दहशतवाद : मी काय करणं अपेक्षित आहे?

Submitted by गजानन on 14 July, 2011 - 02:56

मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातली/देशातली ही परिस्थिती सुधारून असे हल्ले टाळण्यासाठी एक नागरिक म्हणून तुमच्या मते 'मी' काय करणं अपेक्षित आहे?

'मी' म्हणजे भारत देशातला एक सामान्य नागरिक.

कविता करणं
ललित/लेख लिहिणं
शासनाला दोष देणं
चरफडत बसणं
मिडियाला शिव्या देणं

या व्यतिरिक्त.

मला प्रामाणिकपणे हे जाणून घ्यायचे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिरा,चिनूक्स्,मंजिरी,अकु. तुम्हा सर्वांचे प्रतिसाद आवडले.
आपण सारे सिस्टिम सुधारण्याच्या गोष्टी करतो. पण सिस्टिम ही काही एक काँक्रीट वस्तू नाही जी सुधारता येईल. ती माणसांची मिळून बनलेली असते.म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपापली सर्व कर्तव्ये-नागरी,राष्ट्रीय,गृह- बिनचूक पालन केली पाहिजेत.आजची अनागोंदी,केऑस,गलथानपणा हलगर्जी,दिरंगाई कोणाचा पायपोस कोणाच्या पायात अशी स्थिती हे सर्व मानवी चूक, कर्तव्यपालनातल्या विशेषतः नागरीकर्तव्यपालनातल्या मानवी ढिलाईमुळे अथवा बेपर्वाईमुळे आणि स्वार्थीपणामुळे घडते.हे सर्वच क्षेत्रात दिसते. उदा.सैन्यदले,शासन,लोकप्रतिनिधी,बाबूलोक,विरोधी पक्ष,शिक्षण,व्यापार,आयात-निर्यात,खाजगी उद्योगक्षेत्र,माध्यमे, न्यायसंस्था इ.इ.
म्हणून 'मी' पासूनच सुरुवात केली पाहिजे. आणि अर्थातच ह्या प्रोसेसमध्ये शॉर्ट्कट नाही,ती एक दीर्घकालीन उपाययोजनाच असू शकते.

एका हल्ल्यामागे दहा अयशस्वी हल्ले असू शकतात. हल्ले टाळले गेल्याच्या घटनांना तितकीशी प्रसिद्धी मिळत नाही. त्यातून खरं तर बरच काही प्रेरणादायी हाती लागू शकेल. पोलीस किंवा गुप्तचर यंत्रणा यांचे कान आणि डोळे तरी शेवटी कोण असतात ?
काही खबरे आणि शेवटी सर्वसामान्य माणसच !!
त्यांनी योग्य वेळी दिलेल्या टीप्समुळे हल्ल्याच्या योजना अयशस्वी होत असतात.

दुर्दैवाने अशा बातम्या मुख्य पानावर असूनही सहज दिसूनही येत नाहीत. या बातम्यांना ठळक प्रसिद्धी मिळाली तर "मी" काय करू शकतो हे अधोरेखित होत जाईल

माझ्याकडून समाप्त
धागाकर्त्याच्या पोस्टच्या प्रतिक्षेत

माझी पोस्ट प्रेडिक्टेबल वाट्ण्याची शक्यता खूप आहे पण मी हे नक्की करू शकते व करणार.

वरील सर्व चर्चेत अनुल्लेख झालेला गट म्हणजे आतंक वादाचे बळी. त्यांच्यासाठी खालील करणे.

१) जागरूक नागरिकांचे छोटे छोटे आधार गट बनविणे. प्रत्येक उपनगरात/ विभागात इत्यादी. त्यातर्फे
मेणबत्त्या जाळणे वगैरे वाया जाणारे कार्यक्रम न करता प्रत्येक बळी कुटुंबास भेट देउन त्यांना तड्क कशाची गरज आहे ते करणे.
२) घरात शिधा भरणे, आजारी. जखमींची चिकित्सा व उपचार यात मदत. ग्रीफ काउन्सेलिंग व त्यांना
भावनिक आधार देणे.
३) दह्शतवादात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांच्यासाठी शालेय मदत. शिक्षण/ नोकरी मिळविण्यात मदत.
असा एक डेटाबेस बनवून त्यात फॉलोअप करून कार्य तडीस नेणे, शिकणारी मुले दहावी - बारावी डिग्रीपरेन्त नेणे त्यांना मानसिक आधार देणे. त्यांची शक्ती व ऊर्जा वाया किंवा दुरुपयोगी जाउ न देता
सत्कारणी लावणे.
४) सरकारी मदत किंवा अनुदान लाकडी पाय इत्यादी मिळविण्यासाठी फार खेटे घालावे लागतात
ते घालण्यात मदत करणे किंवा मंत्रालयात, सरकारी विभागात काँटॅक्ट्स डेवलप करणे. त्यांना मदत पदरात पाडून देणे. ( पैसे न घेता. ) या सर्वांसाठी राजकीय नेते, उद्योजक यांच्याकडे शब्द टाकणे अपील करणे, आर्थिक मदत मागणे. प्रत्येक कंपनीत सीएस आर फंड असतो. नेत्यांकडे फंड असतो. एखाद्या दहशतवादाला बळी पडलेल्या निर्दोष माणसाच्या फॅमिलीसाठी मदत मागायला मला अजिबात लाज वाट्णार नाही. हे सर्व अबव बोर्ड चेक पेमेंट नेच करायचे व त्यांच्या नावाने त्यांना ड्यू आर्थिक साहाय मिळवून द्यायचे.

५) त्यांना असहाय, विकल वाट्त असल्यास मेडिकल काउन्सेलिंग परेन्त नेणे.

६) नागरिकां साठी दहशतवादाचा सामना कसा करायचा ह्याचे वर्कशॉप घेणे. वरील अनुभव शेअर करणे
व त्यांची कुटुंबे टेरर प्रूफ व्हावीत अश्यासाठी प्रयत्न करणे. सध्याच्या काळात कोणीही दहशतवादाचे बळी ठरू शकते प्रॉबॅबिलिटी अनुसार. घरचे लोक, मुले, पार्टनर, आईबाप ह्यांच्याशी बोलून त्यांना सेन्सिटाईज करणे. अशी आपत्ती आल्यास काय करायचे त्याचे थोडे प्लॅनिन्ग करवणे.

७) स्पेशलाइज्ड डॉग ब्रीडस असतात त्यांना ट्रेनिन्ग देउन गर्दीच्या भागांतून नियमित दर रोज फिरवायचे
ह्यासाठी ग्रूप एफर्टची गरज आहे. पण मुंबईसारख्या ठिकाणी जिथे अतो नात पैशाची उलाढाल होते / व गर्दी असते तिथे हे गरजे चे आहे. अ ट्रेन्ड डॉग कॅन सेव मेनी लाइव्ज. ट्रेनिन्ग साठी खास स्कूल्स पण असतात.
एक जुवेलर जितका खर्च लग्न कार्यात करतो त्याच्या कितीतरी कमी खर्चात ट्रेन्ड कुत्रा व हँडलर येइल.
पण तशी मानसिकता हवी.

सरकार व पोलीस, राजकीय नेते यांच्या बरोबरीने काम करणे जरुरीचे आहे. रोमँटिक मानसिकता बाजूला ठेउन सिटिझनरीने टफ होणे काळाची गरज आहे.

आपल्या मातीची प्रवृत्ती अधिक शांतताप्रिय व दुर्दैवी प्रकार विस्मरणात टाकणारी आहे.

रस्यावर येणार का गजानन? कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता केवळ 'एक नागरीक' म्हणून रस्त्यावर येऊन शासनाचा व न्यायसंस्थेतील त्रूटींचा निषेध करायचा आणि जनजीवन अ‍ॅफेक्ट करायचे. हळूहळू अ‍ॅफेक्ट झालेले लोकही सामील होतील. सगळे ठप्प झाल्याशिवाय सरकार दरबार हालणार नाही.

लोकांची 'शाही' हा अर्थच लावत नाही आपण!
गजानन हो म्हना ! आज नाहि तर उदद्या हेच कराव लागनार आहे!
बेफिकिर : आज नाहि तर उदद्या हेच कराव लागनार आहे!
बेफिकिर : आज नाहि तर उदद्या हेच कराव लागनार आहे!
बेफिकिर : आज नाहि तर उदद्या हेच कराव लागनार आहे!

बरोबर. धुरळा खाली बसलाय, पुढचं वादळ येइस्तोवर. इकडे "साधकबाधक" चर्चा करण्यापलिकडे कोणाला पडली आहे? नाहितर एव्हाना केदारच्या प्रस्तावाला पॉझिटिव्ह रिस्पाँस आला असता.

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

च्च! अहो आता क्रिकेट नाही का सुरु झाले? मग? ते बघायचे, त्याबद्दल बोलायचे का काही दिवसांपूर्वी होऊन गेले त्याबद्दल? आपले पुढारी म्हणाले नाहीत का, की हे असे हल्ले थांबणे शक्य नाही, एव्हढ्या मोठ्या मुंबईत असे काही ना काही होतच असते, वगैरे. शिवाय कुणि केले हे अजून कळलेच नाही! मग काय करणार?
तर जरा चालू घडामोडींकडे लक्ष द्या. झाले गेले होऊन गेले!

>>मी, आणि आणखी काही लोकांनी आता सुरूवात केल्याने काहीतरी होऊन अजून शंभर वर्षांनी समजा असे माणसाचाच द्वेष करणार्‍या माणसांचे बाँबस्फोटासारखे उपद्व्याप थांबतील.

Biggrin
छान मनोरंजन झाले. उत्तम साहित्तिक वाक्य यापलिकडे काही मूल्य नाही.

इथं येऊन आपली मतं मांडणार्‍या प्रत्येकाला धन्यवाद.

या चर्चेतून अधोरेखित झालेल्या बाबींपैकी वैयक्तिकरित्या जे जे करता येण्यासारखे आहे ते अंगीकारण्याचा आणि त्याला चिकटून राहण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न राहील.

बाकी सरकारने काय करणे आवश्यक आहे आणि ते सरकारपर्यंत प्रभावीपणे पोचवण्यासाठी काय करता येईल हे योग यांनी उघडलेल्या धाग्यावर लिहिले जाईलच.

केदार, तू मांडलेल्या प्रस्तावाबद्दल : अर्थातच तळमळीने तू तो मांडला आहेस. पण हे प्रत्यक्षात आणणं कितपत शक्य होईल याबाबत मला स्वतःला - विशेषतः नजीकच्या भूतकाळातल्या घडामोडी बघता - शंका आहे. किंवा याकरता माझा स्वतःचा यावर अजून पुरेसा विचार झालेला नाही किंवा माझ्या स्वतःच्या मनाची तयारी अजून तितकी झालेली नाही असेही म्हणता येईल.

राज, चाणक्य, झक्की आणि इतर तुम्हाला यावर काही म्हणायचे आहे का? तुमचा यावर पुरेसा विचार झालेला असेल तर तुम्ही तुमची मतं इथे मांडू शकता.

माझे मत विचारल्याबद्दल धन्यवाद.
मला भारतातल्या परिस्थितीबद्दल किंवा तेथे रहाणार्‍या लोकांबद्दल शून्य माहिती आहे. त्यामुळे मी सुखात आहे.

पण मी मायबोलीवर नियमित येतो नि तिथे काय गंमत चालते ते बघतो. त्यावरून मी लिहीले.
मायबोलीवरील लोक काय करतात, इथे निरनिराळ्या प्रश्नांवर कशी थोडा वेळ चर्चा करतात नि विसरून जातात, या बद्दल लिहीले होते. श्री. अण्णा हजारे, श्री. रामदेव, भ्रष्टाचार, मंदिरातील पैसे, जातीयता निर्मूलन इ. अनेक प्रश्नांवर खरे तर इथे बरीच चांगली चर्चा होते, पण पुढे लोक ते विसरून जातात. कोण काय करतात पुढे कळत नाही. एक महत्वाची सूचना - इथले विचार जर जाहीर करायचे असतील, तर कृपया 'मायबोली' चे नाव त्यात आणू नका. फुकट मायबोली धोक्यात यायची.
दूरवर पसरलेल्या महाराष्ट्रीयांनी शिळोप्याच्या गप्पा कराव्या, जुन्या ओळखी जागृत कराव्या, नवीन मित्र, मैत्रिणि जोडाव्यात, मराठी भाषेत गप्पा माराव्यात, या हेतूने 'मायबोली' ची सुरुवात झाली नि बरेच दिवस तेच चालत होते.

जसजसे भारतातले लोक इथे येऊन 'गंभीर' प्रश्नांवर 'चर्चा' करू लागले, वैयक्तिक उखाळ्या पाखाळ्या, नावे ठेव्णे असे सुरु झाले तेंव्हा पासून मायबोली फारशी आवडेनाशी झाली. पुनः इथले मराठी 'साहित्यिक' म्हणतात, मराठीत चांगल्या कविताच नाहीत, म्हणून सुखनवर व त्यांच्या उर्दू कविता किती अच्छे असले काहीतरी लिहू लागले. त्यातून आजकालचे मराठी - एका वाक्यात निदान पन्नास टक्के शब्द इतर भाषेतले असायला पाहिजेत!

आमची 'मायबोली' अशी नव्हती, आता जे काय चालते मायबोलीवर तो केवळ एक टिंगल, टवाळी, उपहास या ला अत्यंत सुपीक विषय आहे!!

>>या चर्चेतून अधोरेखित झालेल्या बाबींपैकी वैयक्तिकरित्या जे जे करता येण्यासारखे आहे ते अंगीकारण्याचा आणि त्याला चिकटून राहण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न राहील. <<

चांगली सुरुवात, फक्त याच्याशी कायम प्रामाणिक रहा.

हल्ली कुठल्याशा कार्यक्रमात नानाने घेतलेली अण्णा हजारेंची मुलाखत पहाण्याचा योग आला. त्यात अण्णांनी एक कोटींचा पुरस्कार नाकारण्याचा किस्सा सांगितला. नाकारण्याचं कारण? देण्यार्‍याचे हात भ्रष्ट होते. अशा लहान्-सहान गोष्टींतुन स्फुर्ति घेउन आपल्या सभोवतालचं दुषीत वातावरण स्वच्छ करायचा प्रयत्न केलात तर या बाफचा उद्धेश साध्य झाला असं म्हणता येइल.

>>नाकारण्याचं कारण? देण्यार्‍याचे हात भ्रष्ट होते
त्यापेक्षा त्याला कुठेतरी सत्कारणी लावायला सांगायचे ना. नाहीतर दान करायला..

नॉर्वेत अतिरेकी हल्ला. ८७ जणांना मारले.

http://www.indianexpress.com/news/norway-terror-strikes-87-killed-in-cam...

नॉर्वे आणि इतर युरोपियन देशांना आता अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काही तरी नवीन जबरदस्त कृती करावी लागेल.

<<<संपला का उत्साह ? आता पुढचा हल्ला झाला की परत हिच चर्चा करुयात.>>>

उत्साह संपला असेल तर अशा समाजात पुन्हा पुन्हा बाँबस्फोट झाले तर मला नवल वाटणार नाही. इंग्लंड मधे झालेले भुयारी रेल्वेमधील बाँबस्फोट असोत, बसमधील स्फोट असोत किंवा अमेरिकेवरील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असो किंवा नुकताच झालेला नॉर्वेवरील दुर्दैवी हल्ला असो.. नागरिकांनी ज्या पद्धतीने आपली जबाबदारी ओळखून प्रतिक्रिया दिल्या त्यातून आपल्याला काय शिकता येईल हे पाहणे उद्बोधक ठरेल. फक्त सरकारने काय करावे याबद्दल मुक्ताफळं उधळण्यापेक्षा अशा विचारमंथनातून काही शिकता आले तर चांगलेच आहे असं मला वाटतं.

किमान अशा प्रसंगात "मी" या घटकाचीही काही जबाबदारी असते हा सकारात्मक विचार मनावर बिंबवता आला असेल तर या बाफचं ते यशच मानायला हवं. अर्थातच, कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचे अनेक कोन असल्यामुळे ते सर्वांना पटेलच असं नाही.

Pages