Submitted by गजानन on 14 July, 2011 - 02:56
मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातली/देशातली ही परिस्थिती सुधारून असे हल्ले टाळण्यासाठी एक नागरिक म्हणून तुमच्या मते 'मी' काय करणं अपेक्षित आहे?
'मी' म्हणजे भारत देशातला एक सामान्य नागरिक.
कविता करणं
ललित/लेख लिहिणं
शासनाला दोष देणं
चरफडत बसणं
मिडियाला शिव्या देणं
या व्यतिरिक्त.
मला प्रामाणिकपणे हे जाणून घ्यायचे आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुस-याचं मत खोडून
दुस-याचं मत खोडून काढण्यापेक्षा स्वतःचं मत लिहीणं योग्य होईल असं मला वाटतं..
बेफिकीर, तुमचे पांचट जोक्स
बेफिकीर,
तुमचे पांचट जोक्स कुठे करायचे याचे तारतम्य तुम्ही बाळगाल ही आशा.>>>
कृपया विनोदाला मटेरिअल पुरवू नयेत अशी विनंती! मी गंभीरच आहे. कान किंवा डोळे उघडे ठेवणारे लाखो लोक काल मुंबईत होते. स्फोट झालाच!
मागे योगने लिहिलेला हा लेख
मागे योगने लिहिलेला हा लेख आणि काही प्रतिक्रिया-
विषयाशी संबंधित आहे म्हणून देत आहे.
http://www.maayboli.com/node/4711
पुढच्या पिढीने दिलेली दुषणे
पुढच्या पिढीने दिलेली दुषणे सहनकरण्याची शक्ती वाढवणे.
फचिन, ऊत्तम पोस्ट! जिहादी
फचिन,
ऊत्तम पोस्ट! जिहादी आतंकवादाची जात आणि धर्म काय आहे हे वेगळे सांगायला नको आणि त्याकडे दुर्लक्ष करायचे सल्ले देणारी मानसिकता ही वैचारीक ग्लानी चं प्रतीक आहे. (मंदार जोशी म्हणतात तसे) "अल्झायमर" ही त्या ग्लानीची शेवटची अवस्था आहे... आपली वाटचाल मला त्याच दिशेने चाललेली दिसते आहे.
"मी वैयक्तीक काय करावे" ही चर्चा एकंदरीत या घटनेच्या अनुशंगाने निर्रथक आहे. हे शासन, सरकार, सुरक्षा यंत्रणा यांच्या पंगू कार्यपध्दतीचा हा परिणाम आहे. their job is to protect common citizen.. if a common man has to invest time and efforts in policing then whats the need of the entire police system? rediculous... we indiands don't seem to get it still... what adavani said was correct: this is policy failure and what he means is policy at various levels. unfortunatley even that is seen as politically motivated argument, even though it is, thats the reality!
ऊरलेल्या १% मधिल शक्यता राहुल गांधीच्या कानाखाली आवाज काढून त्याला समजावून द्यायला हवी. नालायक साले ईतकेही म्हणू शकत नाही की या देशात एकही हल्ला होणार नाही यासाठी आम्ही जीवाचे रान करू....... आणि हा म्हणे भावी पंतप्रधान.. चिदंबरम चा अहंकार आणि राहुल ची हिरोगीरी यामूळे वाट लागलीये सगळी.. आणि यांची चाटणारे सगळे षंढ नेते. मुंबई पुरते बोलायचे तर महाराष्ट्राचे जाणकार नेते/नेतृत्व गेली अनेक दशके बॉलीवूड, क्रीकेट आणि जमिन जुमला यातच आयुष्याची ईतीश्री मनण्यात मग्न आणि यत्न आहेत आणि त्या साठी प्रसंगी कुठल्याही व्यक्ती/पक्ष/धोरणाचे पाय चाटायला त्यांनी कमी केलेलं नाही.
या सर्वात वाईट वाटते ते सामान्य माणसाबद्दल. या देशात सामान्य माणसाने काय काय आणि किती करायचे? एव्ह्डे करूनही जीवाची निश्चींती नाहीच.
शा.. आताशा याबद्दल चर्चा देखिल उद्वीग्न करते. २६/११ नंतर असाच बाफ निघाला होता.. तोही वाचा.. आपण आजही तीन, पाच, दहा वर्षापूर्वी होतो तिथेच आहोत.. कुठतेरी वाचले, स्वातंत्र्यानंतर गरीबी, उद्योग, निवारा (पिण्याचे पाणी, घरे वगैरे) या समस्या होत्या त्या आजही आहेत त्यात भ्रष्टाचार आणि दहशतवादाची भर पडलीये. म्हणे सुपरपॉवर.. बौध्दीक पॉवर काय कॉमन सेंस देखिल आताशा दुर्मीळ झाला आहे.
फचिन, ऊत्तम पोस्ट!
फचिन,
ऊत्तम पोस्ट!
गजाजन, ह्या व अश्या
गजाजन,
ह्या व अश्या प्रकारच्या चर्चा इथे अश्या बाफवर करून फक्त इथे(मायबोलीवर) येणार्या,लिहिणार्या चार एक लोकांची मतं कळून मग पुढे काय करणार असा मला प्रश्ण आहे.
कारण चर्चा तर २६/११ घटनेच्या वेळी झालेल्या आठवत आहे मग पुढे काय होते त्याचे?
जागरुकता किती किंवा लोकांचा एकुणच अश्या घटनांकडे बघण्याचा दॄष्टीकोन काय आहे बघायचा उद्देश आहे का?
म्हणूननच खालील वाक्यला अनुमोदन द्यावेस वाटतेय,
>>मी काय करावे एकंदरीत या घटनेच्या अनुशंगाने ही चर्चा निर्रथक आहे<<
फचिन अनुमोदन. खासकरून १ ते १०
फचिन अनुमोदन. खासकरून १ ते १० च्या वाक्याला.
उपाय एकच आहे. अतिरेक्यांना जिथे असतील तिथे शोधून मारणे. तो पर्यंत १ ते १० निरर्थक! तशी राजकीय इच्छाशक्ती नाही. कारण धर्म आडवा येतो. त्यामुळे आपणही एक दिवशी मरणार.
याच्या कानाखाली आवाज काढुन कोणितरी याला अमेरिकेचं उदाहरण ध्या. >> अनुमोदन राज.
पण अतिरेकी का बनतो , किंवा तो बाहेरून आला असेल तर त्याला इथे मदत का मिळते याचा विचार करून ती परिस्थिती बदलणे. >>> म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे. आणि परिस्थिती बदलणे म्हणजे काय? कशाची परिस्थिती? काश्मीर देणे का?
गजाभौ आपण काहीही करू शकत नाही. जे उपाय लोकांनी करायचे आहेत ते दिर्घकालीन उपायात मोडतात, सरकारने करायचे उपाय हे तात्काल व दिर्घकालीन दोन्ही असतात. आपले सरकार फक्त तात्काल उपाय योजते म्हणून हे सर्व चालूच आहे. ही सर्व निरर्थक चर्चा. तेवढाच आपला सर्वांचा राग कमी इतकेच महत्त्व. (व्हेन्ट)
सँटी.. उत्तम पोस्ट.. संपूर्ण
सँटी.. उत्तम पोस्ट.. संपूर्ण अनुमोदन !
केदार, योग.. तुमच्याही पोस्ट चांगल्या आहेत..
चर्चा निरर्थक आहे? मग काय
चर्चा निरर्थक आहे?
मग काय करायचे? बोलायचेही नाही?
संताप व्यक्त कुठे करायचा? चांगले व्यासपीठ लाभले आहे, तेथे २६/११ लाही असाच 'बाफ' निघाला होता व तो निरर्थकच ठरला याचे रेफरन्सेस देत बसायचे?
गजानन यांनी उत्तम धागा काढलेला असून 'इफ अॅट ऑल' एखाद्या राजकारण्याने पब्लिकचे ओपिनियन बघ्ण्यासाठी पाहिलेच तर येथे स्पष्ट मत मिळू शकावे.
माझा स्वतःचा अनुभव आहे की एका 'इतर' संकेतस्थळावर मी गांधीभवनात चाललेले प्रकार लिहिल्यानंतर गांधीझम पाळणार्यांनी मला घरी येऊन धमक्या दिल्या. माबो कडे नक्कीच तसे पाहिले जात असेल. (किमान काही संबंधीत पाहत असतीलच).
http://www.manogat.com/node/15681 - मुद्दा पेटलाच, पण मला धमक्या दिल्या गेल्या. मी गांधीझम न पाळता धमक्यांना त्याच भाषेत उत्तरे दिली.
चर्चा व्हायला हवी यारहो!
-'बेफिकीर'!
वैयक्तीक मला अजूनही एका
वैयक्तीक मला अजूनही एका गोष्टीचं गूढ आश्चर्य वाटतयः या वेळी कुठल्याही छोट्या मोठ्या संघटनेने अजून तरी स्फोटांची जबाबदारी पत्करली नाहीये. याचे बरेच अर्थ निघतातः
१. जर लष्कर तायबा वा ईतर पाक पुरस्कृत संघटनांन हे केले असेल तर या वेळी क्रेडीट घ्यायची चूक करू नका असे पाक स्वतः त्यांना सांगेल.. कारण तसे झाले तर त्यातून ऊद्भवणारी आंतारराष्ट्रीय गंभीर परिस्थिती पाक ला पुरते बेचिराख केल्याशिवय शमणार नाही हे त्यांना पुरेपूर ठावूक आहे. तेव्हा ही शक्यता मला फार कमी वाटते.
२. देशांतर्गत ईतर कुठल्याही गटाने जबाब्दारी घेतली तर तो गट ज्या धर्माचा असेल त्यांची वाईट्ट वाट लागल्याशिवाय रहाणार नाही हेही त्यांना माहित आहे.. कारण आता जनता घाबरलेली नाही प्रचंड चिडलेली आहे.
३. सिमी, वा ईंडीयन मुजाहिदीन वगैरे संघटनांचा यात हात आहे आणि शेवटी आम्ही त्यांना पकडले आहे असे सरकारने जाहीर केले तरी त्यावर विश्वास ठेवून आपण पुनः सर्व विसरून जाणार आहोत का?
४. एखाद्या नविन गट्/संघटनेने हे केले ही शक्यता खूप कमी. या गटाला मुंबई चे जनजीवन, भूगोल, सामाजिक घटक (सर्व स्फोट हिंदू समुदायच्या परिसरात झालेले आहेत त्यातूनही मध्यमवर्गीय मराठी, गुजराथी), दैनंदीन जीवन याबद्दल नक्कीच माहिती, अनुभव सर्व आहे. थोडक्यात हा गट म्हणजे ईतर प्रस्थापित अतीरेकी संघटनांचाच एक गट असणार हे नक्की.
५. सर्वात शेवटी यात "सॅफ्रन टेररिझम" वगैरे आहे असले भलते दिशाभूल करणारे कॅंपेन सरकारने पुनः चालवले तर मात्र परिस्थिती अजूनच चिघळेल असे वाटते.
थोडक्यात या घटनेचा गुंता थोडा विचित्रच आहे. जिथे सरकारची विश्वासार्हताच संपलेली आहे तिथे याच सरकारवर अशा घटनांचा तपास करण्याची आणि गुन्हेगारांना शीक्षा देण्याची कुवत, ईच्छाशक्ती आहे का या प्रश्णाचे उत्तर येणार काळ कदाचित देईल.. तूर्तास ते या परिक्षेत "नापास" आहेत.. आपण त्यांना किती वर्ष atkt वर टीकू देणार आहोत हाच प्रश्ण आहे.
मुजाहिद्दीन संशय अधिकृत वृत्त
मुजाहिद्दीन
संशय
अधिकृत वृत्त
<<भ्रष्टाचाराचा आणि
<<भ्रष्टाचाराचा आणि दहशतवादाचा काय संबंध>>
दहशतवाद्यांना बनावट ओळखीवर सिम कार्ड्स मिळतात, यात भ्रष्टाचार + हलगर्जीपणा आहेच.
यापुढे एकही हल्ला होउ देणार नाही असे नुसते आश्वासन , जे कोणालाही (कोणत्याही पक्षाला )पाळणे शक्य नाही; देण्यापेक्षा प्रत्येक हल्ला टाळणे अशक्य आहे ही फॅक्ट सांगितली तर काय चुकले?
सेक्युरिटी एस्पर्ट्सच्या मते अमेरिकेची भूमी दहशतवाद्यांच्या उगमापासून दूर आहे त्यामुळे त्यांना असे हल्ले रोखणे जास्त सोपे आहे. पुन्हा त्यांच्यासारखे रेशल प्रोफायलिंग करायची सोय नाही. आणि आजही कितीतरी अमेरिकन सैनिक अफगाणिस्तान/इराकमध्ये बळी जातच आहेत.
>>> ऊरलेल्या १% मधिल शक्यता
>>> ऊरलेल्या १% मधिल शक्यता राहुल गांधीच्या कानाखाली आवाज काढून त्याला समजावून द्यायला हवी. नालायक साले ईतकेही म्हणू शकत नाही की या देशात एकही हल्ला होणार नाही यासाठी आम्ही जीवाचे रान करू....... आणि हा म्हणे भावी पंतप्रधान..
अमूल बेबी काल सांगत होता की ९९ टक्के अतिरेकी हल्ले आम्ही रोखलेले आहेत. हे जर खरं असेल तर, निव्व्ळ मुंबईत होणारे किमान ५०० हल्ले तरी यांनी रोखले असावेत कारण मुंबईत गेल्या ५-६ वर्षात किमान ५ हल्ले झालेले आहेत. हाईट ऑफ स्टुपिडिटि!
>>> चिदंबरम चा अहंकार आणि राहुल ची हिरोगीरी यामूळे वाट लागलीये सगळी.. आणि यांची चाटणारे सगळे षंढ नेते.
वाट लागण्यामध्ये चिदू किंवा अमूल बेबीपेक्षा मनमोहन सिंगांच्या निष्क्रियतेचा जास्त वाटा आहे. आपण पंतप्रधान नावाचे असून सर्व निर्णय घेण्याचा अधिकार सोनिया गांधींचा आहे व आपले खरे काम, सोनिया गांधीनी घेतलेल्या निर्णयांची, अंमलबजावणी अधिकारी या नात्याने अंमलबजावणी करणे हे आहे, असे त्यांचे गेल्या ७ वर्षातले वर्तन आहे. काल रूग्णालयाला भेट दिल्यावर त्यांची प्रतिक्रिया बघताना संतापही आला आणि त्यांची कीवही आली. प्रतिक्रिया देताना एखाद्या यंत्रमानवाच्या चेहर्यावर जसे निर्विकार आणि स्थितप्रज्ञ भाव असतात, तसा त्यांचा चेहरा होता. त्यांच्या बोलण्यात ना जोश होता ना आत्मविश्वास ना भावनेचा ओलावा ना स्फोटाबद्दलची चीड. यापूर्वी झालेल्या सर्व अतिरेकी हल्ल्यानंतर त्यांनी जी वाक्ये म्हणून दाखविली होती, तीच पाठ झालेली सर्व वाक्ये त्यांनी काल पुन्हा घोकून दाखविली. "पुन्हा असे हल्ले होऊन देणार नाही, दोषींना कडक शिक्षा करू, अजिबात गय करणार नाही . . ." वगैरे ब्ला ब्ला. नुसती पाठ केलेली वाक्ये निर्विकार चेहर्याने म्हणून दाखविण्यापेक्षा त्यांनी काहितरी ठोस कृती करणे आवश्यक आहे आणि तिथेच ते कमी पडत आहेत.
पाकिस्तान हा भारताचा शत्रू
पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे. युध्द करून किंवा अतिरेकी हल्ले करून गेली ६४ वर्षे पाकिस्तान भारताला नष्ट करायचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानशी शांतता चर्चा करणे, पाकिस्तानशी मैत्री करणे, भारत्-पाकी भाईभाई अशा घोषणा देणारे मूर्खांच्या नंदनवात रहात आहेत.
माझ्या मते परदेशस्थ भारतीयांनी पाकिस्तानी दुकानात व पाकिस्तानी रेस्टॉरंटमध्ये जाणे बंद करावे. कारण तिथून खरेदी करणे म्हणजे अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला हातभार लावणे. देशस्थ भारतीयांनी सुध्दा सारेगमप सारख्या पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या कार्यक्रमांकावर बहिष्कार टाकावा. तसेच अदनाम सामी, फते आली खान इ. पाकी गायकांना प्रोत्साहन देऊ नये. त्याचप्रमाणे पाकिस्तानविषयी सहानूभूती असलेल्या पक्षांना मत देऊ नये.
>>यापुढे एकही हल्ला होउ देणार
>>यापुढे एकही हल्ला होउ देणार नाही असे नुसते आश्वासन , जे कोणालाही (कोणत्याही पक्षाला )पाळणे शक्य नाही; देण्यापेक्षा प्रत्येक हल्ला टाळणे अशक्य आहे ही फॅक्ट सांगितली तर काय चुकले?
मयेकर, विनोद करायची हुक्की आलीये काय? ते मुंबईतले शेंबडे पोरही सांगेल हो...
मुद्दा एव्हडाच आहे की अशा वेळी जनतेला विश्वास, आधार, बळ द्यायचे की स्वताच्या नालायकपणाचे समर्थन करत फिरायचे..? मुंबईकरांना फॅक्ट्स आणि कॉमन सेंस राहुल गांधीकडून शिकायची गरज नाही. त्याचा जन्म होण्या आधीपासून मुंबईकर अनेक संकटांशी तोंड देत जगत आलाय. भावी पंतप्रधानाचा हा अॅटिट्यूड असेल तर सामान्य माणसाने काय रोज देवापुढे नारळ ठेवून बाहेर पडायचे काय? यापेक्षा किमान जनतेच्या सुरक्षेसाठी कटीबध्द असलेल्या बाहेरच्या नेतृत्वाकडे देश "आउट्सोर्स" केलेला परवडेल किमान पैशाच्या मोबदल्यात सुरक्षिततेची भावना तरी मिळेल!
>>> यापुढे एकही हल्ला होउ
>>> यापुढे एकही हल्ला होउ देणार नाही असे नुसते आश्वासन , जे कोणालाही (कोणत्याही पक्षाला )पाळणे शक्य नाही; देण्यापेक्षा प्रत्येक हल्ला टाळणे अशक्य आहे ही फॅक्ट सांगितली तर काय चुकले?
आम्हाला जनतेचे रक्षण करणे शक्य नाही, याची ही कबुलीच नाही का? आणि जे सरकार जनतेच रक्षण करू शकत नाही, याची जाहीर कबुली देते, त्यांना लाथ घालून हाकलणेच योग्य.
आम्ही ९९ टक्के अतिरेकी हल्ले रोखले, हा दावा अमूल बेबीने कशाच्या जोरावर केला खुदा जाने.
आणि जे सरकार जनतेच रक्षण करू
आणि जे सरकार जनतेच रक्षण करू शकत नाही, याची जाहीर कबुली देते, त्यांना लाथ घालून हाकलणेच योग्य. >>> याबद्दल दुमत नाही. पण मग निवडुन कोणाला द्यायचे??
भ्रष्टाचाराचा आणि दहशतवादाचा
भ्रष्टाचाराचा आणि दहशतवादाचा थेट संबंध आहे. युरोपीय राष्ट्रं आणि अमेरिका दहशतवादी कारवाया रोखू शकले कारण त्यांनी काळा पैसा, हवाला, दहशतवाद्यांची बँक अकाउंटं यांवरच कुर्हाड घातली. आपल्याकडे अजूनही तसं झालेलं नाही. सगळेच दहशतवादी काही बाहेरून आलेले नाहीत. आपल्याच देशाचे ते नागरीक आहे, आणि त्यांना मिळणारी आर्थिक मदत ही हवाल्याच्या माध्यमातून होते. यात अंडरवर्ल्डचाही सहभाग असतोच. राजकारण्यांच्या, व्यापार्यांचा, पोलिसांचाही असतोच असतो. मोठा आर्थिक लाभ नसता तर गुन्हेगारी बर्याच मोठ्या प्रमाणात कमी झाली असती. हे झालं आर्थिक मदतीबाबत. पैसे देऊन आपल्याकडे कुठलंही काम करून घेणं शक्य असतं, आणि त्याचाही फायदा अतिरेक्यांना फार मोठ्या प्रमाणात मिळतो.
दुसरं म्हणजे, फक्त सरकारने धर्माचा, जातीचा विचार बाजूला ठेवून काय होणार आहे? सरकार जातीचं, धर्माचं राजकारण करतं कारण मुळात जनताच त्या विचारसरणीची असते. तुम्ही जातीचा, धर्माचा विचार करणं सोडा, म्हणजे तुमचे नेतेही तसा विचार करणं सोडतील. सरकार चालवणारे लोक काही परग्रहावरून आलेले नसतात. याच समाजात वाढलेल आणि राहणारे असतात. जसा समाज, तसे नेते.
भावनेच्या भरात इतरांना मूर्ख ठरवणं, इतरांकडूनच अपेक्षा करणं सोपं असतं. पण दहशतवाद हा फक्त काही लोकांना फाशी देऊन, किंवा राजकारण्यांना शिव्या देऊन संपणार नाही.
इथून पुढे तर फारच सतर्क रहावे
इथून पुढे तर फारच सतर्क रहावे लागेल. भारतातल्या काही स्फोटकतज्ञांच्या मते हा स्फोट केवळ "ट्रायल रन" होता. नवीन तंत्र वापरून पाहिले. मॉडरेट रिस्क घेऊन स्फोटके कमी शक्तीची वापरली होती (अमोनियम नायट्रेटचे प्रमाण फक्त ९००, ७५० आणि २५० ग्रॅम्स, अनुक्रमे जवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर). आजच्याच वर्तमानपत्रात ही बातमी आहे, आणि ती फारच गांभिर्याने घेतली पाहिजे सरकारने!
कसाब ला अजुन शिक्षा का होत
कसाब ला अजुन शिक्षा का होत नाहीये ?
>>सगळेच दहशतवादी काही बाहेरून
>>सगळेच दहशतवादी काही बाहेरून आलेले नाहीत. आपल्याच देशाचे ते नागरीक आहे,
>>कसाब ला अजुन शिक्षा का होत
>>कसाब ला अजुन शिक्षा का होत नाहीये ?>>
काही विशिष्ट जमातीची मनं दुखावली जातील, आणि मग व्होटबँक ब्यांकरप्ट होईल. मग आम्ही(च) पुन्हा निवडून कसे येणार?
बित्तुबंगा शांत व्हा. त्या
बित्तुबंगा शांत व्हा. त्या विशिष्ट जमातीची मनं जपायला नकोत का?
बित्तुबंगा, कसाबच्या शिक्षेचा
बित्तुबंगा,
कसाबच्या शिक्षेचा आणि 'विशिष्ट जमाती'चा काहीएक संबंध नाहीये. सुप्रीम कोर्टात अजून खटला उभा राहिलेला नाही.
सुप्रीम कोर्टात अजून खटला उभा
सुप्रीम कोर्टात अजून खटला उभा राहिलेला नाही. > का ? त्याला काही टाईमलिमिट नाहीये का आपल्या कायद्यात ?
“We will stop 99 per cent of
“We will stop 99 per cent of the terror attacks but 1 per cent of attacks might get through.It is very difficult to stop every single terrorist attack. The idea is that we have to fight terrorism at the local level. There has been improvement in our intelligence. The way we think about fighting terrorism has improved by leaps and bounds. But terrorism is something that is impossible to stop all the time. There is now an attack on Mumbai. But you would not have heard all the attacks that were stopped.However,We must try to stop 100 per cent of the attacks. It is something we will fight and defeat." राहुल गांधींचे संपूर्ण वक्तव्य.
सुप्रीम कोर्टाचा निकाल
सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यावरही राष्ट्रपतींकडे दयेच्या अर्जाचा सोपस्कार असतो. त्यावर निर्णय लागायला अजून काही वर्ष!
मंडळी, रिक्षा फिरवत नाहीये पण
मंडळी,
रिक्षा फिरवत नाहीये पण अशा प्रकारच्या घटना, हल्ले संदर्भात शासनाला ऊपाय्/सूचना ईथे लिहील्यात तर सर्व एका ठिकाणी येईल, खेरीज ते एकत्रीतपणे ईतर वृत्तपत्रे, माध्यमे यांना एडीट करून पाठवता येईलः
http://www.maayboli.com/node/27348
चिनुक्सला अनुमोदन. बदल हा
चिनुक्सला अनुमोदन. बदल हा आपल्या(च) हातात आहे, आपल्या शिवाय तो कुणीही घडवुन आणु शकत नाही. पण त्याकरता आपण सांघीक रित्या काही करायला हवे. मुळ भ्रष्ट आचार, भ्रष्ट विचार हे आहेत, चलता है ची वैचारीक शिथीलता आहे.
झोपलेल्या पोलीसाला उठवायला आपण का कचरतो? कारण आई-बाप मुलांना पोलीसांची भिती दाखवतात. पोलीस भक्षक आहेत हे रस्त्यावर लाच देणार्यांकडे पाहुन आपण शिकतो (पण ते थांबवायचा प्रयत्न करत नाही). We are the people our parents warned us about.
Man in the mirror आठवा. Be the change.
राजकारण्यांना नुसता दोष देऊन काही होणार नाही. We get the government we deserve.
Any form of government is bound to be wretched. Democracy is the best we have.
शेजार्यांशी ओळख करुन घेण्याबद्दलचा मुद्दा महत्वाचा आहे. स्वतःची जाणीव वाढवा. कर भरुन कर झटकण्याऐवजी प्रादेशीक गोष्टींमध्ये सहभागी व्हा, सक्रीय व्हा.
कायदे पाळा, गप्पा टाळा.
Pages