भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
च्यायला, काय भलत्या वेळेला
च्यायला, काय भलत्या वेळेला खेळतात! मी विचार करत होतो की पैसे भरून काही पॅकेज घ्यावे म्हणजे लाईव्ह बघता येईल!! हे तर जणू ठरवून ठरवून माझ्या झोपेच्या वेळी खेळतात!!
आजकाल कुठे हायलाईट्स हि दाखवत नाहीत!!
अश्याने अमेरिकेत क्रिकेट कसे लोकप्रिय होईल?? भारता इतका नसला तरी थोडा फार पैसा आहे या देशात. पुढचा विष्वचषक अमेरिकेत ठेवा. न्यू जर्सीत.
मास्तुरे.. चुकीच्या
मास्तुरे.. चुकीच्या मुहूर्तावर बाफ उघडलात... गेल्या दोन मॅच मध्ये चांगली चालली गोलंदाजी एकदमच ढेपाळली आज...
आयला इतके कमी खेळाडू घेऊन
आयला इतके कमी खेळाडू घेऊन खेळणार? कमाल आहे बुवा!
शिवाय, आपण कसोटीत मार खाणार
शिवाय, आपण कसोटीत मार खाणार हे माझं भाकित, आत्ताच! कसोटीत ३-१ किंवा ३-०.
काहीतरी घोळ दिसतोय. मी हा
काहीतरी घोळ दिसतोय. मी हा धागा २६ नोव्हेंबरला संघ घोषित झाल्यावर संघातल्या खेळाडूंची नावे टाकून सार्वजनिक करणार होतो. म्हणून तो अप्रकाशित ठेवला होता. पण तो आपोआप सार्वजनिक झालेला दिसतोय. मायबोली सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी बग असणार.
असो. आता सार्वजनिक झालाच आहे, तर राहू देत तसाच. मी काळ, वेळ, मुहूर्त, नक्षत्र, गण, होरा वगैरे पाहून धागा तयार केला नव्हता. त्यामुळे हरलो तर मुहूर्त, घटिका, पळे इ. ला कोणी दोष द्यायचा प्रयत्न केला तर थेट अंनिसच्या दाभोळकरांशी संपर्क साधेन.
>>> शिवाय, आपण कसोटीत मार खाणार हे माझं भाकित, आत्ताच! कसोटीत ३-१ किंवा ३-०.
चिमण,
आपण इतिहासात प्रथमच कांगारूंना त्यांच्या भूमीवर कसोटी मालिकेत हरवणार (१-० किंवा २-१ अशा फरकाने). एकदिवसीय मालिकेत सुद्धा २००८ ची पुनरावृत्ती करून आपणच जिंकणार.
>>> हे तर जणू ठरवून ठरवून माझ्या झोपेच्या वेळी खेळतात!!
झक्की,
४ पैकी ३ कसोटी सामने तुमच्या घड्याळाप्रमाणे संध्याकाळी ६:३०/७:०० वाजता सुरू होणार आहेत. इतक्या लवकर झोपता की काय?
>>> आयला इतके कमी खेळाडू घेऊन
>>> आयला इतके कमी खेळाडू घेऊन खेळणार? कमाल आहे बुवा!
अरे, २६ नोव्हेंबर ला संघाची घोषणा आहे. ती झाल्यावर इतर नावे टाकतो.
संध्याकाळी ६:३०/७:०० वाजता
संध्याकाळी ६:३०/७:०० वाजता सुरू होणार आहेत. इतक्या लवकर झोपता की काय? तसे काही सांगता येत नाही. म्हणजे कल्पना चांगली आहे, लवकरच झोपायची! जरा दुपारची दोन तासाची वामकुक्षी बंद केली तर जमेलहि.
खरे तर हायलाईट्स सर्वात उत्तम.
एकदिवसीय मालिका बरी पडते
एकदिवसीय मालिका बरी पडते आपल्याला, एका दृष्टीने, जास्तीत जास्त ५०च ओव्हर्स खेळायच्या असतात! त्या नंतर आपल्या बोलिंगची अब्रू निघत नाही.
पण एकदिवसीय सामन्यात
पण एकदिवसीय सामन्यात बहुतेकवेळा निर्णय लागतोच (पावसाने पूर्ण सामना रद्द होण्याची शक्यता फार कमी असते). कसोटी सामन्यात सामना अनिर्णित ठेवून सर्वांचीच अब्रू वाचवता येण्याची जास्त शक्यता असते. तसेच २ डाव असल्याने व वेळेचे बंधन नसल्याने आधीच्या चुका सुधारताही येतात.
ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी
ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी भारताचा कसोटी संघ आज जाहीर झाला आहे. हरभजनला वगळण्यात आले आहे. झहीर खान फिट असेल तरच तो आत येईल. मुनाफला घेण्यात आलेले नाही. अजिंक्य राहणे, उमेश यादव, वरूण एरॉन, वृद्धिमान साहा हे नवीन खेळाडू आहेत. बाकी सर्व नावे अपेक्षेनुसारच आहेत.
पॅटिसनच्या विकेट्स पाहिल्यात
पॅटिसनच्या विकेट्स पाहिल्यात का? पहिल्याच विकेटच्या वेळेस दिसलेला "एक्स्ट्रॉ बाउन्स" आपले लोक कसा हँडल करतात ते बघायचे.
http://www.youtube.com/watch?v=n5Y6T8aS7_M
ऑस्ट्रेलियाकडे दोन नवीन फास्ट बोलर्स तयार आहेत भारतासाठी.
हरभजन च्या ऐवजी दोन नवीन स्पिनर्स तेथे नेण्याबाबत शंका आहे मला. त्यात हे सिलेक्शन विंडीज विरूद्ध आणि ते ही स्पिनला सपोर्ट करणार्या घरच्या पिचेस वरून केलेले आहे. हरभजन सध्या विशेष काही करत नाही हे खरे पण ऑस्ट्रेलियाविरूद्ध तो विशेष खुन्नस ने खेळतो. फक्त मागच्या वेळेस त्याचे भांडण झालेले लोक आता संघात नाहीत (सायमंडस, हेडन वगैरे) एवढेच.
काहो, धोणी ला बॅक अप म्हणून
काहो, धोणी ला बॅक अप म्हणून दुसरा यष्टीरक्षक कोण? पटेल दिसत नाहीये यादीत? रहाणे का? बिचार्या द्रवीडला जास्त नाचवू नका. उगाच जखमी झाला, आजारी पडला तर एक चांगला, अनुभवी फलंदाज गमावून बसू! पटेल, रहाणे अजून तरुण आहेत, त्या वयात काही होत नाही शरीराला! जेव्हढे जास्त खेळवाल त्यांना तेव्हढाच त्यांना अनुभव जास्त व त्यांची परीक्षा पण होईल!
रिद्दीमान हा बॅकअप विकेटकिपर
रिद्दीमान हा बॅकअप विकेटकिपर आहे.. तो बॅकपच रहावा..
>> पहिल्याच विकेटच्या वेळेस
>> पहिल्याच विकेटच्या वेळेस दिसलेला "एक्स्ट्रॉ बाउन्स" आपले लोक कसा हँडल करतात ते बघायचे.
फारेन्डा, बॅटीचं हँडल लावून व्यवस्थित हँडल करतीले आपले, डोन्चु वरी!
थोडक्यात सचिनची विकेट कोण
थोडक्यात सचिनची विकेट कोण घेणार हे ठरलेले आहे... नवीन आलेले फास्ट बॉलरच.. आणि तीही किरकोळीत गेली तर मग पुढच्या मॅच मध्ये त्या बॉलरची धुलाई...
हिम्या, सचिननं इंग्लंडात किती
हिम्या, सचिननं इंग्लंडात किती धुलाई केली ते पाहिलंच आपण!
त्यानं टेस्ट मॅचेस मधे धुलाई केलीच तर ती आपल्याला लवकरात लवकर जास्तित जास्त धावा करून डिक्लेअर करायचं असायचं तेव्हाच!
सचिन गुरुवारी निघणार
सचिन गुरुवारी निघणार आहे........त्याच्याबरोबर द्रविड आणि उमेश यादव सुध्दा असणार आहे
मिशेल जॉन्सन जखमी असल्यामुळे
मिशेल जॉन्सन जखमी असल्यामुळे भारताविरूद्ध खेळणार नाही. कमिन्सही जानेवारी मध्यापर्यंत खेळणार नाही. म्हणजे पहिल्या तीनही कसोटीत तो नसेल. बॉलिंजर कुठे गेला ते कळतच नाही. ब्रेट ली फक्त एकदिवसीय सामने खेळेल. नेथन हॉरीट्झ वर्षभर बेपत्ता आहे. क्रेझा परत येण्याची शून्य शक्यता आहे.
म्हणजे ऑस्ट्रेलियाकडे पॅटिन्सन, स्टार्क, लॉयन (की लिऑन?) आणि सिड्ल हे चारच मुख्य गोलंदाज आहेत. शेन वॉटसन आणि मायकेल क्लार्क हे पण गोलंदाजी करतील. यातला पॅटिन्सन सोडला तर बाकी गोलंदाज फारसे भेदक नाहीत. त्यामुळे भारतीय फलंदाजांना फारशी भीति नाही. अर्थात बॉलिंजर असेल तर नक्कीच फरक पडेल.
प्रवीणकुमार पाठोपाठ, जखमी
प्रवीणकुमार पाठोपाठ, जखमी झाल्यामुळे, वरूण एरॉनही ऑस्ट्रेलियाच्या दौर्यातून बाहेर पडलाय. त्याला ६ आठवडे बाहेर रहावं लागणार आहे. त्यानंतर तो कदाचित एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकेल. त्याच्याऐवजी विनयकुमारला घेतलेलं आहे.
झहीर खान आता संघात येणार हे नक्की आहे. तो आत येताना त्याच्याऐवजी कोणाला बाहेर काढणार?
म्हणजे परत एकदा इरफान पठाण
म्हणजे परत एकदा इरफान पठाण बाहेरच.. त्याला विंडीज बरोबर पण बळच घेतला आहे... शेवटच्या मॅच मध्ये खेळला तर ठिक.. पण शक्यता कमीच आहे..
> मिशेल जॉन्सन जखमी
> मिशेल जॉन्सन जखमी असल्यामुळे भारताविरूद्ध ....
मास्तुरे,
अहो मिशेल नाही मिचेल किंवा मिच. मिशेल हे पुरुषाचे नाव नाही. आठवा मिशेल फायफर.
मास्तुरे, अहो मिशेल नाही
मास्तुरे,
अहो मिशेल नाही मिचेल किंवा मिच. मिशेल हे पुरुषाचे नाव नाही. आठवा मिशेल फायफर.
>> मिशेल फ्रेंच किंवा रशियन मध्ये मुलाचे नाव पण असते (मायकेल चा अपभ्रंश)
फाय्फर बरी लगेच आठवली तुला.
काहीही करा..आणि विनयकुमारला
काहीही करा..आणि विनयकुमारला राखीव गडी ठेवा.. धुलाई होणार त्याची,
> >> मिशेल फ्रेंच किंवा रशियन
> >> मिशेल फ्रेंच किंवा रशियन मध्ये मुलाचे नाव पण असते (मायकेल चा अपभ्रंश)
फाय्फर बरी लगेच आठवली तुला.
रशियन मायकेलचा मिखाईल करतात (गोर्बाचोव्ह) मिशेल नाही.
पण हा मिच जॉनसन ऑस्ट्रेलियन आहे फ्रेंच नाही.
आणि मिशेल फायफर का आठवू नये बरं?
>>> अहो मिशेल नाही मिचेल
>>> अहो मिशेल नाही मिचेल किंवा मिच. मिशेल हे पुरुषाचे नाव नाही. आठवा मिशेल फायफर.
मराठी वृत्तपत्रात त्याचे नाव मिशेल जॉन्सन असेच येते. असो.
रच्याकने, 'ब्लेम इट ऑन रिओ' मधल्या नायिकेचे नाव मिशेल जॉन्सनच होते ना?
>>> काहीही करा..आणि विनयकुमारला राखीव गडी ठेवा.. धुलाई होणार त्याची,
अगदी! त्याच्याकडे वेग, उसळते चेंडू, यॉर्कर असली हत्यारे नाहीत. तो फक्त स्विंग गोलंदाज आहे (म्हणे). त्याची गोलंदाजी फारशी प्रभावी वाटली नाही. ऑस्ट्रेलियात भरपूर मार पडणार त्याला.
>>द्रविड या दौर्यानंतर
>>द्रविड या दौर्यानंतर नक्कीच निवृत्त होईल
हे कोणी सांगितल तुमच्या कानात येउन?
त्याचा सध्याचा फॉर्म बघता तो अजुन वर्षभर तरी नक्कीच खेळत राहील अस वाटतय!
Sachin lands in
Sachin lands in Australia.
Media: Your record has just been broken. What do you have to say?
Sachin: Which one?
आजच्या पहिल्या सराव सामन्यात
आजच्या पहिल्या सराव सामन्यात भारताने बर्यापैकी फलंदाजी केली. गोलंदाजी मात्र पूर्ण फाफलली. सचिन, लक्ष्मण व रोहित शर्माने अर्धशतके केली. सचिन व लक्ष्मण "Retired Out" म्हणजे काय हे समजले नाही. "Retired Hurt" हे माहित आहे. पण "Retired Out" म्हणजे नक्की काय? भारताची धावसंख्या ६ बाद ३२० आहे. त्यात गोलंदाजांना फक्त ४ बळी मिळाले आहेत. उरलेले २ (सचिन व लक्ष्मण) जर "Retired" झाले असतील तर "Out" कसे? किंवा "Out" झाले असतील तर "Retired" कसे?
मास्तुरे, हा सराव सामना आहे.
मास्तुरे,
हा सराव सामना आहे. त्यामुळे पुरेसा सराव झाल्यास फलंदाज retire होऊ शकतात पण स्कोरबोर्डावर ते retire out असंच लिहिलं जातं.
मुष्टीयुद्धदिन कसोटीसाठी
मुष्टीयुद्धदिन कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ जाहीर झाला आहे (वर नावे दिली आहेत). एड कोवॅन या नवोदिताचा संघात समावेश आहे. आश्चर्य म्हणजे बॉलिंजर संघात नाही. तसेच डॅनियल ख्रिस्तियनचा संघात समावेश हे देखील आश्चर्यच आहे.
Pages