२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेन्यूचा एकच फोटो टाका मग १००० नक्की होतील.
मग, आता प्रत्येक माबोकराचा एकेक असा खातांनाचा क्लोजअप फोटो नावासहित टाकतो असे (फक्त) म्हणा, मग १०००० पोस्टी होतील Proud

चमन Lol

सौजन्य- वृंदाताई

जिलेबी
jilbi.JPG

फदफदे
fadafade.JPG

मुडदुशे कालवण
mudadushe.JPG

खमंग काकडी
khaka.JPG

देसाई आणि सौ देसाईंचे आभार. सगळं आयोजन एकदम झ्याक होतं.
जेवणही अप्रतिम. टेबल इतकं गच्च भरलेलं की कित्येक पदार्थ मी खाल्लेही नाहीत असं माझ्या लक्षात आलंय आत्ताच.

>> फदफद्यातले काजु दिसताहेत स्वाती.
बघा! त्यांना सांगावं लागलं नाही! Proud

>> माका मातश्ये मातश्ये कोकणी येता.
म्हणजे 'मला मासे खाण्यापुरतं कोकणी येतं' का? Proud

अरे वा! मस्तच ..

स्वाती, तू फदफदं ( अळूच्या पातळ भाजीची) रेसिपी कुठे लिहिली आहेस का? ह्यासाठी इकडे मिळतं ते वड्यांचं अळूच वापरलं का? तिकडे आंबट चुका मिळतो का? आमच्याकडे तरी नाही मिळत .. मग अळूत चिंच घातली का आंबटपणाला? (ह्या सगळ्या प्रश्नांची त्वरीत उत्तरं दे नाहीतर ... :p)

१. रेसिपी लिहिलेली नाही
२. वड्यांचंच अळू वापरलं. (ते शिजवण्याआधी तेलावर परतून घेतल्यामुळे छान मिळून आलं.)
३. चुका मिळत नाही.
४. चिंच घातली.

Proud

भाई मुद्दाम मिसळीचा फोटो टाकत नाही आहेत. माझ्याकडे नाही. नाहीतर मी टाकला असता.
आता लोक विसरुन गेले की यांचे फोटो येणार.. तोवर बुवांची फूडच्या गटगची घोषणाही येईल. Sad

Pages