२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केस विस्कटतात. <<< पण डोक्याला सोडून तर जात नाहीत ना? (पु.ल.देशपांडे) Proud

जमेल तर काय.. ठरलं की मी Booking करेन.. Happy

पकडुन कोणी येत नाय देसायनू. Happy
२१ तार्खेला हॉल हवा असल्यास पैसे भरायची काही शेवटची तारिख असेल तर इथे लिहा.

हो हो. चला आता हॉल ठरवुन टाका.
मेनु
१. अ‍ॅपेटायझर - बटाटे वडे, कांदा भजी ,भेळ,पाणीपुरी
२. भाज्या
३. भात,बिर्यानी,पुलाव
४. चिकन डिश
५. फिश करी/फिश फ्राय
६. चपाती, पोळी, ब्रेड
७. लोणचे, पापड, रायता
८. डिझर्ट - आयस्क्रीम, गुलाबजामुन, जिलेबी, रसगुल्ले...
९. केक
१०. रंगीत पाणी.
११. सॉफ्ट ड्रिंक्स.
१२. पेपर प्लेट्स, नॅपकिन, काटे, चमचे, कप्स

काही राहिलय का? Happy

खरंच येणार होते, पण आता तिकिटं लई म्हाग आहेत. तेव्हा येणं रहीत. ३० मार्च ते ५ मार्च जरा बर्‍या किमती होत्या. असो, पुढलं एवेएठी लवकर ठरलं तर महिनाभर आधी तिकिटं काढून ठेवीन.

३० मार्च ते ५ मार्च जरा बर्‍या किमती होत्या. असो, पुढलं एवेएठी लवकर ठरलं तर महिनाभर आधी तिकिटं काढून ठेवीन.

३० मार्च २०१२ ते ५ मार्च २०१३ ? मृ, चहा घेऊन येच आधी . तुझं काही खरं नाही आज Happy

देसायनू, हॉल बूक करुन टाका! लोकं जमतात आणि नाही जरी जमले तरी येतील त्या टाळक्यांवर फार भार नाही पडायचा.

फचिन मामा येइलच. सप्रि आणि बिल्वाला आग्रहाचं आमंत्रण द्या. म्हणजे त्या येतील. अजय आणि असामी शेवटल्या दिवशी आम्ही येतो म्हणतात. ते आले की भावना येतील. मेनुमध्ये पेशल \चहा आहे अशी दवंडी द्या, बेडेकर येतील. बरीच टाळकी झाली.

डिपॉजिट जप्त वगैरे होतं असं काहीसं आठवतय मला. तसं असेल तर तेही लिहा देसायनू. कार्यक्रम क्यान्सल होणार नाहीच पण झाला तर मंडळी तुम्हाला लटकत सोडणार नाहीयेत. Happy

बुवा,
मी ल्हिलेला मेनु वर डकवुन टाका. आणि अपडेट करत रहा.. Happy
बिल्वा येते आहे, सप्रीला पण घेवुन ये. Happy

मृ तै,
तिकीटावर नजर ठेवा. कधी कधी लास्ट मिनिट डिल मिळुन जाते. Happy
बुवा,
बीबी तुम्ही उघडला ना. मग हि जबाबदारी तुमची. नीट पार पाडा. Happy

सप्री, नाव नोंदणी करा.

अरे सगळा मेनु कुठे सांगितला रे भौ.
अरे ते सजेशन असते रे बावा. म्हणुन तर अपडेट करत रहा बोल्लो ना मी. Happy
आता शेपु कुठुन आली?. (कुठे फसवायला बघते?? Happy )

नको, नको प्रायोजक छाप थीम नको प्लीज .
अस्सल मराठमोळा मेनू ठरवा - रावण पिठलं , बटाटेवडे, भाकरी, वांग्याचं भरीत , मठ्ठा, जिलबी, मसालेभात , सुरळीच्या वड्या, मालवणी चिकन / फिश

Pages