिंग आधीच ठरवलेले असते, नंतर फक्त त्याची अंमलबजावणी होते.

आत्मा म्हणजे चिदानंद म्हणे.. मग शरीर विरहीत च्दानंद अवस्था असताना आधी अन्नात जा, मग बापात जा, मग आईत जा, मग पुन्हा जन्म घेऊन बाहेर ये, मग कुठल्या तरी दुसर्‍याला जन्म दे आणि मग मरुन जा... आणि पुन्हा हेच करायला नवीन शरीर घे! हे सगळे उद्योग आत्मा कशासाठी करतो? शरीर विरहीत चिदानंद अवस्थेतच बसायचं की ध्यान लावून.

आत्मा म्हणजे चिदानंद म्हणे.. मग शरीर विरहीत च्दानंद अवस्था असताना आधी अन्नात जा, मग बापात जा, मग आईत जा, मग पुन्हा जन्म घेऊनबाहेर ये, मग कुठल्या तरी दुसर्‍याला जन्म दे आणि मग मरुन जा... आणि पुन्हा हेच करायला नवीन शरीर घे! हे सगळे उद्योग आत्मा कशासाठी करतो? शरीर विरहीत चिदानंद अवस्थेतच बसायचं की ध्यान लावून.>>हेच मी पैलवानाला विचारले तर म्हणतो प्रश्नच कळला नाही.

थोडेसे अवांतर===

दादाजीं वैशंपायन यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिलेले उघड आव्हान आणि त्याची दखल न घेण्याची डॉ. दाभोळकरांची असलेली नेहमीची पद्धत

१९८५ साली प.पू. दादाजींनी ठरवले होते की, तीन गोष्टी करायला सांगून ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’वाल्यांना ‘जगात ईश्वर असल्याची’ अनुभूती द्यायची. प.पू. दादाजींनी डॉ. नरेंद्र दाभोळकरांना उघड आव्हान दिले होते की,

अ. ‘तुम्ही एका कागदावर कोणत्याही विषयावरील तीन प्रश्न लिहा. ते कागद तुमच्याजवळच ठेवा. मी ते कागद न बघता त्या प्रश्नांची दुसर्याम दिवशी उत्तरे सांगीन, तसेच त्यातील र्हहस्व-दीर्घाच्या चुकाही सांगीन.

आ. १५ चांदीची भांडी घेऊन त्यांत पाणी भरा आणि चमचे ठेवा. आमचे साधक ते पाणी चमच्यांनी ढवळत मंत्रघोष करतील. तीन तासांत पाण्याला केशरी रंग येईल, म्हणजेच ते पाणी विष्णुतीर्थ बनेल.

इ. ५०० माणसे बसतील, असे सभागृह घेऊन त्यात तीन तास मंत्रघोष केल्यानंतर तेथे वायूरूपाने येऊन नागराज स्वयं प्रकट होतील.

वरील सर्व कृती मान्य नसतील, तर २१ दिवसांत तुम्ही करून दाखवा, नाहीतर आम्ही करून दाखवतो, ते मान्य करा. या आव्हानाचा कित्येक दिवस पाठपुरावा करूनही डॉ. दाभोळकरांनी यांवर
कोणत्याच तर्हेाचा प.पू. दादाजींना प्रतिसाद दिला नाही किंवा काही कळवलेही नाही.’

- सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (मार्गशीर्ष कृष्ण ५, कलीयुग वर्ष ५११० (१७.१२.२००८)

जामोप्या आणि Er.Rohit,

>> शरीर विरहीत चिदानंद अवस्थेतच बसायचं की ध्यान लावून.

विस्मृतीमुळे हे शक्य होत नाही. मूळ स्वरूप जाणून घ्यायला नरजन्मच घ्यावा लागतो. तो मिळाल्यावर पुढे साधनाही करावी लागते.

आ.न.,
-गा.पै.

Pages