भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

Submitted by मास्तुरे on 22 November, 2011 - 02:22

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान

भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)

_________________________________________________

हा आहे दौर्‍याचा कार्यक्रम -

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

_________________________________________________

पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.

_________________________________________________

पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)

मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी

_________________________________________________

सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0

दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0

तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0

चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३

पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३

सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६

सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन

दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.

तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

_________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< हसीला ढापला म्हणे ! >> त्याची जीभ फारच वळवळत होती सामन्यापूर्वी !!!
<< पण ते कदाचित तुम्हाला अपमानकारक वाटले नसावे >> केदारजी , तसं अजिबात नाही .मी मजेत लिहीलं. त्या आगाऊ 'पाँट्या'साठी उगीच आपल्यात गैरसमज नको !! आणि, माझे खास मित्र मला पण "भावड्या"च म्हणतात !!! Wink
<< आज खोलले तर बरे होईल. >> विक्रमजी, तुमच्या तोंडात साखर पडो !!

हा हा ह्हा हाड रे हाडीन. हा आपल्याला सतावणार. नेहमी कोणी तरी भेटतोच आपल्याला.
मॅच संपत आली असेल आता.

त्याची जीभ फारच वळवळत होती सामन्यापूर्वी !!!

>>>
म्हणून का त्याला ढापणे समर्थनीय ठरते..

त्याची जीभ वळवळायला तो ऑस्सीजचा 'दिग्विजयसिंग' आहे असावा Happy

टेस्ट मॅच असावी तर अशी! ७०,००० लोक, मेलबर्न सारखे महाकाय स्टेडियम, हिरवेगार मैदान, दिग्गज खेळाडू, "जिवंत" पिच, जबरदस्त कॉमेंटरी आणि सगळे एचडी मधे बघायला मिळणे सगळेच जबरी. आज सकाळी चॅपेल, अक्रम वगैरे काही काही प्लॉट्स मस्त सांगत होते. मुख्य बोलर ने राउण्ड द विकेट बोलिंग करणे, स्पिन बोलर ला ऑस्ट्रेलियात कराव्या लागणार्‍या अ‍ॅडजस्टमेंट्स, क्लार्क साठी लावलेला ट्रॅप ई.

ऑसीजनी बॉलिंजरला घेतलं नाही याचं आश्चर्य वाटतंय. तो आजारी बिजारी आहे की काय? राखीवमध्ये पण तो नाही>> तो ODIमधे जेण्व्हा चांगला खेळतो तेव्हधा टेस्टमधे नाहि असे down under समजले जाते. ashes मधे फारसा चांगला खेळला नव्हता बहुतेक.

<< चांगला अ‍ॅडव्हॅन्टेज घालवला आज शेवटच्या तासात... >> ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्टीवर पहिल्याच कसोटी सामन्यात प्रथमच फलंदाजी करायची आहे तेंव्हा उद्यां अगदी सकाळीच फलंदाजी नाही करावी लागणार, हे आयतंच फायदेशीरही ठरूं शकेल ! Blessing in disguise !!

क्लार्क ने आम्ही "फेअर" खेळू असे सिरीज पूर्वी म्हंटल्यानंतर ७ ओव्हर्स लागल्या पहिला स्लेजिग अ‍ॅटॅक व्हायला. रन काढताना पॅटिन्सन ने मधे कोपर आणायचा प्रयत्न केला - रिप्ले बघताना चुकून असावे असे वाट्ते - सेहवाग चा व पॅटिन्सन आणि आणखी कोणाचा तरी वाद झालाय.

गंभीर गेला. बॅट लावली बाहेरच्या बॉलला.

बाय द वे, या सिरीज ची अग्नीपथ सिरीज म्हणून जाहिरात व हृतिक रोशन चे पळणे वगैरे वरून हे अग्नीपथचे ही मार्केटिंग दिसते. चॅम्पियन्स लीग च्या वेळेस शाहरूख, रा-१ चे चालायचे तसे.

सेहवागच्या ६७ धांवा कौतुकास्पदच आहेत; कारण, हिल्फेनहॉस व पॅटीसन अप्रतिम गोलंदाजी करत होते.
चहापाननंतर ऑसीज राहुल-सचिन जोडी फोडायचा आटोकाट प्रयत्न करणार हें निश्चित; कारण सामन्यावर पकड मिळवण्यासाठी ते अत्यावश्यक आहे. सचिनने महाशतकाचं टेंशन नाही घेतलं तर तो व द्रविड मोठी भागीदारी सहज करूं शकतील असं वाटतंय.[सचिनला बॅटींगला येताना मिळालेल्या 'स्टँडींग ओव्हेशन' वरनं त्याच्या तिथल्याही लोकप्रियतेची व त्यामुळे येणार्‍या टेंशनची कल्पना येते].
पाँटींग - सॉरी, 'पाँट्या' - बराच 'जमीनीवर आल्या'सारखा वाटतोय आतां !

Lol अहो तो माज असलेला वळू आहे.

आज महाराज गोल्डन टच देत आहेत. कसले जबरी शॉट्स. गॉड आय हॅव्ह सिन यू! यु प्ले फॉर इंडिया ... अ‍ॅट नं ४ !! आणि हो आय हॅव सिन डेमी गॉड टू. ही टू प्लेस फॉर इंडिया. अ‍ॅट नं १, नं ३!

तो स्ट्रेट ड्राईव्ह!

अहो तो माज असलेला वळू आहे.>> नाही. चेपलेला. Happy
गंभीर उगीच आउट झाला. थोडा टिकला असता तर.
ही विकेट ५००ची आहे. आपल्याला चांगली संधी. केल्याच पाहिजेत. चौथ्या डावात कमीतकमी लक्ष आवश्यक.
चॅपेल आणि मूडीने कितीही सिडल आणि पॅटिनसनचे कौतुक केले तरी मला या विकेटवर त्यांच्यात फार दम आहे असे नाही वाटत. द्रविडचा सब्लाईम फॉर्म, साहेबांचा आत्मविश्वास, लक्ष्मणचा टच आणि कोहलीचे जोशपूर्ण तारूण्य. करा ६०० करा. Happy

<< आज महाराज गोल्डन टच देत आहेत. कसले जबरी शॉट्स. गॉड आय हॅव्ह सिन यू! यु प्ले फॉर इंडिया ... अ‍ॅट नं ४ !! आणि हो आय हॅव सिन डेमी गॉड टू. ही टू प्लेस फॉर इंडिया. अ‍ॅट नं १, नं ३! >> १००% सहमत. सचिनवर दबाव टाकायला चहापानपूर्वीची शेवटची ओव्हर हसीला देण्यात आली व सचिनने ती काळजीपूर्वक खेळून काढली. परत आल्यावर हसीला षटकार ठोकून त्याने 'उगीच भलते डावपेच माझ्याकडे नको' असं बॅटनेच ठणकावून सांगितलं ! द्रविड ... पण जाऊंदे, ...तेंच तेंच कौतुक किती करायचं ह्या ग्रेटच !!

आज महाराज गोल्डन टच देत आहेत. कसले जबरी शॉट्स. गॉड आय हॅव्ह सिन यू! यु प्ले फॉर इंडिया ... अ‍ॅट नं ४ !! आणि हो आय हॅव सिन डेमी गॉड टू. ही टू प्लेस फॉर इंडिया. अ‍ॅट नं १, नं ३! >>> क्या बात. Happy सही.

सचिनची सेंच्युरी व्हावी म्हणून देवाना पाण्यात ठेवलेलं आहेच. पण काय खेळतो हा बाप्पा. (अजून फक्त ३१)

... जल्ला इथे लाईट गेला. त्यामुळे क्रिकिन्फो जिन्दाबाद.

काय रे देवा!!!!! चला, आता थोडया वेळाने बघेन.

सिडलची जादूचल गयी.

रात्रपाळीचा कामगार इशान्त शर्मा.

सचिनने १२ मार्च २०११ ला विश्वचषकाच्या द. आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात आपले ९९ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. त्यानंतर आजपर्यंत तो ७ वेळा ५३ ते ९४ या दरम्यान बाद झाला. त्यात ३ वेळा ८५ ते ९४ या दरम्यान. आज शेवटची २ षटके राहिली असताना विचार करत होतो की उद्या पावणेपाचला उठून सामना बघावा. उद्याचा पहिला तास संपतासंपता साहेबांचे शतक झाले असेल. पण पुन्हा एकदा निराशा पदरी आली.

असो. पण सचिन नेहमीप्रमाणेच उत्तम खेळला. ९८ चेंडूत ७३ धावा (धावगती ७४.५०) ही जबरदस्त खेळी होती. त्याला पडलेला चेंडू उत्कृष्ट होता. सीडल् च्या आधीच्याच षटकात अगदी तशाच चेंडूवर द्रविड त्रिफळाबाद झाला होता. पण तो सुदैवाने नोबॉल होता. सचिनला अगदी तसाच चेंडू पडला, पण तो द्रविडसारखा सुदैवी ठरला नाही.

खुदा जाने शतकांच्या शतकाची अजून किती प्रतीक्षा करायला लागणार! Sad

Pages