पास्ट लाईफ रिग्रेशन

Submitted by अंजन on 27 April, 2012 - 02:32

इथे पास्ट लाईफ रिग्रेशनचा अनुभव असलेले कोणी आहे का? मी याबद्दल बरेच वाचले आहे. ठाण्यात एक बाई याचे सेशन्स घेतात हे ऐकले आहे. त्यांच्या पुढच्या सेशनला उपस्थित राहायचे ठरवले आहे. पण याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले कोणी ओळखीत नाही किंवा कोणा ओळखीच्या ओळखीतही नाही. म्हणुन इथे विचारायचे ठरवले. जर कोणाला अनुभव असेल तर कृपया लिहा. अर्थात मी स्वतः तर जाणार आहेच पण जायच्या आधी खालिल गोष्टींबद्दल जाणुन घेतले तर थोडी मदत होइल असे वाटते-

१. आधीच्या जन्माच्या आठवणी कितपत स्पष्टपणे दिसतात?
२. या जन्मात आपल्या अवतीभवतीची माणसेच आधीही असतात असे ऐकले. मग ती माणसे आपल्याला कशी ओळखु येतात. की जस्ट आपल्याला अंतप्रेरणा होते की हा जो दिसतोय तो सध्याच्या जन्मात अमुकअमुक आहे म्हणुन?

आणि कृपया -

मी जरी आज सभासद झालोय तरी मी गेली ५ वर्षे रोमातला मायबोलीकर आहे, इथल्या प्रतिसादांशी मी खुपच चांगल्या प्रकारे परिचित आहे. आणि म्हणुन खालील सुचना -

१. ज्यांचा या सगळ्यावर विश्वास नाही त्यांनी इथे येऊन 'हे फाल्तु आहे' हे सांगण्यात आपला वेळ वाया घालवायची गरज नाही. हे फाल्तु आहे की कसे हे जाणण्यासाठी मी माझा वेळ आणि पैसा वापरतोयच. आलेले अनुभव इथे टाकेनच.

२. इथे आल्या आल्या इतके छान मराठी टायपिंग कसे जमतेय ह्याही शंका घेऊ नयेत. मी जरी इथे आजच सभासद झालोय तरी मायबोली ही एकच मराठी साईट नाहीय. माझ्या स्वतःच्या ब्लॉगवर आणि संकेतजालावर इतरत्रही मराठीतुन लिहिण्याची सोय आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पुनर्जन्मामागचे तत्त्वज्ञान कपोलकल्पित आहे हे एका हिंदुत्ववाद्याला कसे काय पटले?<<
अच्छा आम्ही हिंदुत्ववादी मग तुम्ही कोण तालीबानी का?
@भरत मयेकर,
कशाला उगाच एकाद्या चांगल्या चाललेल्या चर्चेला विनाकारण फाटे फोडत बसतोस!

सगळ्या प्रतिसादकांचे आभार. लिंक्सबद्दलही आभार आणि काळजी घेण्याबद्दल लिहिणा-यांचेही आभार. Happy

इथे काही जणांनी हे सगळे बकवास आहे असेही लिहिलेय. मला हे बकवास आहे का कसे हेच जाणुन घ्यायचेय, म्हणुन तर मी जातोय. बकवास आहे लिहिणा-यांनी स्वतःचे अनुभव लिहिले असते तर बरे झाले असते.

पास्ट लाईफ रिग्रेशन आजच्या विज्ञानाने प्रमाणित केलेल्या शास्त्रिय कसोट्या पार पाडु शकत नाही ह्या एकाच निकषावर ते बंडल आहे हे अनुमान काढणे योग्य नाही. अशी तुलना अस्थानी आहे हे मला माहित आहे तरीही असे म्हणावेसे वाटते की काही शतकांपुर्वीच्या तथाकथित धर्मशास्त्राने पृथ्वी सुर्याभोवती फिरते हे विधान बंडल आहे असा निष्कर्ष काढलेला. आजचे विज्ञान तेव्हा नव्हते आणि जे काही होते तेच प्रमाणवाक्य असे लोक मानत तेव्हा होते. आज विज्ञानाला लोक प्रमाणवाक्य समजतात. अजुन १०० वर्षांनी काय परिस्थिती असेल माहित नाही पण एखादी गोष्ट खरी आहे की बनावट हे मोजण्याची फुटपट्टी आजच्यापेक्षा बरीच वेगळी असेल. पास्ट लाईफ रिग्रेशन कदाचित त्यावेळच्या फुटपट्टीने मोजल्यास बंडल नाही असे लक्षात येईल. आणि जर ते खरेच बंडल असेल तर तोवर स्वतःच स्वत:चे मरण मेलेले असेल Happy

पास्ट लाईफ रिग्रेशन करणा-या लोकांनी केलेल्या खोट्या दाव्यांबद्दलही वर लिहिलेय. आता पालारि करणारे १०० तज्ञ असतील तर त्यातले काहीजण भोंदुही असतील. आणि पालारीचे एकंदर स्वरुप पाहता ९९ भोंदु आणि एक प्रामाणिक असेही असु शकेल. तसेही इतर धंद्यांमध्येही किती भोंदु आणि किती प्रामाणिक आहेत हे कोणि पाहिलेय?? आजच्या घडीलाही चुकीची औषधयोजना केल्यामुळे हानी झाली म्हणुन डोक्टरांवर खटले भरले जाताहेतच ना?, कुठल्या कारणाने का असेना पण बांधत असतानाच इमारती कोसळताहेत ना? म्हणुन सगळेच डॉक्टर नी इंजिनीअर्स भोंदु आहेत असे कोणी म्हणत नाही ना? एखादी गोष्ट कितीही शास्त्रसंमत असली तरी तिचे यश/अपयश हे ती प्रत्यक्षात राबवणा-या माणसावरही तितकेच अवलंबुन असते. तो राबवणाराच जर भोंदु असेल तर लोकांना ती गोष्ट बंडलच वाटणार. असो.

पण आज हे खरे का खोटे हे जाणुन घ्यायची एक संधी उपलब्ध आहे, ती संधी माझा वेळ आणि थोडे पैसे घेईल पण त्याव्यतिरिक्त मला अजुन काहीच हानी होणार नाही. म्हणुन मी ही संधी घेणार आहे. यात कितपत वाहात जायचे तेही माझ्या डोक्यात पक्के आहे. बघतो काय होते ते.

अंजन,

तुम्ही बिनधास्त पुढे जा. गुग्गुळाचार्यांना "reincarnation proof" असं विचारलंत तर शेकड्याने स्थळे मिळतील! त्यातलं हे पाहिलं डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांच्याविषयी माहिती देणारं आहे. मला वाटतं की या पानावर सांगितलेली पुस्तके आपल्याला उपयुक्त ठरावीत.

आ.न.,
-गा.पै.

पास्ट लाईफ फ्युचर लाईफ खोटेपणा आहे त्याला काहीच अर्थ नाही. पास्ट लाईफ प्रयोग करुन पैसे कमावणारे जे आहेत त्यांचेवर कंझ्यूमर फोरममध्ये खटले दाखल करायला हवेत.माणसे गंडतात म्हणून काहिहि चालते का?
------ Er.Rohit सहमत

बेफ़िकीर यांची संपुर्ण पोस्ट आवडली आणि पटली. क्लिष्ट विषय समजणार्‍या भाषेत सांगितला.

आपल्या अवतीभवतीच्या माणसांचे आत्मे असतात - प्रत्यक्ष माणसे न दिसता आत्मे दिसतात.
आत्मे धुसर आणि निराकार असल्यामुळे ते आपल्याला ओळखु येत नाहीत. असे सेशन्स घडवून आणणारेच आपल्याला सांगतात आपल्याला काय दिसले ते.
----- Happy सेशन्स घेणार्‍यांचे सेंसर्स चांगलेच प्रगत असतांत.

@अंजन- मला पूर्वजन्मासंबंधी काहीही अनुभव आलेले नाहीत.

एक शंका-
हिंदू तत्वज्ञानानुसार आत्मा ८४ लक्ष योनींमधून फिरतो, आणि नंतर फार मोठ्या भाग्याने मनुष्यजन्म मिळतो असे सर्व बुवा/महाराज सांगतात. सबब या जन्मात चांगली कर्मे करावीत, म्हणजे मोक्ष मिळेल, अन्यथा पुन्हा जन्म-मरणाच्या फेर्‍यात पडावे लागेल अशी भीती दाखवली जाते. मग पुढच्या जन्मात तुम्ही कुत्रा, बेडूक, साप- काहीही होऊ शकता. तात्पर्य- मनुष्यजन्म एकदाच मिळतो ही धारणा ठाम आहे.
(रस्त्यावर आरटीओने लिहिलेल्या सूचनांतही या धारणेचे प्रतिबिंब दिसेल- "करू नका घाई, हा जन्म पुन्हा नाही.." वगैरे.)

शंका अशी आहे की मनुष्यजन्म एकदाच मिळणारा आणि अतिदुर्लभ असा असतांना, झाडून सगळ्यांना आपण मागच्या जन्मी मनुष्यच असल्याचे ठामपणे कसे काय वाटते? आजवर एकाही पूर्वजन्माचे अनुभव सांगणार्‍याने आपण मागच्या जन्मी अस्वल होतो, गांडूळ होतो किंवा साळींदर होतो असे का म्हटलेले नाही?

पुनर्जन्म तज्ञांनी कृपया शंकेचे निरसन करावे.

ज्ञानेशांची शंका मला पण डिवचली होती...

११० वर्षांपुर्वी, १८०० साली, जगाची लोकसंख्या १०० कोटी होती. आज २०१२ मधे ७०० कोटी पेक्षा जास्त आहे. प्रत्येक शरिरात किमान एक आत्मा असायला हवा हे गृहित धरले तर ६०० कोटी extra आत्मे आलेत कुठुन? का ६०० कोटी इतर प्राण्यांची (मुंग्या, डायनासोर्स, डासे, फकडी, किटकुल) संख्या कमी झाली. फुगत असलेल्या जगाच्या लोकसंख्येत आत्मे येतात कुठुन? का काही काळानंतर आत्मे संपले... जन्म हवा असेल तर बिगर्-आत्म्याने घ्या असा काही सृष्टीचा नियम आहे?

अनेक प्रश्न तयार होत आहेत... आत्म्याने शरिर बदलायच्या आधी टप्प्या टप्प्याने विचारत राहिन.

कुणीतरी धागा उघडून अशी काही अनुभुती देणार्‍या, हमखास उपचार करणार्‍या, समुपदेशन करणार्‍या किंवा शिबिरे घेणार्‍या व्यक्तीचा ओझरता उल्लेख करुन आपला अनुभव लिहणे... मग अजुन दुसर्‍या कुणीतरी येऊन त्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती विचारणे... त्यांचा संपर्क क्रमांक मागणे... काही टिपीकल आयडींनी येउन त्या धाग्यावर निष्कारण वाद घालून धागा सतत वर काढत राहणे... काही लोकांनी मग त्या धाग्यावर खरच अर्थपूर्ण प्रश्न्/शंका विचारणे आणि मग त्या शंकांचे निवारण करण्यासाठी त्या धागाकर्त्याने सबंधित व्यक्तीला मायबोलीचा आयडी घेउन इकडे पाचारण करणे... असा आजकाल ट्रेंड बनत चाललाय नाही Wink

(काही सिन्सिअर अपवादांचा अपवाद वगळता :))

उदय, ज्ञानेश - तुमच्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत. मीही तुमच्यासारखाच मनात प्रश्न घेऊन फिरणारा आहे.

शंका अशी आहे की मनुष्यजन्म एकदाच मिळणारा आणि अतिदुर्लभ असा असतांना, झाडून सगळ्यांना आपण मागच्या जन्मी मनुष्यच असल्याचे ठामपणे कसे काय वाटते? आजवर एकाही पूर्वजन्माचे अनुभव सांगणार्‍याने आपण मागच्या जन्मी अस्वल होतो, गांडूळ होतो किंवा साळींदर होतो असे का म्हटलेले नाही?

वर शुभायेरी यांच्या ब्लॉगची लिंक दिलीय. त्यामधल्या काही लेखांमध्ये वरच्या प्रश्नाचे उत्तर आहे. अर्थात हा ज्याचा त्याचा विश्वासाचा प्रश्न आहे. तुमचा जर पुनर्जन्मावरच विश्वास नसेल तर कोणाला आपण मागच्या जन्मी माणुसच होतो किंवा माकडच होतो असे कितीही ठामपणे वाटत असेल तर वाटु द्या की, तुम्हाला काय फरक पडतोय???? Happy त्याने काहीही म्हटले तरी तुम्ही थोडेच विश्वास ठेवणार आहात? वेड्याची बडबड म्हणायची आणि सोडुन द्यायचे.

कुणीतरी धागा उघडून अशी काही अनुभुती देणार्‍या, हमखास उपचार करणार्‍या, समुपदेशन करणार्‍या किंवा शिबिरे घेणार्‍या व्यक्तीचा ओझरता उल्लेख करुन आपला अनुभव लिहणे... मग अजुन दुसर्‍या कुणीतरी येऊन त्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती विचारणे... त्यांचा संपर्क क्रमांक मागणे... काही टिपीकल आयडींनी येउन त्या धाग्यावर निष्कारण वाद घालून धागा सतत वर काढत राहणे... काही लोकांनी मग त्या धाग्यावर खरच अर्थपूर्ण प्रश्न्/शंका विचारणे आणि मग त्या शंकांचे निवारण करण्यासाठी त्या धागाकर्त्याने सबंधित व्यक्तीला मायबोलीचा आयडी घेउन इकडे पाचारण करणे... असा आजकाल ट्रेंड बनत चाललाय नाही

ओह्ह.. अशा गँग्स इथे कार्यरत असल्याचे मला माहितच नव्हते. (मायबोली वाचन कमी पडतेय Sad ). आता ह्या धाग्याचा कर्ता मीच असल्याने बहुतेक असल्या एखाद्या गँगचा मी प्रमुख असण्याचीही शक्यता आहे Wink

बा द वे , कॅलिफोर्निया लाच एक डॉक्टर ब्रूस गोल्डबर्ग म्हणून पास्ट /फ्युचर लाईफ रिग्रेशन करणारे एक हिप्नो-सायन्तिस्ट आहेत ,त्यांचे past lives future lives म्हणून एक पुस्तक अतिशय सु-प्रसिद्ध आहे ........

मनशक्ती लोणावळा यांचा एंक पुनर्जन्मावर विशेषांक होता, त्यात अशोक पाटोळे ( लेखक ) यांनी लाईफ रिग्रेशन च्या अनुभवाविषयी लिहिले होते. त्यांना मागचे जन्म आठवले आणि त्यांची आताची बायको हि मागच्या कुठल्यातरी जन्मातली त्यांची बायको आहे. त्यांनी त्या जन्मात म्हातारे असून तरुण मुलीशी लग्न केले होते आणि नंतर ती विधवा झाली. त्या अंकात बरयाच मान्यवर लोकांचे लेख होते. संग्रही ठेवला होता, मिळाला तर बघायला हवा.
हा विषय असं आहे कि खर खोत काहीच सांगता येत नाही. माझी एंक मैत्रीण वयाच्या ३ वर्षापर्यंत म्हणायची कि तिचा खून झालाय. पण आता तिला काही आठवत नाही आणि तीचे आई बाबा म्हणतात कि कदाचित कुठेतरी आईकून बोलत असेल. माझी एंक आत्या अध्यात्मिक आहे, कुंडलिनी चा अभ्यास करते. तिच्या म्हणण्यानुसार आत्मा आहे, जन्म आहेत. मुक्ती मिळत नाही. माझा एंक भाचा मतीमंद आहे. त्याच्या साठी अनेक उपाय झाले. त्यात एका गुरूने सांगितले कि तो मागच्या जन्मीचा भ्रष्ट योगी आहे. योगामार्गावरून मागे फिरला म्हणून या जन्मी असं झालाय. खर खोट देवच जाने. तुमचा अनुभव जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

११० वर्षांपुर्वी, १८०० साली, जगाची लोकसंख्या १०० कोटी होती. आज २०१२ मधे ७०० कोटी पेक्षा जास्त आहे. प्रत्येक शरिरात किमान एक आत्मा असायला हवा हे गृहित धरले तर ६०० कोटी extra आत्मे आलेत कुठुन? का ६०० कोटी इतर प्राण्यांची (मुंग्या, डायनासोर्स, डासे, फकडी, किटकुल) संख्या कमी झाली. फुगत असलेल्या जगाच्या लोकसंख्येत आत्मे येतात कुठुन? का काही काळानंतर आत्मे संपले... जन्म हवा असेल तर बिगर्-आत्म्याने घ्या असा काही सृष्टीचा नियम आहे?
>> नवीन आत्मे तयार होत नाहीत, आत्मे स्प्लिट होत नाहीत, दोन किंवा जास्त आत्म्यांचा मिळून एक आत्मा होत नाही, असलेले सगळे आत्मे कायम जन्माला आलेल्या स्टेट मधे असतात किंवा मृत्यू आणि जन्म ह्यातला कालावधी सारखा असतो (म्हणजे एक माणूस आज मेला तर तो १०० वर्षात जन्माला येतो, म्हणजे जर २०१२ मधे मेलेली सगळी माणसं २११२ पर्यंत जन्माला यायला हवीत) अशी गृहितकं धरली नाहीत तर गणित सुटू शकतं Happy
Light 1

mala sudha punarjanmat khupach interest aahe, RAAJ PICHHALE JANAM KA mi avarjun pahayche, mala sudha hya baddal mahiti havi ahe

आत्मा वगैरे अस्तित्वात नाही. त्यामुळे या गोष्टी खोट्या आहेत. एका शरीरातुन आत्मा बाहेर जातो आणि नवीन शरीर धारण करतो म्हणे ,बघितलाय आत्मा डोळ्यांनी कधी? दिसत नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे वेडेच म्हणावे लागतील.

Er.Rohit,

तुम्ही तुमचे स्वत:चे हृदय, फुफ्फुस, काळीज, इत्यादि अवयव बघितलेत का? आणि डोळ्याने पाहिलेले सगळेच खरे असते हे कशावरून?

आ.न.,
-गा.पै.

गा .पै.,तुमचे सगळे अवयव MRIscan मध्ये तुम्ही बघु शकता, endoscopy केलीत तर तुमचे पोटातले अवयव सहज बघता येतील. तुम्ही दाखवु शकता का,तुमच्या शरीरातला आत्मा.?

अंजन, शेवटच्या सुचना चांगल्या आहेत.

पण त्यामुळे "इथल्या" काही आयडींना खाद्य मिळाले असते ते मिळणार नाही व रोजचे दु:खी आत्मे जे हाच खेळ खेळतात दिवसभर ते तुम्हाला डुआय म्हणून मोकळे झाले असते. त्याने काही फरक नाही पडत म्हणा.
पण बहुधा ते त्यांचे "पास्ट लाईफ फस्ट्रेशन ईवोल्व्ड इन्टू करंट लाईफ" आहे समजून सोडून देवुया.. Proud

बर, मुद्द्यावर बोलायचे तर मध्ये कुठेतरी महेश भट ह्या माणसाची मुलाखत वाचली, तो काहीसे असे ड्रग्स घ्यायचा व सांगायचा की, त्याला असे सर्व मागचे जन्मातले दिसते... आता आठवत नाही.

झम्पी, त्या ड्रग ला "एल एस डी " म्हणत असावेत

रोहित , किर्लीयन फोटोग्राफी आणि आधुनिक एनर्जी मीटर / इन्फ्रा-रेड कॅमेरा इ.साधनांनी मानवी ऑरा / आत्म्याचे अस्तित्व समजू शकते .

पाश्चिमात्य जगतात TAPS "घोस्ट हंटर" नावाची संघटना आहे ,ते बऱ्याच आधुनिक साधनांचा वापर करतात .

डिस्कव्हरी वाहिनी वरील STAN LEE'S superhumans नावाची मालिका कुणी बघता का?
त्यात बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील ......................................................

http://www.history.com/shows/stan-lees-superhumans

मानवी शरिरातुन इलेक्ट्रोमॅग्नेटीक रॅडीएशन बाहेर पडतच असतात, ते आधुनिक उपकरणांद्वारे डीटेक्ट होतात त्यालाच काहीजण चुकुन ऑरा म्हणतात. इथे आत्म्याचा काय संबंध?

Er.Rohit,

>> तुमचे सगळे अवयव MRIscan मध्ये तुम्ही बघु शकता, endoscopy केलीत तर तुमचे पोटातले
>> अवयव सहज बघता येतील. तुम्ही दाखवु शकता का,तुमच्या शरीरातला आत्मा.?

आता कसं बोललात! नुसत्या डोळ्याने अवयव दिसणार नाहीत म्हणून तर एंडोस्कोप वा एमाराय स्कॅनर वापरावा लागतो.

तसाच नुसत्या डोळ्याने दिसणार नाही म्हणून आत्मा पाहण्यासाठी अध्यात्मिक साधना करणे आवश्यक असते.

आ.न.,
-गा.पै.

तसाच नुसत्या डोळ्याने दिसणार नाही म्हणून आत्मा पाहण्यासाठी अध्यात्मिक साधना करणे आवश्यक असते.>>

अर्ग्युमेन्ट म्हणून मान्य

पण स्कॅनिंग करून अवयव दिसतात हे माणसाला स्वतःला अनुभवून तसेच इतरांचे अनुभव ऐकून, पाहून मान्य होते.

अध्यात्मिक साधनेने असे काही कळते हे कुठे सिद्ध होते? Happy

(म्हणजे विश्वासच ठेवणे भाग असे म्हणायचे आहे)

स्कॅनिंगमध्ये प्रत्येकाला/प्रत्येकाचे अवयव दिसतील आध्यात्मिक साधनेत काही दिसले नाही, तर तुमची साधना कमी पडते असे समजायचे असते.

काही गोष्टी स्कॅनिंगमध्ये पण दिसत नाहीत पण असतात उदा. अक्कल,बुद्धी इ. Happy

या गोष्टींसाठी काही वेगळ्या टेस्ट असतात पण त्या सर्वमान्य असतातच असेही नाही.
उदा. एखाद्या माणसाची बुद्धी चित्रकलेत चांगली असेल पण गणितात असेलच असे नाही. ज्या आय क्यू टेस्टमध्ये चित्रकला या आस्पेक्टचा विचार होत नाही तिथे हा माणूस सबनॉर्मल असू शकतो.

तस्मात आपल्याला अवगत असलेल्या साधनांनी कळणार्‍या गोष्टीच फक्त असतात असे नाही.

बाकी अंजनकाका पास्ट लाईफ रिग्रेशनच्या सेशनला जाऊन आले की नाही ?

एका शरीरातुन आत्मा बाहेर जातो आणि नवीन शरीर धारण करतो म्हणे ,बघितलाय आत्मा डोळ्यांनी कधी? दिसत नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे वेडेच म्हणावे लागतील.
----- काही गोष्टी दिसत नाही पण त्यांचे अस्तित्व जाणावता येते. किरणोत्सर्ग (Radiation) तुम्हाला डोळ्यांनी दिसणार नाही पण त्यांचे अस्तित्व सांगता येते आणि ते सर्वांना पडताळुन खात्री करता येते. थोडी जुजबी माहिती असेल, तर (डोळ्यांनी दिसत नसतांनाही) त्याचे वर्गिकरणही करता येते.

Pages