Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता:
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात
तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.
मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे
९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि
माहितीचा स्रोत:
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
jamli ka mandali? amhi 1
jamli ka mandali? amhi 1 tasat pochu.
मिसळ, मलई बर्फी झाली की नाही
मिसळ, मलई बर्फी झाली की नाही ? खायच्या आधी फोटो टाकून ( आम्हांला नैवेद्य दाखवा
) मगच खा 
कार्यक्रम नेहमी सारखाच
कार्यक्रम नेहमी सारखाच दणक्यात पार पडला! खाण्याची प्रचंड रेलचेल होती! खाऊन आणि बोलून दमायला झालय.
आता वृत्तांत येऊ द्या!
हेसाई! हुमी होस्टं होते ह्या हुळे हुमचा ह्रुत्तांत हालाच हाहिजे, हुठल्याही हरिस्थितीत, हां!!!
हहमत!!!!
हहमत!!!!
हाहा
हाहा
एबाबा, तुम्हाला टाटा करता
एबाबा, तुम्हाला टाटा करता नाही आला तुम्ही मधेच साईड मारून सुमडीत गायब झाल्यामुळे.

येत जा एवेएठि ला. मजा आली गप्पा मारायला!
बिल्वा, सप्रि, एक मुलगी, नाईक ह्या माबो तरुण रक्त आयड्यांनी कृपया वृत्तांत लिहायचं बघा. रोमात १० वर्षापासून आहोत ही सबब चालणार नाही.
नाईक तर ए वे ए ठि ला पण
नाईक तर ए वे ए ठि ला पण रोमातच होते असे मला वाटले
येत जा एवेएठि ला. मजा आली
येत जा एवेएठि ला. मजा आली गप्पा मारायला! >> मला पण! जमल्यास नक्की येईन!! आणि येण्याचे जमवीन
मै एबाबा
मै
एबाबा
श्री-सौ. देसायांच्या अत्यंत
श्री-सौ. देसायांच्या अत्यंत आगत्यशील आदरातिथ्यासह एविएठी अत्यंत धूमधडाक्यात पार पडलं.
मैत्रेयीकडलं मायक्रो-मिनि गटग पण सॉलिड धमाल! मी मैत्रेयीच्या भावलीच्या प्रेमात!!!!
वृत्तांताची वाट बघू नका. पुढल्या खेपी येण्याचं बघा.
आत्ताच जरा वेळापूर्वी घरी पोचले. नेहमीप्रमाणे विमानांचे गोंधळ होऊन नेवर्कहून जाणार्या फ्लाइटचा बोर्डिंगपास हातात घेऊन उभे असता अचानक फ्लाइट डिले-कनेक्टिंग फ्लाइट हुकणे-म्हणून नवी फ्लाइट लाग्वार्डियाहून घ्यावी लागणं, लंडटनलजवळची (आणि इतरत्र) तुफान गर्दी- या विमानतळावर पोचायला सव्वातास, मॅनहॅटन्-ब्रुकलिन्-ब्रॉग्झ्-क्वीन्स्-चायनाटाऊन करत एकदाचं विमान गाठणं आणि फायनली घरी पोचणं असा कार्यक्रम झाला.
मंडळी इन्क्लुडिन्ग मी-
मंडळी इन्क्लुडिन्ग मी- सुस्तावलेली दिसताय्त!! आज काही रहदारी नाही इथे?
मुख्य गटग अन पुन्हा चमन कडे अजून एक, नंतर पुन्हा मृण, लालू, रुनीबरोबर मिनि गटग.. किमान ३६ तास माबोमय... बडबडबड्बड....मला तर आता जाम हॅन्गओवर झाल्यासारखे वाटत आहे
>>मला तर आता जाम हॅन्गओवर
>>मला तर आता जाम हॅन्गओवर झाल्यासारखे वाटत आहे
खरंच, किती बोललो! आणि किती खाल्लं. (आता उद्यापर्यंत निपचीत पडावं.)
सप्रि मी अन अजय माझ्या घरून
सप्रि मी अन अजय माझ्या घरून १२ मे ला सकाळी ७ ला निघालो तिथपासून १३ मे ला दुपारी १२ वाजता मी घरी पोचेस्तोवर असं २९ तासांच गट्ग त्यातले ४ झोपेचे तास सोडले तर अखंड गप्पा अन खाणं.
सिंडी (अन फॅमिली) च अगत्यपूर्वक आदरातिथ्य - ईड्ली सांबार्/सात्विक मूगाचे खिचडी/पोहे/फ्रूट कस्ट्र्ड ..न काय काय
....फक्कड चहा न बक्क्ळ गप्पा..तिचं घर आमचं इन्स्टंट माहेर म्हणून जाहीर करण्यात आलय .
सगळ्या सद्य अन भावी माबोकरांना भेटून मजा आली.पहिल्यांदा भेटतोय असं मूळीच वाटलं नाही. बाराकरांचा गटग चा उत्साह अमेझिंग आहे.
काही उंच-दिवे ( मराठीत हाय लाईट्स
-श्री अन सौ देसाई चे गटग चे संयोजन झकास होते. सगळे खाण्याचे पदार्थ ( मासे सोडून - मी खाल्ले नाहीत ) चविष्ट झाले होते. बिल्वाचं आम्रखंड नंबर वन!
-बाई, एबाबा न भाईंची गाणी मस्त झाली..
-हेसाई -हनिल्भाईचा "हुहुहि" हमाल होता...हगळे हसून हसून हमलो.
-एबाबा नी त्यांचा पहिलावहिला ऊऊवि या गटग मध्ये सादर केला.
-अजयनी सध्याच्या माबोवरच्या "धावण्या-पळण्याच्या " वातावरणाला साजेसं एक "पळ" गीत सादर केलं.
-वेमांसोबत प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम ( मूळ अजेंडावर नसूनही) संपन्न झाला.
-चमन सरांकडचं मिनी गटग सायो च्या बशीतल्या मेंबरानी मिस केलं
बोस्टन्कर कनेटिक्टात तर मृ-लालू-रूनी एन्जे त रात्रभर मुक्कामी होते. त्यामूळे ह्या गटग ला "एवेअठि कल्लोळ "म्हणून जाहीर करण्यात यावे अशी विनंती माबो प्रषासनाला करण्यात येत आहे !
श्री-सौ. देसायांच्या अत्यंत
श्री-सौ. देसायांच्या अत्यंत आगत्यशील आदरातिथ्यासह एविएठी अत्यंत धूमधडाक्यात पार पडलं.>>>>>> +१०!
श्री व सौ देसायांका विजय असा!
चलचित्रांची वाट पाह्त आहे.
चलचित्रांची वाट पाह्त आहे.
हँग ओव्हर संपला का?. पटापट
हँग ओव्हर संपला का?.
पटापट पोस्टी टाका. सगळ्यानी आपापले हायलाईट टाका.
"हुहुहि" - हा हेसाई ह्यानी हिहीला होता.
>>>> श्री-सौ. देसायांच्या
>>>> श्री-सौ. देसायांच्या अत्यंत आगत्यशील आदरातिथ्यासह एविएठी अत्यंत धूमधडाक्यात पार पडलं.
+१०
(विनय, माझी डाव (पळी) तुझ्याकडे राहिली.
:P)
श्री. व सौ देसाई, सौ. व श्री.
श्री. व सौ देसाई, सौ. व श्री. मैत्रेयी तसेच श्री. व सौ. चमन यांच्या अगत्यशील आदरातिथ्यासह एवेएठि धुमधडाक्यात पार पडलं.

भाई, फोटो पाठवा की.
भाई, फोटो पाठवा की.
आर हा आर्च चा डुप आयडी नाहिय
आर हा आर्च चा डुप आयडी नाहिय ना?.
माझ्याकडे फक्त खादाडीचे फोटो आहेत. बाकी चांगले आले नाहीत. विनय कडे आहेत फोटो.
-बाई, एबाबा न बाई ची गाणी
-बाई, एबाबा न बाई ची गाणी मस्त झाली..>> बाईंच नाव फक्त दोनदा. तिनदा लिहायच असत ना?.
वेमांचं गाणं चमनला डेडिकेट
वेमांचं गाणं चमनला डेडिकेट केलं होतं ना?
बाई वाचा बरे ए.मु. चा
बाई वाचा बरे ए.मु. चा वृत्तांत
>>>>अजयनी सध्याच्या माबोवरच्या "धावण्या-पळण्याच्या " वातावरणाला साजेसं एक "पळ" गीत सादर केलं
प्रॅडी, वाच बरे वरची (बदललेली
प्रॅडी, वाच बरे वरची (बदललेली :P) पोस्ट.
वाचली प्रॉम्प्टली बदललीत.
वाचली
प्रॉम्प्टली बदललीत.
बाईना वेमाबद्दल नाही माझ्या
बाईना वेमाबद्दल नाही माझ्या बद्दल लिहायच होत.
भाई खादाडीचे फोटो येऊद्यात.
भाई खादाडीचे फोटो येऊद्यात.
देसायांकडचे मेगा गटग, चमनकडचे
देसायांकडचे मेगा गटग, चमनकडचे मिनी गटग आणि सिंडीकडचे मायक्रो गटग तिन्ही खूप जोरदार झाले. सतत तोंड चालवणे हाच हायलाईट - एकतर बडबड्/खिदळणे किंवा खाणे.
श्री-सौ. देसायांच्या अत्यंत
श्री-सौ. देसायांच्या अत्यंत आगत्यशील आदरातिथ्यासह एविएठी अत्यंत धूमधडाक्यात पार पडलं>>> +१००
ध मा ल गटग झालं. एकसेएक खाण्याचे पदार्थ होते. लोलाची मिसळ जहबहरीही!! सायोचा मसालेभात, सिंडींची वांग्याची भाजी, स्वातीने आणलेली अळूची भाजी, सौ. देसाईंची अनमासे करी ( :)) , वृंदाताईंची "च्यामारी" बिस्कीटं सगळेच पदार्थ मस्त. मृ चा फ चौ चि तर क्लासच. माझ्या लिष्टीतला टॉपचा पदार्थ म्हणजे रूनीचा सखुबत्ता!! आणि श्री. देसायांची सोलकढी!
देसाईंचा हुहुहि, एबाबांचा उउवि आणि भाईंचं मायबोली गाणं एक नंबर! स्वातीचं गाणं ऐकण्याचा पहिल्यांदाच योग आला. सु रे ख आवाज आहे तुझा. वेमांनी पण गाणं गायलं? कधी?
अरेरे, मी मिसलं मग ते. 
भाई: ते भाई लिहायचं होतं,
भाई: ते भाई लिहायचं होतं, चुकून बाई परत लिहलं ( वरती सुधारणा केलीय).
Pages