पास्ट लाईफ रिग्रेशन

Submitted by अंजन on 27 April, 2012 - 02:32

इथे पास्ट लाईफ रिग्रेशनचा अनुभव असलेले कोणी आहे का? मी याबद्दल बरेच वाचले आहे. ठाण्यात एक बाई याचे सेशन्स घेतात हे ऐकले आहे. त्यांच्या पुढच्या सेशनला उपस्थित राहायचे ठरवले आहे. पण याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले कोणी ओळखीत नाही किंवा कोणा ओळखीच्या ओळखीतही नाही. म्हणुन इथे विचारायचे ठरवले. जर कोणाला अनुभव असेल तर कृपया लिहा. अर्थात मी स्वतः तर जाणार आहेच पण जायच्या आधी खालिल गोष्टींबद्दल जाणुन घेतले तर थोडी मदत होइल असे वाटते-

१. आधीच्या जन्माच्या आठवणी कितपत स्पष्टपणे दिसतात?
२. या जन्मात आपल्या अवतीभवतीची माणसेच आधीही असतात असे ऐकले. मग ती माणसे आपल्याला कशी ओळखु येतात. की जस्ट आपल्याला अंतप्रेरणा होते की हा जो दिसतोय तो सध्याच्या जन्मात अमुकअमुक आहे म्हणुन?

आणि कृपया -

मी जरी आज सभासद झालोय तरी मी गेली ५ वर्षे रोमातला मायबोलीकर आहे, इथल्या प्रतिसादांशी मी खुपच चांगल्या प्रकारे परिचित आहे. आणि म्हणुन खालील सुचना -

१. ज्यांचा या सगळ्यावर विश्वास नाही त्यांनी इथे येऊन 'हे फाल्तु आहे' हे सांगण्यात आपला वेळ वाया घालवायची गरज नाही. हे फाल्तु आहे की कसे हे जाणण्यासाठी मी माझा वेळ आणि पैसा वापरतोयच. आलेले अनुभव इथे टाकेनच.

२. इथे आल्या आल्या इतके छान मराठी टायपिंग कसे जमतेय ह्याही शंका घेऊ नयेत. मी जरी इथे आजच सभासद झालोय तरी मायबोली ही एकच मराठी साईट नाहीय. माझ्या स्वतःच्या ब्लॉगवर आणि संकेतजालावर इतरत्रही मराठीतुन लिहिण्याची सोय आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निसर्ग नियमानुसार ३ महिने स्प्रिंग (बालपण, योवन ३० वर्ष), ३ महिने समर (प्रोढ ३० वर्ष), ३ महिने फोल (उतारवय ३० वर्ष), ३ महिने विंटर (अनंत ३० वर्ष). ह्यानुसार आत्मा मेल्यानंतर अंदाजे ३० वर्ष नंतर पुन्हा जन्म घेत असावा.

प.पू. दादाजींनी हे असले जादूचे प्रयोग करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जर महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी मिळवून दिले तर इथली समस्त अश्रद्ध जनता त्यांच्या पुढे लोटांगण घालेल.

विस्मृतीमुळे हे शक्य होत नाही. मूळ स्वरूप जाणून घ्यायला नरजन्मच घ्यावा लागतो. तो मिळाल्यावर पुढे साधनाही करावी लागते.>>आत्म्यांना लिंग असते का नर मादी वगैरे.?आत्मा विस्मृतीत का जातो? मुळ स्वरुप जाणुन घ्यायला नरजन्मच का घ्यावा लागतो, ईतर पशु पक्षी देवाचीच रुपे नव्हेत का?

दादाजीं वैशंपायन यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिलेले उघड आव्हान आणि त्याची दखल न घेण्याची डॉ. दाभोळकरांची असलेली नेहमीची पद्धत
१९८५ साली प.पू. दादाजींनी ठरवले होते की, तीन गोष्टी करायला सांगून ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’वाल्यांना ‘जगात ईश्वर असल्याची’ अनुभूती द्यायची. प.पू. दादाजींनी डॉ. नरेंद्र दाभोळकरांना उघड आव्हान दिले होते की,
अ. ‘तुम्ही एका कागदावर कोणत्याही विषयावरील तीन प्रश्न लिहा. ते कागद तुमच्याजवळच ठेवा. मी ते कागद न बघता त्या प्रश्नांची दुसर्याम दिवशी उत्तरे सांगीन, तसेच त्यातील र्हहस्व-दीर्घाच्या चुकाही सांगीन.
आ. १५ चांदीची भांडी घेऊन त्यांत पाणी भरा आणि चमचे ठेवा. आमचे साधक ते पाणी चमच्यांनी ढवळत मंत्रघोष करतील. तीन तासांत पाण्याला केशरी रंग येईल, म्हणजेच ते पाणी विष्णुतीर्थ बनेल.
इ. ५०० माणसे बसतील, असे सभागृह घेऊन त्यात तीन तास मंत्रघोष केल्यानंतर तेथे वायूरूपाने येऊन नागराज स्वयं प्रकट होतील.
वरील सर्व कृती मान्य नसतील,तर २१ दिवसांत तुम्ही करून दाखवा, नाहीतर आम्ही करून दाखवतो, ते मान्य करा. या आव्हानाचा कित्येक दिवस पाठपुरावा करूनही डॉ. दाभोळकरांनी यांवर
कोणत्याच तर्हेाचा प.पू. दादाजींना प्रतिसाद दिला नाही किंवा काही कळवलेही नाही.’>>>>भारीच विनोदी Lol

Er.Rohit,

>> मुळ स्वरुप जाणुन घ्यायला नरजन्मच का घ्यावा लागतो, ईतर पशु पक्षी देवाचीच रुपे नव्हेत का?

हे असं आहे. आणि असंच आहे. हे असं का आहे हे कोणालाही माहीत नाही.

Equipartition of energy का होतं कोणीच सांगू शकत नाही. एखाद्या वस्तूचे तपमान कमी करीत गेल्यास Superconductivity अचानक का उगवते ते कोणालाही माहीत नाही. विजाणू (इलेक्ट्रॉन) अणुगार्भाच्या बाहेर का कोणालाही माहीत नाही. मॅटर आणि अँटिमॅटर एकमेकांचा नाश का करतात कोणालाही ठाऊक नाही.

तसच आत्म्याला स्वरूपसाधनेसाठी नरदेह का धारण करावा लागतो ते कोणालाही माहीत नाही. पुढेमागे कोणी शोधून काढल्यास संगती लावता येईल.

आ.न.,
-गा.पै.

डेलिया,

>> प.पू. दादाजींनी हे असले जादूचे प्रयोग करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जर महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त
>> गावांना पिण्याचे पाणी मिळवून दिले तर इथली समस्त अश्रद्ध जनता त्यांच्या पुढे लोटांगण घालेल.

दादाजी कुणाच्याही बापाचे नोकर नाहीत. का म्हणून दादाजींनी पिण्याचं पाणी मिळवून द्यावं? ती त्यांची जबाबदारी नाही. दादाजींनी जर दुष्काळग्रस्तांना पाणी पुरवायचे तर सरकार हवेय कशाला? तुम्ही सरकारला कर भरताय ना, तर जाब विचारा की!

आ.न.,
-गा.पै.

हे असं आहे. आणि असंच आहे. हेअसं का आहे हे कोणालाही माहीत नाही.
Equipartition of energy का होतं कोणीच सांगू शकत नाही. एखाद्या वस्तूचे तपमान कमी करीत गेल्यास Superconductivity अचानक का उगवते ते कोणालाही माहीत नाही. विजाणू (इलेक्ट्रॉन) अणुगार्भाच्या बाहेर का कोणालाही माहीत नाही. मॅटर आणि अँटिमॅटर एकमेकांचा नाश का करतात कोणालाही ठाऊकनाही.>>>वर उल्लेखलेल्या सर्व वैज्ञानिक गोष्टींचे सर्व ज्ञान कार्यपद्धती वैज्ञानिकांना ठाऊक आहे.electron अणुगर्भाच्या बाहेर आहे कारण अणुगर्भावर +Ve चार्ज तर electronवर -Ve आहे व हे भार मोजता येतात.

Er.Rohit,

>> वर उल्लेखलेल्या सर्व वैज्ञानिक गोष्टींचे सर्व ज्ञान कार्यपद्धती वैज्ञानिकांना ठाऊक आहे

Superconductivity बद्दल काय ठाऊक आहे ते विकीच्या दुव्यावर सापडतं:

The occurrence of the Meissner effect indicates that superconductivity cannot be understood simply as the idealization of perfect conductivity in classical physics.

अतिवाहकतेची (Superconductivity) थियरी अपूर्ण अवस्थेत आहे. तरीपण अतिवाहक चुंबक बनवता येतात. एव्हढच नव्हे तर त्यांच्या सहाय्याने मॅग्लेव्ह ट्रेनही चालवता येते.

आकलन मर्यादित असतांनाही तंत्रज्ञान विकसित करता येतं. तद्वत आत्म्यासंबंधी आकलन मर्यादित असलं तरीही अध्यात्मिकदृष्ट्या उन्नत जिवांच मार्गदर्शन घेतल्यास स्वत:चं मूळ स्वरूप जाणून घेता येतं. हिंदुधर्मियांत अश्या उन्नत जिवांना संत म्हणतात.

आ.न.,
-गा.पै.

The occurrence of the Meissner effect indicates that superconductivity cannot be understood simply as the idealization of perfect conductivity in classical physics.

अतिवाहकतेची (Superconductivity) थियरी अपूर्ण अवस्थेत आहे. तरीपण अतिवाहक चुंबक बनवता येतात. एव्हढच नव्हे तर त्यांच्या सहाय्याने मॅग्लेव्ह ट्रेनही चालवता येते.
----- Superconductivity बद्दलचे संपुर्ण ज्ञान कुणालाही नाही हे मान्य. पण ज्याला Superconductivity परिणाम असे म्हटले जाते तो जगातील प्रत्येक व्यक्तीला (जगात कुठेही) ताडुन बघता येतो. त्याला Superconductivity च्या ज्ञानाची अवशक्ता नाही.

माईस्नर परिणाम मधे मॅग्नेट सुपर-कंडक्टिंग अवस्थेमधे असलेल्या पदार्थावर तरंगतो.
http://en.wikipedia.org/wiki/Meissner_effect
माईस्नर परिणाम किंवा अतिसंवाहकते बद्दल संपुर्ण ज्ञान किंवा आकलन झालेले आहे असे कुणी म्हणत नाही. पण माईस्नर परिणाम जगात सर्वांनाच अनुभवता येतो, बघता येतो. येथे कुठलाही दुसरा अर्थ निघत नाही (सिडनी ऑस्ट्रॅलिया मधे मॅग्नेट ८९ K ला हवेत उडत असेल तर जगात सर्वच ठिकाणी तो ८९ K लाच उडणार - प्रयोग करणारा मायस्नर असेल किंवा ८ वर्षांची मुलगी असेल). येथे जमीन-अस्मानचा फरक आहे.

आकलन मर्यादित असतांनाही तंत्रज्ञान विकसित करता येतं. तद्वत आत्म्यासंबंधी आकलन मर्यादित असलं तरीही अध्यात्मिकदृष्ट्या उन्नत जिवांच मार्गदर्शन घेतल्यास स्वत:चं मूळ स्वरूप जाणून घेता येतं.
----- काही तरी आकलन आहे भले ते मर्यादित असेल... आणि म्हणुन तंत्र सदैव विकसित होत असते. विकास होण्याची प्रक्रिया कधिच पुर्णाअवस्थेत नसते. आत्मा संकल्पना केवळ काल्पनिक आहे.

हिंदुधर्मियांत अश्या उन्नत जिवांना संत म्हणतात.
----- ज्याला कुठल्याही प्रकारचा मोह नाही तो संत. मोहापासुन जो मुक्त आहे तो संत.

<<दादाजी कुणाच्याही बापाचे नोकर नाहीत. का म्हणून दादाजींनी पिण्याचं पाणी मिळवून द्यावं? ती त्यांची जबाबदारी नाही.>>

<<१९८५ साली प.पू. दादाजींनी ठरवले होते की, तीन गोष्टी करायला सांगून ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’वाल्यांना ‘जगात ईश्वर असल्याची’ अनुभूती द्यायची.>>

तुम्ही वर उल्लेख केलेले जादूचे प्रयोग बघून ईश्वराएवेजी जादूगार असल्याची अनूभूती निर्माण होईल. ईश्वर तो जो भुकेलेल्याला अन्न देईल, तहानलेल्याला पाणी देईल. अशी संतशिकवण आहे. म्हणुन ईश्वराची अनुभुती द्यायची ईच्छा असेल तर असले चमत्कार करण्यापेक्षा गरीबांची मदत करावी. अशी संतशिकवण आहे. अता प.पू.दादाजींना हे ज्ञान नसेल असे होणारच नाही ना. मग त्यांना 'चमत्कारांचा' का बरे लोभ जडावा? आणि तहानलेल्यातला ईशवर का दिसू नये??????

जे का रंजले , गांजले,
त्यासि म्हणे जो अपुले,
तोचि संत ओळखावा
देव तेथेचि जाणावा.

--- चमत्कारांच्या नादी लागू नका.

उदय,

१.
>> आत्मा संकल्पना केवळ काल्पनिक आहे.

असूद्यात. Happy काही बिघडत नाही. इलेक्ट्रॉन ही संकल्पना पण काल्पनिक आहे. कधी हा अणुगर्भाच्या भोवती फिरत असतो, तर कधी सुट्टा होऊन (धातूंच्या बाबतीत) पूर्ण पदार्थात पसरतो. कधीकधी तरंगाप्रमाणे वर्तन करतो तर कधी कणांप्रमाणे वागतो. एव्हढं सगळं करूनही तो कोणाला दिसला नाहीये.

मग आत्म्यानेच काय घोडं मारलंय?

२.
>> येथे कुठलाही दुसरा अर्थ निघत नाही (...). येथे जमीन-अस्मानचा फरक आहे.

असा फरक आहेच. इंद्रियगम्य विषयात इंद्रियांद्वारे दिसलेला पुरावा ग्राह्य मानायचा असतो. इंद्रियातीत ज्ञानाच्या बाबतीत शब्द प्रमाण मानायचा असतो.

अध्यात्माच्या बाबतीत वेगळ्या साधकांनी वेगळा अर्थ लावला तरी चालू शकतं. कारण प्रत्येकाची साधना वेगळी असणार आहे. अर्थात दोघांचं अंतिम फलित एकाच असतं ते म्हणजे आत्मज्ञान.

साधी गोष्ट आहे.

आ.न.,
-गा.पै.

डेलिया,

अ.नि.स.चे लोक देवबिव झूट आहे असं उघडपणे म्हणतात हे आपण ऐकलं असेल. त्याचा प्रतिवाद केलाच पाहिजे. याकरिता अनिसच्या लोकांचा पाठपुरावा केला तर त्याला जादूगिरी म्हणत नाहीत. त्याला धर्माचं अस्तित्व सिद्ध करणं असं म्हणतात.

दादाजी जादूगार नव्हते, नाहीत आणि त्यांनी कधीच असा दावा केला नाहीये. ते जे करणार होते त्या क्रियेला जादू म्हणत नाहीत. दादाजींना ईश्वराची अनुभूती सर्वसामान्य लोकांना आणवून द्यायची नाहीये. ती अनिस नावाच्या नास्तिकांना आणून द्यायची आहे. म्हणून हा खटाटोप.

त्यातूनही त्यांच्या दारी कोणी भुकेला, तहानेला आला तर त्याला अन्नपाणी मिळेल.

आ.न.,
-गा.पै.

इलेक्ट्रॉन, सुपरकंडक्टर्स अशा आधुनिक वैज्ञानीक संकल्पनांशी आत्म्याची तुलना करणे केवळ हास्यास्पद आहे. इलेक्ट्रॉन, सुपरकंडक्टर्स यांच्या अस्तित्वाचे पुरावे देणारे शेकडो प्रयोग आहेत आणी ते करण्यासाठी श्रद्धा वगैरे लागत नाही.

सनातनचा कांगावाखोरपणा जुनाच आहे. अंनिस चे एक लाखाचे बक्षीस अगदीच किरकोळ आहे. अमेरिकेतील जेम्स रँडी यांनी दहा लाख डॉलर्स चे बक्षीस लावले आहे. त्यांच्या समोर चांदीच्या भांड्यातले पाणी मंत्रघोषाने केशरी करून दाखवले तर सर्वांचीच बोलती बंद होईल.

असले प्रयोग करणारे संत असतील तर जादुगार के लाल हे महान संत होते असे म्हणावे लागेल.

>> आत्मा संकल्पना केवळ काल्पनिक आहे.

असूद्यात. काही बिघडत नाही. इलेक्ट्रॉन ही संकल्पना पण काल्पनिक आहे. कधी हा अणुगर्भाच्या भोवती फिरत असतो, तर कधी सुट्टा होऊन (धातूंच्या बाबतीत) पूर्ण पदार्थात पसरतो. कधीकधी तरंगाप्रमाणे वर्तन करतो तर कधी कणांप्रमाणे वागतो. एव्हढं सगळं करूनही तो कोणाला दिसला नाहीये.

मग आत्म्यानेच काय घोडं मारलंय?
-------- इलेक्ट्रॉन कोणाला दिसला नाही आहे, पण त्याचे अस्तित्व पदोपदी जाणवते... उदा: घरांत ४ वर्षाच्या लहानग्याने किंवा ९० वर्षांच्या आजोबांनी विजेचे बटन दाबल्यावर प्रकाश पडतोच. लहानगा इलेक्ट्रॉन बाबत पुर्ण अज्ञानी असेल. डोळ्याच्या मर्यादा आहेत, पण अस्तित्व तर पदो-पदी जाणावते आहे. मग अभ्यासुन काही नियम तयार केले जातात. इलेक्ट्रॉन ते सर्व नियम अत्यंत काटेकोर पणे पृथ्वीवर तसेच अवकाशांत सर्वत्र पाळत असतो. नियम चुकीचे आहेत असे जाणवले, ते सिद्ध केले तर नव्या नियमांना आत्मसांत करण्याची तयारी शास्त्राचे अभ्यासक ठेवतात... अर्थात हे अंतिम सत्य कदाचित नसेल, पण त्याकाळांतले ते सर्वात उत्तम स्पष्टिकरण असते म्हणुन स्विकारले जाते.

आत्म्याच्या बाबत असे काही नियम नाही आहेत. त्याचे अस्तित्व दाखवता येत नाही, सिद्धही करता येत नाही. जो पर्यंत अस्तित्व दाखवता येत नाही, दिसत नाही, सिद्धही होत नाही तो पर्यंत त्याला कल्पना विलास म्हणणे अयोग्य ठरणार नाही.

अ.नि.स.चे लोक देवबिव झूट आहे असं उघडपणे म्हणतात हे आपण ऐकलं असेल.
------ देवाने अस्तित्व सिद्ध केले तर अनिसचे लोकं सर्वात आधी नमस्काराला पुढे येतील. देव खरा असेल तर त्याला स्वत:च्या मुर्तीचे रक्षण का नाही करता आले? चोरांनी मुर्ती पळवली, देवाने पळवू दिली, चोरांनी मुर्ती वितळवली, मुर्ती पुर्णतः वितळली (मुर्ती धातू ची होती आणि वितळली हे होणे नैसर्गिक होते - त्यात आष्चर्य वाटत नाही.)... लाखो लोकं श्रद्धेने नमस्काराला यायचे मग देवाने अस्तित्व का नाही दाखवले?

इलेक्ट्रॉन ही संकल्पना पण काल्पनिक आहे. कधी हा अणुगर्भाच्या भोवती फिरत असतो, तर कधी सुट्टा होऊन (धातूंच्या बाबतीत) पूर्ण पदार्थात पसरतो. कधीकधी तरंगाप्रमाणे वर्तनकरतो तर कधी कणांप्रमाणे वागतो. एव्हढं सगळं करूनही तो कोणाला दिसला नाहीये.>>>ईलेक्ट्रॉनचे वस्तुमान अचुक मोजता येते.wave particle duality चे बरेचसे स्पष्टीकरण quantum mechanics मध्ये दिले गेले आहे.

मग आत्म्यानेच काय घोडं मारलंय?>>> आत्मा सिद्ध करुन दाखवा.मगच हा प्रश्न विचारा.

vijaykulkarni,

१.
>> इलेक्ट्रॉन, सुपरकंडक्टर्स अशा आधुनिक वैज्ञानीक संकल्पनांशी आत्म्याची तुलना करणे केवळ
>> हास्यास्पद आहे.

का बरं? अध्यात्मात तात्त्विक चर्चा होणं स्वाभाविक आहे. तशीच विज्ञानातही होते. कारण विज्ञान मुळातून तत्त्वज्ञानस्वरूपी आहे. हे आयझॅक न्यूटन यांचं म्हणणं होतं. अर्वाचीन तत्त्वज्ञांपैकी कार्ल पॉपर हेच म्हणतो.

२.
>> इलेक्ट्रॉन, सुपरकंडक्टर्स यांच्या अस्तित्वाचे पुरावे देणारे शेकडो प्रयोग आहेत आणी ते करण्यासाठी
>> श्रद्धा वगैरे लागत नाही.

मी कुठे या गोष्टींचं अस्तित्व नाकारलंय? मी एव्हढंच म्हणतो की या गोष्टींचं आकलन मर्यादित आहे. पुढे म्हणेन की, केवळ मर्यादितच नाही तर परस्परविरोधीही आहे.

मागे एके ठिकाणी इलेक्ट्रॉनला काल्पनिक म्हंटलं होतं. त्याचा मथितार्थ असा की, इलेक्ट्रॉन ही एक अमूर्त कल्पना आहे. या कल्पनेचा प्रत्यय कधी कण म्हणून येतो तर कधी तरंग म्हणून येतो. हे दोन्ही प्रत्यय परस्परविरोधी आहेत.

३.
>> सनातनचा कांगावाखोरपणा जुनाच आहे.

तुम्हाला सनातन संस्था म्हणायचं आहे का? पण ही संस्था तर इ.स.१९९९ साली स्थापन झालीये. आणि दादाजींचा प्रयोग इ.स.१९८५ सालचा होता.

४.
>> अमेरिकेतील जेम्स रँडी यांनी दहा लाख डॉलर्स चे बक्षीस लावले आहे. त्यांच्या समोर चांदीच्या
>> भांड्यातले पाणी मंत्रघोषाने केशरी करून दाखवले तर सर्वांचीच बोलती बंद होईल.

संत लोक उघड आव्हान पैसे कमावण्यासाठी स्वीकारत नाहीत. केवळ धर्मास बळकटी यावी हाच हेतू असतो. अशांना १० कोटी डॉलर्सही कस्पटासमानच आहेत.

आ.न.,
-गा.पै.

उदय,

१.
>> इलेक्ट्रॉन कोणाला दिसला नाही आहे, पण त्याचे अस्तित्व पदोपदी जाणवते...

अगदी हेच आत्म्यासंबंधी पण म्हणता येते. आत्मा शरीराशी लिप्त नसेल तर देह मृत होतो.

२.
>> इलेक्ट्रॉन ते सर्व नियम अत्यंत काटेकोर पणे पृथ्वीवर तसेच अवकाशांत सर्वत्र पाळत असतो.

माझा काटेकोर या शब्दावर आक्षेप आहे. स्थूल (classical) जगात विज्ञानाचे नियम काटेकोर असतील, पण सूक्ष्म (quantum level) पातळीवर अनिश्चितता मध्ये घुसते. किंबहुना तशी ती असायलाच हवी. हायझेनबर्गचे अनिश्चिततेचे तत्त्व हे पुंजावादाचे (quantum mechanics) एक मूलभूत अंग आहे.

३.
>> नियम चुकीचे आहेत असे जाणवले, ते सिद्ध केले तर नव्या नियमांना आत्मसांत करण्याची तयारी शास्त्राचे
>> अभ्यासक ठेवतात... अर्थात हे अंतिम सत्य कदाचित नसेल, पण त्याकाळांतले ते सर्वात उत्तम स्पष्टिकरण
>> असते म्हणुन स्विकारले जाते.

मान्य!

४.
>> आत्म्याच्या बाबत असे काही नियम नाही आहेत.

आहेत. आत्मज्ञान होण्यासाठी योग आचरावा लागतो. अष्टांग योगाचे सांगोपांग नियम आहेत. या प्रणालीप्रमाणे साधना करावी लागते.

५.
>> त्याचे अस्तित्व दाखवता येत नाही, सिद्धही करता येत नाही.

आत्म्याचे अस्तित्व इंद्रियांना दाखवता येत नसले तरी अनुमानाने ताडता येते. ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉन डोळ्याला दिसला नाही तरी त्याचं अस्तित्व सिद्ध करता येतं त्याप्रमाणे आत्म्याचं अस्तित्व पदोपदी जाणवतं.

६.
>> घरांत ४ वर्षाच्या लहानग्याने किंवा ९० वर्षांच्या आजोबांनी विजेचे बटन दाबल्यावर प्रकाश पडतोच.
>> लहानगा इलेक्ट्रॉन बाबत पुर्ण अज्ञानी असेल.

आत्म्याच्या बाबतीतही असंच म्हणता येईल. तुमच्या स्वत:च्या पचनयंत्रणेवर तुमचं काहीही नियंत्रण नाही. एकदा का घास तोंडातून आत सारला की दुसरीच कोणतरी एजन्सी त्याचा ताबा घेते. त्या अन्नातून सत्त्व शोषून घेते आणि मल शरीराबाहेर टाकते.

ज्याअर्थी गेले कित्येक वर्षे ही क्रिया अव्याहतपणे चालू आहे, त्याअर्थी ती कोणाच्यातरी नियंत्रणाखाली आहे. त्या नियंत्रकाचं नाव आत्मा.

आपल्या विधानातल्या लहानग्याप्रमाणेच बहुतांश लोक आत्म्याबद्दल अज्ञानी असतात.

७.
>> देव खरा असेल तर त्याला स्वत:च्या मुर्तीचे रक्षण का नाही करता आले?

खरा देव तत्त्वरूपी आहे. मूर्ती वितळल्याने तत्त्वास बाधा येत नाही. तरीपण अर्थातंच, सगळ्या मूर्ती फोडून टाकल्या पाहिजेत असं म्हणणं चुकीचं आहे.

आ.न.,
-गा.पै.

Er.Rohit

१.
>> ईलेक्ट्रॉनचे वस्तुमान अचुक मोजता येते

हो, येत असेल. नाही असं नाही. पण म्हणून सर्व उपाध्या (attributes) मोजता येत नाहीत. हायझेनबर्गच्या अनिश्चिततेच्या तत्त्वानुसार त्याचा संवेग (momentum) आणि जागा (position) एकाच वेळी अचूकपणे मोजता येत नाहीत. याचा अर्थ इलेक्ट्रॉनसंबंधी आपल्या आकलनात काहीतरी मूलभूत त्रुटी आहेत.

आत्म्याला वस्तुमान, विद्युद्भार, इत्यादि उपाध्या नाहीत म्हणून त्याचं अस्तित्व नाकारावं का?

अधिक खोलात जाऊन म्हणायचं झालं तर इलेक्ट्रॉनचं वस्तुमान हे rest mass म्हणून मोजलं जातं. आता व्यवहारात इलेक्ट्रॉन स्थिर कधीच नसतो. मग rest mass of electron ही अमूर्त संकल्पनाच नव्हे काय? तरीपण कुणीतरी जर एखादा इलेक्ट्रॉन स्थिर केलाच, तर अनिश्चिततेच्या तत्त्वानुसार त्याच्या संवेगात (momentum) प्रचंड चढउतार होतील. आता संवेग म्हणजे वस्तुमान गुणिले वेग, बरोबर? तर मग स्थिर इलेक्ट्रॉनचं वस्तुमान पराकोटीचं अनिश्चित असेल. कारण स्थिर इलेक्ट्रॉनचा वेग सुनिश्चित आहे. आणि तो ० आहे. मग rest mass of electron या संज्ञेला काय अर्थ राहिला?

हा शब्दच्छ्ल नाही. इलेक्ट्रॉनविषयीच्या मानवी आकालनावरील मर्यादांचा लेखाजोखा आहे.

२.
>> wave particle duality चे बरेचसे स्पष्टीकरण quantum mechanics मध्ये दिले गेले आहे.

कणतरंगसंदिग्धता (wave particle duality) ही हायझेनबर्गच्या अनिश्चिततेच्या तत्त्वाचाच परिपाक आहे. कणाची जागा निश्चित मानली जातो, त्यामुळे त्याचा संवेग अनिश्चित असतो. याउलट तरंगाचा वेग निश्चित असतो, त्यामुळे त्याची जागा सुनिश्चित नसते.

शेवटी अनिश्चिततेचं तत्त्व समोर येतंच. आणि याच तत्त्वामुळे सूक्ष्म जगताचं स्थूल दृष्टीने आकलन करता येत नाही. किंवा केलं तरी ते अत्यंत मर्यादित होतं. याचं कारण म्हणजे मानवी इंद्रियांच्या मर्यादा फार त्रोटक आहेत.

आत्मा तर इंद्रियातीत आहे. त्यामुळे त्याचं स्थूल वैज्ञानिक (classical) आकलन अशक्य आहे.

आ.न.,
-गा.पै.

गा.पै., तुम्ही विचार करुन, वाचुन, समजुन लिहिताहात याबद्दल दाद द्यायला हवी.

> कारण विज्ञान मुळातून तत्त्वज्ञानस्वरूपी आहे. हे आयझॅक न्यूटन यांचं म्हणणं होतं. अर्वाचीन तत्त्वज्ञांपैकी कार्ल पॉपर हेच म्हणतो.

विज्ञान तत्वज्ञानस्वरुपी आहे हे अमान्य. जी गोष्ट विज्ञानाच्या कसोट्यांवर उतरते, ती (ते) विज्ञान.
कोणी (उदा. न्युटन, पॉपर, आईनस्टाईन) काही म्हंटले म्हणुन एखादी गोष्ट सत्य (वा असत्य) बनत नाही.
(पहा: http://www.maayboli.com/node/34282)

ईलेक्ट्रॉन्स वगैरेचे मॉडेल्स असतात. ईलेक्ट्रॉन खरच अस्तीत्वात आहे का हा प्रश्न गौण आहे. त्या मॅथेमॅटीकल मॉडेलच्या ईंटरअ‍ॅक्शन बद्दल इक्वेशन्स मांडता येतात, आणि त्यांच्याप्रमाणे ते वागतात.

>> अमेरिकेतील जेम्स रँडी यांनी दहा लाख डॉलर्स चे बक्षीस लावले आहे. त्यांच्या समोर चांदीच्या
>> भांड्यातले पाणी मंत्रघोषाने केशरी करून दाखवले तर सर्वांचीच बोलती बंद होईल.

संत लोक उघड आव्हान पैसे कमावण्यासाठी स्वीकारत नाहीत. केवळ धर्मास बळकटी यावी हाच हेतू असतो. अशांना १० कोटी डॉलर्सही कस्पटासमानच आहेत.
------ संत लोकांना पैसे कस्पटासमानच आहेत हे मान्य, पण ते एक दमडी न घेता असे करु शकतात. जेम्स रँडीचे दहा लाख गरजवंतांमधे विभागा/ वाटा... धर्मास बळकटी येईल, अंधश्रद्धा दुर होतील, सर्व विरोधकांची बोलती बंद होतील.

इलेक्ट्रॉन ते सर्व नियम अत्यंत काटेकोर पणे पृथ्वीवर तसेच अवकाशांत सर्वत्र पाळत असतो.

माझा काटेकोर या शब्दावर आक्षेप आहे. स्थूल (classical) जगात विज्ञानाचे नियम काटेकोर असतील, पण सूक्ष्म (quantum level) पातळीवर अनिश्चितता मध्ये घुसते. किंबहुना तशी ती असायलाच हवी. हायझेनबर्गचे अनिश्चिततेचे तत्त्व हे पुंजावादाचे (quantum mechanics) एक मूलभूत अंग आहे.
----- नियम काटेकोर पणे पाळतो... जे काही नियम, तत्व आहेत ते तो काटेकोरपणे पाळतो. अनिश्चितते संबंधीचे नियम आलेत.

आत्म्याचे अस्तित्व इंद्रियांना दाखवता येत नसले तरी अनुमानाने ताडता येते. ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉन डोळ्याला दिसला नाही तरी त्याचं अस्तित्व सिद्ध करता येतं त्याप्रमाणे आत्म्याचं अस्तित्व पदोपदी जाणवतं.
------ इलेक्ट्रॉन च्या अस्तित्वाबाबत १० उदाहरणे अगदी सहज देता येतील. तुम्हाला माहिती असलेली आत्म्याच्या अस्तित्वाबाबत ३ (जास्ती मिळाल्यास चालतील) उदाहरणे कृपया सांगणार कां? पचन यंत्रणा आणि आपले नियंत्रण नसणे (म्हणजेच पर्यायाने आत्मा कंट्रोलर आहे) हे एक उदाहरण तुम्ही दिलेले आहेच अशी अजुन २ सांगा.

शेवटी अनिश्चिततेचं तत्त्व समोर येतंच. आणि याच तत्त्वामुळे सूक्ष्म जगताचं स्थूल दृष्टीने आकलन करता येत नाही. किंवा केलं तरी ते अत्यंत मर्यादित होतं. याचं कारण म्हणजे मानवी इंद्रियांच्या मर्यादा फार त्रोटक आहेत.
------ सुक्ष्म जगांत तुम्ही स्थान (position) आणि संवेग (momentum) एकाच वेळी अत्यंत अचुकपणे मोजू शकत नाही. मोजलीच तर दोघांच्या अनिस्चिततेचा गुणाकार १०^-३४ असेल. आता येथे मानवी इंद्रियांच्या मर्यादा का आल्यात, त्यांचा संबंध कसा येतो हे समजले नाही.
मानवी इंद्रियांच्या मर्यादा आहेत त्या पेक्षा वेगळ्या असत्या तर हे अनिश्चिततेच्या तत्वात बदल झाला असता? असा अर्थ होतो. मानवाच्या मर्यादा भले काही असोत १०^-३४ बदलणार नाही. येथे मानवाच्या मर्यादांचा संबंध येत नाही.

गा.पै., तुम्ही विचार करुन, वाचुन, समजुन लिहिताहात याबद्दल दाद द्यायला हवी.
------ सहमत.... टोकाचे मतभेद आहेत पण दाद द्यायलाच हवी.

>>> गा.पै., तुम्ही विचार करुन, वाचुन, समजुन लिहिताहात याबद्दल दाद द्यायला हवी.

+१

गा.पै. यांचा विज्ञान व अध्यात्म या दोन्हींचा अभ्यास दांडगा आहे यात शंकाच नाही.

>>> अमेरिकेतील जेम्स रँडी यांनी दहा लाख डॉलर्स चे बक्षीस लावले आहे. त्यांच्या समोर चांदीच्या भांड्यातले पाणी मंत्रघोषाने केशरी करून दाखवले तर सर्वांचीच बोलती बंद होईल.

अध्यात्म हे अभ्यासू व जिज्ञासूंसाठी आहे. ते स्वतः प्रयत्न न करता निव्वळ आव्हान देणार्‍या नास्तिकांसाठी नाही. एखादा नास्तिक खरोखर जिज्ञासू असेल तर तो आधी तो 'देव म्हणजे काय' ही संकल्पना शोधायचा प्रयत्न करेल व अथक प्रयत्नानंतर जर त्याला देव सापडला नाही तर तो अधिकारवाणीने 'देव नाही' असा ठाम दावा करू शकेल. पण स्वतः अजिबात प्रयत्न न करता समोरच्याला आव्हान देणार्‍यांना आस्तिक कधीही प्रतिसाद देणार नाहीत. चांदीच्या भांड्यातले पाणी मंत्राने केशरी करून दाखविणे इतक्या क्षुद्र गोष्टींकरता आस्तिक आपली अध्यात्मिक शक्ती कधीही पणाला लावणार नाहीत. याबाबतीत पाण्यावरून चालण्याची सिद्धी प्राप्त करणार्‍या एका योग्याला स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी दिलेले उत्तर सुप्रसिद्ध आहे. पण एखाद्याने खर्‍याखुर्‍या जिज्ञासेने देव शोधण्याची इच्छा व तयारी दाखविली तर तो नास्तिक असला तरी आस्तिक नेहमीच त्याला त्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आपली शक्ती पणाला लावतील.

ज्याचा देव या संकल्पनेवर विश्वासच नाही त्याला कितीही पुरावे दिले तरी त्याचा विश्वास बसणार नाही आणि ज्याचा या संकल्पनेवर विश्वास आहे त्याला कोणत्याही पुराव्यांची गरज नाही.

पास्ट लाईफ रिग्रेशन चा अनुभव मी घेतलेला आहे..

पण इथे ते अनुभव सांगून वाद ओढवून त्यावर वादावादी करण्या इतका मला वेळ नाही.. ज्यांना उत्सुकता आहे ते विपुतून बोलू शकतात

गाडी नेहेमीप्रमाणेच भरकटलेली आहे...

तरिही कुणी पास्ट लाईफ री चे अनुभव ईथे लिहीले तर वाचायला आवडेल. मुळात पूर्वजन्मीचे काही आठवणे किंवा भविष्यातील काही गोष्टी दिसणे हे "रोमांचकारी" वाटते. त्यातही पहिली गोष्ट शक्य वाटते (तोच आत्मा, त्याच आठवणी घेवून पुनः जन्माला वगैरे आला अशा थियरी वर विश्वास ठेवला तर) पण भविष्यातील पहाणे हे मात्र कुठल्याही तर्काच्या बाहेरचे वाटते.. पण अशा गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात. सभोवतालचे वातावरण तुमच्या सूक्ष्म जाणीवा वा आठवणी (संवेदना?) जागृत करायला वा जिवंत ठेवायला किती पुरक आहे यावरून असे अनुभव कमी जास्ती प्रमाणात येत असावेत असे वाटते.
ऊ.दा: एखाद्या निर्जन, शांत ठिकाणी अगदी बारीक आवाज देखिल लगेच ऐकू येतो एरवी शहरातील गोंगाटात शेजारचा शिंकला तरी ऐकू येईलच असे नाही-- तसेच काहीसे.
कधी असे होते की आपण एखाद्या नविन जागी जातो, व्यक्तीला भेटतो तेव्हा आधी कुठेतरी ही जागा पाहिली आहे, कीम्वा या व्यक्तीला पाहिले आहे/भेटलो आहोत असे काहीसे वाटते... तो अनुभव त्या प्रसंगापुरता जर खराखुरा आहे असे मानले तर मग पास्ट लाईफ रिग्रेशन देखिल शक्य आहे/सत्य आहे या तर्काला आधार मिळतो.

बाकी ते अंनिस आणि ईतर अध्यात्मिक बुवाबाजी या दोन्ही गोष्टी देखिल आज ईतक्या डिस्टोर्टेड स्वरूपात समोर येतात की सगळेच खोटे वाटू शकते. पण पास्ट लाईफ रिग्रेशन सारख्या प्रयोगातून एकंदर जीवशास्त्र/विज्ञान या अनुशंगाने पुढे काही फायदेशीर तपास्/निश्कर्ष/प्रगती करता येत असेल जी नव्या प्रयोग/सिध्दांत/पुरावे यावर प्रकाश टाकत असेल तर तर तसा विचार वा प्रयोग मुळात नाकारायची गरज नाही... ज्यांना त्यात रस आहे ते पुढे जातीलच...

या जन्मातील ज्या चांगल्या/वाईट गोष्टींचा कार्यकारण भाव सापडत नाही त्याला "गेल्या जन्मीच्या पापाची/पुण्याची फळे भोगणे" आणि याच जन्मातील वाईट कृतींपासून परावृत्त करायला "नरकात जाशील किंवा पुढचा जन्म क्ष क्ष क्ष क्ष चा येईल" अशा सर्रास वापरल्या जाणार्‍या भावनिक ब्लॅकमेलिंग ला धर्म,संस्कृती,पुराणे, ई. ई.. च्या गुंत्यात अडकवून मनुष्य स्वतःचीच रोज फसवणूक करून घेत असतो हे खरेच. त्यामूळे मूळ मुद्दा बाजुला रहातो आणि निव्वळ गुंता वाढत जातो.. जसे या बाफ चे चालू आहे Happy

योग,

खरंतर हा बाफ स्वानुभावांशी निगडीत आहे. त्यामुळे आधुनिक विज्ञानाचे स्वरूप उलगडून सांगणे विषयबाह्य आहे. मात्र आत्म्याच्या अस्तित्वाच्या मूळ गृहितकाला धक्का लागल्याने प्रतिवाद करणे आवश्यक पडते. शिवाय आक्षेपक प्रश्नकर्ते भावनिक ब्लॅकमेलिंगला बळी पडणारे वाटत नाहीत.

'गाडी भरकटली आहे' हे तुमचं निरीक्षण एका अर्थी बरोबर आहे. मात्र ती का भरकटली ते बघायला पाहिजे.

जे आक्षेप अध्यात्मावर घेतले जातात तेच निकष आधुनिक विज्ञानाला लागू केल्यास परिस्थिती फारशी वेगळी नाही असे दिसते. हा माझा युक्तिवाद आहे. गाडी परत रुळावर यावी अशी आशा व्यक्त करतो! Happy

आ.न.,
-गा.पै.

aschig,

१.
>> विज्ञान तत्वज्ञानस्वरुपी आहे हे अमान्य. जी गोष्ट विज्ञानाच्या कसोट्यांवर उतरते, ती (ते) विज्ञान.
>> कोणी (उदा. न्युटन, पॉपर, आईनस्टाईन) काही म्हंटले म्हणुन एखादी गोष्ट सत्य (वा असत्य)
>> बनत नाही.

वैज्ञानिक कसोट्या नेमक्या काय आहेत यावर वैज्ञानिकांचं आणि तत्त्ववेत्त्यांचं एकमत नाही. मर्यादानिश्चीती हे (आधुनिक) वैज्ञानिक तत्त्वज्ञानातलं एक न सुटलेलं कूट आहे.

सांगण्याचा मुद्दा काय आहे की वैज्ञानिक कसोट्यांची निश्चिती हा तात्त्विक प्रश्न आहे. नेमक्या याच कारणामुळे विज्ञानाकडे 'अंतिम सत्य' म्हणून न पाहता 'एक विशिष्ट तत्त्वज्ञान' या कोनातून बघितले पाहिजे.

२.
>> ईलेक्ट्रॉन्स वगैरेचे मॉडेल्स असतात. ईलेक्ट्रॉन खरच अस्तीत्वात आहे का हा प्रश्न गौण आहे. त्या
>> मॅथेमॅटीकल मॉडेलच्या ईंटरअ‍ॅक्शन बद्दल इक्वेशन्स मांडता येतात, आणि त्यांच्याप्रमाणे ते वागतात.

मला आत्म्याबद्दल अगदी हेच म्हणावंसं वाटतं. आत्मा खरोखरच अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न गौण आहे. मात्र तो विशिष्ट रीतीने व्यक्त होतो. ती रीत पाळून (भक्तियोग, कर्मयोग, इ.) योग साधल्यास आपण स्वत: आत्मस्वरूपी आहोत याचं जाणीवरूपी ज्ञान होतं.

इलेक्ट्रॉन गणिती समीकरणाप्रमाणे वागतो हे खरंय. मात्र त्यासाठी सामुग्रीची (setup) गरज असते. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये तो तरंगासारखा वागेल. तर निर्वातनलिकेत (vacuum tube) तो कणासारखा वागेल. त्याचप्रमाणे आत्मतत्त्व मानवी शरीरात एके प्रकारे वागेल, तर वनस्पतीत वेगळ्या प्रकारे वागेल.

असो.

शेवटी एव्हढंच सांगतो की एक पर्यायी दृष्टीकोन उपलब्ध आहे. तो कितपत अंगिकारावा हे प्रत्येकाने स्वत:चं स्वत:च ठरवावं. मात्र त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष साधना करून अनुभूती घेणे. याकरिता कुलदैवताच्या नामजपाचा फायदा होतो. तो नामजप करणं सर्वात महत्त्वाचं आहे.

आ.न.,
-गा.पै.

उदय,

१.
>> जे काही नियम, तत्व आहेत ते तो काटेकोरपणे पाळतो. अनिश्चितते संबंधीचे नियम आलेत.

'अनिश्चिततेचे नियम काटेकोरपणे पाळणे' हे परस्परविरोधी विधान आहे. Happy या प्रकारच्या विरोधाभासाला इमॅन्युअल कांट या तत्त्वज्ञाने antinomy असे संबोधले आहे.

त्याच्या युक्तीवादाप्रमाणे अनिश्चिततेचा नियम इलेक्ट्रॉनने पाळला तर मोजमापात काटेकोरपणा येणं अशक्य. आणि जर मोजमापात काटेकोरपणा असेल तर त्यास अनिश्चितता म्हणत नाहीत!

२.
>> पचन यंत्रणा आणि आपले नियंत्रण नसणे (म्हणजेच पर्यायाने आत्मा कंट्रोलर आहे) हे एक उदाहरण
>> तुम्ही दिलेले आहेच अशी अजुन २ सांगा.

कार्ल पॉपरच्या असत्यीकरणाच्या मताची (थियरीची) मदत घेतो. तिच्यानुसार :

Logically, no number of positive outcomes at the level of experimental testing can confirm a scientific theory, but a single counterexample is logically decisive...

आत्माबित्मा अस्तित्वात नाही अशी तुमची थियरी (मत) आहे. या मताचा निरास करण्यासाठी केवळ एक उदाहरण पुरेसे ठरायला हरकत नसावी. तरीपण आजून दोन उदाहरणे देतो.

आर्यभट्टाने सांगितले की पृथ्वीपासून सूर्य १०८ सौरव्यास दूर आहे, तर चंद्र १०८ चांद्रव्यास इतका दूर आहे. हे ज्ञान त्याला अध्यात्मिक साधनेमुळे झाले. त्याकाळी अग्निबाणांच्या सहाय्याने पृथ्वीबाहेर जायची सोय नव्हती. आजून एक उदाहरण म्हणजे आयुर्वेद. हे शास्त्रंच मुळी आत्मज्ञानातून उद्भवलेले आहे. त्यातले पित्त, वात आणि कफ हे शरीरातील त्रिदोष उघडपणे दिसत नाहीत. मात्र त्यांचा प्रभाव जाणवतो.

३.
>> सुक्ष्म जगांत तुम्ही स्थान (position) आणि संवेग (momentum) एकाच वेळी अत्यंत अचुकपणे
>> मोजू शकत नाही. मोजलीच तर दोघांच्या अनिस्चिततेचा गुणाकार १०^-३४ असेल. आता येथे मानवी
>> इंद्रियांच्या मर्यादा का आल्यात, त्यांचा संबंध कसा येतो हे समजले नाही.

माझ्या डोळ्यांचं रेझोल्युशन जर १०^-४० SI units असतं, तर स्थानाची अनिश्चितता प्रचंड प्रमाणावर उणावली असती. साहजिकच संवेगीय अनिश्चितता आणि स्थानीय अनिश्चितता यांचा गुणाकार आजून कमी झाला असता. जो अन्यथा १०^-३४ SI units आहे.

थोडं वेगळ्या शब्दांत मांडायचं झालं तर स्थान आणि संवेग या इंद्रियगम्य गोष्टी आहेत. त्या एकाच वेळी पाहायला जाणं शक्य नाही. म्हणून अनिश्चिततेचं तत्त्व हे मानवी इंद्रियांच्या मर्यादा दाखवतं असं म्हणता येईल.

आ.न.,
-गा.पै.

>>थोडं वेगळ्या शब्दांत मांडायचं झालं तर स्थान आणि संवेग या इंद्रियगम्य गोष्टी आहेत. त्या एकाच वेळी पाहायला जाणं शक्य नाही. म्हणून अनिश्चिततेचं तत्त्व हे मानवी इंद्रियांच्या मर्यादा दाखवतं असं म्हणता येईल.

परफेक्ट!!!!

Pages