पास्ट लाईफ रिग्रेशन

Submitted by अंजन on 27 April, 2012 - 02:32

इथे पास्ट लाईफ रिग्रेशनचा अनुभव असलेले कोणी आहे का? मी याबद्दल बरेच वाचले आहे. ठाण्यात एक बाई याचे सेशन्स घेतात हे ऐकले आहे. त्यांच्या पुढच्या सेशनला उपस्थित राहायचे ठरवले आहे. पण याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले कोणी ओळखीत नाही किंवा कोणा ओळखीच्या ओळखीतही नाही. म्हणुन इथे विचारायचे ठरवले. जर कोणाला अनुभव असेल तर कृपया लिहा. अर्थात मी स्वतः तर जाणार आहेच पण जायच्या आधी खालिल गोष्टींबद्दल जाणुन घेतले तर थोडी मदत होइल असे वाटते-

१. आधीच्या जन्माच्या आठवणी कितपत स्पष्टपणे दिसतात?
२. या जन्मात आपल्या अवतीभवतीची माणसेच आधीही असतात असे ऐकले. मग ती माणसे आपल्याला कशी ओळखु येतात. की जस्ट आपल्याला अंतप्रेरणा होते की हा जो दिसतोय तो सध्याच्या जन्मात अमुकअमुक आहे म्हणुन?

आणि कृपया -

मी जरी आज सभासद झालोय तरी मी गेली ५ वर्षे रोमातला मायबोलीकर आहे, इथल्या प्रतिसादांशी मी खुपच चांगल्या प्रकारे परिचित आहे. आणि म्हणुन खालील सुचना -

१. ज्यांचा या सगळ्यावर विश्वास नाही त्यांनी इथे येऊन 'हे फाल्तु आहे' हे सांगण्यात आपला वेळ वाया घालवायची गरज नाही. हे फाल्तु आहे की कसे हे जाणण्यासाठी मी माझा वेळ आणि पैसा वापरतोयच. आलेले अनुभव इथे टाकेनच.

२. इथे आल्या आल्या इतके छान मराठी टायपिंग कसे जमतेय ह्याही शंका घेऊ नयेत. मी जरी इथे आजच सभासद झालोय तरी मायबोली ही एकच मराठी साईट नाहीय. माझ्या स्वतःच्या ब्लॉगवर आणि संकेतजालावर इतरत्रही मराठीतुन लिहिण्याची सोय आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शॉक देवुन थांबलेले हृदय वगैरे चालू करुन मेलेला माणुस जीवंत करता येतो. पण मेल्यावर ( हृदय बंद पडल्यावर ) रक्ताभिसरण आणि ऑक्सीजन पुरवठा लगेच थांबतो त्यामुळे पेशी मरायला सुरुवात होते. त्यामुळे माणुस मेल्यावर थोडा काळ गेल्यावर शॉक दिले काय कींवा कोणी आत्मा आणुन घातला काय? शरीर जीवंत होणार नाही.
Rofl
तुमचं तुम्हाला तरी कळलं का तुम्ही काय लिहिलंय ते ? उत्तर माहित असेल तर द्या. उगीच कशाला बोटांना त्रास देताय .
इंजीन विजेवर / इंधनावर चालते ना?
exactly . इंजिनाला कितीही काड्या केल्या तरी त्यात इंधन नसेल तर ते चालणारच नाही. तसंच मृत शरीराला काहीही केलं तरी आत्माच नसल्यामुळे ते जिवंत होणार नाही

याच आठवड्यात एक हिस्टरी चॅनलवर डॉक्युमेंटरी पाहिली.

परदेशात वैद्यकीय व्यावसायीक स्त्री धबधब्यावरुन ( हा एक क्रिडा प्रकार आहे ) बोट चालवताना ( वल्हवताना ) पाण्यात पडुन बुडाली.

साधारण १ तासाने जेव्हा तीला वर काढली तेव्हा तिचा श्वास बंद झाला होता. पण या दरम्यान ती बुडाली आणि पुढे ती अज्ञात जगात होती. जिथले वातावरण वेगळेच होते असा तिचा अनुभव आहे. दरम्यान तीला कृत्रीम श्वास दिला जात होता हे ही दिसत होते.

या अज्ञात ठिकाणी तिला दोन माणसे भेटली ज्यांनी तिला अद्याप वेळ झाली नसल्याचे सांगुन परत जायला सांगीतले.

एका तासाने ती पुन्हा श्वास घ्यायला लागली हा डॉक्टरांच्या दृषीने सुध्दा चमत्कार आहे.

तीने स्वतः सांगितले की मृत्यु नंतरचे पण एक जग आहे जीथे आपण जाणिवा घेऊन जातो यावर माझा विश्वास बसला आहे पण हे सत्य लोकांना कसे पटवायचे हा खरा प्रश्न आहे.

या घटनेवर एक्स्पर्ट न्युरोलोजिस्ट चे असे म्हणणे होते की हृदय बंद पडल्यावर चार तास मेंदु ती अवस्था टिकवु शकतो. याचे नियंत्रण मेंदुमधल्या एका सेंटरने होते.

जर आपण हे सेंटर बाहेरुन अ‍ॅक्टीवेट केले तर अशी अवस्था प्राप्त होऊ शकेल. पण हा जीवाशीच खेळ आहे. समजा एखादा माणुस या प्रयोगानंतर या अवस्थेच्या बाहेर आलाच नाही तर काय म्हणुन हे प्रयोग कन्सेप्ट म्हणुन ठीक असले तरी असा न्युरोलोजीस्ट आणि ज्याच्यावर प्रयोग करायचे असा माणुस सहजा सहजी उपलब्ध्द होणे दुरापास्त असावे.

आद्य शंकराचार्यांनी केलेला परकायागमनाचा प्रयोग ह्या प्रयोगाच्या कन्सेप्टशी मिळता जुळता आहे. हे इथे नमुद करणे गैर असले तरी हा मोह आवरत नाही.

भारतीय संस्कृतीत - पुराणात याचे दाखले आहेत.

योगाभ्यासाने या सिध्दी प्राप्त करता येतात हे डॉ. प. वि.वर्तकांनी सिध्द करण्याचा शास्त्रीय प्रयत्न सुध्दा पुणेरी तथाकथित बुध्दीप्रामाण्यवाद्यांना पचवता आला नाही हे ही खेदाने नमुद करावेसे वाटते.

असो. एक काळ येईल असा आशावाद आहे की जेव्हा ही सारी शास्त्रे आजच्या सायन्सच्या भाषेत सिध्दच नव्हे तर अनुभवता येतील.

नितीनचंद्र,
आपण बर्णिलेल्या प्रकारात (थंड पाण्यात बुडून)मृतवत शरीरात चेतना आणण्याच्या प्रकाराला आम्ही डॉक्टरलोक
थालमन प्रोटोकॉल म्हणतो.
मायबोलीवर डॉ सुरेश शिंदे यांनी यावर खूप छान लेख लिहिला आहे.
http://www.maayboli.com/node/47261

चालू विषयावर वैद्यक-शास्त्राची मते जाणून घ्यायला मलासुद्धा आवडतील.

मी केलेली इंजिन व मानवी शरीर यांची तुलना ढोबळ आहे. ती फक्त मला काय म्हणावयाचे आहे हे स्पष्ट करण्यासाठी आहे. इंजिन व मानवी शरीर दोन गोष्टी पूर्णपणे एकाच प्रकारच्या नसल्याने त्यांची एकमेंकाशी काटेकोर तुलना करता येणार नाही. पण हि तुलना एकदम हास्यास्पद आहे असे मला वाटत नाही. असो .

इंजिनाला लागणारे इंधन हे शरीराला लागणाऱ्या अन्नासारखे आहे. उर्जा. इथे चर्चा केलेल्या "चेतना" अथवा "आत्मा" नव्हे. इंधन पुरवठा बंद झाला कि इंजिन थांबते; त्याप्रमाणे अन्नपुरवठा बंद झाला कि शरीर थांबते. आता शरीर हे पुढील बाबीत इंजिनापेक्षा वेगळे आहे . ते म्हणजे इंजिन हे इंधन पुरवठा करून पुनश्च चालू करता येते. पण मृत शरीर पुन्हा चालू(जिवंत) करता येत नाही. (काही अपवाद वगळता) कारण? - माझ्या माहितीप्रमाणे, शरीरातील अवयव वेगात निकामी होतात. (आणखी करणे असल्यास डॉक्टरांकडून ऐकायला आवडतील)

माझे मत साधे व सोपे आहे - जशी इंजिनाला आत्म्याची गरज नाही तशीच ती मानवी शरीराला नसावी. आता जर एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाबद्दल बोलले जात असेल तर साहजिक आहे कि वैज्ञानिक कसोटी वर त्याची सिद्धता व्हायला हवी.

शेवटी पुढील गोष्ट विसरून चालणार नाही . - विलक्षण गोष्टींना सिध्द करण्यासाठी विलक्षण पुरावे लागतात. Extraordinary things need extraordinary evidence.

<<< मग कर्मभोग छोटे असल्यामुळे जन्माला येवून लगेच त्या शरीराचा त्याग करण एवढंच त्याला भोगायचं असतं. >>>>
कर्म व भोग यावर माझा विश्वास नाही. या गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत.

सातीजी,

हा लेख वाचला. धन्यवाद

१) जर अश्या सर्व उदाहरणात तो पेशंट दरम्यानच्या काळात काय घडले याचा उलगडा करु शकला. असे किमान संख्याशास्त्राला मान्य होईल इतक्या संख्येने पेशंटने प्रतिक्रिया दिल्या तर या काळात शरीर मृत असते पण शरीराशी संलग्न असलेली आणखी एक एनर्जी बॉडी असते हा निष्कर्ष काढला तर तो आजच्या डॉक्टर्सना मान्य होईल का ?

२) वर उल्लेखलेला प्रयोग - अजुनही हे प्रयोग ( प्रयोग अवस्थेतच आहेत ) त्याचे इंजिनियरीग ( खात्रीने यशस्वी प्रयोग ) झालेले नाही हे मान्य होईल का ? अश्या वेळी या प्रयोगातल्या व्यक्तीला जीवनदान देणे शक्य होईलच असे नाही. फेल्युअर रेट जास्त असेल. याची कारणे अनेक असतील. प्रमुख कारण तंत्र अद्याप विकसीत न होणे हे असु शकेल.

३) जर असे प्रयोग करण्याची मुभा डॉक्टर्स ना आहे तर प्लॅचेटचे प्रयोग करण्याची अतिंद्रीय शक्तीचा दावा करणार्‍या किमान ग्रॅज्युएट व्यक्तीला का असु नये ? याबाबत आपले फक्त मत व्यक्त करावे ही विनंती.
एखादी सरकारमान्य संस्था यांनी हा प्रयोग प्रमाणित करावा. अश्या १०० प्रयोगांच्या नंतर प्लँचेट खरे - खोटे यावर शिक्कामोर्तब करावे.

मला हे प्रयोग करायचे नाहीत परंतु असा दावा कोणी करत असेल तर त्याची शहानिशा करण्यात, व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात मात्र रस आहे.

हिस्टरी चॅनलवर मृत व्यक्तीत दुसर्‍या आत्म्याच्या प्रवेशाचा प्रयोग दाखवण्यात आला ज्यात एक सर्जन तसेच अनेक नर्सेस यांच्या उपस्थीतीत या मृत व्यक्तीची पल्स काही काळ चालु झाल्याचे दाखवण्यात आले.

भारतात मात्र असे प्रयोग होताना दिसत नाहीत. आपल्या सारख्या डॉक्टर्स आणि अन्य तज्ञांनी रस घेतल्यास अज्ञात आणि गुढ विषयावर प्रकाश पडेल.

2020 आले

कुणी कुठे फिरून आले का ?

पण मृत शरीर पुन्हा चालू(जिवंत) करता येत नाही. (काही अपवाद वगळता) कारण? - माझ्या माहितीप्रमाणे, शरीरातील अवयव वेगात निकामी होतात. >>>

हो. हृदयासारखा अवयव बंद पडला की इतर अवयवांना प्राणवायू मिळणे बंद होते आणि काही मिनिटात ते अवयव प्राणवायूअभावी बंद पडतात. शस्त्रक्रिया यशस्वी झाली पण मल्टिपल ऑर्गन फेल्यरने पेशंट गेला असे खुपदा ऐकले होते. सुदृढ अवयव असे अचानक का बरे बिघडतात ह्याचे कोडे पडायचे. ते उत्तर प्राणवायू न मिळाल्यामुळे हे कळल्यावर प्रकाश पडला.

मेंदू मृत झाला तरी ऑर्गन्स जिवंत राहू शकतात पण मृत मेंदू परत जीवित होत नसल्याने ऑर्गन्स जिवंत असतानाही माणूस मृत घोषित होतो असे वाचलंय. याबद्दल मला पुरेशी माहिती नाही.

जे मृत घोषित होऊन नंतर परत उठतात ते कदाचित ब्रेन डेड असावेत का? काही कारणामुळे मेंदू परत जिवंत होतो व हे परत उठून बसतात? हृदय बंद पडल्यामुळे जसे नुकसान होते तसे इथे होत नसल्यामुळे माणूस धडधाकट पुनरुज्जीवित झाल्यासारखे वाटते?

Pages