भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
या खेळपट्टीवर आणि विशेषतः ऑसी
या खेळपट्टीवर आणि विशेषतः ऑसी च्या अचूक व तिखट गोलंदाजी समोर आपल्याला २५०+ दुसर्या डावात करायला धापा लागतील असे वाटते. तो लेयोनेल देखिल बर्यापैकी चेंडू वळवत होता.
सचिन चे महाशतक दुसर्या डावात आणि भारताचा विजय असा सुयोग जुळून आला तर बहार येईल. अर्थात सेहवाग नावाचा जुगारी सर्व काही बदलू शकतो.
ऊमेश यादव... जबर्या... दशकांनंतर कुणी तरी तेज गोलंदाज गवसला आहे. त्याला आयपिल पासून दूर ठेवावे अन्यथा मुनाफ च्या लाइनीत जाईल. सचिन, द्रविड कं ने हाही सल्ला त्याला दिला तर बरे होईल.
पण काय झक्कास सामना झालाय.. मजा आ गया.. खरे क्रिकेट सर्वार्थाने.
कालचा दिवस संपता संपता सचिन
कालचा दिवस संपता संपता सचिन गेला, तसा आजचा दिवस संपता संपता किमान हसी तरी गेलाच पाहिजे.
कुणी ताजा स्कोअर टाकेल का?
कुणी ताजा स्कोअर टाकेल का?
कालच्या खेळाबद्दल आज पेपरमधे
कालच्या खेळाबद्दल आज पेपरमधे मथळा काय तर म्हणे 'गड आला पण सिंह गेला'
गड आला कुठला हाका मारायला...
आपल्याला मराठी म्हणी माहित आहेत हे दाखवण्याचा किती तो सोस!
>>Ashwin to Hussey, no run,
>>Ashwin to Hussey, no run, dropped by Rahul Dravid at slip, Ashwin had done so well to draw Hussey out of his crease and have him driving at a flighted one, it turned away to take the outside edge, and went at a nice height to Dravid at slip, who, not for the first time recently, has dropped a sitter
Or has he dropped the Match?
गेली गेली ७वी गेली.. सीडल
गेली गेली ७वी गेली.. सीडल गेला... जबरीच गंम्मत चालू आहे.. २५० चेच टारगेट रहाणार... आजच ऑल डाऊन व्हायला पाहिजे.. १६४/७
Siddle gone चला, कुणीतरी
Siddle gone
चला, कुणीतरी कलंडला.
<रवी शास्त्री मोड ऑन>
Looks like the Indians are planning to work around Hussey at the moment.
<रवी शास्त्री मोड ऑफ>
लिऑन पण गेला... १६६/८...
लिऑन पण गेला... १६६/८...
53.6 Ashwin to Lyon, OUT,
53.6 Ashwin to Lyon, OUT, Ashwin has struck, umpire Erasmus thinks that is going to hit leg stump, it was the flighted carrom ball, pitched on a length, Lyon was playing off the back
foot and was caught on the pad, have to wait for replays to see if it was taking leg, yes, replays show Erasmus was spot-on
NM Lyon lbw b Ashwin 0 (11b 0x4 0x6) SR: 0.00
१७९/८ . हश्या लेकाचा
१७९/८ . हश्या लेकाचा सेन्च्युरि मार्तोय की क्वॉय ?
>>> ऊमेश यादव... जबर्या...
>>> ऊमेश यादव... जबर्या... दशकांनंतर कुणी तरी तेज गोलंदाज गवसला आहे.
उमेश यादव, वरूण एरॉन व इशांत शर्मा (आणि अजून ३-४ वर्षे झहीर खान) हे आपले पुढील ८-१० वर्षातले मुख्य गोलंदाज असणार आहेत.
ऑसीज ८ बाद १७९. पाँट्या १५ वर असतान झहीरच्या गोलंदाजीवर अगदी व्यवस्थित पायचित झाला होता. पण पुन्हा एकदा पंचांनी त्याला जीवदान दिले अन्यथा आजच १५० च्या ऑसीजचा डाव संपला असता. आपल्याला जिंकायला २५०-२६० चे लक्ष्य असेल. आपण ते नक्की पार करू अशी माझी श्रद्धा आहे. अर्थात ३०० च्या पुढे लक्ष्य गेले तर मग आपल्याला सामना वाचविणे अवघड आहे.
२००४ मधला दुसरा कसोटी सामना (बहुतेक सिडनेचा) आपण २३८ धावांचा पाठलाग करून जिंकला होता. त्यात द्रविड २४० व नाबाद ७० आणि आगरकर (दुसर्या डावात ६ बळी) हे विजयाचे प्रमुख शिल्पकार होते. हा कसोटी सामना आपण तसाच पाठलाग करून जिंकणार.
२३८ मध्ये द्रविड २४० ? ऐ.ते.
२३८ मध्ये द्रविड २४० ? ऐ.ते. न.
कोहलीवर 'अशी वेळ' न येवो!
कोहलीवर 'अशी वेळ' न येवो! निदान ह्या मॅचमध्ये तरी
आपण २३८ धावांचा पाठलाग करून
आपण २३८ धावांचा पाठलाग करून जिंकला होता. त्यात द्रविड २४० व नाबाद ७० >>>असे असेल ते. म्हणजे दुसर्या डावात ७० धावा.
त्या सामन्याचा धावफलक असा
त्या सामन्याचा धावफलक असा होता.
ऑसीज - पहिला डाव सर्वबाद ५५६ (पाँटिंग - २४२)
भारत - पहिला डाव सर्वबाद ५२३ (द्रविड २३३, लक्ष्मण १४८)
ऑसीज - दुसरा डाव सर्वबाद १९६ (आगरकर ६ बळी)
भारत - दुसरा डाव ४ बाद २३३ (द्रविड नाबाद ७२)
भारताने सामना जिंकला होता.
द्रविड ने बहुतेक मॅच सोडली
द्रविड ने बहुतेक मॅच सोडली हसी चा कॅच सोडुन............हसी एक अत्यंत निच फलंदाज आहे...... त्यामुळे त्याला जीवदान देणे म्हणजे स्वतःला फासी लावुन घेने.........
मॅथ्यु हेडनचे आत्मचरित्र
मॅथ्यु हेडनचे आत्मचरित्र वाचतेय.
पहिलेच प्रकरण स्लेजिंगबद्दल आहे. ऑसीज स्लेजिंगचा गेम प्लान कसा करत होते (म्हणजे अजूनही करतातच) त्याचाबद्दल बरंच लिहिलय. हे पुस्तक अजून कुणी वाचलय का?
आजचा दिवस खरंच मस्त खेळला गेला. बॉलर्सनी कमाल दाखवली. उमेश यादवला अति खेळवून एक्झॉस्ट करायला नको. चांगला खेळतो शिवाय मोक्याच्या क्षणी विकेट्स पण काढतो.
हेडनचे वाचले नाही. कसे आहे
हेडनचे वाचले नाही. कसे आहे लिही वाचल्यानंतर.
हसी एक अत्यंत निच फलंदाज
हसी एक अत्यंत निच फलंदाज आहे...... त्यामुळे त्याला जीवदान देणे म्हणजे स्वतःला फासी लावुन घेने.........
>>
लय हसलो..
नीच म्हणजे काय ? त्याचे कामच आहे ते
<<मॅथ्यु हेडनचे आत्मचरित्र
<<मॅथ्यु हेडनचे आत्मचरित्र वाचतेय.>>
छान, त्यातील बहुमोल माहिती इथे टाकत जा तसेच जयवंत लेलेंचे आत्मचरित्रही वाचा...चॅपेलचे चरित्रही वाचा, वादळी आहे.
अंबाती रायडूला घेऊन जायला हवे
अंबाती रायडूला घेऊन जायला हवे होते, गुणवान फलंदाज आहे पण 'आयसील'ला गेल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होतय.
जल्ला तेन्डल्याची शंभरावी
जल्ला तेन्डल्याची शंभरावी सेन्चुरी कधी होणार काय माहिती????

पहिल्या इंनिग मध्ये जल्ला आउट झाला ना????
देवक काळजी
ऊमेश यादव... जबर्या...
ऊमेश यादव... जबर्या... दशकांनंतर कुणी तरी तेज गोलंदाज गवसला आहे. त्याला आयपिल पासून दूर ठेवावे >> भाऊ खेळतोय तो आधीच तिथे
उद्या मजा येईल.
उद्या सकाळचं पहिलं सत्र
उद्या सकाळचं पहिलं सत्र [ऑसीजचा डाव संपेल हे गृहीत धरलंय ] नीट खेळून काढलं तर सामना जिंकल्यात जमा आहे. विकेट तशी फलंदाजीलाच अनुकूल आहे, असं तर सर्वच म्हणताहेत !
ऑसीच्या ५०० होऊ देत रे
ऑसीच्या ५०० होऊ देत रे म्हाराज्या. तरच सायबाचे महाशतक व्ह्यायचे चान्सेस. २५०-३०० च काढायला लागल्या तर 'नंगा नहायेगा क्या और निचोडेगा क्या?'
पण फुल लेंथ बॉल्स कोण कसे
पण फुल लेंथ बॉल्स कोण कसे खेळतो यावर सगळे अवलंबून दिसते. सचिनने पहिल्या डावातील फॉर्म दुसर्या डावातही आणला पाहिजे. आज काय जबरी तिखट बोलिंग होती आपली. त्यांचे लोकही फुल लेंथच करणार, ती सेहवाग, सचिन वगैरे कशी टॅकल करतात ते बघायला मजा येइल. या पिचवर फुल लेंथ बॉल्स अचानक काहीतरी करून जात आहेत काल संध्याकाळी जेव्हा सिडल ने प्रथम सुरूवात केली तेव्हापासून.
आपल्या कोणीतरी ती लेंथ बिघडवली पाहिजे त्यांच्या बोलर्स ची. बाकी पिच बॅटिंगला सपोर्ट करणारेच आहे.
विकेट तशी फलंदाजीलाच अनुकूल
विकेट तशी फलंदाजीलाच अनुकूल आहे, असं तर सर्वच म्हणताहेत !
लक्ष्मण, धोनि, कोहली यांना तसे कुणि सांगितले नव्हते का?
मला वाटते ११ खेळाडू नि ११०० समालोचक, टीकाकार, शहाणे सल्लागार! त्यामुळे बिचारे खेळाडू जाम गोंधळून जात असणार!
या पिचवर फुल लेंथ बॉल्स अचानक
या पिचवर फुल लेंथ बॉल्स अचानक काहीतरी करून जात आहेत>> +१
सेहवाग काय करतो ह्यावर बरेच काही ठरेल असे वाटतेय.
4th वर िवराट ला उतरायला
4th वर िवराट ला उतरायला हवे....
1ली िवकेट साठी िकमान 70 रन्स तरी जोडल्या पाहीजे..
>> भाऊ खेळतोय तो आधीच
>> भाऊ खेळतोय तो आधीच तिथे
तेच तर म्हणतोय ना... दूर ठेवायला हवा त्याला..
Pages