बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहो सिंडरेला, तुम्ही तिन्ही पदार्थ आणणार की दोन, की एक. तिन्ही आणणार असल्यास उत्तमच पण दोनच आणणार असाल तर अनारसे नि उकडीचे मोदक व एकच आणणार असल्यास नक्कीच उकडीचे मोदक.

पुरणपोळी ऐवजी गुळाची पोळी चालेल का? सुमा फूड्स ची? वाटेतच आहे म्हणून विचारले.

>>>कच्छी दाबेली, फ्रँकी, ओल्या वाटाण्याच्या कचोर्‍या, सुरळीच्या वड्या, पिवळा / पांढरा ढोकळा, कॉकटेल इडल्या, डेव्हिल्ड एग्स, चिली पनीर, चिकन ६५, चिकन मलाई कबाब, चिकन / व्हेज डंपलिंग्स -( ग्योझा) , दही वडे,
शेव बटाटा पुरी, काठी कबाब रोल्स, खेकडा भजी, मिरची भजी, मुगोडे, थाय स्टाइल फिश केक्स ,

स्पिनॅच डिप / बाबा गनुज / क्रॅब डिप / स्मोक्ड सामन डिप / वसाबी वा इतर फ्लेवर्स वाले हमस / ग्काकमोले / मँगो किंवा पायनपाल साल्सा />>

हे भगवंता. असा मेन्यु टाकून अगदीच काँप्लेक्स देऊ नका. ह्यातले फार कमी पदार्थ मी स्वतः केलेत किंवा करता येतील असा आत्मविश्वास आहे. Uhoh

हे भगवंता. असा मेन्यु टाकून अगदीच काँप्लेक्स देऊ नका >>
आं ? भगवंताने कुठे मेनू टाकलेत ?
मला यातले कुठले पदार्थ करता येतील याबद्दल कुठे काय म्हटलंय मी Proud

मेनुत नाही का?. अरेरे. Happy
जावुदे, तु काँप्लेक्स घेवु नकोस. Wink

बाकी मेनु कोण कोण आणणार आहेत.
जरा लिहा रे..

भाई, गेल्यावर्षी ८ जानेवारीला आपलं एवेएठि ठरलेलं चांद पॅलेसला. आयत्या वेळी स्नो मुळे कॅन्सल करावं लागलं होतं, आठवतंय का?

अजून एक आयड्या आली बॉ मनात... संक्रान्त स्पेशल मेनू पण ठेवू शकतो... खिचडी/ मसालेभात , भरली वांगी, कढी, सुमा भाकरी, सुमा गुळाच्या पोळ्या , बरोबर पकोडे/ वडे पण जातील.
बघा, सुचवले आपले. शिवाय पोष्ट पण वाढली एक. Wink

चांगली आहे ही कल्पनाही >>>
खिचडी/ मसालेभात, तिळाच्या वड्या माझ्याकडे (करणार कोण ते आपण जाणताच)

ह्या मेन्युला आणखी शेपटं लावायला हवीत नाहीतरी पदार्थ कमी आणि माणसं जास्त व्हायचं. भेळ वगैरे प्रकार आणायचेत ना?

हो स्टार्ट्रर्स ठेवू की भरपूर. हा मेनू ठीक नसेल वाट्त तर आधीचा मिक्स मेनूही चालेलच. Happy स्वारी ! स्वारी! कन्फूज केले का मी ?

अजून एक आयड्या आली बॉ मनात... संक्रान्त स्पेशल मेनू पण ठेवू शकतो... खिचडी/ मसालेभात , भरली वांगी, कढी, सुमा भाकरी, सुमा गुळाच्या पोळ्या , बरोबर पकोडे/ वडे पण जातील. >> सुमाला पण बोलवा GTG ला Lol

आता फक्त हलव्याचे दागिने करवून घ्यायचे राहिलेत. >>>> मृ.. हो ना.. बरोबर मुलांची बोरनहाणं आणि हळदीकुंकू पण ठेवा.. काळे कपडे हा ड्रेसकोड. म्हणजे एकदम थीम पार्टी होऊन जाईल ! Proud

आम्ही ए.वे.ए.ठि.ला न येणार्‍यांची सजेशन्स घेत नाही.

हुकुमावरून Happy

अजून एक वाढली!

अरे किती नुसते खाण्यापिण्याच्या गोष्टी करता? सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सु करणारे( आयत्या वेळी स पासून सुरु होणारे तिसरे काही काही आठवले नाही म्हणून हेच लिहीले) लोक आपण, जरा सांस्कृतिक कार्यक्रमांबद्दल बोला ना!

मायबोलीवर चर्चिल्या जाणार्‍या विषयांचा आपल्या जीवनावर होणारे सामाजिक, राजकीय, नि आर्थिक परिणाम, यावर चर्चा होऊ शकेल का?

Pages