[*] सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

मूळचे सात विंग्ज असलेले सेल्युलर जेल.
२६ फेब्रुवारी १९६६ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मार्पण केले. त्यामुळे २६ फ़ेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन! सुमारे शतकापूर्वी, म्हणजे ४ जुलै १९११ ला सावरकरांना ज्या सेल्युलर जेलमध्ये बंदिस्त केले गेले ते बंदिगृह आज राष्ट्रीय स्मारक आहे. ज्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झालेले आहेत असे हजारो भारतीय दरवर्षी यात्रेकरूप्रमाणे येऊन कृतज्ञतापूर्वक त्याचे दर्शन घेतात आणि नंतर अंदमानच्या पर्यटनाला जातात. सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांबद्दल मला उपलब्ध झालेली माहिती संक्षिप्त रूपात देत आहे. वाचकांना याशिवाय कांही अधिकृत माहिती असेल तर अवश्य नोंदवावी. १९०६ पासून हे नवे जेल वापरले जाऊ लागले. १९३८ सालानंतर अंदमानला राजकीय कैदी पाठवणे पूर्णपणे बंद केले गेले. त्यानंतर जेलचा एक विंग जिल्हा कारागार म्हणून वापरला जाऊ लागला. श्री. गोविन्दराव हर्षे हे मराठी गृहस्थ १९ वर्षे या बंदिगृहाचे बदिपाल होते. या बंदिगृहाला भेट देणाऱ्यांना त्यांची खूप मदत होत असे. स्वातंत्र्योत्तर काळात सशस्त्र क्रांतिकारकांना राज्यकर्त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केले. त्यामुळे सेल्युलर जेल पाडून तेथे हॉस्पिटल बांधण्याच्या योजनेला बिनदिक्कतपणे सुरुवात केली गेली. त्या बंदिगृहात २२५ बंगाली, ६७ पंजाबी, २० उत्तर प्रदेशी, नंतर कांही बिहारी, ,काही आसामी, तर फक्त तीन मराठी क्रांतिकारकांनी यातना सोसल्या होत्या. त्यातील हयात क्रांतिकारकांनी वा त्यांच्या वारसांनी व्यथित होऊन त्या बंदिगृहाचे स्मारकात रुपांतर करण्याची मागणी केली. २७ मे १९६७ रोजी श्री. विश्वनाथ माथुर यांच्या कलकत्त्यातील निवासस्थानी सेल्युलर जेलमध्ये राजबंदी म्हणून ज्यांनी शिक्षा भोगली अशा आठ जणांनी अंदमान-स्वातंत्र्यसैनिक संघटना स्थापन केली.
५ नोव्हें१९६७ च्या बैठकीत सेल्युलर जेल पाडायला सुरुवात झाल्याच्या बातम्या आल्याने पाडापाडी थांबवून त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावे ही आणि हयात अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन द्यावी अशा मागण्या शासनाकडे करण्याचे ठरवण्यात आले. निखिल गुहा रॉय (अध्यक्ष), विश्वनाथ माथुर (जनरल सेक्रेटरी), बंगेश्वर रॉय (असिस्टंट सेक्रेटरी), बिनय बोस(खजिनदार) असे पदाधिकारी निवडून कामाला सुरुवात झाली. ६ एप्रिल १९६८ रोजी ५६ सह्यांचे निवेदन पंतप्रधान इंदिरा गांधीना देण्यात आले. राजकीय पक्षांनाही या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आवाहन केले गेले. ५ मे १९६८ रोजी भूपेश गुप्तांनी लोकसभेत अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांच्या या मागण्या मांडल्या. एन सी चतर्जी, सौ रेणू चक्रवर्ती आणी निरेन घोष या खासदारांनी अंदमानला भेट दिली आणि नंतर पंतप्रधानांना निदान उरलेल्या तीन विंग्ज न पाडण्याबद्दल आग्रह धरला. प्रत्येक देशभक्तासाठी सेल्युलर जेल हे पवित्र स्थान आहे हे त्यांनी आग्रहाने मांडले. इंद्रजीत गुप्तांनीही आग्रह धरला. जेल पाडले जात असल्याबद्दल निषेधाच्या सभा ठिकठिकाणी झाल्या. मार्च १९६९ मध्ये संघटनेचे पदाधिकारी अंदमानला जाऊन आले.
८ एप्रिल १९६९ ला त्यांनी इंदिराजींची भेट घेऊन मागण्या मांडल्या. इंदिराजींनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
३० एप्रिल १९६९ ला शासनाने पुढील चार वर्षांमध्ये उरलेल्या सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा केली.
२ ऑक्टोबर १९६९ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देण्याचे शासनाने मान्य केले.
१५ ऑगस्ट १९७२ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपत्रेही देण्यात आली.
२६ जानेवारी १९७४ ला अंदमानात शिक्षा भोगून आलेल्या ९६ स्वातंत्र्यसैनिकांनी अंदमान- यात्रा केली आणि जेथे यमयातना भोगल्या त्या जेलचे दर्शन घेतले. राष्ट्रीय स्मारक तयार हॊण्यास प्रत्यक्षात १९७९ हे वर्ष उजाडावे लागले.११ फ़ेब्रुवारी १९७९ ला पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे उदघाटन केले.
[*] सेल्युलर जेल नष्ट होऊ नये आणि त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावे म्हणून केल्या गेलेल्या प्रयत्नांविषयी वाचा इथे: http://hridyapalbhogal.hubpages.com/hub/Andaman-Cellular-Jail-Kaala-Paan...
Truth deficiency
Truth deficiency syndrome'(TDS)
पतीतपावन मंदिर. आहे त्या
पतीतपावन मंदिर.
आहे त्या मंदीरांत येऊ नका.
आम्ही तुम्हाला एक नवे 'मंदीर' बांधून देऊ.
वर तोंड करून सांगू की हे 'सोशल इक्वॅलिटीचे प्रतिक' आहे.
रच्याकने: तो पां.स.साने तिकडे उपोषण करीत होता पंढरपूरात, अन हे विनायकराव इकडे मंदीर बांधत होते..
<<नाही, नाही.
<<नाही, नाही. काँग्रेस
फक्त
भारतातल्या भ्रष्टाचार,
गुन्हेगारी, जातीयवाद,
दंगली, लुटालूट,
लांगूलचालन इ. लोकल
गोष्टींना जबाबदार.
इतक्या बिझी लोकल
गोष्टीतून ग्लोबल
वॉर्मिंगला त्यांना वेळ
तर मिळायला पाहिजे
ना!>> हो , एकदम करेक्ट ,कमळाच्या राज्यात तर सामान्य लोक सोन्याचांदीच्या ताटामध्येच जेवायचे आणि हिर्याने दात टोकरायचे.
ईतकी सुबत्ता बघुन जगातल्या ईतर देशांनी भारतावर आक्रमण करु नये म्हणुन जनतेने काँग्रेजी सरकार निवडुन दिले.
<<रच्याकने: तो
<<रच्याकने: तो पां.स.साने
तिकडे उपोषण करीत
होता पंढरपूरात, अन हे
विनायकराव इकडे मंदीर
बांधत होते..>> साने गुरुजींचा एकेरी उल्लेख करु नका. ते तळमळीने चांगले कार्य करायचे. इतरांसारखा प्रचारकी थाट नसायचा त्यांचा.
<<पतीतपावन मंदिर. आहे त्या
<<पतीतपावन मंदिर.
आहे त्या मंदीरांत येऊ नका.
आम्ही तुम्हाला एक नवे 'मंदीर' बांधून देऊ.
वर तोंड करून सांगू की हे 'सोशल इक्वॅलिटीचे प्रतिक' आहे.>>
सावरकरांनी विठ्ठलाच्या मंदिरात पूर्वास्प्रुश्यांना प्रवेश मिळवून दिला होता तसेच आंबेडकरांच्या महाड व नाशिकच्या सत्याग्रहाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे तुमचा वरील 'आहे त्या मंदीरांत येऊ नका.' हा आरोप फोल ठरतो.
साने गुरुजींचा एकेरी उल्लेख
साने गुरुजींचा एकेरी उल्लेख करु नका. ते तळमळीने चांगले कार्य करायचे. इतरांसारखा प्रचारकी थाट नसायचा त्यांचा.>>>> सहमत ! पण यांच्याकडुन वेगळी अपेक्षाच नाही
>>साने गुरुजींचा एकेरी उल्लेख
>>साने गुरुजींचा एकेरी उल्लेख करु नका. ते तळमळीने चांगले कार्य करायचे. इतरांसारखा प्रचारकी थाट नसायचा त्यांचा.>>>>
आमच्याकडे पूज्य दैवताला 'अहो देव' म्हणत नाहीत. श्रीरामाला, 'तो' राम असे प्रेम/भक्तीभावाने म्हणतात. यूपीच्या भैय्यांसारखे राम"जी" नाही.
>>सहमत ! पण यांच्याकडुन वेगळी अपेक्षाच नाही <<
तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमचे अवतार कार्य नाही. तेव्हा अपेक्षापूर्तीची अपेक्षा घेऊन 'पुढच्या दारी' जावे. धन्यवाद
>>सावरकरांनी विठ्ठलाच्या
>>सावरकरांनी विठ्ठलाच्या मंदिरात पूर्वास्प्रुश्यांना प्रवेश मिळवून दिला होता तसेच आंबेडकरांच्या महाड व नाशिकच्या सत्याग्रहाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे तुमचा वरील 'आहे त्या मंदीरांत येऊ नका.' हा आरोप फोल ठरतो.<<
वेगळे मंदीर बांधायची गरज का पडली??
तुमच्या अपेक्षा पूर्ण
तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमचे अवतार कार्य नाही. तेव्हा अपेक्षापूर्तीची अपेक्षा घेऊन 'पुढच्या दारी' जावे.
( वाक्याचा कॉपि राइट घेऊन ठेवा ! )
<<सावरकरांनी विठ्ठलाच्या
<<सावरकरांनी विठ्ठलाच्या मंदिरात
पूर्वास्प्रुश्यांना प्रवेश
मिळवून दिला होता तसेच
आंबेडकरांच्या महाड व
नाशिकच्या सत्याग्रहाला पाठिंबा दिला होता.
त्यामुळे तुमचा वरील 'आहे
त्या मंदीरांत येऊ नका.'
हा आरोप फोल ठरतो.>> तुमच्या दाव्याच्या समर्थनासाठी लिंक द्या.
<<वेगळे मंदीर बांधायची गरज का पडली?? >>ज्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे ते कालच निरुत्तर झाले आहेत, त्यामुळे ते ईकडे फिरकनार नाहीत.
तुमच्या अपेक्षा पूर्ण
तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमचे अवतार कार्य नाही. तेव्हा अपेक्षापूर्तीची अपेक्षा घेऊन 'पुढच्या दारी' जावे. धन्यवाद>>>> हेच उत्तर मिळणार याची अपेक्षा नव्हे तर खात्री मात्र नक्कीच होती, त्यामुळे त्याला फाट्यावर मारण्याची तयारी आम्ही आधीच ठेवलेली होती.
जेम्स बाँड, लोकसंख्या इतकी
जेम्स बाँड,
लोकसंख्या इतकी वाढली आहे तरीही लोकांनी पोरं काढायचा उद्योग थांबवला आहे का? तद्वत नवी मंदिरे बांधण्यात येणारंच.
तुमच्यासारख्या धर्मद्रोह्याला अध्यात्मिक परंपरा समजावून सांगण्यात आम्हाला काडीइतकाही रस नाही. मात्र ज्याला खरोखरच प्रक्रिया जाणून घ्यायची आहे त्याने त्या मंदिराशी संपर्क करून शंकानिरसन करून घ्यावे.
आ.न.,
-गा.पै.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे एक
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे एक जुने प्रकाशचित्र. या महान स्वातंत्र्ययोद्ध्याला विनम्र अभिवादन!!!
>>आमच्याकडे पूज्य दैवताला
>>आमच्याकडे पूज्य दैवताला 'अहो देव' म्हणत नाहीत. श्रीरामाला, 'तो' राम असे प्रेम/भक्तीभावाने म्हणतात. यूपीच्या भैय्यांसारखे राम"जी" नाही.
मग शिवाजी, संभाजी, तानाजी, जिवा महाले आणि अशाच अनेक ऐतिहासिक लोकांचा उल्लेख भक्तिभावाने "तो" असा केला तर चालेल ना ? (तुमची परवानगी विचारत नाहीये, कृपया गैरसमज करून घेऊ नये).
महेश बरिक जामोप्या सोडले तर
महेश
बरिक जामोप्या सोडले तर बाकीचे सगळे डुआय आहेत. स्वतःचं नाव लपवण्याची आणि स्वतःच्या नावाने येण्याची ज्यांना लाज वाटते त्यांच्या लायकीबद्दल न बोललेलेच बरे. बरं भेटायला बोलावलं तेव्हा इब्लिसमियाँ पळून गेले. बाकीचेही भेटणार नाहीतच.
>>मग शिवाजी, संभाजी, तानाजी,
>>मग शिवाजी, संभाजी, तानाजी, जिवा महाले आणि अशाच अनेक ऐतिहासिक लोकांचा उल्लेख भक्तिभावाने "तो" असा केला तर चालेल ना ? (तुमची परवानगी विचारत नाहीये, कृपया गैरसमज करून घेऊ नये).
मग गांधीजी कशाला? ह्यांच्या लेखी ते पूज्य आहेत ना? मग मोहनदास म्हणा की
त्यांना काही फरक पडत नाही ते
त्यांना काही फरक पडत नाही ते बापुंनाही मोहनदास किंवा मोहन्या म्हणायला कमी करणार नाहीत.
<महेश बरिक जामोप्या सोडले तर
<महेश
बरिक जामोप्या सोडले
तर बाकीचे सगळे डुआय
आहेत. स्वतःचं नाव
लपवण्याची आणि
स्वतःच्या नावाने
येण्याची ज्यांना लाज
वाटते
त्यांच्या लायकीबद्दल न
बोललेलेच बरे. बरं
भेटायला बोलावलं
तेव्हा इब्लिसमियाँ पळून
गेले. बाकीचेही भेटणार
नाहीतच.>>मायबोलीने तुम्हाला थेट पंतोजि म्हणुन नियुक्त केले आहे काय?
<<त्यांना काही फरक पडत नाही
<<त्यांना काही फरक पडत
नाही .'ते'
बापुंनाही मोहनदास
किंवा मोहन्या म्हणायला
कमी करणार नाहीत.>>ते, ते, ते, मग तुम्ही काय 'हे' आहात काय?.
ते, ते, ते, मग तुम्ही काय
ते, ते, ते, मग तुम्ही काय 'हे' आहात काय?.>>> आलात ना आपल्या पातळीवर ?
"ते, ते, ते" आणि "हे, हे, हे"
"ते, ते, ते" आणि "हे, हे, हे" सोडून "आपण" केव्हा आणि कसे होणार याचा विचार करूयात का ? बघा निट विचार करून सांगा.
ते, ते, ते, मग तुम्ही
ते, ते, ते, मग तुम्ही काय
'हे' आहात काय?.>>>
आलात
ना आपल्या पातळीवर ?>>दुसर्यांची पातळी ठरवायला अधिकार तुम्हाला कोणी दिला, पंतोजिंनी?
तुमची पातळी तुम्हीच सिद्ध
तुमची पातळी तुम्हीच सिद्ध केलीत जेम्स बाँड, दुसर्यांनी ठरवायची गरजच काय?
महेश, काय तुम्ही पण दगडावर डोके आपटताय?
विशाल, यांना प्रत्यक्ष
विशाल, यांना प्रत्यक्ष भेटायला बोलावायचं का?
<<"ते, ते, ते" आणि "हे, हे,
<<"ते, ते, ते" आणि "हे, हे, हे"
सोडून "आपण"
केव्हा आणि कसे होणार
याचा विचार करूयात
का ? बघा निट विचार
करून सांगा.>>"कोडगा अंध धर्मवाद ,संघाची भाटगिरी ,अंधश्रद्धा, प्रतिगामी विचार, कर्मकांडे, फॅसिस्ट मनोवृत्ती" हे सर्व सोडायची तयारी आहे का??? मगच पुढचे बोलू.बघा नीट विचार करुन.
<<विशाल, यांना
<<विशाल, यांना प्रत्यक्ष
भेटायला बोलावायचं
का?>>प्रत्यक्ष भेटुन काय सागरगोटे खेळायचेत का?इथे कमेंट्स द्यायला घाबरता कि काय?
>>प्रत्यक्ष भेटुन काय
>>प्रत्यक्ष भेटुन काय सागरगोटे खेळायचेत का?इथे कमेंट्स द्यायला घाबरत कि काय?
इथे कॉमेंट कुणीही टाकू शकतो बिंधास. त्याला अजिबात हिंमत लागत नाही.
पण तुम्ही जे इथे बोलता तेच प्रत्यक्ष बोलायची हिंमत आहे का तुमच्यात ते बघायचंय.
का? घाबरलात का?
>>कोडगा अंध धर्मवाद ,संघाची
>>कोडगा अंध धर्मवाद ,संघाची भाटगिरी ,अंधश्रद्धा, प्रतिगामी विचार, कर्मकांडे, फॅसिस्ट मनोवृत्ती" हे सर्व सोडायची तयारी आहे का??? मगच पुढचे बोलू.बघा नीट विचार करुन.
आहे, पण तुमची देखील सतत हिंदुत्व, ब्राह्मण यांना नावे ठेवणे, इतिहास बदलून नको त्या गोष्टी प्रस्थापित करणे, बाह्य शक्तींना चांगले म्हणणे, इ. हे सर्व सोडायची तयारी आहे का ? बघा विचार करून.
येथे "तुम्ही" म्हणजे वैयक्तिक तुम्ही एक व्यक्ती अपेक्षित नाहीये. तसेच "आम्ही" म्हणजे पण मी एक व्यक्ती नाहीये.
माझी सर्वांनाच कळकळीची विनंती आहे की इतिहासात घडलेल्या चुका सुधारण्याचा सगळेच मिळून प्रामाणिक प्रयत्न करूयात. अजुन जास्तीत जास्त महान चुका करत राहिलो तर त्यात आपला सर्वांचा विनाश आणि बाह्य शक्तींचा विजय आहे.
सोड महेश, कळली यांची हिंमत.
सोड महेश, कळली यांची हिंमत. प्रत्यक्ष नको म्हणे इथे कॉमेंट द्या
>>प्रत्यक्ष भेटुन
>>प्रत्यक्ष भेटुन काय
सागरगोटे खेळायचेत का?
इथे कमेंट्स
द्यायला घाबरत
कि काय?
इथे कॉमेंट कुणीही टाकू
शकतो बिंधास.
त्याला अजिबात हिंमत
लागत नाही.
पण तुम्ही जे इथे
बोलता तेच प्रत्यक्ष
बोलायची हिंमत आहे
का तुमच्यात ते बघायचंय.
का? घाबरलात का?>>>तुम्ही निधर्मी झाला आहात आणि धर्मवाद सोडत आहात अशा आशयाचे एक 'प्रतिज्ञापत्र' मायबोलीवर पोस्ट करा खाली तुमचा खरा पत्ता द्या स्वखर्चाने भेटायला तयार आहे. बघा आहे का हिंमत.
Pages