राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येईल ना.
तुम्ही नकारात्मक प्रतिक्रिया सहन करून घेत नाही. एकतर सफशेल दुर्लक्ष करून अपमान करता, किंवा उद्धट उत्तरे देता. >>>>>>>>>> Rofl

माझ्या २ विदा बिंदूंवरुन माझे असे मत आहे की या व्यक्ती एकंदर खूप मॅग्नेटिक असतात.>>>>>>>>> Happy
____________
लग्न म्हणजे दिसणं येतं गं, तसेच तुम्ही स्वतःला कसे प्रेझेंट करता. म्हणजे बघ आतली खरीखुरी वस्तू म्हणजे चंद्र राशी तर बाहेर केलेले पॅकिंग म्हणजे - लग्न रास. >>>>>>>>> Ok....
______
सिंह व वृश्चिक दोन्ही fixed (स्थिर मला वाटतं म्हणतात ज्योतिषात) राशी आहेत. म्हणजे एकदा मनावर घेतलं की हट्टाने पूर्णच करतात. >>>>>>> सहमत.

stubborn असू शकतेस. >>>>>>>>> Lol

>>> वृश्चिकची साडेसाती २४ जानेवारी २०२० पासून संपणार आहे.>>>> ओके, पण नंतर चांगले दिवस येणार आहेत काय वृश्चिकेच्या लोकांना. >>>

हो.

४ नोव्हेंबरला गरू धनू राशीत प्रवेश करतोय. म्हणजे वृश्चिक राशीला दुसरा गुरू होईल व दुसरा गुरू चांगली फळे देतो. नोव्हेंबर २०२० पर्यंत गुरू चांगली फळे देईल.

२४ जानेवारी २०२० पासून शनि मकर राशीत असेल. म्हणजे वृश्चिक राशीला तिसरा असेल. तिसरा शनि चांगली फळे देतो. जुलै २०२२ पर्यंत शनि चांगली फळे देईल.

एकंदरीत फेब्रुवारी २०२० ते नोव्हेंबर २०२० हा कालखंड वृश्चिक राशीला संस्मरणीय असेल.

येईल ना.
तुम्ही नकारात्मक प्रतिक्रिया सहन करून घेत नाही. एकतर सफशेल दुर्लक्ष करून अपमान करता, किंवा उद्धट उत्तरे देता. Proud>>>> Lol

ठकासी असावे महाठक>>> Lol

जबरी होते हे दोन्ही. Lol

लोक्स धनुर्धारी दिवाळी अंक घ्या आणि ग्रहांकित. दोन्ही चोपड्यातं चांगले म्हणजे विस्त्रुत असे लिहीलेले राशिनुसार भवी ष्य वाचायला मिळेल. इफ यु डू बिलीव्ह.

लोक्स धनुर्धारी दिवाळी अंक घ्या >>>> अरे बापरे! धनुर्धारीतले भविष्य वाचायला सुरूवात केली की वाचता वाचता शेवटला आपले भविष्य काय आहे हेच कळेनासे होते.हे १५-२० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कमाबुदो.

Proud Proud

पुरोगामी गुरु धनुत म्हणजे माझ्या ७ व्यात. कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम निघणार की काय तेव्हा? गुरुची दृष्टी ना लग्नावर Sad

>>> पुरोगामी गुरु धनुत म्हणजे माझ्या ७ व्यात. कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम निघणार की काय तेव्हा? गुरुची दृष्टी ना लग्नावर >>>

चिंता नसावी. गोचरीचा गुरू २, ५, ७, ९ व ११ या स्थानात असताना शुभ फळे देतो.

He is Jewish, but he explained the subject gracefully...just shared a link for scorpio...there are other zodiac signs videos also...
https://youtu.be/Nnat_HgIVDc

खरंच साडेसाती चालू आहे? तरीच..
मी वृश्चिक चंद्र, मीन सूर्य. नक्षत्र अनुराधा. लग्न माहीत नाही.
तर काय सांगता येईल?

सगळ्यांना धन्यवाद, मला अजून एक विचारायचं आहे कि जर साडेसाती संपल्यानंतर मी बॉसला उलट सुलट बोललो, कॉलर वैगरे पकडली आणि माझे स्टार चांगले असतील तर कंपनी बॉसला काढेल कि मला?

मला अजून एक विचारायचं आहे कि जर साडेसाती संपल्यानंतर मी बॉसला उलट सुलट बोललो, कॉलर वैगरे पकडली आणि माझे स्टार चांगले असतील तर कंपनी बॉसला काढेल कि मला? >> कंपनी बॉसचे स्टार पण बघेल आणि त्यावरुन ठरवेल - ज्याचे स्टार जास्त चांगले तो टिकणार.
उलटसुलट बोलणे, कॉलर पकडणे वगैरेला कारण काय, दोघांची परफॉर्मंस हिस्टरी काय, हे सर्व मुद्दे गैरलागू असतात. स्टार्स काय ते ठरवणार

वृश्चिक राशी विशाखा नक्षत्र ह्या बद्दल कोणी सांगू शकेल काय ? डिप्रेशन चा काही संबंध आहे का ह्या कॉम्बिनेशन मध्ये ?

सतत काळजी करणे हे कॉमन आहे का वृश्चिक राशी (विशाखा नक्षत्र) मध्ये ? कि मीच करत असतो सारखी काळजी ?
आणि ह्या साठी जे उपाय आहेत - जसे कि मेडिटेशन वैगेरे हेच आहेत कि राशी स्पेसिफिक काही गोष्टी करणे जास्त effective राहील ?

@ शोधक,
विशाखा म्हणजे वॄश्चिक मस्त रास आहे. रिझर्व्हॉयर ऑफ विल पॉवर. अजिबात काळजी करु नका मात्र डिप्रेशन जर असेल, तर वैद्यकीय मदत घ्यायला कचरु नका.
ग्रहं तारे बरे करणार नाहीत. डॉक्टर १००% बरे करतील.
बाय द वे तुम्ही डिप्रेशन नाही म्हणालेलात, काळजी म्हणालात. पण मी उगाचच सल्ला दिलेला आहे. न आवडल्यास क्षमस्व.

@सामो - खूप धन्यवाद !

रिझर्व्हॉयर ऑफ विल पॉवर -- नाही हो ! उलट विल पॉवर वाढविण्या साठी खूप प्रयत्न करत आहे ...

अहो क्षमस्व काय (डिप्रेशन शब्द मी वापरला आहे आधीच्या पोस्ट मध्ये) , तुम्ही एवढ्या आपलेपणाने लिहिलत खरंच धन्यवाद !!

>>>अहो क्षमस्व काय (डिप्रेशन शब्द मी वापरला आहे आधीच्या पोस्ट मध्ये) , तुम्ही एवढ्या आपलेपणाने लिहिलत खरंच धन्यवाद !!
ऑफ कोर्स!! माबोचे कल्चर आहे आपलेपणा Happy आपलेही आभार.

इंटरेस्टिंग धागा आहे.

माझ्या सभोवताली सर्वच क्लासिक ड्युएल राशीचे पब्लिक आहे, जसे सिंह रास सिंह लग्न, कुंभ रास कुंभ लग्न, तूळ रास तूळ लग्न इत्यादी.

त्यामुळे काय होईल/ होते हे मात्र मला माहित नाही !

अनिंद्य काय सांगता याचा अर्थ तीघांचाही चंद्र पहील्या घरात आहे. त्याशिवाय लग्नरास व चं रास एकत्र येणारच नाही. आता पहील्या घरा तील चंद्राच्या कारकांचे काय लक्षण वगैरे असते ते मला माहीत नाही.

माझ्या साबचंची चं व ल रास कन्या होती. कोणतेही काम परफेक्ट असे. अगदी कामातील यशाची निश्चिंती!!!

>>>>>सिंह रास सिंह लग्न

ओह ओके. प्रखरता. राईट-रॉन्ग बद्दल फार प्रखर व क्लिअर मते म्हणजे तत्वनिष्ठ.

माझ्या नवर्‍याचा सूर्य पहील्या घरात आहे व माझा सातव्या. तळपत असतो तो. स्वतःला पटणारा मुद्दा, इतका व्हेहेमेन्टली, प्रखरतेने मांडतो ना. मला 'अरे हो हो हो ..... मुद्दा समजला पण आवेश आवर' होउन जाते.
आणि आम्ही सातव्या घरातील सूर्य असणारे लोक -सतत कोणाच्या ना कोणाच्या तेजाखाली फिकुटलेले. अन्य झाडाच्या सावलीत वाढणारी आम्ही कॉफीची झाडे Wink

सतत काळजी करणे हे कॉमन आहे का वृश्चिक राशी (विशाखा नक्षत्र) मध्ये ? कि मीच करत असतो सारखी काळजी ?
आणि ह्या साठी जे उपाय आहेत - जसे कि मेडिटेशन वैगेरे हेच आहेत कि राशी स्पेसिफिक काही गोष्टी करणे जास्त effective राहील ?
>> @सामो - ह्यावर काही प्रतिक्रिया द्या ना !

Pages