भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

Submitted by मास्तुरे on 22 November, 2011 - 02:22

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान

भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)

_________________________________________________

हा आहे दौर्‍याचा कार्यक्रम -

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

_________________________________________________

पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.

_________________________________________________

पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)

मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी

_________________________________________________

सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0

दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0

तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0

चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३

पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३

सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६

सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन

दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.

तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

_________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावेळेस आपण मालिका नक्की जिंकणार. दोन कारणे. एकतर आपली टीम कांगारडूंपेक्षा खूप चांगली आहे आणि त्यांनी चॅपलचा सल्ला घेतला आहे. ऑस्ट्रेलियात जिंकणे हे सचिन , द्रविड व लक्ष्मण या त्रिकूटाने स्वप्न साकार करण्यासाठी खास तयारी केली आहे.
सचिनचे १००वे शतक होणारच.. Happy
झहीर आणि इशांत बरे होउ दे.

मास्तुरे बॉक्सिंग चा येथे संबंध मुष्टियुद्धाशी नसावा असे वाटते. मी ऐकले होते की ख्रिसमस प्रेझेंटस शी संबंधित काहीतरी आहे.

<<<<पहिला कसोटी सामना - (मुष्टीयुद्ध दिन कसोटी सामना)>>>>>

बॉक्सिंग डे मधल्या बॉक्सिंगचा मुष्टियुद्धाशी काय संबंध? तो बॉक्सेस (पेटारे) उघडायचा दिवस असतो.
Why is 26 December called Boxing Day?
Traditionally, 26 December was the day to open the Christmas Box to share the contents with the poor.
The Christmas box was a wooden or clay container where people placed gifts.

In the Roman/early Christian era; metal boxes placed outside churches were used to collect special offerings tied to the Feast of Saint Stephen.

In the UK, it was a custom for tradesmen to collect "Christmas boxes" of money or presents on the first weekday after Christmas as thanks for good service throughout the year. This is mentioned in Samuel Pepys' diary entry for 19 December 1663;] This custom is linked to an older English tradition: in exchange for ensuring that wealthy landowners' Christmases ran smoothly, their servants were allowed to take the 26th off to visit their families. The employers gave each servant a box containing gifts and bonuses (and sometimes leftover food).

>>> मास्तुरे बॉक्सिंग चा येथे संबंध मुष्टियुद्धाशी नसावा असे वाटते.
>>> बॉक्सिंग डे मधल्या बॉक्सिंगचा मुष्टियुद्धाशी काय संबंध?

अहो, गंमत केली. एखादी स्माईली टाकायला पाहिजे होती. बॉक्सिंग डे चा बॉक्सिंगशी संबंध नसतो हे माहित होते, पण या दिवसाला "बॉक्सिंग डे" असे का म्हणतात हे माहित नव्हते. असो. आता माहिती मिळाली.

सराव सामन्यात सेहवाग व रहाणे सर्व डावात अपयशी ठरले. त्यामुळे रहाणे आत येण्याची अजिबात शक्यता नाही. वरच्या फळीतल्या नेहमीच्या सहाजणांबरोबर सातवा कोहली आत येईल. गोलंदाज म्हणून उमेश यादव व अश्विन नक्की आहेत. ओझाऐवजी अश्विनलाच संधी मिळेल. झहीर, इशांत व विनयकुमार या तिघातून दोघे आत येतील. पण झहीर व इशांतचा फिटनेस अजूनही संशयास्पद आहे. दोघेही फिट नसतील तर विनयकुमारच्या बरोबरीने मिथुन आत येईल.

आता ४ च दिवस राहिले. २६ ला गजर लावून पावणेपाचला उठायला लागणार. Happy

' श्रेष्ठ कोण ? ब्रॅडमन कीं सचिन ? ' ही पुडी नेमक्या वेळी औस्ट्रेलियात सोडली गेली आहे, आणि तीही एका ' इकॉनॉमिक्स'च्या विश्लेषणकर्त्याने !!
आज मेलबोर्न स्टेडियमवर उभारलेला शेन वॉर्नचा नवीन पुतळा पाहिला [फोटोत !]. खरंच फिरकीचा नुसता जादूगारच नाही तर फिरकीला कलात्मकता व चातुर्य बहाल करून एका वेगळ्याच पातळीवर नेवून ठेवणारा महान गोलंदाजच तो !!! सलाम.

>>> खरंच फिरकीचा नुसता जादूगारच नाही तर फिरकीला कलात्मकता व चातुर्य बहाल करून एका वेगळ्याच पातळीवर नेवून ठेवणारा महान गोलंदाजच तो !!! सलाम.

सहमत! शेन वॉर्नची गोलंदाजी बघायला खूप मजा यायची. तो क्रिकेटच्या इतिहासातला महान लेगस्पिनर होता/आहे.

पण शेन वॉर्नला भारतात मुंबईच्या अमित पागनिसपासून सगळ्यांनी धुतला होता. भारतात तो इतर ठिकाणच्या तूलनेत फार यश मिळवूच शकला नाही!!

तो क्रिकेटच्या इतिहासातला महान लेगस्पिनर होता/आहे. >> +१. फिरकी गोलंदाजी पुनरुज्जिवित करण्यामधला त्याचा वाटा सिंहाचा आहे.

<< हो आणि त्याची न सचिनची खुन्नस पण. >> खरंय. सचिन वि. वॉर्न ! असं द्वंद्व पहायला मिळणं हा क्रिकेटमधला अत्युच्य आनंदच !!

काल मायकेल हसीने धोनी व सचिनचं कौतुक करत त्यांच्याबद्दल, अनुक्रमे, धोनीला आम्ही टेंशन खाली ठेवणार व सचिनला ऑस्ट्रेलियात शतक काढूं देणार नाही अशी विधानं केलीं आहेत. प्रत्येक दौर्‍याच्या सुरवातीला असलीं विधानं करणं, विशेषतः ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमधे, नेहमीचं व बालीश झालं आहे असं नाही वाटत ?

उद्या मेलबोर्नला सामना सुरू होण्याच्या वेळेला आणि नंतर पुढचे ४-५ तास पावसाची शक्यता ४०-५० टक्के इतकी आहे. नमनालाच अपशकुन होणार असं दिसतंय. Sad

<< नमनालाच अपशकुन होणार असं दिसतंय >> म्हणजे, पांच ऐवजी चार दिवसातच आपल्याला ऑसीजना हरवावं लागणार !!! Wink

पाँटींगचं अर्धशतक ! त्याची व कोवनची शतकी भागीदारी अपेक्षित. अश्विनचे चेंडू वळताहेत पण टप्प्यावर हवं तितकं नियंत्रण नाही. दोन तीन चेंडू त्याने सुंदर उलट्या दिशेने वळवले; यात त्याने अधिक सहजता आणली तर तो खूपच प्रभावी ठरणार यात शंका नाही. [ अश्विनला गोलंदाजी करताना पाहून सलिम दुराणीची आठवण आली, तो डावरा गोलंदाज असूनही. ऊंची व सहजसुंदर शैली ही कारणं असावीत].

कसोटी सामन्यासाठी स्टेडियम भरलेला असणं हे पाहून बरं वाटतं.

आज ईथले हवामान फार चांगले नाही पण आपले लोक उत्साहाने आजची मॅच बघायला गेले आहेत. त्यामूळे मस्त माहोल असेल स्टेडीयमवर!

<< पॉन्ट्या गेला! >> पण...लवकर दोन विकेट गेल्या असूनही "पॉन्ट्या" ६२ धावा ठोकूनच बाद झाला !! यादव बोला, " याद रखो,ऑसीज. अब मै आया हूं ! " !!! Wink
<< आपले लोक उत्साहाने आजची मॅच बघायला गेले आहेत >> स्टेडियममधे "आपले"पेक्षां "त्यांचे"च लोक खूपच जास्त दिसताहेत !! मा.बो. स्टँड मात्र अगदीच रिकामा दिसतोय आज; माझ्यासारखे रिकामटेकडे फार नसावेत माबोवर !!:डोमा:

भाऊ मग आपण सचिन कडून १०० ची अपेक्षा दरवेळी ठेवतो तर ऑसीजने त्याचाकडून अपेक्षा न ठेवणे म्हणजे जास्तच होईल की. तो पण महान फलंदाज आहे ह्या दुमत नाही.

<< तो पण महान फलंदाज आहे ह्या दुमत नाही >> केदारजी, तुम्ही त्याला लाडाने "पाँट्या" म्हटलंत हे लक्षात नाही आलं ! Wink
<< तो आजारी बिजारी आहे की काय? > > बॉलींजरबद्दल असं वाचल्याचं आठवतं पण नक्की नाही सांगता येत. पण तो नाही, हे जरा आश्चर्यच !

म्ही त्याला लाडाने "पाँट्या" म्हटलंत हे लक्षात नाही आलं ! डोळा मारा >>> भाऊ, तो महान खेळाडू असला तरी भारतासोबत खेळताना नेहमी अखिलाडू वृत्ती दाखवतो. त्या अर्थाने त्याला म्हणले. तसेही पॉन्ट्या म्हणन्यात काय वावगं आहे. मी खुद्द "द सचिन तेंडुलकरला" पण तेंडल्या, सच्या असे अनेकदा लिहिले आहे ( हे लाडात, आपुलकीच्या भावनेने). पण ते कदाचित तुम्हाला अपमानकारक वाटले नसावे, पण पॉन्ट्या वाटले, म्हणून खास अवतरण चिन्ह दिले. मायबोली हे २ डी आहे त्यामुळे नेमके का व कसे लिहिले हे बर्‍याचदा कळत नाही. Happy

जय झहिर! गेम बदलला की. (म्हणजे हे दोघे टिकले नाहीत तर)

Pages