बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील पोष्टीतल्या बर्‍याच शब्दांचा अर्थ माहित नाहीये मला. फाSर फाSर वर्षांपूर्वी हे शब्द ऐकले आहेत!

फाSर फाSर वर्षांपूर्वी म्हणजे एक रुपयात तिघेजण सिनेमा पाहून वर मध्यंतरात भेळ खाउ शकत त्या काळी, पुण्यात मराठी बोलत तेंव्हा... म्हणजे तुमचे बाबा ...., वगैरे वगैरे काळी,

पहा, बारा चे ए. वे. ए. ठि नुसतेच खाण्याबद्दल नसून अत्यंत मह्त्वाच्या विषयावर परिसंवाद ऐकण्याची सुवर्णसंधि हे सिद्ध होते की नाही?!

पहा, प्रतिसादांची संख्या वाढवण्याखेरीज, नवीन विषय चर्चेस घेतल्याचे पुण्य मिळाले की नाही मला?
एक बीअर जास्त मला.

या वीकांताला हवा चांगली आहे, म्हणजे डीसीला कार्यक्रम होणार म्हणजेच मी पुढच्या वीकांताला एवेएठीला आहे..

मी बटाटेवडे आणणार आहे..

आता पुढे चालू दे.. Happy

पत्ता ईमेल करते लवकरच.
अरे देसायांनी वडे घेतले?? ये चेंज कैसे कब हुआ?? मी काय करू मग? भरली वांगी घेऊ का
? लिस्ट रि पोस्ट करत रहा मग आता. म्हणजे रिपिट होणार नाही!

अरे तिकडे म्हणे जेमतेम १६ बायका जमल्या नि त्याला 'महागटग' म्हणतात!! आपण आनखी एक दोघे जण धरून आणू, फचिन, संदीप चित्रे वगैरे नि 'अति महा प्रचंड ए. वे. ए. ठि' करू. हो ए. वे. ए.ठि. च! गटग कसले? नुसती भाषांची भेसळ! भिक्कारपणा! फार शहाने समजतात काय कुणास ठऊक. मला तर वातते एकहि भाषा धड न येणारे अर्धवट अक्कल असलेले लोक!!

नि अजूनहि खाण्यातच गुंतला आहात? अहो असे काय करता, दहा वर्षे उपाशी असल्यासारखे! जरा 'सौम्स्क्रुतिक' कार्यक्रमांबद्दल बोला ना!!

मै... तुला वडे करायचे असतील तर करच बापडी.
मी भरलेली वांगी करून आणू शकतो.. तुला जे जमेल ते इथे लिही. आणि माझं नांव दुसर्‍या पदार्थावर टाक... किंवा मीच टाकतो..
मै - बटाटेवडे
विनय - भरलेली वांगी... Happy

अरे... Sad तू एक घे.. मी दुसरं असं म्हणतोय तर... आता तू टाक तू काय करणार ते आणि दुसरं माझ्या नावावर.. Happy

हे तुम्ही तुम्हा दोघांच्यातच ठेवा, नाहीतर हा, हा म्हणता सगळेजण पदार्थ करण्याची जबाबदारी एक दुसर्‍यावर ढकलतील नि तिकडे गेल्यावर केवळ रं. पा. वर भागवावे लागेल. अर्थात त्यामुळे 'सौम्स्क्रुतीक' चर्चा छान रंगेल!!

झक्की,
आपल्याकडे सरप्राईज गेस्ट असणार आहेत. ते धरुन अती अती अती महा प्रचंड ए.वे.ए.ठि.च होणार नेहमी प्रमाणे. Happy

अरे काय मेनू ठरला शेवटी? भेळ खाणार की नाही तुम्ही लोक?
गूळपोळ्यांसाठी तुपाची बरणी मी आणू का? Proud
भरल्या वांग्यांबरोबर एखादी उसळ (ओल्या वालांची वगैरे) चांगली वाटेल. ती आणू का?
भाकरी असेल तर त्यासोबत एखादा सामिष रस्सा (चिकन करी वगैरे) चालू शकेल. तो कोण आणणार?

झक्की, खाणं हा सांस्कृतिक कार्यक्रमच आहे. Proud

डिस्क्लेमर : म्हणजे बिरडं नव्हे.
(इतक्या लोकांसाठी डाळिंब्या सोलायची माझी प्राज्ञा नाही. :P)
हे आपले ओले - हिरवे - फ्रोझन मिळणारे वालाचे दाणे.

सायो, गाजराची चटणी? गाजरं किसून फोडणीवर नुसतं मीठ आणि (जसा सढळ) हिरव्या मिरच्या घालून परततात तशी? चवीपुरती साखर आणि लिंबू पिळायचं. झाकण ठेवून वाफ आणायची किसाला. गाजर लवकर शिजतं. अगदी मेण नाही करायचं. वरून खोबरं कोथिंबीर. भाकरीबरोबर (आणि बाकीच्या संक्रांत मेनूबरोबर) बेस्ट जाईल.

बाईमाणूस, चालेल - म्हणजे भाकरीशी होईल.

आता काय झाला मेनू?

बटाटेवडे - मैत्रेयी किंवा कोलावेरीविनय
भेळेचं सामान - स्वाती_आंबोळे
भरली वांगी - मैत्रेयी किंवा कोलावेरीविनय
वालाची उसळ - स्वाती_आंबोळे
चिकन/मटण रस्सा - बाईमाणूस
मलई बर्फी - सायो
मसालेभात आणि तिळगूळ - एबाबा

गुळाच्या पोळ्या आणि भाकरी सुमाकडून कोण आणतंय?

नोट - भाकरी आणि गु पो सुमा करणार असली तरी कुणीतरी आधी ऑर्डर अन येताना पिकप करावी लागेल Happy
गु पो झक्कींनी उचललेय पण भाकरी इज अप फॉर ग्रॅब Happy

Pages