दहशतवाद : मी काय करणं अपेक्षित आहे?

Submitted by गजानन on 14 July, 2011 - 02:56

मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातली/देशातली ही परिस्थिती सुधारून असे हल्ले टाळण्यासाठी एक नागरिक म्हणून तुमच्या मते 'मी' काय करणं अपेक्षित आहे?

'मी' म्हणजे भारत देशातला एक सामान्य नागरिक.

कविता करणं
ललित/लेख लिहिणं
शासनाला दोष देणं
चरफडत बसणं
मिडियाला शिव्या देणं

या व्यतिरिक्त.

मला प्रामाणिकपणे हे जाणून घ्यायचे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरुंधती,

आपण सुचवलेल्या मार्गाने हल्ले टळतील कसे पण? आणि तिसरा मुद्दा (सुयोग्य उमेदवाराला मत) हा स्वप्नवत वाटतो. असा उमेदवार कुठे मिळतो? मिळाला तर तो अपक्ष असतो किंवा सत्तेत न येणार्‍या पक्षाचा! पोलिसांना चहा पाणी न देणे हा दहशतवादावरचा लोंग टर्मही उपाय वाटत नाही. तो केवळ 'सुजाण व प्रामाणिक नागरीक' होण्याचा उपाय वाटतो. समजा सगळे प्रामाणिक झाले तर बॉम्ब स्फोट होणार नाही असे कुठे आहे?

भाडेकरूंची माहिती मिळवणे हे ठीक आहे. पण त्याने समजा प्रूव्ह केले की तो भारतीय नागरीकच आहे आणि नंतर त्याने दहशतवाद्यांशी संबंध ठेवले तर काय?

हल्ला 'टळण्यासाठी' एकमेव उपाय आहे. मात्र तो दुर्दैवाने धर्मवादीच उपाय आहे. हे खरच दुर्दैव आहे. पण हे सगळे प्रकार इस्लाम स्थापनेसाठी आहेत.

पवित्र कुर्रानमधील एक मतः

'जो इस्लाम मानत नाही त्याला नष्ट करणे हे प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य आहे. '

याचा 'गैर'अर्थ काढला गेला. जो इस्लाम मानत नाही म्हणजे जो मुसलमान म्हणून जन्माला येऊनही इस्लाम मानत नाही त्याच्याबद्दल पैगंबरांनी ते म्हंटले. जो मुळातच हिंदू म्हणून जन्माला आलेला आहे तो कसा काय इस्लाम मानेल?

मुस्लिम जगताशी युद्ध जिंकणे हा एकमेव उपाय आहे. पण दुर्दैवी आणि अत्यंत घातक मात्र आहेच आहे.

मुंबईकरांनी नेहमीचे 'स्पिरिट' न दाखवता दोन दिवस मुंबई बंद करावी. कोणत्याही राजकीय हेतूशिवाय. आर्थिक नुकसान होते आहे म्हटल्यावर उद्योगपती जागे होतील, मग आपोआप सरकार जागे होईल.

बाकी मला वाटते, यावेळचे स्फोट तुलनेने कमी क्षमतेचे होते, हे कदाचित यंत्रणेच्या सतर्कतेमुळे असू शकेल. तसे असेल तर खूपच चांगले.

दैनंदिन जीवनात भ्रष्टाचाराला थारा न देणे हे आपण सगळेच करू शकतो.

यावेळचे स्फोट तुलनेने कमी क्षमतेचे होते, हे कदाचित यंत्रणेच्या सतर्कतेमुळे असू शकेल. तसे असेल तर खूपच चांगले.>>

तसे असावे अशी इच्छा आहेच. पण हे विधान खटकले. कमी तीव्रतेचे असले तरी काही लोक बिचारे मेलेच ना? त्यात कमी जास्त असे प्रकार पाडले जाऊ नयेत असे वाटते.

मुंबई बंदशी सहमत! Happy

रिमझिम स्फोट होती सारखे, असुरक्षेलाही पूर चढे,
दहशतवादीच दहशतवादी चहूकडे ग बाई गेले समाजसेवक कुणीकडे !

जे चांगले लोक आहेत "अण्णा हजारे" यांच्यासारखे त्यांना पाठिंबा देणे हा पण एक उपाय आहे.

यावेळचे स्फोट तुलनेने कमी क्षमतेचे होते, हे कदाचित यंत्रणेच्या सतर्कतेमुळे असू शकेल. तसे असेल तर खूपच चांगले.>> हे विधान खटकले.. Sad

जर दादरचा स्फोट जरा लवकर झाला असता तर अँटॉनीयो डिसिल्वा शाळेची मुले त्यात सापडली असती. खुप पावसामुळे शाळा लवकर सोडली होती ही देवाची कृपा.. अजुनही निष्पाप मुलंचे बळि गेलेल असते. Sad

अरुंधती सगळ्या मुद्द्यांना अनुमोदन.

भ्रष्टाचार रोखल्याने बॉम्बहल्ले कसे रोखले जाणार हा जर प्रश्न असेल तर -
१००० रुपयाच्या चिरिमिरि वर पासपोर्ट मिळवणे आणखी काही शे देऊन कसलेही आयडी मिळवणे, केवळ काही हजारात पुर्ण भारतीय आयडेंटिटी मिळवणे या गोष्टी सहज शक्य आहेत हे स्टींग ऑपरेशने मागेच दाखवुन दिले आहे. भ्रष्टाचार रोखला तर देशात सहजपणे जे घुसखोर घुसतात त्याला आळा बसेल अशी अपेक्षा करता येईल.
ताज च्या हल्ल्यासाठी जे लोक समुद्रमार्गे आले त्यांनी कुठे आणि किती जणांचे हात ओले केले असतील त्या जागी पोचण्यासाठी. पैसे खायची सवय नसती तर हे इतक्या सहज पणे झाले नसते.
सगळे हल्ले याने थांबतीलच असे नाही पण हल्ले घडवुन आणणे भरपुर कठीण नक्कीच होणार.

आपण जागरुकता दाखवली तर काही ठिकाणचे बॉम्ब फुटण्या आधीच मिळतील आणि जीवितहानी टळेल .

एक नागरिक म्हणुन रस्त्यावर येण्यात एक धोका आहे. जमावावर बंधन नसेल तर कुठल्यातरी एखाद्या क्षणी जमाव हिंसक बनतो. त्यावेळी योग्य अयोग्य याचा विचार करण्याच्या पलिकडे जातो आणि मग बस, गाड्या जाळणे, पब्लिक संपत्तीचा नाश करणे अशा गोष्टी घडतात. पुढे असे आंदोलन सहज पण सामाजिक स्वास्थयाचे कारण देऊन सरकारला चिरडता / संपवता येते.

"prevention of blasts is not a foolproof exercise. handling the aftermath compassionately & wisely, is.

slowly tv channels ramp up the hysteria. journos on the ground are encouraged to air angry voices. will we never learn.

now is not the time to lash out at imagined perpetrators. terror tht begets irrational anger's successful terror. stick together, stay sane." राहुल बोस

एकट्याच्या पातळीवर होण्यासारखा नाही, पण अतिरेकी का बनतो , किंवा तो बाहेरून आला असेल तर त्याला इथे मदत का मिळते याचा विचार करून ती परिस्थिती बदलणे.

यावेळी लोकल ट्रेनमध्ये बाँब ठेवले गेले नाहीत, हाही कदाचित सतर्कतेचा परिणाम असु शकतो.

याला एक उपाय आहे ,तो म्हणजे प्रादेशीक मित्र संघटना.या संघटनेच जाळ गल्ली गल्ली ,आळी आळीत विखुरलेल असाव .आपापल्या कार्यक्षेत्रात आढळलेल्या संशयीत हालचालीवर खडा पहारा असावा व संशय येताच पोलीसांशी संपर्कात असावे .प्रतयेक नागरीकाने सतर्क असावे .हॉटेल्सनी योग्य ओळखपत्राची खात्री करूनच निवासाची व्यवस्था करावी .कँश ट्रान्झँक्शन्स टाळाव्यात .कँमेराची व्यवस्था असावी .झोपडपट्टीतील अँक्टीव्हीटीजवर लक्ष असावे .सोसायटी ,सोसायटीत सुरक्षा यंत्रणा सतर्क असावी. बिल्डिंगमधील तसच परिसरातील संशयास्पद गोष्टींचा आढावा वेळोवेळी घेतला जावा .पोलीसानीसुद्धा आपापल्या कार्यक्षेत्रातल्या मित्र संघटनांच्या संपर्कात असाव नागरीकानी स्वतः वैयक्तीक तसच संगठीत रीतीने सतर्क राहून ,निशेधार्थ अँक्टीव्हिटीजचा योग्यवेळी निशेध करत निर्भीडपणे वावराव.काय कोणाची बिशाद आहे अशी निंदनीय कृत्य करण्याची .अशा घटनाना घाबरून आपल्या देशाचा भाग गमवायची काहीच गरज नाही .

>>>>यावेळचे स्फोट तुलनेने कमी क्षमतेचे होते, हे कदाचित यंत्रणेच्या सतर्कतेमुळे असू शकेल. तसे असेल तर खूपच चांगले.>> हे विधान खटकले..

सतर्कतेमुळे मोठे स्फोट घडू शकत नसतील तर ही मोठी प्रगती आहे - चांगले आहे असे मला वाटते.
कमी क्षमतेचे स्फोट घडले तर हरकत नाही असे अजिबातच म्हणायचे नाही. मोठे स्फोट घडले तर अर्थव्यवस्थेवर थोडा तरी परिणाम होतोच. कदाचित सतर्कता वाढण्याचे ते एक कारण असू शकेल. म्हणून अर्थव्यवस्थेवर दबाव यावा त्यातून राजकारण्यांवर दबाव यावा म्हणून या स्फोटांना किरकोळ समजून, 'मुंबई स्पिरिट' दाखवून, आज लगेच कामावर जाऊ नये असे मला वाटते.

हे नीट स्पष्ट नसेल तर क्षमस्व. कोणाचा जीव गेला नाही तरी घबराट पसरवणारे स्फोटसुद्धा रोखले पाहिजेत असे मला वाटते.

जातपात, धर्म आणि भाषा यावरील राजकारण थांबवणे. >>> पुन्हा तेच!!! बरं, हे राजकारण कोण करतंय?????<<< संघ-भाजपा आणि काँग्रेस दोघेही!!!

स्वत: व्यक्ती म्हणुन सतर्क राहणे हाच एक उपाय असु शकतो. भरत मयेकर म्हणतात तसे ट्रेन किंवा बस मधे आता लोक सतर्क असतात. त्यामुळे तिथे कदाचित आता बाँब ठेवले जाणार नाहीत (अशी आशा आहे). पण एखादी व्यक्ती संशयास्पद वाटल्यास आजुबाजुच्या लोकांना गोळा करुन जाब विचारण्यास हरकत नाही.

अर्थात हल्ले "टाळण्याकरता" याचा काही फायदा होईल असं वाटत नाही. कारण त्याकरता लागणारी यंत्रणा सरकारकडे आहे. सरकारने ती यंत्रणा आधिक कार्यक्षमपणे राबवायला काय करायला हवे, हे एक सामान्य माणूस म्हणुन मी नाही ठरवु शकत.

गजानन, प्रामाणिक विचारमंथनास उद्युक्त केल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

मी काय करायला हवे?
मी तुकाराम ओंबळे बनायला हवे!
त्यांनी आपल्या कर्तव्याखातर प्राणांचीही पर्वा केली नव्हती. तेच मीही करायला हवे.

अत्यंत प्रिय व्यक्तीला गमावण्याची वेळ आली तरीही त्याकरता ज्ञात दहशतवाद्यास सोडणे टाळावे.

'दहशतवाद्यांशी चर्चा नाही' हेच धोरण म्हणून स्वीकारावे.
'दहशतवाद्यास ताबडतोब ओळखणे आणि दंड देणे' ह्या धोरणाचा मनोमन स्वीकार करावा!

आपल्या सभोवतीच्या सर्व माणसांशी संबंध वाढवावेत. निदान तोंडओळख करून घ्यावी. आपलीही ओळख करून द्यावी. अशाने नवखा इसम ओळखणे सोपे पडते. त्याला निराळे पाडणे शक्य होते.

मतदान करावे..

एकादा राजकारणी नालायक कधीपासून समजावा..? ज्यादिवशी तो निवडून आला त्यादिवसापासून.
एका Term पेक्षा जास्त कुणालाच टिकू देऊ नये...

हम्म्म्म .......
चिनुक्स, मंजिरी आणि अकु सगळ्याला अनुमोदन...
किमान, मी माझ्या नागरीकत्वाची सगळी कर्तव्ये काळजीपूर्वक अन जाणीवपूर्वक पार पाडेन !
सानी, मंदार नेहमीच धर्म मध्ये आणला नाही तरी चालेल गं, रे ....
अन सानी नुसता काश्मिर देऊन प्रश्न सुटनार नाही, उलट चिघळेलच....
जरा अ-धर्म ( धर्मातीत ) होऊन काही प्रश्न सुटतात का ते ही पाहू की एकदातरी.....

प्रत्येक गोष्टीचा संबंध जातीशी, धर्माशी लावणं थांबवणं.
>>
बरोबर. आणि हे सर्वात प्रथम सरकारने केले पाहिजे. पूर्वी ज्यांनी भीषण स्फोट घडवून आणलेत आणि ज्यांना फाशीची शिक्षा झाली आहे त्यांना ती देऊन टाकली पाहिजे. उगीच शिक्षा झालेले मुसलमान आहेत म्हणून मग कुठे दयेचा अर्ज, दिरंगाई असले फाल्तू प्रकार करणे बंद केले पाहिजे.

भ्रष्टाचाराचा आणि दहशतवादाचा काय संबंध? आणि 'आम्ही भ्रष्ट आहोत म्हणून आमचे नेते भ्रष्ट आहेत' वगैरे असंबंध आत्मपरिक्षण तर वेडगळपणा वाटतो. आणि जर दहशतवादी पासपोर्ट कसातरी मिळवून आत आले आहेत असे जर कळले तर संबंधित व्यक्तीला कडक शासन करणे आणि पासपोर्ट व्यवस्थेतील त्रुटी काढण्यासाठी नवीन नियम आणि प्रणाली तयार करणे हे सरकारचे काम आहे.

नुसते 'भ्रष्टाचार करू नका' असे लोकांना सांगून काही उपयोग आहे का? आणि असे सांगून सगळ्यांनी एकदम हे पाळल्याशिवाय त्याचा काय उपयोग? असे कोणी सांगितलेले ऐकले असते तर अगदी ज्ञानेश्वरांनी 'जे खळांची व्यंकटी सांडो' असे म्हणायचा अवकाश की सगळे आलबेल झाले असते. अहो इथे शिक्षेचाच धाक पाहिजे आणि हे फक्त सरकार करू शकते.

पूर्वीच्या स्फोटांच्या घटनांवरील जर काही तपासातून निष्कर्ष निघाले असतील तर सुरक्षेविषयी नवीन नियम आणि पॉलिसी तयार करणे हे सरकारचे काम आहे. हे करण्यासाठी पैसा, मनुष्यबळ, अधिकार हे सर्व सरकारकडे असतात.

नवीन नियम जरी गैरसोय करणारे असतील तरी ते पाळून सहकार्य करणे एवढेच सामान्य नागरिकाचे काम आहे. मूर्ख नेत्यांना सपोर्ट करणे सोडले पाहिजे. तो अमूल बेबी म्हणतोय, 'दहशतवादाला पूर्णपणे थांबवणे अशक्य आहे'. असल्या मूर्खांना पंतप्रधानपद वगैरे मिळू देऊ नये. जिथे लीडर लोकांनी व्यवस्थित बोलून लोकांना धीर दिला पाहिजे, तिथे हे काय बावळट विधान करतायेत पहा. ओबामाने चुकूनसुद्धा असे काही म्हटले तर तो पुढची निवडणूक हरेल ह्यात तिळमात्र शंका नाही.

उगीचच १ ते १० असे आकडे टाकून हे करायला पाहिजे, मी मूर्ख आहे, गाढव आहे, नापास झालो आहे हा सगळा मला वेडगळपणा वाटतो.

>>'मी' काय करणं अपेक्षित आहे? <<
आपापल्या कुवतीप्रमाणे प्रतिकार करण्यास सिद्ध व्हावे. चुझ योर ओन वेपन. कोणाचं शस्त्र लेखणी असेल तर कोणाचं आंदोलन. आजच्या घडीला सर्वात जास्त टॅक्स मुंबई भरते आणि तिचिच हि दुरावस्था. मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारुन टॅक्स भरु नका. नामर्द्/नाकर्ते सरकारला दखल घ्यावीच लागेल. सत्तर वर्षांपुर्वि ब्रिटीशांविरुद्ध असं आंदोलन उभारलं गेलं होतं, आज परत स्वकियांविरुद्ध उभारायची वेळ आलेली आहे.

"सगळे दहशतवादि हल्ले रोखणे अशक्य" - रागां.
हे आमचं सळ्सळणार्‍या रक्ताचं तरुण नेतृत्व. याच्या कानाखाली आवाज काढुन कोणितरी याला अमेरिकेचं उदाहरण ध्या.

१.बाहेर प्रवास करताना, कुठे जाताना कान, डोळे उघडे ठेवु शकतो.
२.कोणी काही सामान ठेवुन निघुन जात नाही आहे ना बघु शकतो.
३.कोणी काही अशा विषयावर बोलत असतील त्यांच्यावर लक्ष ठेवु शकतो.
४.अशा एखाद्या संशयास्पद वाटणार्‍या व्यक्तीचा गाडीचा नंबर/घराचा पत्ता नोट करु शकतो.
५. अशा आजुबाजुला घडणार्‍या संशयास्पद घटना "अनॉनिमसली" पोलिसाना कळवु शकतो.

COP = Citizen On Patrol हे लक्षात ठेवायला हवे. आपले हित आता आपणच जपायला हवे.

हा उपाय केला तर दहशतवाद आटोक्यात येऊ शकेल.

"Israel need not apologize for the assassination or destruction of those who seek to destroy it. The first order of business for any country is the protection of its people."
Washington Jewish Week, October 9, 1997

>>> तो अमूल बेबी म्हणतोय, 'दहशतवादाला पूर्णपणे थांबवणे अशक्य आहे'. असल्या मूर्खांना पंतप्रधानपद वगैरे मिळू देऊ नये.

सहमत.

स्फोट होऊन २४ तास होऊन गेले आणि अजून अमूल बेबीच्या शेपटाने (दिग्विजयने) संघपरिवाराकडे कसे बोट दाखविले नाही?

पहीले हा विचार करा हे ह्ल्ले होतात का? व भारताने एक देश म्हणुन आजवर झालेल्या हल्या बाबत कय केले. जर कितीही हल्ले झाले तरी काहीच प्रतिकिया नसेल तर काय होईल?

India is a soft target. Very soft. Remember Kandahar? have u seen any more idiotic handling of terror acts?

तीन लोकांना आटोक्याट आनायला मगच्या हल्यात कीती वेळ लागल. That tells how un-prepared is the country.

Pages