दहशतवाद : मी काय करणं अपेक्षित आहे?

Submitted by गजानन on 14 July, 2011 - 02:56

मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातली/देशातली ही परिस्थिती सुधारून असे हल्ले टाळण्यासाठी एक नागरिक म्हणून तुमच्या मते 'मी' काय करणं अपेक्षित आहे?

'मी' म्हणजे भारत देशातला एक सामान्य नागरिक.

कविता करणं
ललित/लेख लिहिणं
शासनाला दोष देणं
चरफडत बसणं
मिडियाला शिव्या देणं

या व्यतिरिक्त.

मला प्रामाणिकपणे हे जाणून घ्यायचे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर लोकशाही स्विकारली आहे तर त्या व्यवस्थेने स्विकारलेली कायदेव्यवस्थादेखिल आपण स्विकारली पाहिजे. काँग्रेसच्या जागी भाजपाचे सरकार असते तरी कसाबला लगेचच फासावर चढवण्यात आले असते कां, हा प्रश्न आहे. आणि कसाबला फासावर चढवुन अतिरेकी हल्ले थांबतील हा स्वप्नविलासच आहे. धनंजय चॅटर्जीला एका १६ वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याबद्दल फाशी झाली होती. त्यानंतर देशात अशा प्रकारची घृणास्पद कृत्यं झाली नाहीत कां?? उलट त्यांचं प्रमाण कितीतरी वाढलं आहे. काश्मिरात अतिरेक्यांना आपल्या सैनिकांकडुन कंठस्नान घातलं जातं, घुसखोरांवर कारवाई केली जाते, पण अशा प्रकारच्या कारवाया थांबल्या आहेत काय??? जिहादी मानसिकतेचे अतिरेकी मरणाला भीत नाहीतच. पोलीस-सैन्य यांच्या गोळीने मरण काय किंवा फाशी होऊन मरण आले काय, त्यांच्यासाठी 'जन्नत' आहेच.

माझ्या मते परदेशस्थ भारतीयांनी पाकिस्तानी दुकानात व पाकिस्तानी रेस्टॉरंटमध्ये जाणे बंद करावे <<<<< हे बर्‍याच लोकांनी केव्हाच केलं आहे.. ९२/९३ च्या मुंबईतल्या स्फोटांपासून असं करणारे बरेच लोक माहीत आहेत..

दुरगामी परीणाम होतील असे बरेच लहान मोठे उपाय आहेत, पण आता आपल्याला तत्काल उपाय हवेत.

२००१ नंतर अमेरिकेत एकही मोठा हल्ला झाला नाही (नॉक ऑन वुड) .
सी आय ए/ एन एस ए/बॉर्डर पॅट्रोल यात त्यानी कसे बदल केले, काय वेगळे केले.. त्याचा केस स्टडी करणे आवश्यक आहे.
जर आपण आपली जुनीच प्रोसेस वापरतोय आणि तरीही रीझल्ट मधे सुधारणा नाही याचा अर्थ त्या प्रोसेस मधे काही बदल करणे अत्यावश्यक आहे.

युरोपीय राष्ट्रं आणि अमेरिका दहशतवादी कारवाया रोखू शकले कारण त्यांनी काळा पैसा, हवाला, दहशतवाद्यांची बँक अकाउंटं यांवरच कुर्‍हाड घातली.
>>
अरे पण ते काय सामान्य नागरिकांनी केलं का? ते सरकारी यंत्रणांचे काम आहे. ते करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचे काम पण त्यांचेच आहे. शेजार्‍यापाजार्‍यांवर लक्ष ठेवणे हे एका मर्यादेपुढे करता येत नाही, आणि दोन दिवसात माणूस स्वतःच्या कामात हे सगळं विसरून जाईल.
का असं करू म्हणतोस? शेजार्‍याला अचानक म्हणायचं, 'अहो, मी तुम्हाला काल आयसिआयसिआय बँकेत मोठी पिशवी घेऊन जाताना पाहिलं. तुम्ही तर नेहमी महाराष्ट्र बॅन्केत जाता. काय मनी लॉन्डरींग वगैरे करताय की काय". Proud

'जशी प्रजा तसा राजा' असे नसून ते 'जसा राजा तशी प्रजा' अशी म्हण आहे. ती पूर्वीच्या राजेरजवाड्यांपासून ते आजकालच्या मोठमोठ्या कंपन्यांपर्यंन्त, शासनापर्यन्त सर्वांना लागू पडते. सगळं स्वतःच उत्तम करणारी प्रजा असती तर राजे पाहिजेत कशाला? जे लोक मोठ्या अधिकारी पोस्टवर असतात त्या लोकांचे, नेत्यांचे कामच हे असते की परिस्थितीप्रमाणे नवीन पॉलिसी, नियम तयार करणे. त्यांना ते जमत नसेल तर लोकांनी पुढच्या वेळी वेगळ्या पार्टीला संधी देऊन पहावी.

कसाबला फासावर चढवुन अतिरेकी हल्ले थांबतील का?
>>
अरेच्चा, त्यांनी गंभीर गुन्हे केले आहेत आणि त्यांना शिक्षा झाली आहे तर ती दिलीच पाहिजे. त्याशिवाय सरकारवरचा लोकांचा विश्वास कसा वाढणार? म्हणजे पोलीस लोक कष्ट करून गुन्हेगारांचा शोध लावणार आणि जर त्याचा उपयोग नाही झाला तर पुढच्यावेळी कोण कष्ट घ्यायच्या भानगडीत पडेल. अहो गीतेतही अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतो की, तुला असे वाटते का की तू मारले नाहीस तर कौरव कधीच मरणार नाहीत. तेही कधी ना कधी मरणारच आहेत. पण आत्ता तुझे कामच आहे त्यांना मारणे.

भावनेच्या भरात लोकांना मूर्ख म्हणणे
>> मी कोणालाही मूर्ख म्हणालो नाही. भावनेच्या भरात तर नाहीच नाही. उलट 'हे घडत आहे म्हणजे आम्हीच दोषी आहोत' असे स्वतःला थपडा मारून घेणे हे भावनेच्या भरात म्हणणे आहे.

मी दिवसभरात काय करतो आणि त्यात दहशतवाद रोखण्यासाठी काय करू शकतो, आणि इथे अमेरिकेत पाच सहा वर्षे राहून इथला सामान्य नागरिक दहशतवाद रोखण्यासाठी विशेष काय करतो (काहीही नाही) ह्या निरिक्षणावरून ते लिहिले आहे.

असो. ह्या चर्चांमधून फक्त बर्‍याच लोकांचे दृष्टिकोन वाचायला मिळतात. बाकी काही होत नाही.
त्यामुळे हे शेवटचे पोस्ट.

>>सेक्युरिटी एस्पर्ट्सच्या मते अमेरिकेची भूमी दहशतवाद्यांच्या उगमापासून दूर आहे त्यामुळे त्यांना असे हल्ले रोखणे जास्त सोपे आहे. पुन्हा त्यांच्यासारखे रेशल प्रोफायलिंग करायची सोय नाही. आणि आजही कितीतरी अमेरिकन सैनिक अफगाणिस्तान/इराकमध्ये बळी जातच आहेत. <<

मयेकर, मला वाटतं इथे गृह्पाठ कमी पडतोय. ९/११ चा हल्ला आतुनच झाला होता; पर्ल हार्बर सारखा एअर स्ट्राईक नव्हता. आजहि अनेक (पोटेंशियल) दहशतवादि अमेरिकेत सामान्य माणसासारखे रहात आहेत/असतील, पण त्यांच्यावर एफबीआय ची करडी नजर आहे. त्यांच्या हालचाली, फोन्/इंटरनेट अ‍ॅक्टिविटिज, फिनांशियल ट्रांझॅक्शन्स मॉनिटर केले जातात. माझ्याच शहरात, ३० मैलाच्या परिघात, मला माहित असलेले ३ जमातखाने आहेत (जास्तहि असतील). तुम्हाला काय वाटतं हे जमातखाने "बिग ब्रदर"च्या रेडारखाली नसतील? तुम्ही याला "रेशियल प्रोफायलिंग" म्हणा आम्ही "प्रिएम्टिव अ‍ॅक्शन" म्हणतो.

भारतात हे का शक्य नाहि? रेशियल प्रोफायलिंग करायची सोय नाहि? मग आत्ताच्याच सरकारने इंदिरा गांधीच्या हत्येनंतर ८३ मध्ये दिल्लीत शीख समाजावर जे पाशवी अत्याचार केले, ते काय होतं? देशप्रेम?

शेवटी भारतातील निरपराध जनतेची तुलना अमेरिकन सैनिकांबरोबर करुन, "भारतातील सामान्य माणुस सकाळी कामासाठी नाहितर लढाईसाठी बाहेर पडतो..." या समजुतीवर शिक्कामोर्तब केलंत. धन्यवाद.

चिनुक्सला अनुमोदन.

फचिन, मी दुसरीकडे ह्याबाबत लिहीले आहे त्यामुळे इथे परत लिहीणार नाही. ते बँक, पिशवी वगैरे उदाहरण नेमकं काय म्हणून दिलय ते आजिबत कळलं नाही. असो.

सगळ्यात पहिले काँग्रेसला हाकला!!!
अगदी मायावती परवडली पण हा इंटिग्रेटेड फॅमिली बिझेनेस बंद व्हायला हवा आता.
पुढच्या निवडणुकीत मतदान करा लोकहो, नुसत्या चर्चा करुन काय फायदा? (अमुल बेबी अजून पंतप्रधान नाहीये, हेच सध्या भारताचं सुदैव!)

सामान्य माणूस म्हणून मी काहीच करू शकत नाही- हा सरळसरळ जबाबदारी टाळण्याचा प्रकार आहे.

माझ्या नकळत माझ्या रस्त्यावरून चोर कसे निघून गेले-याचा विचार मी कधी करतो का? व्यायाम म्हणून मी रोज उतरताना लिफ्ट वापरत नसलो, तरी माझ्या घराच्या व्यतिरिक्त इतर घरांकडे, फ्लॅट्सकडे, मजल्यांकडे मी किती बारकाईने बघतो? सार्वजनिक ठिकाणी अस्ताव्यस्त पार्किंग केलेले मला किती वेळा खुपते-खटकते? 'हुश्श! मिळाली एकदाची गाडी लावायला जागा!' म्हणून मी किती वेळा त्याच उकिरड्यात इतरांना थोडी/जास्त अडचण होईल अशी बेशिस्तपणे/बेकायदेशीरपणे/इथे पोलिसांचा धाक-त्रास नाही- म्हणून माझी गाडी लावतो? तीच गाडी काढताना माझ्याच गाडीला अडसर म्हणून आडदांडपणे गाडी लावलेल्यांवर मी किती वेळा चिडतो? माझ्या अपार्टमेंटच्या कोपर्‍यावर अत्यंत चिंचोळ्या जागेत रिक्षावाले अस्ताव्यस्त बेशिस्त पद्धतीने थांबून दांडगाई का करत असतात? आणि मी रिक्षाची सेवा कुणाकडून, कुठून घेतो? थोडे पुढे गेल्यावर वाहतुकीला अडचण करणारे भाजीवाले बघून मला संताप का येतो? आणि मी भाजी कुठून घेतो? मी सिग्नल संपत आलेला असतानाही माझी गाडी किती वेळा पुढे दामटतो? पण मला सिग्नल मिळाल्यावर इतर कुणीतरी तसाच (ग्रीन सिग्नल 'संपत आलेला असताना' पुढे गाडी दामटलेला) पुढे आला, तर त्यावर किती मोठे डोळे ताणतो, पुटपूटत / उघडपणे शिव्या देतो? ओव्हरटेक करताना कितीवेळा समोरच्याचा / मागच्याचा विचार करतो? आणि कुणी मला चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केले म्हणून किती वेळा चिडतो? स्वतःची कामे नगरसेवकातर्फे मोफत/सहज झाली म्हणून किती वेळा डांगोरा पिटतो? आणि दुसर्‍यांची कामे तशीच झाली तर किती वेळा त्या नगरसेवकाला निर्लज्ज्/लाचखाऊ/भ्रष्टाचारी म्हणतो? आपल्या घरातला माणूस पीएसआय असेल, तर त्याच्या 'योग्य' ठिकाणच्या बदलीसाठी किती प्रार्थना/प्रयत्न करतो? आणि माझ्याचवर 'अन्याय' झाल्यावर 'या हरामखोर पीएसआयची बदली करा!' अशी गावभर बोंबाबोंब करतो? स्वतः शिक्षक असल्यावर कितीवेळा माझ्यावरच्या अन्यायाचा पाढा वाचतो? आणि माझा पाल्य मागे पडल्यावर किती वेळा शिक्षकांना दोष देतो?

या सगळ्या प्रश्नांचा आणि दहशतवादाचा काहीच संबंध नाही, अशी मी स्वतःची समजूत अनेक वर्षे करून घेतली होती. मी एखादी छोटी, दुर्लक्षित, तुच्छ कृती केल्याने काय फरक पडेल अशीही. शिवाय एखादी, माणसांनी भांडण करून आखलेली सीमा ओलांडल्यावर अचानक मानसिकतेत, संस्कृतीत, विचारधारणेत अचानक फरक पडतो, अशीही समजूत अनेक वर्षे माझी होती. नंतर कळले ही सीमा देवाने, निसर्गाने नाही आखली. दोन्ही बाजूला संस्कृती एक. विचारधारा, जगण्याची पद्धत एक. रंगरूपभाषाखाणेपिणे जवळपास सारखे. फक्त गृहितकांत फरक. ही गृहितके अनेकांनी अनेक वर्षे मनावर बिंबवलेली. आईबाप, शेजारपाजारचे, मित्र, सगेसोयरे, शिक्षक.. अनेकांनी. मी स्वतः विचार कधी केलाच नाही. ते सारे पाळत आलो- अक्षरशः आंधळेपणाने. मी एक्स्ट्रीमिस्ट कधी झालो, हे माझे मलाच कळले नाही. इतरांना मात्र एक्स्ट्रिमिस्ट म्हणत राहिलो, इमानेइतबारे. शिकल्या संस्कारांना, केल्या आरत्या-प्रार्थनांना आणि खाल्ल्ल्या मिठाला जागून. जातीधर्माच्या खोट्या कालबाह्य कल्पनांना चिकटून राहून.

माझे नेते, पोलिस, राजकारणी, शिक्षक, तत्ववेत्ते तरी माझ्यापेक्षा वेगळे कसे असतील? माझ्यातलेच. मीच विश्वास ठेवलेले, उदोउदो केलेले आणि निवडून दिलेले. डीएनए एकच म्हणा अक्षरशः. मला झेपेल- त्याच्या पलीकडचे शिकवणे हे त्यांच्याही कुवतीबाहेरचे, त्यांना या ना त्या कारणाने न परवडणारे. कसे सांगतील, शिकवतील ते? मी स्वतः स्वतंत्र विचार न करता द्वेषा-संशया-पुर्वग्रहांचीची बीजे-मूळे माझ्यात रूजवणे- ही पद्धत पिढ्यानपिढ्या चालूच राहणार. कारण हे सारे इतर कुठच्याही कृतीपेक्षा कितीतरी सोपे, सोयीस्कर..!

माझी, म्हणजे जनतेची, प्रजेची जबाबदारी नाही- असे म्हटले तर सारेच संपले. मी भिकारी. हेल्पलेस. दुसरा कुणीतरी- म्हणजे लोकशाहीत मी निवडून दिलेला/ लादलेला एखादा नाकर्ता नेता, किंवा हुकूमशाहीतला एखादा हिरो दडपशाहीने, माझे स्वातंत्र्य दाबून-दडपून टाकून काहीतरी करणार, याची मी वाट बघणार.

प्रत्येक गोष्ट ही अशा प्रकारे दुष्टपणे माझ्यापाशीच येऊन थांबत असलेली पाहून मी चरकलो. 'मी' या संदर्भात काय करू शकतो/नाही, यापेक्षा 'मी' या सिस्टिममधला इतका महत्वाचा माणूस आहे- महत्वाचा पॅरामीटर आहे- याचा मला थोडा अभिमान वाटू लागला.

माझे गटार तुंबले असो, की माझे राष्ट्र संकटात असो- मी सुरुवात माझ्यापासून करणार. मुळात हे कुठून सुरू झाले आहे, त्याचा तरी गांभीर्याने विचार करणार. हा भाबडा आशावाद नाही, आजकालच्या टर्म्समधली मूर्ख गांधीगिरीही नाही. मुळात मी इतर कुणाला फटके मारून सांगू शकत नाही. पण माझ्यापासून तर सुरूवात करू शकतोच ना. तात्कालिक आणि लाँग टर्मवाले उपाय- अशी वर्गवारी करण्यात मी अजून किती वर्षे वाया घालवणार? मी, आणि आणखी काही लोकांनी आता सुरूवात केल्याने काहीतरी होऊन अजून शंभर वर्षांनी समजा असे माणसाचाच द्वेष करणार्‍या माणसांचे बाँबस्फोटासारखे उपद्व्याप थांबतील. 'मी' अजून शंभर वर्षांनी ही सुरूवात केली तर बदल व्हायला कदाचित एक हजार वर्षे लागतील.

मी राहत असलेला माझा हा प्रिय समाज सुशिक्षित आहे, पण पुरेसा शिक्षित नाही, शिस्तीत वागणारा नाही, इतरांची गैरसोय होऊ नये यची पुरेशी काळजी घेणारा नाही, कारणाने म्हणा की विनाकारण- शिस्तीत वागणारा नाही, इतकेच नव्हे, तर पुरेसा सुसंस्कृत देखील नाही- हे सत्य मी स्वीकारले आहे. मी मरेपर्यंत ते माझ्या चांगले लक्षात राहिले, आणि त्या दिशेवरच्या अब्जावधी पावलांपैकी मी एखादे टाकू शकलो, तरी सार्थक झाले असे मला वाटेल. Happy

हे सारे अर्थातच अनेकांना मुर्खपणाचे वाटू शकते. लोकशाही, आणि मतस्वातंत्र्य- दुसरे काय?!. पण तरी मला हुकूमशाही नको. मला हवे आहे, ते इथेच, याच परिस्थितीत होईल- असे मला वाटते. पुन्हा एकदा- हा भोळाभाबडा आशावाद नाही, सो-कॉल्ड 'गांधिगिरी' किंवा आदर्शवाद नाही. नक्कीच नाही. Happy

>>> युरोपीय राष्ट्रं आणि अमेरिका दहशतवादी कारवाया रोखू शकले कारण त्यांनी काळा पैसा, हवाला, दहशतवाद्यांची बँक अकाउंटं यांवरच कुर्‍हाड घातली.

एवढेच नव्हे तर अमेरिकेने भारतासारखे धर्माच्या आधारावर फाजिल लाड केले नाहित. संशय आलेल्या प्रत्येकाला, बुरखा/पगडी/चपला/बूट उतरवून त्याची तपासणी केली. पगडी हा आमच्या धर्माची पवित्र निशाणी आहे, बुरखा आमच्या धर्मात सक्तीचा आहे असले युक्तिवाद अमेरिकेने ऐकून घेतले नाहीत. प्रवाशांच्या यादीत मुस्लिम नावे दिसली की त्या व्यक्तीची कडक तपासणी केल्याशिवाय त्याला सोडले नाही. अतिरेक्यांशी संबंधित लोकांना व्हिसा नाकारला (उदा. काश्मिरचा गिलानी). हे सर्व करताना फक्त आपल्या देशाची व देशातल्या नागरिकांची सुरक्षितता या एकाच गोष्टीला प्राधान्य दिले आणि "मानवी हक्कांची पायमल्ली", "एका विशिष्ट धर्माबद्दल पूर्वग्रह" अशा टीकेकडे संपूर्ण दुर्लक्ष केले.

याचा फायदा म्हणजे ९-११ नंतर तिथे आजतगायत एकही अतिरेकी हल्ला झालेला नाही.

तुम्ही याला "रेशियल प्रोफायलिंग" म्हणा आम्ही "प्रिएम्टिव अ‍ॅक्शन" म्हणतो >>. राज अनुमोदन.

दुर्दैवाने असे म्हणावे वाटते भारतात बसून अमेरिका इथे काय करते हे कोणालाच कळत नाही त्यामुळे सरकारला कोणी जबाबदार ठरवायलाच तयार नाहीत.

इथे पण मानवतावद्यांनी बिग ब्रदर वॉचिंगचे रान केवढे उठवले आता सगळे फॉल इन लाईन झाले आहेत. येथील सरकारने अनेक गोष्टी रात्रीतून बदलल्या व जनतेने एकसाथ साथ दिली, कोणी असे म्हणाले नाही की मी आता ३ ऑउंस च्या वर असणार्‍या गोष्टी सरकार नेऊ देत नाही म्हणून उपोशन करतो किंवा माझे नाव अमजद खान आहे म्हणून मला तपासू नका. इथे राहायचे आहे ना. मग ह्या गोष्टी होतीलच. पिरिएड. नाहीतर जा तुमच्या घरी. त्यामुळेच आता अमेरिकेत हल्ला होऊ शकत नाही. ह्यात काही निरपराधी भरडले जातील पण ग्रेटर गुड साठी अमेरिकन नागरिक हे सहन करतो. हे काय अमेरिकन नागरिकांनी ठरवले नाही की हा अमजद किंवा रसूल किंवा हरभजनसिंग आहे त्याच्या वर आपण लक्ष ठेवू. हे येथील सरकारने ठरवले. ह्यात कित्येक शिख देखील भरडले गेले होते. हवे असल्यास २००१ मधील पेपर वाचा.

सरकारची इच्छाशक्ती हवी, मग दहशतवाद थांबवता येतो. पंजाबचे उदाहरण घ्या. दहशतवाद थांबला की नाही? उगाच ते फिदाई आहे, जन्नत आहे, ते मारणारच अशी समजूत करून घेतली की तुम्ही मरणार. उलट इन्टेल इतकी चांगली हवी की फिदाई आले की त्यांना जन्नत कडे सरकारी लोकांनी (आपण ज्यांना पॅरा मिल्ट्री किंवा पोलिस असे संबोधतो) पाठवावे. त्यांचा कार्यभाग (जन्नत कडे जाण्याच्या ) साधेल.

एकही दहशतवादी हल्ला पूर्ण भारतात होऊ देऊ नये. पिरिएड. हे मान्य नसेल तर यु आर विथ देम! १ टक्काही नाही.

सामान्य नागरिकांनी कायदेपालन करणे हे अध्याऋत आहे. ते निदान करावे ही अपेक्षा रास्त आहे. तो ते करेलच पण सरकारला दोष देऊ नका हा जो इथे काही लोकांचा सुर आहे तो मान्य नाही.

बायदवे अमेरिकेत हुकूमशाही नाही लोकशाहीच आहे.

सरकारने काय करावे.

१. इन्टेल
२. इन्टेल (हो परत तेच. तिथेच भारत कमी पडतो)
सर्व साधने कितीही पैसे खर्च झाले तरी घ्यावेत. उदा सध्या आपण (बहुदा) ८ मीटर पेक्षा बारीक काही असेल तर ते उपग्रहाद्वारे पाहू शकत नाही. नवीन उपग्रह सोडून १ फुटाचे डिटेलिंग करता आले पाहीजे. फक्त पाकव्याप्त काश्मीर आणि काश्मिर वर एक उपग्रह असा असायला हवा. हे तंत्रज्ञान डेव्हलप करता येत नसेल तर अमेरिकेशी संधी करावी. ओबामा सध्या मदत नक्की करेल.

३. रेशीयल प्रोफाईलिंग करणे भारतात अशक्य आहे पण काही काही ठिकाणी जरूर पाळत ठेवावी.
४. जनजागृती (दहशतवादाविरुद्ध)
५. कायद्याची अमंलबजावनी न करणार्‍यांना स्पिड कोर्ट (बहुदा मी जोक मारत आहे) द्वारे शिक्षा ठोठवावी.
६. भ्रष्टाचार निर्मुलन वगैरेच्या गप्पा मारू नयेत. तो आहे आणि असाच बहुदा आणखी काही वर्षे राहणार. ह्यातूनच मार्ग काढावा.

असो आता एवढे लिहून झाल्यावर संताप आवरता घेतो. पुढे बघू.

साजिरा, उत्तम पोस्ट!
जर नेते करत नाहियेत असं दिसतय आणि जर आपल्याला बदल घडावा असं वाटतय, तर आपण स्वतः प्रयत्न करायलाच हवेत.
ही माझी जवाबदारी नाही असं आपल्या देशातल्या प्रत्येकालाच वाटल्यानं आज आपण जिथे, जसे आहोत तसे आहोत.
अगदी साधं उदाहरण, लाईट जातात म्हणून आपण ओरडतो - पण त्यावर स्वायत्त कसं होता येईल ह्याचा विचार, त्यावर प्रयोग कुणी केलेत का?
आपल्या रिकाम्या वेळात आपण काय करतो?

कधीकधी वाटतं वी आर गेटिंग वॉट वी डिझर्व अ‍ॅज अ सोसायटी! Sad

चिनऊक्सला अनुमोदन ,

अमेरिकेने केलेल्या "कडक" उपायांमुळे अमेरिकेत ९/११ नंतर दहशतवादी हल्ला झाला नाही हे काही तितकेसे खरे नाही. अगदी टाईम स्क्वेअर मधे ठेवलेला बाँब ऐनवेळी ( नागरिकांच्या जागरूकतेमुळे, त्यातलाही एकजण मुस्लिम होता) सापडला. शिवाय एका सैनिक तळावर अमेरिकन मुस्लिम सैनिकाने हल्ला केला होताच. बाकी एअरपोर्ट वर एक्स रे मशिन वगैरे फक्त खाबूगिरीचा प्रकार आहे. मोटिव्हेटेड लोकांना अतिरेकी हल्ला करण्यापासून रोखणे अशक्य आहे. शिवान भारतात निदान सामान्य माणसांना ए के ४७ वगिरे मिळणे अवघड आहे, इथे अमेरिकेत तर प्रदर्शनात जाऊन एखादा मिक्सर घ्यावा इतक्या सहजतेने ते मिळतात.

भ्रष्टाचार निर्मुलन वगैरेच्या गप्पा मारू नयेत. तो आहे आणि असाच बहुदा आणखी काही वर्षे राहणार. ह्यातूनच मार्ग काढावा

हे कसे शक्य आहे? तुम्ही मारे लोकांना डिजिटल ओळख पत्रे द्याल, पण अतिरेकी चिरिमिरी देऊन ते ओळखपत्र मिळवतीलच ना? अतिरेकी उंदीर भ्रष्टाचाराच्या बिळातूनच येतील. सीमेवरच्या सैनीकाप्रमाणेच रेशन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसेन्स देणारा कारकूनही या लाढाईतला एक शिपाई आहे.

हे कसे शक्य आहे? >>> मग काय करायचे? काहीच करायचे नाही की आहे त्यातून काही मार्ग काढायचा. चॉईस काय आहे?

थे अमेरिकेत तर प्रदर्शनात जाऊन एखादा मिक्सर घ्यावा इतक्या सहजतेने ते मिळतात. >> हो पण रोज गोळीबार होत नाही. दुसर्‍या एका बाफवर मी ह्या बद्दल मिळायला नको असे लिहिले होतेच की. आणि ते काय सगळेच भारतातल्यासारखे बॉम्बस्फोट करत सुटतात का?

अगदी टाईम स्क्वेअर मधे ठेवलेला बाँब ऐनवेळी > >
मोटिव्हेटेड लोकांना अतिरेकी हल्ला करण्यापासून रोखणे अशक्य आहे. >>> इन्टेल! मग असे वाटणार नाही. आणि जागरूक असूनही (सरकार, लोक सर्वच) असे स्फोट झाले तर वेगळी गोष्ट पण कुठलीही यंत्रना नसताना असे स्फोट होणारच. नाही का? त्यामुळे जर उद्या अमेरिकेत स्फोट झाला तरी निदान योग्य ती यंत्रना होतीच तरी हे झाले असे बोलले जाईल. आज १०० पैकी ९८ भारतीय यंत्रना कुचकामी ठरत आहे हे म्हणतात. निदान तो बोल तरी नका लावून घेऊ.

जागरुक नागरिकांचा सहभाग नसावा असे इथे कोणीही म्हणालेले मला तरी दिसत नाही. ते अध्याहृत आहे. आपले सरकार कमी पडते आहे हे म्हणने चुक कसे हे कळत नाही? ते पण रोज रोज असे बॉम्बस्फोट होताना. आम पब्लीक किती काय आणि काय काय करणार? की आता केवळ एखाद्याचे नाव मोहमद आहे आणि एकाचे राम तर त्या दोघांवरही शेजारी पाळत ठेवणार?

एअरपोर्ट वर एक्स रे मशिन वगैरे फक्त खाबूगिरीचा प्रकार आहे. >>> आँ? मी रोज ट्रॅव्हल करतो (दर आठवड्यात किमान दोनदा कमाल चारवेळेस सुद्धा) त्यामुळे मी तरी असे म्हणणार नाही. विमान प्रवासात परत एकदा विमान कुठे तरी कोसळेल, धडकेल अशी भिती अजिबात वाटत नाही. कारण प्रिव्हेंशंन इज बेटर. ... अगदीच पॅट डाउन नको असले तरी जे आहे ते योग्य आहे. आणि त्यामुळे अगदी एक हल्ला जरी व्हायचा वाचला तरी ते खूप आहे. काही जीव त्यात वाचतात हे महत्त्वाचे नाही का?

परत एकदा लोकांनी भ्रष्टाचार करू नये, कायदा पाळावा, जागरुक असावे हे आहेच. पण फक्त त्याचाच फायदा नाही. कोणी एक केदार नावाचा नागरीक पाकव्याप्त काश्मीर मधून किंवा इतर कुठून घुसखोरी होत आहे ती थांबवू शकत नाही, त्याला यंत्रना लागते आणि ती यंत्रना कुचकामी ठरत आहे हे मान्य करायला काय हरकत आहे? हे सरकारला दोष देणे नाही तर आहेत त्या कमी मान्य करणे व त्या दृष्टीने पाऊले उचलणे आहेत.

नाहीतर तिकडे राष्ट्रवादीला गृहमंत्री केले, मी राजीनामाच देतो,(इती महा मुख्यमंत्री) आणि इतने बडे शहर मे ऐसी छोटी बाते होती है, (आबा) वगैरे बोलणारे आहेतच. पक्षीय लेव्हलच्या पुढे जाऊन कोणी विचार करणार का?

जाता जाता सामान्य नागरिक असे सिरीयल बॉम्बस्फोट रोखू शकतील ह्यावर माझा विश्वास नाही. कदाचित मी चुकीचा असेन पण सध्या तरी हाच विश्वास आहे.

गजानन यांनी धागा चालू करताना खालील वाक्यं लिहिली आहेत.
मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातली/देशातली ही परिस्थिती सुधारून असे हल्ले टाळण्यासाठी एक नागरिक म्हणून तुमच्या मते 'मी' काय करणं अपेक्षित आहे?
'मी' म्हणजे भारत देशातला एक सामान्य नागरिक.

त्यामुळे सरकार्/शासन/विविध गुप्तचर यंत्रणा यांनी काय करावं याबाबत मला वाटतं सर्वांचं एकमत असेलच. प्रश्न हा होता की एक सामान्य नागरीक म्हणून मी काय करू शकतो. तर चर्चा/प्रतिसाद त्या दृष्टीने असावेत.

तसेच सरकार्/शासन/राजकीय पक्ष यांनी काय करायला पाहिजे याची चर्चा करण्यासाठी योगनी धागा चालू केलेला आहेच. http://www.maayboli.com/node/27348

>>अमेरिकेने केलेल्या "कडक" उपायांमुळे अमेरिकेत ९/११ नंतर दहशतवादी हल्ला झाला नाही हे काही तितकेसे खरे नाही. <<

तमाम (अमेरिका: आतिल आणि बाहेरील) अनभिज्ञ लोकांच्या माहितीसाठी, कृपया खालची लिंक वाचा आणि ठरवा कडक उपाय प्रभावी ठरले कि नाहि ते...

http://www.heritage.org/Research/Reports/2010/04/30-Terrorist-Plots-Foil...

समीर
धन्यवाद. ज्या हेतूने धागा सुरू झालाय त्याची आठवण करून दिल्याबद्दल. पण असे लिहीणारे मूर्ख आहेत अशा अर्थाच्या पोस्टस इथे पडल्याने आता कुणी तसे लिहील असे वाटत नाही. सरकारने काय केले पाहीजे, इंटेलिजन्सने काय केले पाहीजे, लोकांनी काय केले पाहीजे वगैरेच दळण आता इथे दळले जाईल. "मी" फक्त गोष्टी सांगेन युक्तीच्या !!

एका चांगल्या धाग्याचा अकाली मृत्यू झाला हे दुर्दैव !

हॅरी पॉटरचा पाचवा भाग आज पहात होतो तेंव्हा एक जाणवले.
व्हॅलडरमॉट हा अतिरेकी आहे - समजुन सवरुन तो वाईट गोष्टी करतो.
डंबलडोरला जी मिनिस्ट्रीतील बया रिप्लेस करते ती भ्रष्टाचारी (म्हणजे तुमच्या - आमच्यासारखी) असते - तशी गोड, साधी, पण तिच्या नकळत काळ्याकृत्यांना मदत करणारी.
अशा बया (किंवा माणसे) नसतातच किंवा त्यांच्यामुळे व्हॅलडरमॉटला मदत होत नाही असे म्हणणारे डोळे असुन आंधळे.
चुपचाप बसणारे हे त्या शिडीवाल्या मदतनिसासारखे ...

फचिन, कसाबला त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल फासावर चढवायलाच हवे. पण 'कसाबला फासावर न चढवल्यानेच अतिरेकी हल्ले होतायत' असा सूर काही जणांचा असतो, म्हणुन मी पोष्ट टाकली होती.

एकंदरीत चर्चा पाहता 'सरकार' आणि 'सरकारच' असे हल्ले टाळण्याकरता काही करु शकते हेच अधोरेखित होत आहे असे दिसते.

मी" फक्त गोष्टी सांगेन युक्तीच्या !! >>. कृपया वैयक्तिक नका होऊ. आपणास माझा मुद्दा मान्य नसेल तर आपण तसे सांगावे पण "मी" वरून तलवार ओढायची गरज नाही. निदान ह्या बाफवर तरी वैयक्तिक दोषारोप नको.

आणि मी इथे पोस्ट लिहिण्याआधी १०० पोस्ट पडल्या त्यात दहशतवादी कसा तयार होतो ते विज निर्मिती ते अमेरिकेची उपाययोजना असे सर्व आधीच आले होते.

चर्चा सर्वांगाने होणारच. विषयच तसा आहे. उदा "मी" भ्रष्टाचार मुक्त भारत करेन हे "माझ्या मते" स्वप्न आहे! मी भ्रष्ट्राचारी नाही त्यामुळे जे लेखक वाचक मी भ्रष्टाचार करणार नाही असे म्हणत आहेत, तो उपाय द्रुदैवाने "मला" लागू होत नाही. शिवाय "मी" भारतात राहत नाही, म्हणजे "मी" इथे लिहूच नये, कारण भारतीय नागरिक "मी" असेही आहे.

अशा बया (किंवा माणसे) नसतातच किंवा त्यांच्यामुळे व्हॅलडरमॉटला मदत होत नाही असे म्हणणारे डोळे असुन आंधळे >>. बरोबर आशिष. पण मेख अशी आहे की ती बया बरेचदा हे मुद्दाम हे करत नाही नकळत करते. आणि असे आपल्याकडूनही होत असेल.

मी आधीही लिहिले की भ्रष्टाचार केवळ बॉम्ब ब्लास्ट झाले म्हणून संपणार नाही, त्यातून आपण मार्ग काढायला हवा. पण ते ही इथे लोकांना पटत नाही असे दिसते. एकतर मी फार रियॅलिटीत जगत आहे किंवा इतर डिनायल मध्ये असे ला वाटायला लागले आहे.

भ्रमर, सरकारच हल्ले टाळू शकते. पण नागरिक फार तर भ्रष्टाचार न करणे, कायदे पालन करणे, मतदान करणे आपण सामान्य नागरिक फक्त तेच व्यवस्थित करू शकतो व करावे ही सर्वांची अपेक्षा रास्त आहे. पण "मी" वर हा विषय थांबत नाही असे माझे प्रामाणिक मत आहे. <em>अमेरिकेत ९/११ च्या आधी फार भ्रष्टाचार होता, कायदे पालन नव्हते, गुंडगिरी होती आणि एकदम ९/११ मुळे नंतर बदलले का? विचार केल्यावर उत्तर काय मिळेल?

माझे मुद्दे पूर्ण अमान्य असतील तर सिरियल बॉम्ब ब्लास्ट "मी" कसे थांबवू शकतो हे आता तुम्हीच समजावून सांगा. तो माणूस को ऑर्डिनेट करून तीन ठिकानी १ मिनिटाच्या आत ब्लास्ट घडवतो, हे किती लोक (किती "मी") थांबवू शकतील.

केदार,
गजाननाने <<कविता करणं
ललित/लेख लिहिणं
शासनाला दोष देणं
चरफडत बसणं
मिडियाला शिव्या देणं

या व्यतिरिक्त.>> असं लिहिलं आहे. म्हणजे 'शासनाला दोष देणं' या व्यतिरिक्त. Happy

चिनूक्स माझे मुद्दे अमान्य असतील तर खोडू शकतोस. Happy

या व्यतिरिक्तचा अर्थ परत "मी" मला हवा तसा घेतला**. Happy शासनाला नुसताच दोष देणे आणि योग्य त्या चुका दाखवून देणे ह्या दोन्हीत फरक आहे. मी दुसरी गोष्ट करत आहे.

** इथे कोणी तरी विज निर्मीती केली म्हणजे दह्शतवाद थांबेल असे काहीसे लिहिले, तेच स्वातंत्र्य घेऊन Happy

>>> स्फोट होऊन २४ तास होऊन गेले आणि अजून अमूल बेबीच्या शेपटाने (दिग्विजयने) संघपरिवाराकडे कसे बोट दाखविले नाही?

माऊथ डायरिया झालेल्या दिग्विजय नावाच्या गाढवाने अजिबात अपेक्षाभंग केला नाही. अपेक्षेप्रमाणे त्याने संघपरिवाराकडे बोट दाखविले आहे.

http://www.indianexpress.com/news/mumbai-blasts-cant-rule-out-hand-of-hi...

अशा आरोपांमुळे, प्रत्येक अतिरेकी हल्ला झाला, की, तो "हिंदूंनीच" केला, असे पाकिस्तानला म्हणण्याची संधी मिळत आहे. काही अमेरिकन वृत्तपत्रातसुध्दा, "भारतातल्या अतिरेकी हल्ल्यात फक्त मुसलमानांचाच सहभाग नसतो, हिंदूंनीही काही हल्ले केल्याचे उघड झाले आहे", अशा अर्थाच्या बातम्या येत आहेत. जर खरंच काही हिंदूंनी अशी कृत्ये केली असतील, तर, त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. पण मालेगावचे निमित्त करून, हातात कोणताही पुरावा नसताना, साध्वी प्रज्ञासिंग व इतरांना गेली ३ वर्षे जामीन न देता डांबून ठेवले आहे. हा खटला अजून सुरूच झालेला नाही. प्रत्येक वेळी त्यांनी जामीन मागितला की, अजून तपास संपलेला नाही, असे एकच उत्तर सरकार पक्षाकडून येते. त्यामुळे कोर्ट जामीन देत नाही. त्यांचा अतोनात छळ करून त्यांचा कबुलीजबाब मिळविण्याचा प्रयत्न झाला. अजूनपर्यंत त्यात यश आलेले नाही. आता २००६ मध्ये झालेल्या समझोता एक्स्प्रेस मध्ये स्फोटामध्येही हिंदूंना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

यात २ हेतू आहेत. २००६ मधले समझोता एक्स्प्रेस व मुंबई लोकल्स मधले स्फोट, २०१० मधला जर्मन बेकरीतला स्फोट या व अशा अनेक स्फोटांमधले कुठलेही मुख्य गुन्हेगार अजून सापडले नाहीत. त्यामुळे काही हिंदूंना अटक करून डांबायचे व गुन्हेगार पकडल्याबद्दल आपली पाठ थोपटून घ्यायची, हा दुय्यम हेतू. आणि मुख्य हेतू म्हणजे भाजपवर राजकीय कुरघोडी करायची.

>>> दहशतवाद : मी काय करणं अपेक्षित आहे?

भाजपवर राजकीय कुरघोडी करण्याच्या अशा अत्यंत बेजबाबदार प्रयत्नामुळे व अशा अत्यंत मूर्खपणाच्या विधानांमुळे भारताची दहशतवादाविरूध्दची लढाई डायलूट होत आहे. दिग्विजयसारखे अत्यंत बेजबाबदार व बेताल बरळणारे ज्या पक्षात आहेत, निदान, त्या पक्षाला तरी मत देऊ नका. तेवढाच दहशतवादाविरूध्द्च्या लढाईत आपला सहभाग वाढेल.

दिग्वीजय सारख्यांवर देशविघातक विधाने करण्यासाठी टाडा खालीच खटला भरला पाहिजे. ईथे सामान्य मनुष्य आणि शहर जळतय आणि या भो**** ला शाब्दीक डायरीयाचे झटके येत आहेत. खरच उचला याला.
"मी" काय करू शकतो या लिस्ट मध्ये हे नक्की अ‍ॅड करता येईल.
(आपल्या देशात सामान्यांनी मतदान केले तरी मरा, नाही केले तरी मरा अशी परिस्थिती आहे!)

रच्याकने: काल "मुंबई स्पिक्स" मध्ये एका शाळेत जाणार्‍या मुलाने थेट तोफ डागली: अगर राहुल गांधी कहेते है की आतंकी हमले नही रोक सकते तो गद्दी पर क्यू बैठे है?....... जे भल्या भल्यांना आकलत/जमत नाही ते एका शाळकरी पोराने करून दाखविले: सलाम!

बाकी इथली नेहेमीची ठराविक मंडळींची (स्युडो सेक्युलर जमात) मुक्ताफळे वाचून भयंकर करमणूक होते आहे. मला आता खरच असे वाटू लागले आहे की वीज निर्मीतीपासून ते हॅरी पॉटर पर्यंत सर्व पाहून यावे.. feeling of empowerement might just come!!!

गजानन

तुम्हाला अभिप्रेत चर्चा होणार नाहीच. तर मी काय करू शकतो याबद्दल आता प्रॅक्टिकल लिहूयात

यानिमित्ताने

१. मी लोकांना मूर्खात काढू शकतो
२. विरोधात असणा-या सर्वांवर चिखलफेक करू शकतो.
३. आपल्या विरोधात जाणा-या मुद्यांवर आगपाखड करू शकतो.
४. फक्त सत्ताधा-यांना नावे ठेवू शकतो
५. माझी काही कर्तव्ये असू शकतात असं सांगणा-यांचा (परखड वगैरे) समाचार घेऊ शकतो.
६. वादविवाद स्पर्धेत ढाल मिळणार असल्याप्रमाणे संगणकाची स्क्रीन, वीज इ. इ. (कार्यालयच्या खर्चाने) जाळू शकतो.
७. केवळ माझा मुद्दा मांडून मी स्वस्थ बसणार नाही. तर विरोधातील प्रत्येक मुद्दा हा माझ्याच विरोधात आहे असं समजून वैयक्तिक भांडण सुरू करू शकतो.

असे बरेच पराक्रम मी करू शकतो.. जे करणार नाही त्याची अपेक्षा धागाकर्त्याला असेल तर त्याची पर्वा मी करणार नाही.

दिवे घ्या

नेहेमीचेच यशस्वी इथे आलेले आहेत. जो माणुस येरवडा येथील इस्पितळात पाहिजे (अण्णा हजारेंच्या म्हणण्याप्रमाणे) त्याच्या म्हणण्याला महत्व देउन हाफ चड्डिवाले स्वतःवर स्वतःच का ओढवुन घेत आहेत कळले नाहि Proud

Pages