२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीतर पहिली तारीख पडलीय>> ओ.. बर्‍याच तारखा पडुन गेल्याती. बघिटल न्हाय का. मागे जावुन बगुन या. हि फायनाल हायती. लवकर बुक करुन टाका. नायतर म्हाग घ्यावी लागतील हां. Happy

जास्त दिवस वाट नै देखनेका रे. नै तो कही ऐसा न हो जाये. Happy

उम्र-ए-दराझ माँग के लाये थे चार दीन
दो आरजु में कट ​​गये, दो इंतज़ार में

मी म्हंटलो तो हॉल नाही जमायचा, खुपच महाग आहे.
Type of Rental Member Non-Member
Function (up to 6 hours) $300 $425

लवकर चौकशी करा रे हॉल ची आपापल्या नेबरहुडात.

ही पहिली पक्की तारीख आहे हो भाई>>>> म्हणून नाव पण वसंत-ग्रीष्म असं अ‍ॅम्बिग्युअस दिलंय :p झालं तर झालं वसंतात, नाहीतर ग्रीष्मात होईल :p

अरे पण सायो नै तर देसाईंच्या हॉलमध्ये का नको ? खुर्च्या टाकून बसता येतं. शिवाय वृतांतात उ उ वि सुरु असताना खुर्चीतुन पडलो/पडले अशी वाक्य टाकता येतात.

वृत्तांताचे माहित नाही पण ती सनम बेवफा हे गाणं नाचा सकट सादर करणार आहे असं ऐकलं म्हणून म्हंटल बागेत नको करायला. Proud

भाई, अहो ह्या आशा टायमावर पोस्टी टाकून तुम्ही काय उगाच सगळ्यांच्या डोक्याला भुंगा लावताय! Proud

देसायांचे $१२५ वाला हॉल परवडेबल वाटतोय. मंडळी, लवकर सांगा काय करायचं ते. पार्कात जमायचे असेल तर काही प्रश्न नाही पण मला वाटतं पार्कात सुद्धा शेड, बेंचेस वगैरे राखून ठेवायचे असतील तर सांगावे लागेल.

मला हॉल, बाग काहीही चालेल. आर्च झंपीबाईम्ना घेऊन येणार असेल तर दोघींना बघायच्या उत्सुकतेमुळे मी माझं येणं आत्ताच कन्फर्म करतेय.
सिंडी, चांदनीटाईप पांढरे कपडे घालून नाच, गा.

अहो या वयात मला काय काय करायला लावायच्या गप्पा करताएत तेव्हा तर देव आला नाही आता तुम्हाला नुसतं बघायचं तर देव येणारे होय Wink

मंडळी बुधवार पर्यंत नक्की करुन टाका वेन्यू म्ह़ए मेन्यु वगैरे कडे लक्ष देता येइल. १०-१२ दिवसात थंडी कमी होणार आहे का? नसेल तर हॉल मध्येच करुयात गटग.
देसाई, बुधवार पर्यंत नक्की सांगितलं तर जमेल ना हॉलचे बुकिंग करायला?

मला स्वतःला बाहेर एवेएठि नक्कीच आवडेल पण थंडी असली की मजा जाते. १-२ दिवसांत ठरवून टाकू मात्र.

हालातच बरं आहे. पार्कात वारं-बिरं असलं की मजा जाते. थंडी वाजते. बोललेलं ऐकु येत नाही. पार्कात आलेल्या कॅटींचं आणि डॉगांचं फर उडून पाण्यात पडतं. प्लेटी स्वतःला विमान समजतात. मेनुत भेळ ठेवता येत नाही. फवारा चिवडा नावाला जागतो. केस विस्कटतात.

Pages