२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो!

हटकेश्वर हटकेश्वर!! तिकडे बेकरीकर बघात धडाधड गटग करुन मोकळेही होतात. आपण ठरवा ठरवीत अडकलो आहोत.. शोनाहो!!! Happy

शेड असलेल्या स्टेट पार्कांची चौकशी करायला सुरवात करा कृपया>>> आणि त्यादिवशी पाऊस पडला तर? ही शक्यतापण विचारात घ्या.

मृणची आयड्या आवड्या. 'आमचं' 'स्मोकिज' गटग झालं होतं तसं काही करता येइल Happy

सगळे ग्रीनिचला येता का ? फेरी बोट + बीच गटग करु.

अरे किती त्या चर्चेच्या फेरी झडताहेत... तारखा आहेत तर हॉल नाही. हॉल आहे तर लोक नाही.. काय चाललय काय. आमच्यासारख्या शेवटच्या मिनीटाला एवेएठिला येण्यार्‍यांनी कसे प्लॅनिंग करायचे मग.
ठरवा की पटपट.. मे महिना म्हणजे मस्त असेल, घरा बाहेर भेटायला हरकत नाही. कोणाचे बॅकयार्ड मिळणार नाही का?

काही हरकत नाही. टाळकी जमली तर परवडेल. खरं १० टाळकी आली तरी जमेल पण तारिख बदललल्यामुळे कदाचित जास्त लोकं जमतील. सांगा रे पटापट! नाहीतर हे पण जायचं हातचं.

बुवा, १२ मे माझ्या क्लबहाऊसबद्दल बोलतोय ना आपण?
बरं, आधी $२०० बुकींग ज्यांना चालेल त्यांनी हो म्हणा म्हणजे तारखेचं बघते.

रुनि... चर्चा केल्याशिवाय १००० पोष्टी पडणार कश्या?

सायो... १२ मे ला किती गडी जमतात बघ.. २००/२० = १० बर्‍याच लोकांना चालतील.. २००/७ = २५ बर्‍याच लोकांना चालणार नाहीत..

मला १२ मे चालेल.. Happy

Pages